सावित्रिच्या लेकी ....

Submitted by झुम्बर on 8 January, 2011 - 07:21

"आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या" आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारणासाठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष माबो करांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस असा लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु ईथे कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुलाला किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी ही मुलगीच असते ...आता म्हणल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणण एवढ्च आहे की ज्या तडजोडी मुलीला कराव्याच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधि नवत स्वयंपाक करनार्या मुलान्च जे कौतुक होत आजहि ..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?

गुलमोहर: 

मला अपेक्षित दानत ही स्वतः करुन दुसर्‍याला खायला घालण्यातली आहे>>
मग ही दानत भारतीय पुरुषांमध्ये बहुतेक करून नाही, हे तरी मान्य करावेच लागेल, नाही का???

मला वाटतं होतं की स्वयपाक हे इथे फक्त एक उदाहरण आहे... मुळ मुद्दा मुलगा-मुलगी यांना समान वागवण्याचा आहे>>>
मलाही हेच वाटतेय..

झुम्बर,
तुझा वैताग कळतोय्..पण काय आहे ना की तू ज्याच्याशी लग्न करणार त्याला त्याच्या घरच्यांनी हा समानतावादी विचार नसेल शिकवला तर तुला आयुष्यभर त्याचा त्रास होईल..तेव्हा एकतर असा मुलगा बघ ज्याची हे समजण्याची कुवत आहे किंवा मग आयुष्यभर या गोष्टींनी त्रास करून घेणे सोड.

राहाता राहिला प्रश्न "अजून असे का?" चा..तर मला वाटतं आपल्या मुलांच्या पिढीपासून ह्यात नक्कीच बदल होईल. कारण आपण आपल्या मुलांवर नक्कीच समानतावादी संस्कार करु. ती काळाची गरजच आहे. मी मागे कुठल्यातरी अशाच बाफ वर लिहिल्याप्रमाणे: मुलगा/गी दोघांनाही किमान स्वयंपाक, ब्यांकेची कामं, ड्रायव्हिंग आणि प्रत्येक मनुष्यासाठी जात्-वंश्-लिंग्-रंग विरहीत आदर एवढ्या गोष्टी शिकवल्याच पाहिजेत.

गरज असताना केलं पण मुळात स्वैपाकाची आवड अजिबात नाही त्यामुळे बाई लावली स्वैपाकाला. अर्थात ती नसेल तरी अडत नाही.
खरतर कॉमन सेन्स असेल तर बेसिक स्वैपाक करण्यात कणभर पण अवघड नाही पण आवड नसेल तरी केलाच पाहिजे बाईच्या जातीला यातही काही अर्थ नाही.
>>>>> नी हजारो मोदक, रैना ला पण.
वर अनेकांनी म्हणल्याप्रमाणे मलाही वयाच्या २५ पर्यंत काहीही ग्रेट येत नव्हते, पण लग्नानंतर कधीही अडले नाही. मी व नवर्‍याने एकत्रच स्वैपाक शिकायला सुरुवात केली, थोडे त्याच्या घरच्या पधतीचे अन थोडे माझ्या असे करायचो. थोड्याच दिवसात लक्शात आले की दोघांनाही रोज रोज स्वैपाक करत बसायची काही जबरी आवड नाहीये, आणि भारतात असल्यामुळे बाई मिळणे फारच सोपे. त्यामुळे बाई लावली, तसेही दोघांचे ऑफीस अन इतर कामे होतीच, त्यामुळे मनात येईल तेव्हा वेगळे पदार्थ करुन बघणे याशिवाय कधी रोजचा स्वैपाक करत बसायची गरज वाटली नाही. पण मी हे नक्कीच म्हणेन की मी अतिशय उत्तम स्वैपाक करु शकते, जेव्हा वेळ असतो / वेळ येते तेव्हा स्वखुशीने केलेले सर्व पदार्थ छानच झाले आहेत आजपर्यंत, कधीच काही बिघडले / चुकले नाहीये. आपोआप इंपल्सिवली अंदाज येतो कधी किती आणि काय घालायचे याचा, उलट कश्यात काय असते तर अजून चांगले झाले असते हेही जाणवते. पाकक्रूती वाचणे / कुकरी शोज बघणे यातून पण असेल, खाण्याची आवड असल्याने हे शोज पाहीले जातात.
स्वैपाक करणे ही फक्त प्रॅक्टीस ची गोष्ट आहे, बेसिक स्वैपाक इच्छा असेल तर कोणालाही जमू शकतो, गरजेपुरता स्वैपाक सगळ्यांनाच आला पाहीजे अन वेळ आली की तो येतोच, हे सगळ्यांनी म्हणलेले १००% खरे आहे. आता करणे न करणे हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग.

>>>> आणि भारतात असल्यामुळे बाई मिळणे फारच सोपे. त्यामुळे बाई लावली, <<<<
ती "बाईच का लावली", बाप्या का मिळाला नाही हे उपफाटे फुटू शकतात, शिवाय,
स्वतःच्या घरचा राहुदेच बाजुला, लोकाच्या दारात जाऊन तिथला स्वैम्पाक करण्याचे नशिबात असलेल्या त्या "बाईच्या" " स्त्री/व्यक्ति स्वातन्त्र्याचा" विचार कोण करणार? की स्वतःच्या स्त्रीस्वातन्त्र्याकरता ती बाई मात्र गृहितच धरायची?
असो, हे आपले मला पडणारे प्रश्न बरकां, बाकीकुणी लोड घेऊ नये Proud

>>>> मग ही दानत भारतीय पुरुषांमध्ये बहुतेक करून नाही, हे तरी मान्य करावेच लागेल, नाही का???
हो, पुरुषात "दानत नस्तेच" अन म्हणूनतर धार्मिक कृत्यात, देण्याचे वेळेस पत्निस नवर्‍याचे उजवीकडे बसवतात, तर जेव्हा घ्यायची वेळ असेल तेव्हा डावीकडे बसवतात! अभिषेके पत्नि वामतः Proud

बायदिवे, सावित्री म्हणल की मला सत्यवान आठवतो, वडपिम्पळ आठवतो, वटसावित्रीचे व्रत आठवते, वगैरे वगैरे..... पण हे घरातला स्वैम्पाक वगैरे कसे काय आठवू शकते तुम्हाला?
असो
बाकी सावित्रीच्या मुली ज्यान्ना व्हायचे त्यान्ना होऊदे ना, पण मला तरी बोवा पुराणकथेतल्या "सावित्रीचा सत्यवान" व्हायलाच आवडेल! Proud

"बाईच का लावली", बाप्या का मिळाला नाही हे उपफाटे फुटू शकतात,>>> सध्या बाप्याच आहे. बाई मिळाली तेव्हा बाई लावली, घर बदलले, बाई मिळाली नाही, बाप्या मिळाला, लावला. इतके सोपे होते. Happy मस्त बनवतोय सगळे पदार्थ, ओरीसाचा आहे, गुजराथी / दिल्ली / कानडी च्या घरांमध्ये काम करतो, त्यामुळे घरबसल्या सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात. ;). (आता पाककलेत फार इंटरेस्ट नसल्याने त्याच्या रेसिपीज टाकत बसत नाही म्हणून :फिदी:, पण खूप सारे पदार्थ शिकता येतात त्याच्याकडून.)
लोकाच्या दारात जाऊन तिथला स्वैम्पाक करण्याचे नशिबात असलेल्या त्या "बाईच्या" " स्त्री/व्यक्ति स्वातन्त्र्याचा" विचार कोण करणार?>>> ते तिचे 'काम' (जॉब या अर्थी) आहे, त्याचे तिला पैसे मिळतात हा फरक नाही का माहीती घरचा आणि बाहेरच्या स्वैपाकातला ? असो.
स्वतःच्या स्त्रीस्वातन्त्र्याकरता ती बाई मात्र गृहितच धरायची? >>>> अरेरे, हे वाक्य वाचलेच नाही मघाशी. लिम्बूदादा, हे वाक्य फारच गंमतशीर आहे, अहो आम्ही बाई लावलीय ती स्वतःच्या स्त्री स्वातंत्र्यासाठी नसून आवड नसलेले काम करण्यात वेळ खर्ची घालावा लागू नये म्हणून, अन ते शक्य आहे म्हणून, हे वर लिहीलेच आहे. आवड असती तर स्वैपाक केलाच असता, त्यात स्वातंत्र्याचा संबंध नाही, आवडीचा आहे. शिवाय त्या बाई ला गृहीत धरण्याचा काहीच संबंध नाही, तिला पैसे कमवायचे आहेत, तिला ते काम येते अन त्याद्वारे पैसे मिळतात, म्हणून ती ते करते.

थाम्ब थाम्ब मवा, इत्क्यात सम्प्ले नै
>>>> मस्त बनवतोय सगळे पदार्थ, ओरीसाचा आहे, गुजराथी / दिल्ली / कानडी च्या घरांमध्ये काम करतो, त्यामुळे घरबसल्या सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात. <<<<<
बाई नै, बाप्या मिळाला इथवर सुटू शकलात, आता ओरिसाचा वा युपी/बिहारी का ठेवलात, महाराष्ट्रीय का नै ठेवला, यावरील फाटे वेगळेच, नै??? Biggrin
बाकी, ग्यारन्टीने सान्गतो, की या कामाकरता महाराष्ट्रीय बाप्या मिळणे म्हणजे भान्गेत तुळस शोधण्यासारखे आहे! Proud

आता ओरिसाचा वा युपी/बिहारी का ठेवलात, महाराष्ट्रीय का नै ठेवला, >>> जो मिळाला तो ठेवला, नवरा जायच्या आत ज्याची वेळ जमत होती, अन चांगला डीसेंट वाटला तो ठेवला.
बाप्या मिळाला इथवर सुटू शकलात, >>> हे मात्र नाही कळले.
की या कामाकरता महाराष्ट्रीय बाप्या मिळणे म्हणजे भान्गेत तुळस शोधण्यासारखे आहे! >>> याला मात्र अनुमोदन, महाराष्ट्रीय बाप्यांनी हाही करीयर ऑप्शन विचारात घ्यायला हरकत नाही.

>>> (बाई नै,) बाप्या मिळाला इथवर सुटू शकलात, >>> हे मात्र नाही कळले. <<<
वाक्य पूर्ण वाच! तुझ्याच आधीच्या पोस्टला धरुन हे ते, >>>> सध्या बाप्याच आहे. बाई मिळाली तेव्हा बाई लावली, घर बदलले, बाई मिळाली नाही, बाप्या मिळाला, लावला. इतके सोपे होते.<<<<<
"बाई नै," हे का गाळलस सन्दर्भ घेताना-देताना??? अशी गाळागाळी केली तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो!
सुटू शकलात याचा अर्थ माझ्या आधीच्या पोस्ट मधे फाटे फुटतील, त्यापासुन सुटलात अशा घ्या!
(कस्ल कितीकिती ते उलगडून सान्गाव लागत? )

एक पाहण्यातले कुटूंब आहे.
एक मुलगा एक मुलगी..
दोघांनाही घरातली सगळी कामं येतात. मुलगी सासरी सगळं करते.

मुलाचं लग्न झालं. त्याच्या बायकोला सुरूवातीला काही येत नव्हत म्हणून याने मदत म्हणून घरातल सगळं करायला सुरूवात केली आता तोच करतो ..तिला अजूनही काही येत नाही Happy

अहो तिला काही येत नाही हे तर क्वालिफिकेशन आहे ना . आणि तिने ते का करावे?. तिला आवडले तरच ती करेल. अन्यथा तो जाचच . जसे मजेने ड्राईव्ह केले तर ते प्लेझर आणि ड्रायवरची नोकरी हा जाच. मग पाहुणे आल्यावर गम्मतच होत असेल. बुवा टुण्णदिशी किचनमध्ये पळत असेल अन बाई पाहुण्यांशी गप्पा मारीत बसत असेल. तेही चांगलेच . पूर्वजांची संस्कृतीच सोडायची म्हटल्यावर ते तरी का ठेवावे.?
बाकी हा किस्सा वाचून उपड्या घड्याना सांडेस्तोवर आनन्द होईल हे नक्की... Proud

जसे मजेने ड्राईव्ह केले तर ते प्लेझर आणि ड्रायवरची नोकरी हा जाच. >>>> परत एकदा चुकले.
ड्रायवरची नोकरी ही गरज. जाच हा की नवरा-बायको दोघांना ड्रायविंग येत असताना , आणि नवर्‍याची ड्रायविंग करायची इच्छा नसताना केवळ ड्रायविंग हे पुरुषाचे काम आहे असे मानून नवर्‍यालाच ते करायला वर्षानुवर्षे भाग पाडणे.
हे ही आमच्या बाबतीत लागू होते. नवर्‍याचे ऑफीस खूप लांब असल्याने त्याला रोज ड्रायविंग करुन कंटाळा येतो, त्यामुळे शनिवार्-रविवार बाहेर पडलो तर त्याला विश्रांती म्हणून मी ड्राईव्ह करते अन तो आरामात मागे मुलींशी खेळत बसतो, यात त्याला काहीही कमीपणा वाटत नाही.

>>>> म्हणून मी ड्राईव्ह करते अन तो आरामात मागे मुलींशी खेळत बसतो, यात त्याला काहीही कमीपणा वाटत नाही.

तो कमीपणा वगैरे जाऊदेहो, आधी त्याला सुरक्षित कस काय वाटत? Wink
मला तर बोवा कुणाच्याही मागे टूव्हीलरवर बसणे जमत नाही, कुणाच्याच ड्रायव्हिन्ग स्कीलवर विश्वास नसल्याने मी रीक्षात बसणे टाळतो, अगदी कामानिमित्ते गरज पडलीच, तर ड्रायव्हरला सरळ सान्गतो की बाबारे, मला हार्टचा त्रास आहे तेव्हा गाडी हळू हळू सावकाश चालव, कम्पनीचे ड्रायव्हर ऐकतात, कित्येक रिक्षावाले नाही ऐकत, लिम्बी तर ऐकुन न ऐकल्यासारखे करेल अन स्कूटीचा कान अजुनच जोरात पिळेल याचि खात्री! Proud

लिम्बू आहेस खरा डिप्लोम्याट हं किती खुबेने ड्रायव्हिंगवर अविश्वास दाखवलाय. याला जेन्डर बायास म्हणतात हं लिम्बू.

(मी महिला ड्रायव्हर लाम्बून दिसली तरी पहिला सुरक्षित ठिकाणी पळतो बाबा... :फिदी:)

तो कमीपणा वगैरे जाऊदेहो, आधी त्याला सुरक्षित कस काय वाटत? >>>
मी महिला ड्रायव्हर लाम्बून दिसली तरी पहिला सुरक्षित ठिकाणी पळतो बाबा... ) >>>
काही बोलायला राहीले नाही की अशी जुनाट १८५७ मधली वाक्येच आधार देतात. Happy

काही युनिवर्सल सत्ये असतात, ती १८५७ची असली काय अन २०५७ ची असली काय. त्याकाळीही रथांचा लगाम महिलावर्गाच्या हातात देण्याची हिम्मत कोणी करत नव्हते... Proud

>>>> काही बोलायला राहीले नाही की अशी जुनाट १८५७ मधली वाक्येच आधार देतात. <<<< Lol
नै तस नै कै, इकडेच माबोवर कुणा लाल टीशर्टवाल्या उन्चानिन्च गोर्‍यापानाचा लेख होता, त्यात एक वाक्य होते, "दोन पायान्चे ल्यान्डीन्ग गिअर टाकुन.....वगैरे". तर तशा त्या प्रकारे गिअर टाकुन टू व्हीलर चालवणार्‍या ललना बघितल्यावर काय शामते कुणाची मधे कडमडायची??? Wink
असो.

>>>> (मी महिला ड्रायव्हर लाम्बून दिसली तरी पहिला सुरक्षित ठिकाणी पळतो बाबा... )
अरे बाजो, पन्चवीस/एकतीस डिसेम्बर वगैरे दिवशी, अन रात्री तर नक्कीच, मी रस्त्यावर उतरत नाही. पेदाड लोक टर्र पिऊन गाड्या चालवित अस्तात, न जाणो,आपण नियमात अस्लो तरी त्यान्च्या झिगझ्याग झिन्गत्या ड्रायव्हिन्गच्या कचाट्यात आपणच सापडलो तर काय घ्या? नै का?
पण ते २५/३१ दोनच दिवस, त्यामुळे टाळता येत रस्त्यावर जाणे, पण या दोन पायान्च्या ल्यान्डीन्गगिअरच्यापुढे बाकि ३६३ दिवसान्चे काय हो? Biggrin Light 1

१८५७ची असली काय अन २०५७ ची असली काय. त्याकाळीही रथांचा लगाम >>> १८५७ मध्ये रथ वगैरे नव्हते हो, पेंगुंनी असा इतिहास शिकवला की काय ?
चला म्हणजे आता गाडी पोळ्यांवरुन ड्रायविंग वर आली आहे तर !
बाकी आमच्या घरात सर्वांचे विमे उतरलेले आहेत, त्यामुळे आमची काळजी नको. Happy

शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न.

मला वाटते पुढच्या पिढीत कोणीच स्वयंपाक करणार नाही - कोणी तरी परदेशात मिळते तसे पॅक्ड फुड (पण पोळी भाजीचे) काढेल. दर आठवड्याला हे घेऊन यायचे व मायक्रोवेव मधुन काढायचे व खायचे हा प्रकार होणार आहे. अर्थातच ह्या मध्ये चवीची वाट लागणार पण तरी सुद्धा लोक स्विकारतील व हळु हळू परदेशी लोकां सारखे बेचव खायची सवय लागेल. ह्यात एक पिढीचाच फारतर फरक असेल.

रणजित, तुम्ही "चितळे" असुनही "बेचवीचे" बोलताहात? शो. ना. हो. ! Proud
या महाराष्ट्रात चितळे बन्धु मिठाईवाले असेस्तोवर काय बिशादे आमच्या पुढच्या पिढीला बेचव खावे लागेल! चितळे झिन्दाबाद! Proud

(मी महिला ड्रायव्हर लाम्बून दिसली तरी पहिला सुरक्षित ठिकाणी पळतो बाबा... )

हे वाक्य विनोदाने लिहिलेत असे मला तरी वाटते.

आणि जर तसे नसेल तर सुरक्षित ठिकाणी पळून पळून कुठे पळणार?? बायका हल्ली सगळी वाहने चालवतात. आणि अपघात होण्याचे प्रमाण पुरूषांपैक्षा बायकांमध्ये कमी आहे, कारण त्या वाहतुकीचे नियम पाळुन वाहने चालवतात. आणि या विधानाला अपवाद हे असायचेच.

नाही दुर्दैवाने साधनाजी हे विनोदाने लिहिलेले नाही. अनुभवाने लिहिले आहे. काही अपवाद वगळता बहुसंख्य महिलांचे ड्रायव्हिंग कमी असते त्यामुळे हात साफ नसतो आणि त्याना गाड्या कंट्रोल होत नाहीत हे मी अनेकदा पाहिले आहे शिवाय गाडी इकडे तिकडे गेल्यावर त्या सावरण्याऐवजी घाबरून जाऊन आणखी अनर्थ करून ठवतात. अगदी अलिकडचे पुण्याच्या एका हृदयविशारदाच्या मुलीचे प्रताप आठवा वानगीदाखल...

>>>> शिवाय गाडी इकडे तिकडे गेल्यावर त्या सावरण्याऐवजी <<<
अरे बाजो. काहून चावी मारुन र्‍हायलाय? जाऊ दे ना. Wink
अरे बाबा, मुद्दामहून गाडी इकडेतिकडे झिगझॅगकरत बुन्गाट्ट फिरवणार्‍या कॉलेज कुमारान्पेक्षा या नक्कीच परवडतात, लागले तर निदान सॉरी तरी बोलतील, त्या कॉलेजकुमारान्च्या गाडीखाली आला तर राम म्हणायला देखिल सन्धी नाही! Proud

त्याना गाड्या कंट्रोल होत नाहीत >> या बाफवर परत वाद घालायची इच्छा नाहीये, पण एकच सांगते की सर्वच महीला गंमत म्हणून गाडी चालवत नाहीत, अशी उदाहरणे तर पुरुषांची देखील आहेत बेजबाबदार गाडी चालविण्याची. मी स्वतः गेली ६.५ वर्षे बंगलोर मध्ये रोजच गरज म्हणून गाडी चालवत आहे. आणि इथेच काय भारतात सगळीकडेच अश्या महीला आहेत, महीला ड्रायवर ही काही नवीन गोष्ट नाहीये त्यावर तेच तेच फालतू बोलत बसायला.

मवा तुम्ही एका 'विशिष्ट' आय डी सारखं प्रत्येक गोष्ट स्वतःवर ओढवून का घेत असता कळत नाही. तुम्ही स्वतः असाल हो एक्स्पर्ट ड्रायवर पण असंख्य मूर्ख ड्रायवर आहेत त्यांचं वकीलपत्र तुम्ही कशाला घेताय? तेच तेच फालतू बोलत बसायला तुम्हाला कोणी निमंत्रण दिलेय का? तुम्हालाच खुमखुमी आहे यात भाग घेण्याची असे दिसते. आम्ही आमचे अनुभव सांगतोय तुम्ही तुमचे अनुभव अगदी फॉर्म्युला वन रेसचे सांगितले तरी चालतील...

बाजो, खुमखुमी वगैरे वाचून मी आता अजून भांडत बसेन असे वाटत असेल तर ऐका, मला तुमच्याशी भांडत बसण्यात यत्कींचितही रस नाही. लेखनसीमा.

Pages