उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण

Submitted by कांदापोहे on 18 January, 2011 - 21:50

गतवर्षीप्रमाणे यंदाही फ्लेमिंगो (रोहीत, अग्निपंख) बघायला जावे हा विचार होता पण कुणीच सोबत यायला तयार नव्हते. नेहाला फारसा उत्साह नव्हता तरी तिला व मुलांना घेऊन मी भिगवणला गेलोच. यावर्षी रोहीत अजुन आलेच नाहीत व इतर पक्षीही कमी आहेत हे तिथे पोचल्या पोचल्याच कळल्यावर आमचा हिरमोड झाला होता. पाऊस जास्ती झाल्याने पाणीपण जास्ती होते आणी पाण्याची पातळी कमी झाल्याशिवाय फ्लेमिंगो येत नाहीत ही नविनच माहीती कळली. पातळी कमी झाली तर त्यांना खाद्य शोधायला सोप्पे जाते अशी माहीती एका गावकर्‍याने सांगीतली.

तरीही प्राप्त परीस्थितीत आम्हाला अनेक पक्षी बघायला मिळालेच त्यांचा नजराणा पेश करतोय. मराठी व इंग्रजी नावे नंतर शोधुन लिहीनच तोवर तुम्ही गाणी शोधा. Proud

Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Grey Heron (राखी बलाक)

Large Egret (बगळा)

Long-Tailed Shrike (खाटीक)

Black-Headed Ibis (कुदळ्या, पांढरा शराटी)

Black-Winged Stilt (शेकाट्या)

Common Coot (चांदवा)

Large Egret (बगळा)

Grey Wagtail (करडा धोबी)

प्रकाशचित्र १२

Indian Pond Heron (वंचक)

Large Egret (बगळा)

प्रकाशचित्र १५

Wooly-Necked Stork (कांडेसर)

Black-shouldered Kite (कापशी घार)

गुलमोहर: 

क्लास !!

प्रचि ११ : हळदीसमारंभात भाग घेऊन आलेली चिमणी
प्रचि १३ : हळद नाकाडोळ्यात गेलेला पक्षी
:कैच्याकै:

मस्त आहेत फोटो. शेवटचे घुबड आहे. पहिल्या फोटोत पक्षी चिखलात बुडालाय म्हणुन चोच,मान आणि पाय काळे आहेत की तो असाच आहे??
दुसरा तिसरा लॅपविंग असावा... बाकीचे बगळे, हेरॉन.. तो पिवळा पक्षी कोण आहे???

केपी.. अ फ ला तू न फोटो आहेत सगळे.. त्यातही १,१४,१५ खासच !!!
प्रत्येक फोटो बघताना 'वॉव' 'सुंदर' असे उद्गार बाहेर पडत होते.. मस्तच !!! नि धन्यवाद Happy

धन्यवाद लोक्स. माझ्याकडे D40X आहे. लेन्स १८-५५ व ५५-२००. पक्ष्यांचे फोटो काढताना ५५-२०० पुरत नाही. ट्रायपॉड वापरा म्हणतात पण तेव्हढा वेळ नसतो. शक्यतो ५५-३०० लेन्स असेल तर उत्तम.

आर्च जेव्हढी नावे सापडली तेव्हढी लिहीली आहेत. बाकीची सापडली यथावकाश लिहीनच.

धन्यवाद लोक्स. Happy

मला आवडलेच सगळे. १४ मधली पोझ तर ग्रेट आहे.
मला पक्ष्यांचे फोटो काढणे जमत नाही. त्यामानाने फूले टिपायला सोप्पी. एकाजागी स्थिर असतात.

सुरेख फोटो. हे भिगवण नक्की कुठे आहे ? तिथे जायची / रहायची काय सोय आहे ? कुठल्या दिवसात कुठल्या प्रकारचे पक्षी पहायला मिळतात ही माहिती पण लिहा कृपया.

कांदापोहे,
एकापेक्षा एक ....भन्नाट आणि झक्कास,लाजवाब फोटो !
क्लिक केलेलं टायमिंग तर परफेक्ट !
Happy

ओहो! काय सुंदर फोटो आहेत. एकापेक्षा एक सरस आहेत. भिगवण आजुन ठिक आहे का? पुण्याजवळची बरेचशी ठिकाणं हरिओम झालीत! Sad

Pages