मला आवडलेले चित्रपट : Everything Is Illuminated

Submitted by नेतिरी on 25 January, 2011 - 00:33

आपण एखादी गोष्ट शोधण्यास जेंव्हा निघतो तेंव्हा आपणाला काय शोधायचय ते माहिती असत पण ते हातात येत तेंव्हा त्याचे संदर्भ इतके बदललेले असतात की आपण नक्की काय शोधत होतो असा प्रश्न पडतो.या वर थोडासा प्रकाश टाकणारा भन्नाट चित्रपट म्हणजे Everything Is Illuminated.

जॉनाथन (एलायजा वुडस्) च्या आजीने मरताना त्याच्या collection साठी एक जुविश तारा असलेले लॉकेट आणी जुना फोटोग्राफ दिलाय त्यात त्याचे आजोबा एका स्त्री बरोबर उभे आहेत आणी मागे लिहिलय "ऑगस्टिन आणी मी, त्राचिमब्रोद १९४०".चित्रपट थोडासा मागे जातो यात लहानगा जॉनाथन आपल्या नुकत्याच मरण पावलेल्या आजोबांच्या पलंगाशेजारी बसलाय, टेबलावर त्याला एक मोठ लॉकेट सापडत.ते एका प्लास्टिकच्या पिशवीत घालुन तो आजोबांच्या फोटोखाली लावतो.इथुन त्याच्या collection ची सुरुवात होते.आजी ने दिलेल्या फोटोमधील बाईच्या गळ्यात तेच लॉकेट आहे.यानंतर आतापर्यंत त्याने असंख्य गोष्टी जमवलेत. पेन,नोटा,पायमोजे,चमचा. नुकत्याच निर्वतलेल्या आजीची दातांची कवळी तिच्या फोटोखाली लावलिये.आता हा जॉनाथन युक्रेन ला निघालाय.ऑगस्टिन आणी त्राचिमब्रोद शोधायला.त्याच्या आजोबांना हॉलोकोस्टच्या वेळेस देश सोडुन पळुन जाण्यास या ऑगस्टिनने कदाचित मदत केली असावी एवढीच जुजबी माहिती त्याच्याकडे आहे.इकडे युक्रेन मधे त्याचे वाटाड्या असणार आहेत अतिशय विचीत्र ईंग्रजी बोलणारा आलेक्झांडर "अ‍ॅलेक्स" पेर्चोव्ह (युजिन हुत्झ) आणी त्याचे चक्रम आजोबा (बोरिस लेस्किन).या आजोबांनी १९५० मधे हा heritage tours चा व्यवसाय सुरु केलाय, ज्यात ते श्रीमंत ज्युविश लोकांना हॉलोकॉस्टच्या वेळेस हरवलेल्या किंवा बळी पडलेल्या नातेवाइकांना शोधण्यास मदत करतात. गंमत अशीये की आजोबांना ज्यु लोकांचा अतिशय तिटकारा आहे.आजोबा खरे तर आता नीवॄत्त आहेत, शेवटी त्राचिमब्रोद चे नाव ऐकुन ते तयार झालेत पण अट अशी आहे की samy davis jr.jr ही त्यांची कुत्री पण बरोबर येणार.आजोबा एक मोठा काळा चश्मा घालतात आणी त्यांनी डोक्यात घेतलय की ते आंधळे आहेत.हे फक्त बोलण्यासाठी बाकी त्यांना सगळ व्यवस्थीत दिसत.जॉनाथन चे collection प्रवासातपण सुरुच आहे.ट्रेन मधल्या batharoom मधुन त्याने सोप् च्या दोन बाटल्या पिशवित टाकल्यात्.कमरेला कॅमेर्‍याच्या बॅग मधे त्याने बर्‍याच प्लास्टिकच्या पिशव्या भरुन ठेवल्यात, collection साठी.काचेच्या गोट्यांसारखे हिरवे निळे डोळे,मोठा चश्मा, चप्पुन बसवलेले केस, साधारण उंची आणी संपुर्ण चित्रपटभर सुट घालणारा जॉनाथन एकदम लल्लू दिसतो.चित्रपटात मधेच वहीवर लिहिलेल शिर्षक येत "commencement of very rigid search"ट्रेन थांबताच त्याला अ‍ॅलेक्स दिसतो जॉनफॅन असा फलक हातात आणी मागे स्वागता साठी मोठा बँड.अ‍ॅलेक्स चांगलाच उंच आहे, डाविकडचा एक दात चांदिचा, गळ्यात साखळ्या आणी अंगात ट्रॅकसुट.अ‍ॅलेक्सला अमेरिकेचे भारी आकर्षण आहे, खास करुन मायकल जॅक्सन.ड्राइव्हरच्या सिटवर आजोबा बसलेत, दाढिचे आणी डोक्याचे केस पुर्ण पांढरे झालेत, डोळे अगदी मिचमिचीत चेहर्‍यावर प्रचंड वैताग.मागे samy davis jr.jr. "seeing eye bitch" असा युनिफॉर्म घालुन बसलिये.ही कुत्री प्रचंड हिंसक दिसते आणी गुरगुरते सुद्धा.जॉनाथन ला कुत्र्यांचा phobia आहे पण आजोबांनी फर्मान सोडलय "the bitch and the jew will share the back seat".प्रवास सुरु होतो, जॉनाथन कुत्रीला घाबरुन अंग चोरुन बसलाय.अ‍ॅलेक्स त्याला विचारतोय "did u able to repose well" (निट झोप लागली का).कुत्रीच नाव अस विचित्र का ठेवलय विचारल्यावर, सॅमी डेविस हा अजोबांचा आवडता गायक आहे हे उत्तर मिळत.जॉनाथन म्हणतो तो ज्यू आहे, अ‍ॅलेक्स आश्चर्याने आजोबांना विचारतोय, अजोबा म्हणतायत "bullshit".अ‍ॅलेक्स विचारतोय मायकेल जॅक्सन पण ज्यू आहे का?पुढचा प्रवास चालू राहतो, मधेच मस्त रशियन/युक्रेनियन गाणं.वाटेत सगळे जेवणासाठी थांबतात, इथे कळत की जॉनाथन शाकाहारी आहे उरलेले दोघे प्रचंड आश्चर्यचकीत.शेवटी याला फक्त उकडलेला एक बटाटा मिळतो, त्याचा एक तुकडा जातो collection पिशवित.वहीत शिर्षक येत "a very rigid search".वाटेत जुनी मोडकळीस आलेली इमारत दिसतिये जॉनाथन म्हणतोय what is it? अ‍ॅलेक्स-soviets. जॉनाथन - what happened? अ‍ॅलेक्स - independence. रस्ता दाखवणार्‍या माणसाला जॉनाथन मार्लबरोच एक पाकिट देतोय कारण त्याने गाइडबुक मधे वाचलय युक्रेन मधे मार्लबरो मिळत नाही, टीप म्हणून सर्वांना द्या.विचित्रपणे याच्याकडे बघणार्‍या त्या माणसाला अजोबा सांगतायत "तो शाकाहारी आहे".are there any negro accountants in america?असे अ‍ॅलेक्स विचारतोय.जॉनाथन - you don't want to use that word.नंतरचा प्रश्न आहे are there any homosexual accountantants? जॉनाथन - there are homosexual everything, there is homosexual garbage man. अ‍ॅलेक्स - how much currancy negro homosexual accountant receive?
वाटेत गाडीतला गॅस संपलाय, अजोबा एका कुराणावर विमनस्कपणे थांबलेत समोर दुसर्‍या महायुद्धातले रणगाडे पडलेत.आता एकदम एका ओळित उभे राहिलेले ज्यू दिसतायेत, प्रत्येकांच्या कोटवर पिवळा तारा.समोर बंदुक घेउन थांबलेले सैनिक.आजची रात्र बाहेरच झोपलेत सगळे.अ‍ॅलेक्स जॉनथनला सांगतोय अजोबा मला नेहमी स्वप्न बघत असल्या सारखे वाटतात. सकाळी आजोबांनी कुठुन तरी गॅस मिळवलाय, पुढचा प्रवास जास्तच scenic होत चाललाय.रस्त्याच्या दोन्हीं बाजूला हिरवीगार कुरणं.अचानक अजोबा सांगु लागतात हा युक्रेन मधील सर्वात सुपिक प्रदेश आहे, युद्धापुर्वी तर प्रेमात पडण्यासाठी याहुन सुंदर जागा नव्हती.आपले आजोबा युद्धाआधी इथे येउन गेलेत हे ऐकुन अ‍ॅलेक्सला आश्चर्य वाटतय.आकाशात मोठा अर्धा चंद्र दिसतोय अजोबांच लक्ष सारख त्याच्याकडे आहे, गाडीच्या रिअरव्ह्यु मिरर मधुन सुद्धा सारखा तो दिसतोय.शेवटी गाडी एका सुर्यफुलांच्या शेतासमोर थांबते.अख्या शेतात फक्त एकच घर आहे, अजोबा म्हणतात इथे जाउन विचारा.वहीत शिर्षक येत "overture to illumination ".आत एक आजी आहेत, अ‍ॅलेक्स त्यांना जॉनाथनच्या आजोबांचा फोटो दाखवतोय आणी त्राचिमब्रोद कुठे आहे विचारतोय.आजी म्हणतात मिच आहे त्राचिमब्रोद.आजींच्या घरात सगळे जमलेत, घर अनेक पेट्यांनी भरलय, हॉलो़कॉस्टमधे मारल्या गेलेल्यांच्या अनेक वस्तू गोळा करुन त्यात ठेवल्यात्.अ‍ॅलेक्स म्हणतोय
she is also collector.ऑगस्टीन ही आजींची बहीण असते.तिच साफ्रान या जॉनाथन च्या आजोबांशी लग्न झालेल असत.अमेरिकेत जाउन सेट्ल होउन तिला बोलवुन घेउ पर्यंत इकडे युक्रेन मधे हॉलोकॉस्ट सुरु होतो आणी त्यातच ती मरण पावते. इतका वेळ आजींकडे पाहत उभे असलेले अजोबा आजींना तुझ नाव काय आहे विचारतात.आजी पेटीतुन एक फोटो घेउन आजोबांना म्हणतात हा बारुख आहे. गावातल्या लायब्ररितुन सगळ्यात जास्त पुस्तक हाच आणायचा वाचता येत नसुन सुद्धा.लोक म्हणायचे तो वेडा आहे, आम्हा दोघांच्यात तेच साम्य होत.अजोबा दोघांनाही बाहेर जायला सांगतात.बर्‍याचवेळाने ते आणी आजी बाहेर येतात. आता सगळे नदीकिनारी चाललेत.तिथे एका छोट्या दगडावर लिहिलय इथे त्राचिमब्रोद मधल्या १०२४ जणांचा हॉलोकॉस्ट मधे मॄत्यू झाला.आजोबा डोळे मिटुन उभे आहेत आता पुन्हा मघाचा तोच प्रसंग येतो, एका ओळित सगळे ज्यु उभे आहेत, गोळ्या सुरु होतात सगळे खाली पडतात.एकच तरुण वाचतो, डोळे उघडतो तेंव्हा आकाशात मोठा अर्धा चंद्र दिसतो.तो उठुन उभा राहतो अंगातला ज्युविश तारा असलेला कोट काढुन फेकतो आणी तिथुन निघुन जातो.जॉनाथन ने तिथली माती दोन पिशव्यात भरलिये, एक पिशवी तो आजोबांना देतो.
निघताना आजी त्याला ऑगस्टिनची अंगठी देतात आणी सांगतात the ring is not here because of us, we are here because of the ring.परतिच्या प्रवासात एका बाथटब मधे अजोबा आत्महत्या करुन घेतात्.अ‍ॅलेक्स जॉनथनला ट्रेन स्टेशन पर्यंत पोचवतो.जाताना जॉनथन त्याला आपल्या अजोबांच लॉकेट देतो.शेवटी अ‍ॅलेक्स म्हणतो " i have reflected many times upon our rigid search, it has shown me that everything is illuminated in the light of the past".आता वहिच्या पहिल्या पानावर शिर्षक येत "everything is illuminated by alexander perchov". अजोबांना त्राचिमब्रोद मधे पुरण्यात येत.त्यांच्या थडग्यावर लिहिलय अलेक्झांडर बरुख पेर्चोव.चित्रपटाच्या शेवटच्या scene मधे जॉनाथन आणी ज्युविश टोपि घातलेला अ‍ॅलेक्स आपापल्या आजोबांच्या थडग्यावर त्राचिमब्रोदमधलि माती टाकतायत असे दिसते.

२००५ साली प्रदर्शीत झालेला Liev Schreiber या दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट Jonathan Safran Foer च्या पुस्तकावर आधारित आहे ( पुस्तकात आणी चित्रपटात बरेच फरक अढळतात्).चित्रपटाची मांडणी अतिशय वेगळी आहे.सुरुवातिला विनोदी वाटणारा ह चित्रपट मध्यंतरानंतर बराच deep होत जातो. समजत नसली तरी गाण्यांचा ठेका छान आहे.जॉनथन हा "हीरो" असला तरी अ‍ॅलेक्स आणी अजोबा हीच चित्रपटाची बलस्थानं.अ‍ॅलेक्सचं ईंग्रजी ऐकण्यासाठी तरी चित्रपट नक्किच पहावा.

दुसर्‍या महायुद्धावर आणी हॉलोकॉस्टवर अनेक चित्रपट आलेत, तिच कथा अगदी वेगळ्या तरिही खिळवुन ठेवणार्‍या पद्धतीने हा चित्रपट सांगतो.

Note : if anyone is interested in watching, movie is available on youtube.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users