"बाल"कवी

Submitted by संयोजक_संयुक्ता on 27 January, 2011 - 18:33

mbs_balkavi.jpgछोट्यांसाठी कविता स्पर्धा

माझं नाव चिऊ, आडनाव चिमणे
आवडतात मला खायला दाणे||१||

माझं नाव काऊ, आडनाव कावळे
सगळे म्हणतात तुम्ही किती बावळे||२||

माझं नाव माऊ, आडनाव मांजरे
सगळ्यांपेक्षा आहेत डोळे माझे घारे||३||

ही आपल्या छोट्या अवनीला सुचलेली कविता.. पोस्टरसाठी हवी म्हटल्यावर एका आवडत्या कवितेवरुन प्रेरणा घेऊन तिने लिहून दिली. या छोट्यांमध्येही "बाल"कवी दडलेले आहेत. मग स्पर्धेसाठी अजून कोण कोण लिहिणार कविता?

स्पर्धेसाठी नियम व माहिती-

१. कविता छोट्यांना स्वतःला सुचलेली असावी.

२. कविता मराठी असावी.

३. स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.

४. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात), ऑडियो किंवा व्हिडियो स्वरुपात पाठवता येतील. लिखीत प्रवेशिका मुलांच्या हस्ताक्षरातच असावी. एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवता येतील.

५. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व गट लिहावा तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.

६. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : Baalakavi असे नमूद करावे.

७. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी, २०११

संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.

मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.

धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहे..
हा उपक्रम मला सगळ्यात जास्त आवडला. या निमित्ताने आया मुलांच्या मागे लागतील, काहीतरी खरड म्हणुन.. Happy ज्यांना मुलांना देवदत्त देणगी आहे त्यांना जाणिव होईल की आपणही दोन ओळी लिहु शकतो म्हणुन...

इमेल पाठवलय काल. मिळालं असल्यास पोचपावती मिळू शकेल का प्लीज. नसेल मिळालं तर परत पाठवता येइल कळलं तर

पौर्णिमा , ऑडियो किंवा व्हिडियो पण चालेल त्यामुळे लिहायचे नसेल तर रेकॉर्डींग करुनही पाठवू शकतेस Happy

ऑडियोचा प्रयत्न करते. (अपलोडिंगला स्पीडचा प्रॉब्लेम येऊ शकतो.)
पण प्रश्नाचं उत्तर द्या की Uhoh

पौर्णिमा,

प्रवेशिका मुलांच्या हस्ताक्षरातच हवी आहे. त्यामुळे पालकांनी लिहिलेली चालणार नाही. तुम्हाला ऑडीयो किंवा व्हीडीयो प्रवेशिकाही पाठवता येतील.

धन्यवाद.

हां. आता कसं! Happy
धन्यवाद.
वरच्या ४ नंबरच्या नियमांतही हे टाका कृपया.