मोडी लिपीचे देवनागरी लिपीकडे स्थित्यंतर कसे झाले?

Submitted by सानी on 20 January, 2011 - 08:29

आपली मराठी भाषा फार पूर्वी 'मोडी' ह्या लिपीत लिहिली जायची.
मला प्रश्न असा पडलाय, की मोडी लिपी सोडून देवनागरीकडे आपण कसे काय वळलो? त्यामागची कारणे काय?
विकीपीडीयावर मराठी विषयी माहिती लिहितांना मराठी हा शब्द देवनागरी आणि मोडी अशा दोन्ही लिपींमधे लिहिलेला आहे.

तसेच लिपीच्या नष्ट होण्याविषयी माहिती लिहितांना तिच्यातल्या क्लिष्टतेमुळे छापतांना होणार्‍या गैरसोयीचे कारण दिलेले आहे.

मोडी विषयी अधिक माहिती इथे वाचता येईल.

हे सगळे वाचल्यानंतरही माझ्या मनात अनेक दिवस घोळत असलेल्या प्रश्नाचे नीट उत्तर मिळत नाहीये. कोणाला माहिती असल्यास कृपया सांगावे. धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवलचा धागा बघता, ती लिपी शिकायला, व अंगवळणी पडायला कठीण वाटतेय. (तशी देवनागरी तरी कुठे सोपी आहे ?) म्हणून मागे पडली का ?
म्हणजे माणसाची प्रवृत्ती ही सुलभीकरणाकडे वाटचाल करणारी आहे, असे म्हणायचे का ? कारण भाषेपासून आहारापर्यंत सगळीकडेच ते होताना दिसतेय.

चांगला मुद्दा आहे दिनेशदा...पण ह्या सुलभीकरणामुळेच ही इतकी चांगली लिपी नामशेष झाली... Sad

असो, त्यातल्या त्यात एक आनंदाची बाब म्हणजे मोडी फॉन्ट उपलब्ध आहे!!! सोमेशच्या ब्लॉगवरुन-ह्या दुव्यावरुन आपण डाऊनलोड करु शकतो.

मोडी लिपी शिकायची असेल तर ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.

तसेच मोडी लिपी, तिचा इतिहास, त्यातिल साहित्य, कलाकुसर इ. अनेक उपक्रम असणारे- थोडक्यात, 'मोडी' ला वाहिलेले हे संकेतस्थळ

मला वाटले होते, तेवढेही औदासिन्य नाहीये तर, ह्या लिपीबाबत... Happy

माझ्या मते –

मोडी लिपी ही देवनागरीच्या तुळणेत शिघ्र लिपी होती ती टाक़ आणि बोरूच्या वापरामुळे.
आता तसे नाही. फाऊंटन पेनाच्या वापरामुळे आता देवनागरी ही मोडी लिपीपेक्षा शिघ्र ठरते.
गेली ७०० वर्ष केवळ मोडी लिपीनेच मराठी भाषा जीवंत ठेवली ही समज पुर्णत: चूकिची आहे. त्या ७०० वर्षातील आध्यात्मीक मर्‍हाट्टी साहित्य हे देवनागरी लिपीतंच आहे. मोडी लिपीचा वापर सर्वाधीक पत्रव्यहारात दिसून येतो.

महत्वाचे असे की मर्‍हाट्टीचे मराठी भाषे परिवर्तन हे १८ व्या शतकात झाले.

मोडी लिपीचे जनक हे हेमाद्री वा हेमाडपंत आहेत किंवा त्यांनी बाजरीचे बी आणि मोडी लिपी श्रीलंकेहून आणली हा समज चूकिचा आहे. महादेवराव यादव व रामदेवराव यादव यांच्या कारकिर्दीत यादव साम्राज्याचे ते प्रधान, मुख्य सचिव असल्याने आणि याचबरोबर जमिनीची पाहणी करून महसूल ठरवणे, तो वसूल करणे, उत्पन्न ठरवणे इ. कामेही करत असल्यामुळे त्यांना “श्रीकरणाधिप” (जमाबंदीचे प्रमुख) या पदवीनेही ओळखले जाते. या कामा निमित्ताने साम्राज्याच्या मानाकोपर्‍यात त्यांची पत्रे जात असत. जर त्यांनी मोडी लिपीचा शोध लावला असता तर साम्राज्याच्या कानाकोपर्‍यातल्या अधिकार्‍यांना मोडी लिपी शिकवली कधी आणि कोठे ?
मोडी ही शिकस्ता या फारशी लिपीवरून अस्तित्वात आल्याचा दुसरा मतप्रवाह आहे. ईसापूर्व ३०० वर्षात पारसी (अरबी मध्ये – फारसी) भाषेच्या “आर्मायीक” लिपीतून “अवेस्तन” आणि “पहलवी” जन्मास आली. ७व्या शतकात “अवेस्तन” आणि “पहलवी” लिपीतून “नस्तलीक” लिपी जन्माला आली. १०व्या शतकात “नस्तलीक” मधून “शिकस्ते” लिपी जन्मास आली. “शिकस्ता” म्हणजे “मोडकी नस्तलीक”. अपितु, ९व्या शतकातील काही stone inscriptions हे राजस्थानातून कर्नाटकात प्रचारार्थ गेलेल्या जैन भिक्षुकाचे कन्नड भाषेत परंतु मोडी लिपीत आढळले आहेत. तर “शिकस्ता” ही १०व्या शतकात अस्तीत्वात आली. अर्थात, मोडी लिपीचे मौर्यी लिपीशीही साधारम्य बरेच जण जोडतात. माझ्या वाचनात एक गुजराती कागद आला आहे ज्याची लिपी ९५% मोडी लिपीशी मिळते. उर्वरीत ५% हे सध्याच्या गुर्जर लिपीचे आहेत.

The “Shikasta” script is so complex and difficult to read that even an expert could easily be misled. A brand of heavy humor exist in context to Shikasta is difficult to gauge at this distance, ``The Drama of the Boat and the Prostitute,'' a District Superintendant of Police sends a message in Urdu (in shikasta script) to one of his subordinates requesting that a boat (kishti) be kept ready for his arrival. Because of the ambiguity of the Shikasta script the sub-ordinate misreads “kishti” as “kasbi” `prostitute', leading to embarrassing and amusing developments.

Pages