ए वतन, ए वतन, हमको तेरी कसम....

Submitted by स्मितहास्य on 27 January, 2011 - 01:08

ऐ वतन, ऐ वतन, हमको तेरी कसम.... या देशभक्तीपर गीताच्या ओळी कानावर पडल्या त्या काल सकाळी ठाणे स्टेशनमधे शिरतांना. निमित्त होतं आपल्या ६२व्या प्रजासत्ताकदिनाचं, आणि मी निघालो होतो शिवाजी पार्कला, तिथे होणार्‍या विविध दलांतील जवानांच्या परेड टिपायला.

सकाळी लवकर पार्कात पोहोचणं आवश्यक होतं, कारण एक मित्राला सकाळी ७ला साक्रीयासमोर भेटायला बोलावलं होतं, आणि लवकर पोहोचून फोटोशूटपण करता आलं असतं. सकाळी ६.००ला घर सोडलं व तडक स्टेशन गाठलं. नेहमीच्या कर्णकर्कश्य आरोळ्यांनी दुमदुमणारं स्टेशन आज देशभक्तीपर गीतांनी भारून गेलं होतं. एक वेगळंच वातावरण होतं काल.

दादरला उतरलो तेव्हा ७ वाजत आले होते. तसाच पणशीकरच्या मागच्या गल्लीतून पार्कात पोहोचलो तर मित्रसुद्धा आलेला होता. दोघांनीपण आपापले कॅमेरे बॅगेतून बाहेर काढले आणि सुरू झालो. एका पोलिसाने सागितलं की पार्कात आत एंट्री नाही. थोडासा हिरमोड झाला खरा, पण आजूबाजूला एक मस्त असा माहोल तयार झाला होता. ठिकठिकाणी वेगवेगळ्या दलातील जवान आपापले गणवेष घालत होते, तर कुठे शाळेतल्या आर.एस.पी वगैरे मुला-मुलींचा सराव चालू होता. संपूर्ण शिवाजी पार्क वेगवेगळ्या रंगांच्या गणवेषधारी जवानांमुळे फुलून गेलं होतं. प्रत्येकजण एकदम टापटिप व निटनिटका दिसत होता. जागोजागी पहारा होता, गाड्या वेगवेगळ्या रस्त्यांनी फिरवल्या होत्या, पण कुठेच रहदारी खोळंबलेली नव्हती.

परेड ९.३० ला सुरू होणार होती, म्हणून बरेच फोटो काढून झाल्यावर मोर्चा वळवला चौपाटीकडे. सी लिंक पुर्ण धुक्यात अद्रुष्य झाला होता. ज्या पोलिसांची ड्युटी तिकडे होती ते थोडे रिलॅक्स दिसले, त्यांचे फोटो घेतांना कोणी मधेच सावध व्ह्यायचे, तर कोणी चेहरा झाकायचे तर कोणी बिनधास्त पोझ द्यायचे आणि मग फोटो कसा आलाय हे तर अतिशय उत्सुकतेने बघायचे. य सगळ्या गोष्टीत तमाम भारतीय नागरीकसुद्धा गर्दी करायला लागले होते, त्यामुळे मोक्याची जागा शोधण्यासाठी आम्ही दोघेही परत माघारी फिरलो.

पार्कात एंट्री नसल्या कारणाने परेड ज्या गेटमधून बाहेर पडणार होती त्या गेटसमोर फत्कल मांडलं आणि वाट पाहू लागलो. बरोबर ९.३० ला गेट उघडलं गेलं आणी एका-मागोमाग एम असे करत पर्त्येक दल मार्चिंग करत बाहेर येऊ लागलं, त्यांची ती शिस्त, चालण्याची ऐट, सारच कसं एकदम भारदस्त. त्यानंतर बाहेर येणारी क्षेपणास्त्रे..... एकदम रोमहर्षक. प्रत्येक दल बाहेर पडल्यावर होणारा टाळ्यांचा वर्षाव......... अंगात एक वेगळात उत्साह संचारला होता.

संपूर्ण सोहळा कॅमेरात बंदिस्त केला.... एक अनोख्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार ठरलो होतो आम्ही दोघे.
ज्या लोकांमुळे आपण प्रत्येकजण इतका बेफिकीरपणे जगू शकतो त्या लोकांना माझा खरच मनापासून सलाम.

पावले घराच्या दिशेने वळली तेव्हा मनात होता, अभिमान. एक भारतीय असल्याचा... आणि तो द्रुढ करणारं देश्भक्तीपर गीत,

ए वतन, ए वतन
हमको तेरी कसम
तेरी राह मे जान तक लुटा जायेंगे.......

=========================================================================

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
बघू माझा फोटो कसा आलाय??? (अपुर्व आणि एक पोलिस)

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४
प्रतिबंधित क्षेत्र

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९
कोडॅक मोमेंट

प्रचि ३०
थ्री इडियट्स

प्रचि ३१
परेड बाहेर यायला सुरूवात झाली...

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

प्रचि ५९
परतीचा शेवट या दोन फोटोंनी झाला...

प्रचि ६०

गुलमोहर: 

अप्रतिम फोटो.
>>>>ज्या लोकांमुळे आपण प्रत्येकजण इतका बेफिकीरपणे जगू शकतो त्या लोकांना माझा खरच मनापासून सलाम. <<<< अगदी खर.

सर्वांचे मनापासून आभार.. Happy
प्रचि २६ - या देशाची सद्यस्थिती दाखवतो.>>>> अनुमोदन..
यतिन, प्रतिसादाबद्दल धन्स... बर्‍याच दिवसांनी अवतरलास माबोवर रे.... Happy

Pages