राणीचा बाग (जिजामाता उद्यान) माझाही वृत्तांत

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 17 January, 2011 - 04:48

काही दिवसांपुर्वी दिनेशदांचा विपु आला की मी ९ तारखेला एक दिवसासाठी मुंबईत येणार आहे. त्यादिवशी राणीच्या बागेत गटग करायचा आहे. येणार का ? बापरे ! कुठे जायच म्हटल म्हणजे मला खर तर टेन्शनच असत. कारण माझे महिनाभराचे शनिवार रविवार बरेचदा काही ना काही कामांसाठी किंवा प्रोग्रॅमसाठी बुक असतात आधीच (म्हणून मला कुठे बोलवायचे असल्यास १ महिना आधी माझी अपॉइंटमेंट घेत जा. Lol हे वाक्य कट्टेकरांसाठी )

पण दिनेशदांसारखे वनस्पतीतज्ञ (किती कठीण आहे टायपायला ?) येताहेत आणि आपण चांगल्या ज्ञानाला मुकतोय की काय असा विचार मनात चालु झाला. तो पर्यंत साधनाचाही गटग बद्दल विपु आला. योगेश येणार आहे हे कळल. घरी ह्याच विचारात गेले आणि लगेच कानावर आल ९ तारखेला चुलत दिराच्या मुलाच बारस आहे. आमच्या घरापासुन ५ मिनिटे अंतरावर असल्याने काही थाप ही मारता येणार नव्हत बारश्याला न जाण्याची. झाल आता गटगचे स्वप्न त्याच दिवशी अंमलात येणार होत. मग नवर्‍याबरोबर गप्पा मारताना त्याला दिनेशदा आणि साधनाच्या विपु बद्दल सांगितल. साधनाला माझ्या घरात सगळे चांगले ओळखतात. गणपतीला आली तेंव्हाच मोदकाची लाच देउन तिने माझ्या घरातल्यांच मन जिंकल होत. साधना अजुनही तुझ्या मोदकांची घरात आठवण निघते. त्यादिवशी कुंडी देतानाही माझ्या जावेने आमच्या मैत्रीणिला तुझ्या बद्दल सांगितल. (माझ्या मसाल्याची आठवण काढतेस का ?) मला वाटत आता हे वाहत चाललय. मुद्याच बोलु. माझे आहो म्हणाले जाउ आपण दिनेशदा एवढ्या लांबुन येताहेत, श्रावणीलाही राणिचा बाग दाखवायचा आहे (एका दगडात दोन पक्षी). मग जाउया. मी चाचरतच जरा बारशा विषयी विचारल. तेंव्हा आपण बारश्याला संध्याकाळी जाउ त्यात काय ? आता मात्र मला आनंद झाला.

काहीतरी खाउ न्यायला पाहीजे म्हणून मी गाजर हलव्याच प्रयोजन केल. ८ तारखेला बाजारात गेले सकाळी आणी गाजरे घेतली. सकाळीच गेल्यामुळे काही फुलझाडांची रोपेही मिळाली. मला साधना आणि योगेशची आठवण आली म्हणून त्यांच्यासाठीही घेतली. थोड पुढे गेल्यावर तरले दिसले. म्हटल चला ह्यांना प्रुफ दाखवु की मी जे करुन टाकते ते आम्ही खातो. रात्री गाजर हलवा बनवला आणि तरले उकडले. १२.३० पर्यंत हे उद्योग चालु होते.

सकाळी उठले आणि वेळ आहे म्हणून आरामात आटोपत बसले तर ९.३० झाले. साधनाला देण्याची रोपे आदल्या दिवशीच माती लावुन पिशवीत ठेवली होती. पण साधनाने पाचु मागितला होता तो काढायचा राहिला होता. मग गेटवर जाता जाता पाचुची रोपे काढली. (साधना कशी आहे पाचुची अवस्था ? आता बरा आहे का?)

धक्क्यावर पोहोचलो तर लॉच पाच मिनीटांपुर्वी गेली होती. झाल आता अर्धा तास वाट बघा. लगेच साधनाला फोन केला. साधनाला थोडा धक्का बसला जो तिने वृ. मध्ये टाकला आहे. मग पटकन साईबाबांच दर्शन घेतल आणि मग १०.३० च्या लाँचनी आम्हि निघालो. श्रावणी खुप खुश झाली होती. कारण मध्येच आम्हाला डॉल्फिन फिरताना दिसले. धक्क्यावर आल्यावर सरळ टॅक्सीत बसलो. तो धंदेवाईक टॅक्सीवाला आम्हाला विचारत होता मुंबईला जायच आहे काय ? त्याला आम्ही बाहेरच्या देशातुन आलो असे वाटले की काय कोणास ठाउक ? आम्ही नाही राणीच्या बागेत जायच आहे सांगितल्यावर तो म्हणाला चालु आहे की नाय म्हाईत नाय पण राणीचा बाग कालपासुन ८ दिवस बंद राहणार होता असे ऐकले. मला थोडावेळ धस्स झाल. पण मग विचार केला की तस असत तर एवढ्याला मला साधनाचा फोन आला असता. त्याला काहीही मत प्रदर्शन न करता माझ्या आहोंनी त्याला सांगितल राणिच्या बागेत चलायला. तो बडबड्या होता. मध्येच पॉलिटिक्सवर बोलत होता एक जमाव पाहुन. माझ्या नवर्‍याने सवईप्रमाणे त्याला त्याचे नाव आणि गाव विचारले. नेमकी त्याच्या गावचा जज आमच्याईथे दोन वर्षापुर्वी बदली होउन गेलेला अशी ओळख निघाली. तो खुष झाला पण पैसे मात्र घ्यायचे तेवढेच घेतले. उतरले आणि भली मोठी गर्दि. मग साधनाला फोन केला. साधना म्हणाली तु गेट जवळ ये दिनेशदा येतील न्यायला. अग दिनेशदांनी मला कधी पाहीले नाही ते कसे मला ओळखतील ? ते बरोबर ओळखतील तुला अस सांगितल्यावर मला जरा शंका आली दिनेशदा जादुटोणाही जाणतात की काय ? मग तिने मला सांगितले की एका हातात कॅमेरा एका हातात बॅग आणि जांभळा टिशर्ट त्यांनी घातला आहे. ते गेटवर उभे होते. मीच त्यांना हात करुन ओळख दाखवली आणि तुम्ही दिनेशदाचना म्हणून विचारले. तोपर्यंत माझे आहो आणि श्रावणी तिकीट काढत होते. साधनाने सांगितल होत की प्लॅस्टिक बॅग लपवुन आण. पण माझी बॅग लपण्यासारखी नव्हती कारण त्यात झाड होती. मग गेटवर गेल्यावर मी पण अगदी प्रांजळपणे त्यांना सांगितल की ये झाड ले झा सकते है ? त्यानी काही हरकत नाही घेतली. पण त्याच्यातील लेडीने विचारल की डब्बा आहे ? तो नाही नेउ शकत. मला इथे मात्र माझ्या मुलीसमोर थाप मारावी लागली की आम्ही आत खाणार नाही फक्त सोबत नेतोय. तिनेही सोडले. (ती आली तर हे वाचायला माबोवर ?)
आत जाताच दिनेशदा आणि माझ्या नवर्‍याच्या गप्पा चालु झाल्या. मग ग्रुप जवळ पोहोचले. साधना आनी योगेशना हाय केल. साधनाच्या भावाने मला हाय केल पण माझ्या कमकुवत स्मरणशक्तीमुळे मला ओळखायला उशिर लागला पण मी ओळखल. ह्यावर साधनाने तिच्या आणि माझ्या मेमरीची जुळवणी केली. तिच्या वहीनीचीही ओळख करुन दिली. एक मुलगी हसर्‍या चेहर्‍याने ओळख दाखवत होती. कोणीतरी ओळख करुन दिली अग ही सतत हसरी असते ही हसरी. अनपेक्षित असल्याने मला हसरीला भेटुन खुप आनंद झाला. एक अजुन वेगळी व्यक्ति होती. नविन माबोकर विजय पण ते आमच्यात जुने असल्याप्रमाणेच मिसळले. अजुन एक व्यक्ती होती त्या व्यक्तीची योगेशने ओळख करुन दिली. तो होता यो रॉक्स. गप्पा होत होत्या पण पहिलांदाच भेटलो. मग आम्ही भटकंतीसाठी निघालो. तोपर्यंत श्रावणी आणि आहो प्राणी पाहायला गेले.

दिनेशदांनी आम्हाला खालील सगळ्या झाडांची माहीती दिली.
माझ्या गरीब बिचार्‍या कॅमेर्‍याने त्याच्या ऐपतीप्रमाणे फोटो खेचले. ते तुमच्यापुढे सादर करत आहे. खरतर यो-रॉक्स आणि साधना-योगेशच्या वृतांतमध्ये इतके चांगले फोटो आले आहेत त्यामुळे मी वेगळा वृतांत टाकणार नव्हते. त्यांच्याच प्रतिसादात लिहीणार होते वृ. पण प्रतिसाद लिहायला गेले आणि त्याचा मोठा वृत्तांतच झाला मग म्हटल जाउद्या आपल्याकडचेही देउ फोटो. गोड मानुन घ्या.

गेटच्या सुरवातीलाच हा एलिफंटा स्वागत करत आहे. दगडी आहे तरी त्याला कैदेत ठेवला आहे. हा हत्ती एलिफंटा ह्या डोंगरावर सापडला. ह्या हत्तिमुळेच त्या डोंगराला एलिफंटा हे नाव पडले असे माझ्या इतिहासप्रेमी नवर्‍याने सांगितले.
Ranibag.JPG

हे ब्राउनीचे झाड हे फळा सारखा दिसणारा पालवीचा कोंब आहे.
ranibag5.JPG

ह्या कोंबातुन पालवी आलेली कोवळी पालवी तर सुकलेल्या पानांसारखी दिसते
ranibag6.JPG

दुसर्‍या ठिकाणी सापडलेले ब्राउनीचे झाड
ranibag27.JPG

पावडरपफच्या कळ्या
ranibag8.JPG

पावडरपफचे फुल
ranibag9.JPG

कर्दळीच्या जातीतले बांडगुळासारख्या वनस्पतीला हा फुलोरा आला होता.
ranibag4.JPG

हा एक पाम चा प्रकार ह्याच्या एका पानापासुन बालदीभर की हंडाभर पाणी निघु शकत अस दिनेशदा म्हणाले.
rani1.JPG

ही आहेत नोनी फळे
ranibag7.JPG

ही भिंतीवर चिकटणारी पण तिला कोणतीही इजा न करणारी वेल असे साधनाने सांगितले.
ranibag10.JPG

हया वेलीने सजवलेला घुमट. इथे आल्यावर कोमलचे आगमन झाले. ह्याच्या समोरच आम्ही आमचे डबे खोलले. साधनाने पराठे आणि दही आणि विजयने आणलेला शिरा आणि माझ्याकडचा गाजरहलवा आणि तरले असा आहार झाला. त्यावर इथेच परत माझि मुलगी आणि नवरा आम्हाला जॉइन झाले आणि आमचा एकत्र नाश्ता झाला. दिनेशदांना गाजरका हलवा आणि पराठे हे फिल्मिस्टाईल असल्याचे आठवले. दिनेशदांनीही त्यांच्याकडील शेंगदाण्यासारखे लागणारे कुठलेतरी फळ आणि गोरखचिंचेपासुन बनवलेला पदार्थ आणला होता. खाउन झाल्यावर आम्ही सगळे एकत्र परत भटकंतीला निघालो.
rani2.JPG

ह्या झाडाच्या फुलांचा वास सगळीकडे दरवळत होता.
ranibag12.JPG

सोन की सुवर्णवरुन काहीतरी ह्या झाडाचे नाव आहे.
ranibag15.JPG

कोरंटीचा प्रकार
ranibag18.JPG

ही आहे दुर्मिळ उर्वशी.
ranibag21.JPG

तगरीसारखी मोठी फुले
ranibag22.JPG

आशोकाच्या फुलाचा गुच्छ. ह्या झाडाखाली साधना आशोकाची बी शोधत होती. पण बि शोधता शोधता तिला रोपच सापडले.
ranibag23.JPG

चेंडूफुल
ranibag25.JPG

कृष्णवड
ranibag24.JPG

अजुन एक ब्राउनीचे झाड सापडले.
ranibag27_0.JPG

कोकोची फुले. इथे मी श्रावणीला हाक मारत होते चॉकलेटच फुल बघ म्हणून सांगायला. तर माबोकरांना लगेच चान्स मिळाला आणि म्हणाले ही आई करते ती तंदुरीची कोको नाही.
ranibag28.JPG

हे समुद्रफुल . इथे इंद्रा क्रिकेट खेळून येऊन मिसळला. हारुन आला होता बिचारा. त्याआधी हसरी आणि कोमलने आमचा निरोप घेतला होता.
ranibag29.JPG

हे सुंदर फुललेल झाड निवर
ranibag30.JPG

फ्लेमिंगो
ranibag31.JPG

पांढरा कावळा
ranibag32.JPG

आणि इथे ३.३० झाले. मला घरी जाउन एक प्रोग्राम अटेंड करायचा होता. शिवाय श्रावणी खुपच कंटाळली होती. इतकी कंटाळली होती की योगेश तिचा श्रावणी इकडे बघ करुन फोटोची पोझ मागत होता पण ती मानच फिरवत होती. तरी साधनाचा भाऊ तिला सारखा श्रावणमासी हर्षमानसीची कविता ऐकवुन दाखवत होता. ती ओळ तिला पाठ होउन ती घरी जाऊन तेच गुणगुणत होती. मग मी इथुन काढता पाय घेतला. जाता जाता दिनेशदांनी एक फळ दिले बी लावण्यासाठी नाव आठवत नाही. दालचीनीही दिली आम्हाला. खुपच स्वादिष्ट आहे ती.

अगदी अविस्मरणीय अशी ही राणीच्या बागेची सफर झाली. दिनेशदांचे परत एकदा आभार.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण प्रतिसाद लिहायला गेले आणि त्याचा मोठा वृत्तांतच झाला >> Lol

जागू.. छान लिहीलेयस... खुसखूशीत.. ! बरं केलस लिहीलेस ते.. मजा आली वाचताना.. नि तो एलिफंटाचा फोटो घेतलास ते बरे झाले.. मी काढायला विसरलो होतो..

जागु, मस्त लिहिलेस गं.... पण दोनदा छापलेस...

(तुझा मसाला मी संपवला Happy अगदी आठवण काढुन काढुन.. )

तो दगडी हत्ती आधी कुठेतरी दुसरीकडे होता. त्याला तिथुन हलवताना बिचारा फुटला. मग त्याला जुळवुन इथे उभे करुन ठेवले. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय मी दोनदा पाहिलेय. आता नुतनीकरणानंतर परत एकदा पाहायला हवे. (राणिबागेत फिरुनच पाय मोडतात Sad )

हा एक पाम चा प्रकार ह्याच्या एका पानापासुन बालदीभर की हंडाभर पाणी निघु शकत अस दिनेशदा म्हणाले
हा ट्रेवलर्स पाम. याचे एक पान तोडले तर त्या जाड दंडा-यातुन एका माणसाची तहान भागेल इतके पाणी गळते. पाने केळीसारखी दिसतात पण हे केळ नसुन नारळवर्गीय झाड आहे. त्या केळीसद्रूश्य पानाखाली चक्क नारळीसारखा सरळसोट बुंधा असतो.

ही भिंतीवर चिकटणारी पण तिला कोणतीही इजा न करणारी वेल

ही आयवी (ivy). मस्त हिरवीकाळी दिसते.

ह्या झाडाच्या फुलांचा वास सगळीकडे दरवळत होता.

ह्याचे नाव दिनेशना तेव्हा आठवत नव्हते पण त्यांनी त्यांच्या रंगिबेरंगीवर लिहिलेय याबद्दल.

सोन की सुवर्णवरुन काहीतरी ह्या झाडाचे नाव आहे

हे सुवर्णपत्र. ह्याबद्दलही लिहिलेय. ह्याची फुले काय सुंदर आहेत. लक्ष ठेऊन बहराच्या वेळी जायला पाहिजे राणीच्या बागेत.
http://www.maayboli.com/hitguj/messages/58489/93440.html?1195810955 इथे खाली फुलांचा फोटो आहे.

जाता जाता दिनेशदांनी एक फळ दिले बी लावण्यासाठी नाव आठवत नाही.

अगं ते पॅशनफृट. बी लाव त्याची. त्याला कृष्णकमळासारखे पण हिरवट पांढरे फुल येते. पिवळी फळे लागतात ज्यांचे सरबत करता येते. मी बी लावलीय. बघते येते का रुजून ते.

तो दगडी हत्ती आधी कुठेतरी दुसरीकडे होता. >> तो घारापुरी बेटावर होता. त्याच्यामुळेच बेटाचे नाव एलिफंटा पडले. असे मी वाचले होते. (चु.भु.दे.घे.)

तो खुष झाला पण पैसे मात्र घ्यायचे तेवढेच घेतले. >>> जल्ला तो काय भाजीवाला वाटला काय... :d

मस्त लिहिलाय वृत्तांत Happy

व्वा..छान वृ. तुझाही..तुझ्याकडले फोटू पाहतांनाही मजा आली Happy
मी जर्का ती गेटवाली लेडी अस्ते तर जागू ची पिशवी आणी आत्ला माल काय सोडला नस्ता Proud
पण त्या बाईला ही जागू आहे हे म्हाईत नव्हते ना!!!!

जागु,
फोटो आणी माहिती ..लई भारी !
मला तर हे २-३ वेळा वाचुन तिकडे प्रत्यक्ष येऊन गेल्यासारखे वाटायला लागलयं ...
Happy

व्वा..छान वृ. तुझाही..तुझ्याकडले फोटू पाहतांनाही मजा आली
मी जर्का ती गेटवाली लेडी अस्ते तर जागू ची पिशवी आणी आत्ला माल काय सोडला नस्ता
पण त्या बाईला ही जागू आहे हे म्हाईत नव्हते ना!!!!

>>>> परफेक्ट वर्षुतै. यावरून असं लॉजिकल कन्क्लुजन निघतं की ती बाई माबोवर येत नाही. म्हणजे जागू तुला भिती नाही. पुढच्या वेळी बिंधास जा. फारतर वर्षुताई आणि इतर गेटावर दबा धरून उभ्या असतील.

साधना धन्स. आता तरी खात्री पटलीना तुझ्या मेमरीबद्दल?
यो, जो, अनिल धन्स.

सतिश तुमची माहीती बरोबर आहे. खर तर मी वृ. मध्ये टाकायला विसरले. आता अपडेट करते. ही माहीती माझ्या नवर्‍याने मला तिथे दिली होती.

मामी, वर्षू तुमचे फोटो पाठवा मला. पुढच्यावेळी गेटवर मी निट लक्ष ठेवेन कोण आहे ते.

जागू मस्तच वृतांत.

कोकोची फुले. इथे मी श्रावणीला हाक मारत होते चॉकलेटच फुल बघ म्हणून सांगायला. तर माबोकरांना लगेच चान्स मिळाला आणि म्हणाले ही आई करते ती तंदुरीची कोको नाही.>>>> Proud जागू श्रावणीला सांगत होती कि "कोको" बघ आणि आम्ही बोलत होतो कि श्रावणीला हा "कोको" नकोय तिला दुसरी "कोक्को" पाहिजे. Biggrin

मला माहित होत हा प्रश्न फक्त अश्विनीच विचारु शकते. पण ती आहे कोणीतरी लपाछपी खेळतेय त्या बागेत.

सुवर्णात्राची पिकलेली फळे खाता येतात त्यांना स्टार अ‍ॅपल म्हणतात. तशी ती झाडे मुंबईत अनेक ठिकाणी आहेत (सायन हॉस्पिट्ल जवळ, कमला नेहरु पार्कात, हुतात्मा चौकात ) त्याचे फळ दोन हाताच्या तळव्यात गोलगोल फिरवायचे मग आतला गर ह़ळूच काढायचा. तो पारदर्शक असतो. त्याचा पाचसहा धारा असतात. चवीला थेट ताडगोळ्यासारखा लागतो. मुंबईतल्या झाडांनाही फळे लागतात. पण साल मात्र खायची नाही, पोट हमखास बिघडते.