रक्तदानाचे फायदे!

Submitted by हर्ट on 25 January, 2011 - 10:46

मला माझा एक मित्र म्हणाला की ज्या व्यक्तीचा रक्तदाब उच्च असतो त्यानी जर रक्तदान केले तर रक्तदाब कमी होतो. एक मित्र म्हणाला की रक्तात जर कोलेस्टेरॉलची प्रमाणे अधिक असेल तर रक्तदानाचा फायदा होतो. मान्य आहे रक्तदान केल्यानी समाजहिताला आपण हातभार लावतो. पण थोडे स्वार्थी होऊन स्वत:ला रक्तदानामुळे काय फायदे होतात हे इथे विचारावेसे वाटते. जर उच्च रक्तदाब असलेले रक्त एखाद्याने घेतले तर त्याचा रक्तदाब वाढेल का? धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बी
http://www.webmd.com/ ही साइट बघ, तुझ्या मित्रांनापण बघायला दे. उगीच इथे तिथे विचारून काहीतरी अर्धवट माहिती मिळवण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी एकदा एखाद्या इस्पितळात जावून माहिती मिळवणे जास्त योग्य नाही का.

ओ बी, दोन गोष्टी मिश्र करताय राव. अतिरक्तदाब कशाने होतो माहितीय का? जरा मूळ कारन नीट माहित करा.

तुम्ही रक्तदान करता का? मग कोनत्या रक्तदान पेढीत अतिरक्तदाब असलेल्या मानसाला रक्त द्यायला संमती असते सांगा? त्याची तक्रार करा लगेच. आम्हाला सांगितलेला नियम असा हाय की अतिरक्तदाबाच्या इसमाने रक्त देवू नये. ज्याला रक्ताची लफडी( मराठीत प्रॉबलेम) आहेत त्याने रक्त देवू नये. व इतर कारनं बरीच आहेत कि का देवू नये, कुठल्याही पेढीत जा व विचारा की तुम्हाला रितसर कारणं हवीत कारण तुम्हाला रक्त दान करायचेय आनि तुम्हाला अतिरक्तदाब आहे सांगा मग ते नाकारले की विचारा कारणं. उत्तम म्हंजी डॉक्टरला भेटा, मित्रांना भेटून इचारु नका. Wink

दुसरे म्हंजी, कवाबी रक्तदान दिले की साधारण रक्तदाब असलेल्यांचा पन रक्तदाब थोडा वेलच खाली जातो पन असा काय कायमचा कमी होत नाय..

कोलेस्टेरॉलच्या बाबतीत काहिबाहि शास्त्रज्ञांनी लिवलय पण ते काय अजुन नक्की नाय काय. तुमचे मित्र डॉक्टर आहेत काय? Wink
आमी कवाकवा करतो रक्तदान.. तेवा थोडी फार माहिती आहे.

मला संगितलेली माहिती अशी.
साठ वया पर्यंत रक्त दान करता येते.
थायरॉईड च्या रोग्यानी-त्यांचे औषध चालू असल्यास करू नये.
तसेच डायबेटीस च्या.
दिलेल्या रक्ताची झीज २ दिवसात भरून निघते.
बी पी व इतर रोग्यानी फॅमिली डॉ ला विचारून निर्णय घ्यावा.
केस टू केस रोगाच्या तीव्रतेवर अवलंबून आहे.
गर्भवती स्त्रियानी करू नये.

बी ,जरा विचार करत जा रे अशा माहितीवर विश्वास ठेवण्याच्या आधी .

काही डॉक्टर्सचे असे मत असते की शरिरातले / रक्तातले पाणी कमी केले तर त्याने अति रक्तदाबाला मदत होउ शकते. पण हा उपाय सर्वच लोकांना लागू होत नाही. ब्लड प्रेशरच्या काही औषधांमधे डाय युरेटिक्स (diuretics ) असतात. ते रोज घ्यावे लागतात अन त्याने रोजच्या रोज किडनीचा डाययुरेसिस रेट वाढतो - त्याची परिणती जास्त वेळा मूत्र विसर्जनात होते.

३ महिन्यातून एकदा काही औंस रक्तदान करुन त्याने काही नोटिसेबल फायदा कसा होइल ?

दुसरे , शरिरात अतिरिक्त कॉलेस्टेरॉल तयार होत असेल तर रक्तदान करण्याने त्यात कसा काय फरक पडेल? नवीन कॉलेस्टेरोल बनतच राहील ना ?

उगीच कोणाच्याही सांगण्यावर विश्वास ठेवायचा हे तुला शोभत नाही. थोडा अ‍ॅनलिटिकल, क्रिटिकल विचार करत जा . आंतरजालावर काही विश्वसनीय साइट्स आहेत तिथली माहिती वाचून पहा. रुनीने दिलेली साईट फार उपयुक्त आहे.

रच्याकने रुनी किंवा धनी यांच्या च्या पोस्टमधे मला तरी चिडका सूर दिसला नाहीये. त्याम्नी दिलेले सल्ले तुला पटले नसतील तर त्या सल्ल्यांना "रागावणे" का म्हणतोस ?