मला आवडलेले चित्रपट : घटश्राद्ध

Submitted by नेतिरी on 22 January, 2011 - 02:42

जवळपास ८/९ वीत असताना हा चित्रपट पहिलेंदा पाहिला होता, कानडी येत असल तरी अतिशय गंभीर विषया मुळे फारसा कळलाच नाही.घरी दर्जेदार चित्रपट पाहण्याचा नेहमीच आग्रह असायचा.कॉलेज मधे असताना पुन्हा नेटाने पाहीला आणी "घटश्राद्ध" ने मनावर जबरदस्त पकड घेतली.पहिली काही वर्ष तो मला bold आणी वेगळ्या कथे मुळे आवडायचा.नंतर याच पार्श्वसंगीत, अभिनय, cinematography सगळच आवडत गेल.

१९७७ मधे FTII मधुन नुकत्याच pass out झालेल्या गिरीश कासारवल्ली या प्रतिभावान दिग्दर्शकाचा हा पहिला चित्रपट. हा चित्रपट पाहताना नेहमी जणवत राहते ती दिग्दर्शकाची प्रत्येक shot वर असलेली घट्ट पकड.कुठेही confuse न होता त्यांना जे सांगायच आहे ते बरोबर प्रेक्षकांपर्यंत पोचत.

यु.आर.अनंतमुर्तीं च्या घटश्राद्ध या लघुकथेवर आधारित हा चित्रपट.अनंतमुर्तींच्या सर्व लेखनात ब्राम्हण धर्मातील कर्मकांडावर आणी एकंदर जातिव्यवस्थेतील विषमतेवर विचार करायला लावणारे प्रश्न उभे केलेले असतात (अशाच विषयावर भाष्य करणारी "संस्कार" ही अप्रतिम कादंबरी त्यांनी लिहली, स्वत: ब्राम्हण असून असे लिखाण केल्याबद्दल त्यांना बर्‍याच टीकेला तोंड द्दावे लागले).

संपूर्ण चित्रपट नानी (अजिथ कुमार) ह्या आठ वर्षाच्या मुलाच्या नजरेतुन दिसतो.नानिचे वडील त्याला उडुपाशास्त्रिंकडे वेदाभ्यास करण्यास सोडुन जातात.घर सोडुन पहीलेंदाच आलेल्या नानी ची यमुना (मीना कुट्टाप्पा) या उडूपांच्या विधवा मुलीशी चांगलिच गट्टी जमते.शाळेतिल इतर मुले नानी पेक्षा मोठी आहेत आणी त्याच्या बर्‍याच खोड्या काढतायत. या मुळे नानी यमुनाक्काला जास्तच चिकटलाय.रात्री तुला ब्रम्हराक्षस दाखवतो म्हणुन मोठी मुले नानी ला उठवून परसात आणतात, तिथे यमुनेचा प्रियकर तिला भेटायला आलाय, कसली तरी पुडी तिच्या हातात कोंबुन तो गडबडीने जातो.बघितलास का ब्रम्हराक्षस असे म्हणून इकडे शास्त्री नागा ही मुले हसु लागतात.यमुनेला या गावातल्या शाळेत शिकवणार्‍या शिक्षका पासुन दिवस गेलेत, तो तिला गर्भ पाडण्यासाठी औशध आणुन देतोय पण ते घ्यायचे धैर्य काही तिला होत नाहिये त्यातच नानीला पाहुन नुकतच अनुभवत असलेल मात्रुत्व तिच्यात उफाळुन येतय.इकडे उडुपा शाळेसाठी निधी आणण्यास काही दिवस बाहेर जातात.
बर्‍याच दिवसा पासुन यमुना बाहेर का पडत नाहिये म्हणुन गोदाक्का ही शेजारीण आडुन आडुन चौकशा करतिये.बेल गोळा करायला गेलेल्या नानी ला ती यमुना ला काय होतय, उलट्या होतायत का? झोपुन आहे का, ब्रम्हराक्षस दिसतो का कधी असे सारखे विचारतिये.पण नानी फक्त तीला ताप येतोय एवढच सांगतोय.शेवटी गोदाक्का कडे जायला लागुनये म्हणून नानी ला यमुना जंगलातुन बेल आणण्यास सांगते.बेल गोळा करताना नानी ला पुन्हा शास्त्री, नागा पकडतात आणी चल तुझ्या यमुनाक्काच खर रुप बघायला म्हणुन आडोशाला लपतात.इकडे यमुना आणी तिचा प्रियकर काळजीत बसलेत आणी तिकडुन एक नागसाप वळवळत त्यान्च्याकडे येतोय.तिने धर्म बुडवलाय त्यामुळे देवाचा नाग तिला चावणार असे शास्त्री नानी ला सांगतो.घाबरलेला नानी "यमुनाक्का" अशी हाक मारत तिच्याकडे धावत येतो, दोघेही घरी येतात.गोदाक्का आता यमुनेला घरिच येउन काय झाल म्हणून विचारु लागते, वैतागुन यमुना तिला घराबाहेर घालवते.रागावलेली गोदाक्का गावभर यमुनेची बातमी पसरवते.शाळा बंद पडते, पालक आपापल्या मुलांना घेउन जातात.शास्त्रिपण नानी ला तुला घरी सोडतो चल म्हणतो.पण नानी यमुनेला सोडुन जात नाही.रात्री यमुना जीव देण्यास जंगलात जाउन वारुळात हात घालुन बसते, पण साप तिला चावत नाही.शेवटी ती नानी ला घेउन गावतल्या एका शुद्राच्या घरात येते.तिचा प्रियकर गर्भ पाडण्याची सुचना देउन गाव सोडुन निघुन जातो.नानीला बाहेर बसवुन ठेउन यमुना आत जाते.ताडी पिउन झिंगलेले बरेच जण शेकोटी भोवती नाचतायत, घाबरलेला नानी आत येउन वेदनांनी तळमळत असलेल्या यमुनेला पाहुन तिथेच थबकतो.परत येत असताना गाववाले यमुनेला शोधतायत असे दिसते, यातले काहीजण नानीला पकडुन नेतात.गावाहुन परतलेले यमुनेचे वडील तिच "घटश्राद्ध" घालतात.म्हंजे जिवंत माणसाच श्राद्ध घालुन त्यांना जातिबाहेर टाकणे.हा विधी चालु असताना पार्श्वभुमिवर हुंदके ऐकू येत राहतात.इकडे वडिलांबरोबर नानी घरी परत चाललाय, वाटेत अग्रहारातले एक ब्राम्हण आपल्या मुलिच लग्न उडुपाशास्त्री बरोबर लावणार असल्याच सांगतात.परतिच्या वाटेवर एका पिंपळाखाली बसलेली यमुना नानी ला दिसते, यमुनाक्का अशी हाक मारुन तो तिच्याकडे पाहतो, संपुर्ण डोक भादरलेली यमुना तिचा चेहरा झाकुन घेते आणी मघाशी ऐकू आलेले हुंदके पुन्हा ऐकू येत राहतात.थोडासा पुढे गेलेला नानी मागे वळुन एकदा पाहतो आणी चित्रपट संपतो.

चित्रपट black n white आहे.बरेच प्रसंग सरळ चित्रित न करता वेगवेगळ्या संवादातुन आणी shots मधुन धाखवलेत.म्हंजे यमुनेला दिवस गेलेत हे कोणीही कधीच बोलत नाही.यमुनेच्या चेहर्‍यावर उठताना दिसणारी वेदना, गोदाक्कांचे खडुस प्रश्न्न यातुन ते समजत जात.उडुपा बाहेरगांवी जायचं रात्री यमुनेला सांगतात, ते पिशवी घेउन निघालेत असा प्रसंग कुठेहि नाही, दुसर्‍यादिवशी नविन गुरुजी बसलेत आणी शाळा कशी चालु आहे, ऊडुपांना शाळा सोडुन इतके दिवस जायला नको या गोदक्काच्या संवादातुन ते कळत.cinematography हा या चित्रपटाचा आणखी एक huge plus point.
चेहर्‍यांचे closeups अनेकदा दिसतात.गोदाक्काला यमुनाने घरा बाहेर काढल्यावर दार धाडकन बंद होते आणी गोदाक्का रस्त्यावरुन जोरजोरात ओरडत चालालिये असा panoromic shot घेतलाय, तो अगदिच अंगावर येतो.कासारवल्लींच्या अनेक चित्रपटात नंतर दिसत राहिलेले खिडकिचे गज, चौकट, दार याच्या आडुन डोकावणारे चेहरे याची सुरुवात इथे झाली.चित्रपटाला बि.व्ही.कारंथ यांच अगदी haunting संगीत लाभलय.ताडी पिउन शेकोटी भोवती नाचणारे लोक आणी मागे वाजणारा ढोल, बेल/फुलं गोळा करायला नानी एका पायवटेने उड्या मारत चाललाय, याची शेंडी आणी फुलांची परडी हलतिये आणी मागे मस्त बासरीत मिसळलेले गाइच्या गळ्यातले घुंगुराचे सुर.एकही गाण नसलेल्या या चित्रपटास उत्तम संगीताच national award मिळालेल होत.चित्रपटाचा काळ दाखवला नसला तरी तो १९२० च्या दशकात घडतो, कारण गावातल्या शाळेत असलेले पंचम जॉर्ज चे फोटो.
चित्रपटाची वेशभुशा अगदी साजेशी आहे.साधा अंबाडा आणी थोड्याश्या आ़खुड सुती साड्या, पुरुषांचे धोतर/पंचे ,जानवं, शेंडी कपाळावर आडवे भस्माचे पट्टे आपल्याला त्या काळात घेउन जातात.

नानी आणी यमुना या दोघांतील chemistry अगदी amazing आहे.पण खर आकर्षण आहे ते "नानी", संपुर्ण चित्रपटभर आपण त्याला यमुना प्रमाणे frantically पकडून ठेवतो.
पदार्पणातच best film साठी national award मीळवलेल्या या चित्रपटाने कानडी मधील new wave cinema ची movement सुरु केली.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझाही अतिशय आवडता चित्रपट. 'ताईसाहेब', 'ताबारना कथे', 'गुलाबी टॉकीज', 'द्वीप' हे कासारवल्लींचे चित्रपटही अप्रतिम आहेत.
धन्यवाद. Happy

is this group only for members? i mean non-members and non-maaybolikars caanot read anything published here? i was putting these writings in gulmohar-lalita but madat samiti told me specifically to publish all movie reviews in this group.is there any way of publishing this in a way so that members and non members both can read.this doesn't even show in "navin likhaan".

i am still new here....sumbody help me.

You can edit by clicking on the संपादन tab. select सार्वजनिक & it will be visible to all.
धन्यवाद.
हे वाचून चित्रपट पहावासा वाटतो आहे.

काल रात्री यू ट्युब वर पाहिला हा सिनेमा. त्या मुलीचे काम अफलातुन !! तिच्या body
language बद्दल तर कितीतरी लिहीता येईल.

नेतिरीने लिहीलेल्या गोष्टी मधे एक add करावेसे वाटते, यमुना आणि तिच्या प्रियकराच्या प्रेमाचे
किंवा त्यांच्या एकांत /उन्मादाचे क्षण ओझरते सुध्दा दाखवले नाहीयेत, त्यामुळे यमुनेचा तुटलेपणा
सतत अंगावर येत राहतो.

धन्यवाद, नेतिरी !

मी अमिला अनुमोदन.. मी हीच कथा असलेला (नाव पण नानीच त्या मुलाचं) दीक्षा हा हिंदी सिनेमा बघितला आहे.. दूरदर्शनवरच पाहिला होता. शाळेत असताना आई-बाबांनी रविवारी दुपारी सिनेमे लागायचे त्यात हा बसवून दाखवलेला.. पुढे पुढे अनेकदा स्वतःहुन पाहिला आहे.. नाना पाटेकरने अप्रतिम काम केले आहे 'दिक्षा' मध्ये..

सापडले.. इथे अधिक माहिती आहे.. http://en.wikipedia.org/wiki/Diksha_%28film%29

@anodon
i agree with u abt yamuna's body language, her sharp nose and visible jawline add an extra something.the way she sits curling her hands around her legs and putting chin on knees is amazing.if anybody has more info abt this actress please let me know.

I miss those sunday afternoon movie. हिंदीत भडक अभिनय करणारे साऊथी नट तेथे वेगळीच कला दाखवतात. कमला हसन आणि जयाप्रदाचा सागरसंगमम्, श्रीदेवीचा सितारा(?). ताबरान् काथे, Accident, red rose ज्या वरुन घेतला तो मुळ सिनेमा असे अनेक आहेत. नाव माहित नाहीत. तसाच शिवजी गणेशन् असलेला एक सिनेमा होता ज्यात त्याची बायक्को फार कजाग आणि आक्रस्थाळी असते. त्यापासुन सुटण्यासाठी तो समुद्र किनारी येऊन बसतो. तेथे एका कोळणीशी त्याची ओळख होते वगैरे....

सध्या उदया, सन वगैरे चॅनेलवर बरेच सिमेना दाखवतात. कधीतरी चांगले असतात पण sub title नसल्याने काहीच कळत नाही. कोणीतरी त्याना कळवले पाहिजे.