सिंहगड आणि विंदा

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

सिंहगडावर पावसाळ्यात कधी सुर्योदय पाहिला आहे का? तो पहाताना मला
नेहमी विंदांच्या ह्या कवितेची आठवण होते.

किलबिललेले उजाडताना

किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला
गुलाबलेला ओललालसर

तुंडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या.

नाहि उमगले
केव्हा सरला रजतराग हा
ही अस्ताई,
आणि उमटला रौप्यतराणा
झगमगणा-या जलद लयीतील
... असा विसरलो, विसावलो अन
नीरवतेच्या गुप्त समेवर
आणिक नंतर
न कळे कैसी
मनात माझ्या - काहि न करता-
जाणिव भरली कृतार्थतेची

- विंदा

प्रकार: 

फारच सुमार कविता आहे.

धन्यवाद!

माझ्या म्हणण्याला पुष्टी दिल्याबद्दल!

-'बेफिकीर'!

क्षिप्रा, सुरेख गं कविता.

तुडुंबलेले
संथ निळेपण
पसरत गेले चार दिशांना
तांबुसवेडे
हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन

खूप सुरेख. शेवटचे कडवे तर खूप आवडले. इथे ही कविता दिल्याबद्दल धन्यवाद.

हळुहळु मग नि:स्तब्धातुन
स्वप्ने उडाली गुलाल घेऊन
लालचुटकश्या चोचीमध्ये
पिंजर-पंखी,
आणिक नंतर
’आप’ खुशीने अभ्र वितळले
उरले केशर
आणि भराभर
उधळण झाली आकाशावर
आकारांची
रंगदंगल्या
.

सही Happy विंदाची ही रचना अप्रतिम आहे.