संक्रांतीला देण्यात येणार्‍या वस्तू...

Submitted by juyee on 14 January, 2011 - 02:43

सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.... Happy

संक्रांतीला घरोघरी हळदीकुंकुचा कार्यक्रम असतो... त्यात वाण / दान द्यायची/ करायची प्रथा आहे.
कोणकोणत्या वस्तू देता येतील ... ?सांगाल का...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाजारात वस्तुंचा खच पडलाय... सगळ्या चायनिज Sad

चेंज म्हणुन प्रत्येकीला एक तुळशी/गुलाब्/मोगरा/जाई/चमेली/अबोली/पिटुनीया/बाल्सम्/विंका किंवा इतर कोणतेही फुलझाडाचे रोप छोट्याश्या कुंडीत लावुन दे. लहान कुंडी साधारण रु. २५ पर्यत येईल. रोप २०-३० पर्यंत येईल. दरडोकी साधारण रु ५०-६० खर्च येईल. काहीतरी वेगळे केल्याचा आनंद मिळेल.

मस्तच साधना...
माझ्या मते एखादी वस्तू जसे वाटी डिश देणे टाळलेलेच बरे..
अन्नदान करावे असे शास्त्रात आहे.
साखर, गुळ, खोबर, डाळी ..ईत्यादी आताच्या घडीला कांदे, लसूणही चालेल... हो की नाही.

जुई <<<<<<अन्नदान करावे असे शास्त्रात आहे.
साखर, गुळ, खोबर, डाळी ..ईत्यादी आताच्या घडीला कांदे, लसूणही चालेल... हो की नाही.>>>>>>>>>>>१००% अनुमोदन.

काहीही द्या पण.. ते प्लॅस्टिकच्या वस्तु नका देउ.. आणी वापरात येइल असे द्या.. नाहीतर ठेववतही नाही आणि फेकवतही नाही अशी गत होते Sad

आजच्या घडिला "कांदेच" लुटा. Happy जमलेच तर कांदा व लसूण.
जोक्स अपार्ट,

गावचे लाल पोहे, हरभरे भाजलेले,सुक्या खोबर्‍याच्या वाट्या,चणे-गूळ(मला आवडते खायला), शेंगदाणा-गूळ, असे काहितरी खायचे वापरात येवु शकते.

स्त्रियांच्या आवडिच्या गोष्टी बांगड्या,निरनिराळ्या रंगात आणून त्यांनाच सांगायचे निवड करून घ्यायला वगैरे.
कँडल स्टँड , घरच्या डेकोरटिव पिसेस लटकन वगैरे.
एका ओळखीच्या मावशीने पिझ्झा कूपनं दिली होती एकदा. Wink

वाण / नैवेद्य म्हणून कांदा, लसूण वापरु नये असं माझं वैयक्तिक मत. Happy

हात/तोंड पुसायचे नॅपकिन्स
रोपं
कालनिर्णयसारखी कॅलेंडर्स
भाजीच्या कापडी पिशव्या
पॅराशूट तेलाच्या बाटल्या
गॅस पेटवायचे लायटर्स
फ्रीज बॉटल्स

फ्रीजमध्ये भाज्या / फळे ठेवण्यासाठी मिळणार्‍या जाळीच्या पिशव्या
मीठ - मिरपूडीसाठी सॉल्ट - पेपर शेकर्स
फळांसाठीचे काटे (फोर्क्स)
फळे कोरण्याचे स्कूप्स
खणांचे बटवे/ पाऊचेस / साडी बॅग्ज / मोबाईलच्या गळ्यात लटकावायच्या पिशव्या
अत्तराच्या बाटल्या
उत्तमपैकी अगरबत्ती / धुपाचे पुडे
अष्टगंध / चंदन पावडर
केशर
सुकामेवा

जुई,

विषय छान आहे. कालच मी झिपलॉकचे चौकोनी डबे आणले लुटायला (त्यात पातळ पदार्थ पण सहज नेता येऊ शकतो). पहिले पाच वर्ष एवढा काही विचार नव्हता केला कारण सौभाग्य वाणच द्यावे लागते पण आता दरवर्षी हा प्रश्न पडणार आहे.
अजून पर्यायः

१. साबण
२. फेस वॉश (हल्ली बरेच आकर्षक आकारात पण मिळतात)
३. पुस्तकांना माझेही अनुमोदन (पण वाचनाची आवड नसेल तर अडगळीत जाऊ शकेल)
४. साडी क्लिप्स
५. ज्यूट च्या पर्स, बटवे (प्रदर्शनात चांगल्या मिळतात)

अवांतरः पूर्वी माझी आई पोस्टकार्ड/आंतरदेशीय पत्र देत असे. तेव्हा माहेरी पत्र लिहिणे वगैरे जोरात असे. Happy

अंजली

वाण / नैवेद्य म्हणून कांदा, लसूण वापरु नये असं माझं वैयक्तिक मत.>>>>>>>><< अश्विनी ,काहि खास कारण आहे का? कारण मी मा.बो.वरच वाचलं आहे कि नैवेद्याला लसुन्,कांदा चालत नाहि.त्या आधी ऐकलं नव्हतं.आमच्याकडे शाकाहारी काहिही चालतं नैवेद्याला म्हणुन विचारलं.

माहेरी आईच्या बिल्डींग मधे अलिखीत नियम असल्याप्रमाणे प्लॅस्टिकच्या वस्तूंना तसेच ईतर निरुपयोगी वस्तूंना फाटा देऊन नेहेमीच धान्य, साखर, गूळ, शेंगदाणे ईत्यादी लुटलं जाई. कधी नारळ खणाने ओटीच भरली जाई. एखादीची परिथिती चांगल्यातली असेल तर सुकामेव्याची पाकिटं असत.

असे काही वाण खरंच आपल्या नात्यातल्या / ओळखीच्या बायकांना द्यायची गरज आहे का ? त्यापेक्षा त्यानिमित्ताने गरजू , शाळकरू मुला मुलींना, किंवा गरजू स्त्रियांना मदत केली तर ?

माझी आई आमच्याकडे काम करणार्‍या बाईला नव्या साड्या घेऊन देत असे दर वर्षी. नात्यातल्या बायकांना हळदी कुंकु, लाडू, फराळ, कॉफी अन गजरा ! आता माझी बहीण पण तेच करते .

दोन वर्षांपूर्वी एका मैत्रिणीने ४ मसाल्यांच्या छोट्या पुड्या वाटल्या होत्या -
१. कांदा लसूण मसाला
२. कच्चा मसाला
३. गोडा मसाला
४. मालवणी मसाला
अशा चार पुड्या केल्या त्यावर मसाल्यांची नावे लिहिली मस्त रिबन लावली आणि ते सगळे एका लहान गिफ्टबॅगमधे घालून दिले. मस्त वाटली आयडीया.

डाळ-तांदूळ एकत्र करुन त्यातून एक कप, थोडा गोडा मसाला एका छोट्या पॅकमधे असे एकत्र पॅक करून द्यायला पण छान आहे.

मम्मी पण भांडीवालीला साडी, ब्लाऊजपीस देते आणि बाकीच्यांना एखादा सट, काचेचा बाऊल असे देते.

माझी आई पण एका गरीब कष्ट करुन संसार चालवणार्‍या स्त्री ला बोलावुन (तिला तिच्या संसारात कुठल्या वस्तु ची गरज आहे ते विचारुन) तिच वस्तु घेउन देते.
१० छोट्या वस्तु घेऊन वाण देण्यापेक्षा एखाद्याला उपयोगी अशी मोठी वस्तु देण्यात वाण दिल्याच मोठ समाधान हि मिळत.

हे गरजु बाईला काहीतरी देण्याचे पटले.

इथे सुचवलेल्या इतर वस्तुही मला खुप आवडल्या. मी घरी हळदीकुंकू करत नसल्याने मला ह्या आयडिया वापरता येणार नाही याचे भारी वाईट वाटले. Happy

मैत्रिणींना काहीतरी इनोवेटिव देता आले तर द्यावे, देणारी आणि घेणारी दोघेही सुखावतात, मग भले ती वस्तु तशी गरजेची नसो. उगीच द्यायचे म्हणुन ते नेहमीचे कंगवे, प्लॅस्टीकचे लहान डब्बे वगैरे देऊ नका. ठेववतही नाही आणि टाकवतही नाही. Happy

गुळाची छोटी ठेप, साखर, खोबर वाटी, अगरबत्तीचे पॅकेट, शेव पॅकेच,

कापडी पिशव्या, छोट्या मनिपर्स

जुइ
विषय आवड्ला.मी दिल्लीत राह्ते. इथे म. मंड्ळ फार दुर आहे. जवळ सर्वे पंजाबी . मग देवळात वाण देवून आले.
प्रतिसाद वाचुन घर, माहेर आठ्वळ.
सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.

मोड आलेली कडधान्य !( मुग्,मटकी,वाटाणे)>
आमच्याकडे सावंतवाडिला हळदिकुंकूला मोड आलेले चणे वाटाणे हे वाटावेच लागतात त्याशिवाय 'वाण' वेगळ असत.

तुमच्याजवळपास अंध, कर्णबधिर, मतिमंद अशा मुलांचे हॉस्टेल, वर्कशॉप असेल तर त्यांनी बनवलेल्या वस्तू विकत घेऊन त्या इतरांना देऊ शकता. गाडीमधे ठेवायचे टिशू बॉक्सेस, पॉपुरी ( सुगंधीवस्तूचंचे कपड्यांच्या घड्यांमधे ठेवणाचे ) पाउचेस, साड्या हँगरवर लटकवल्यावर त्यावर घालायचे कव्हर अशा गोष्टींचा वापर होतो अन शिवाय गरजू व्यवसायिकांना मदत होते. सर्वसाधारण दुकानातून , मॉलमधून वस्तू विकत घेण्यापेक्षा अशा ठिकाणून वस्तू घेता येतील का ते पहावे.

मागच्यावर्षी मी छोटा साबण, शाम्पू सॅशे, छोटी टूथपेस्ट, पॅराशूट्ची एकदम छोटी क्युट बॉटल मिळते ती, छोटा कंगवा, पेपर नॅपकीन्स असे सगळे एका बॅगमधे घालुन प्रवासी सेट बनवुन दिला होता. हे सगळे छोट्या साईझचे वाण म्हणुन. आणि घरी आणि ऑफिसमधे सफाई करणार्‍या दोन बायकांना हेच सगळे फक्त छोट्या साईझचे न देता रेग्युलर/ मोठ्या साईझचे दिले. पेपर नॅपकिनच्या ऐवजी साधा नॅपकिन दिला.

अजुन पहिली ५ वर्शे म्हणुन सगळे सौभाग्याचेच वाण द्यायचे आहेत. Happy
आमच्याकडेही आई गुळची ढेप, मिक्स(सुकं) कडधान्य, साखर, गुळ खोबरे, डाळ, नारळ, १० रुपयाच्या शँपु, पावडर, तेलाच्या छोट्या बाटल्या, झिपलॉकचे डबे, सुके खोबरे, रवा, साबण वैगरे देते.. Happy

कचरेवाला/वाली, वॉचमन, देवळाबाहेरचे भिकारी वैगरेंना पैसे आणि तिळगुळ, दिवालीचा फराळ, गुढीपाडव्याला गोड असं काहीबाही देतच असते. Happy

<<सौभाग्याचेच वाण द्यायचे आहेत. >> म्हणजे नक्की कुठले...
मी हळद कुंकु, बांगड्या, पुजलेले सुगड, नारळ, पावडरचा आणि मॉईश्चरायचा छोटा पॅक असे क्रमाने दिले आहेत... अजून काही यात राहिले का ?
यंदा माझा विचार आहे, गुळाची ढेप, साखरचे पॅकेट्स , किंवा सुवासिक अगरबत्तींचा पुडा द्यायचा . Happy

मी हळद कुंकु, बांगड्या, पुजलेले सुगड, नारळ, पावडरचा आणि मॉईश्चरायचा छोटा पॅक असे क्रमाने दिले आहेत... अजून काही यात राहिले का ?>>>>>> कंगवा राहिला ना Happy

Pages