|| तपश्चर्या ||

Submitted by जिप्सी on 15 January, 2011 - 08:18

योग्या? कोण आहे तो तपस्वी ? लवकर सांग नाहीतर समाधी पक्की Light 1

सॉल्लीड फोटो. मामी आणि नादखुळ्याला अनुमोदन.

कापर फोटो...काय शब्दच नाहीत राव....
केवळ अफलातून....तुस्सी ग्रेट हो....

कुठला असेल काय अंदाज करता येत नाहीये...

धन्स लोक्स Happy

कोण आहे तो तपस्वी ? लवकर सांग नाहीतर समाधी पक्की>>>>:फिदी: सुकी "तो मी नव्हेच". Happy

कुठे घेतला रे हा फोटो...
कुठे घेतलाय हा फोटो ?
एव्हढा ultimate backdrop कुठे मिळाला?
कुठला असेल काय अंदाज करता येत नाहीये...
ही शिवथर घळ तर नव्हे????
पण कुठ्ला आहे सांगा ना.
कुठला फोटो अहे हा?>>>>>>>:-) Happy

ठिक आहे, जास्त उत्सुकता ताणत नाही Happy हा फोटो "आंबोली" घाट येथे काढला आहे. Happy

आंबोली घाटात घेतलाय पण कुठे अन कसा ते पण लिही जरा.>>>>आंबोली घाटात जो मुख्य धबधबा आहे, त्या धबधब्याचे पाणी जाण्यासाठी रस्त्याखालुन एक वाट केली आहे (एक छोटासा पूल आहे). त्याच पूलाखालील पाण्यात हे "तपस्वी" बसलेले होते.

जिप्स्या , असं कळत नाही. मुख्य धबधबा, पाण्याची वाट, वाटेवरचा पूल हे सविस्तर सांग रे भेटल्यावर. Lol कारण फोटो खरच खूप अप्रतिम आलाय.

सुकी, हा जुना फोटो आहे रे माझ्या डिजीकॅममधला. आमची धावती भेट होती आंबोलीला, त्यामुळे जास्त फोटो नाहीत.

हा मुख्य धबधब्याचा फोटो. याचे पाणी रस्त्याखालुन दरीत कोसळते. ते पाणी जिथुन जाते तेथे एक छोटासा पूल आहे. त्याच पुलाखाली (ऐसपैस जागा आहे, अर्थात मुसळधार पावसात तेथे जाणे धोकादायक आहे) काढला आहे हा फोटो. माझ्याकडे व्हिडियो क्लिप आहे, ती पाहुन कल्पना येईल. Happy भेटलास कि दाखवतो व्हिडीयो क्लिप. Happy

छान आहे

छान आहे

नादखुळा | 15 January, 2011 - 18:25 नवीन

योगेश२४, 'ना भुतो ना भविष्यती' अगदी.
!!!

>>>>

अगदी अगदी !!

अप्रतिम ए!!!!

Pages