नकार आहे!

Submitted by क्रांति on 20 January, 2011 - 02:44

तरहीचा माझाही प्रयत्न!

तुला न मी पाहिले तरीही मनात श्रद्धा अपार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे

सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!

तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!

मला जराही कळू न देता लुटून नेलेस गाव माझे,
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे

कसे, किती शोधले, कुठेही तपास ज्याचा नसे कुणाला,
असा निराकार सावळा श्रीहरी मला भेटणार आहे!

गुलमोहर: 

क्या बात है, क्रांती
तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे! >>>>काय बोलायलाच नको...

क्रांति, बर्‍याच दिवसांनंतर तुझा प्रवेश आणि तोसुद्धा इतक्या सफाईदारपणे! वा वा! मस्त गजल. एकेक द्वीपदी कातिल! आवडत्या दहात सामिल! Happy

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!

खूप आवडला हा शेर!

क्या बात है...... एकदम ''तोडू'' गझल.... प्रत्येक द्विपदी भन्नाट... खणखणीत.

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!

हा शेर फार आवडला. Happy

माझ्याही आवडत्या दहात. Happy

तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!

मला जराही कळू न देता लुटून नेलेस गाव माझे,
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे

संपूर्ण गझलच उत्तम त्यातही हे तीन शेर प्रचंड आवडले

सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!

अप्रतिम.

मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!>>>> नि:शब्द!!!

सुपर्ब गझल! मस्तच!

अप्रतिम गझल...
सॉल्ल्लिड!!
अभिनंदन क्रांतिजी.. Happy