सावित्रिच्या लेकी ....

Submitted by झुम्बर on 8 January, 2011 - 07:21

"आज पासून पोळ्या तु कर संध्याकाळच्या" आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या कारण ही फार मोठी बाब नवतीच मुळी ... पण ज्या कारणासाठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत... हो कदाचित चाणाक्ष माबो करांनी कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नवती तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस असा लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु ईथे कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुलाला किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलाल असाल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी ही मुलगीच असते ...आता म्हणल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणण एवढ्च आहे की ज्या तडजोडी मुलीला कराव्याच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधि नवत स्वयंपाक करनार्या मुलान्च जे कौतुक होत आजहि ..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?

गुलमोहर: 

नाही.. नाही.. ते काही असो पोळ्या तर आल्याच पाहीजे....आणी भाकर्‍याही..!

त्या 'गोल' करायला मला जमत नाही...:स्मित:

जे मुलीला सांगाल ते मुलालाही सांगितलं पाहिजे (स्वयंपाक वै). पण बदल व्हायला वेळ लागतो... आपल्या आया मागल्या पिढितल्या होत्या... आता आपल्या पिढितल्या पालकांनी ही समानतेची बाब त्यांच्या मुलांच्या *लहानपणापासुन* लक्षात ठेवली पाहिजे.

हे बघा, पोळ्या करायच्या तर करा नैतर नका करू, तुम्हा "नौराबायको" व्यतिरिक्त या जगात दुसर्‍या कुणालाच त्याचा काही फरक पडत नाही! Proud
बाकी आख्ख्या भारतात, जिथे जिथे "कुटुम्बाव्यतिरिक्तचा" जास्त सन्ख्येचा स्वैम्पाक होतो, तिथे तिथे "आचारी" हे पुरुषच अस्तात! कोणत्याही लग्नाचे/हॉटेलातील्/हातगाडीवरील आचारी पुरुषच अस्तात, तर किती कौतुक करणार इनमीन दोनतिनजणान्च्या स्वैम्पाकाच? Wink अन त्याच्यावर समानता तोलून बघणार?
मूळात कुणाला करुन खायला घालायला वृत्तीत "दानत" असावी लागते म्हणलं, कोण्च्या शाळेत ही दानत शिकवतात का त्याची काळजी करा! (नुस्त्या "हक्कान्च्या" मागण्या करण्याचे शिकल्यावर असच व्हायच Biggrin )

स्त्री पुरुश स्पर्धक नहि पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सान्गितलेला विचार अमलात कधि येणार?
>> जोपर्यंत अशी तीच ती वासंतिक गुर्‍हाळे चालू राहतील तोवर नाही.
KNOW your limits.
Learn to say NO.
जोवर या दोन 'नो' चे महत्त्व समजत नाही तोवर नाही.

आशुडिला अनुमोदन.... Happy

फक्त "नाहि" म्हणुन होत नाहि....त्या नाहिवर ठामहि रहायला शिका तरच थोडा फरक पडेल. तसेच आपल्या मुलींनाहि आतापासुनच ह्या दृष्टिने बघायला शिकवा आणि मुलांना घरकाम शिकवा तर काहि फरक पडला तर.... नाहितर आहेच सगळा आनंद. फक्त असे लेख लिहुन काहि होणार नाहि.

मी तरी माझ्या मुलीला पोळ्यांपासुन सगळे करायला शिकवतेय. आणि याचे कारण तिचे लग्नाचे वय जवळ आलेय हे नसुन मी जसे तिला आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी झटतेय तसेच खाण्यापिण्याबाबतीतही स्वावलंबी करण्याकरता झटतेय हे आहे. खाण्याच्या बाबतीत हॉटेले आणि बाहेरचे घरात आणुन खाण्यापेक्षा स्वतः घरात बनवुन खाल्लेला डाळभातभाजीचपाती जास्त पौष्टीक असतो हे तिला समजायला पाहिजे आणि वेळप्रसंगी करताही यायला पाहिजे. तिचा नवरा उद्या काय करेल हे तेव्हाचे तेव्हा ठरेल, पण तिचे आज, उद्या आणि पुढे केव्हाही कोणावाचुन अडायला नको.

मला मुलगा असता तरीही मी असेच वागले असते.

मुलाचे काय किंवा मुलीचे काय, पालक वगैरे नाही हो विचार करत, आणि समाज तर त्याहुन नाही. तो विचार लग्नाळु मुलामुलीलाच करावा लागतो. मग होते काय की स्थैर्य सुरक्षितता यांची पाटी जिंकते, but its a choice you make. हे आयुष्यभर विसरता कामा नये.स्वैपाक नाही करायचा तर अजिबात करु नये. पण मग लग्नाचा जोडीदार निवडताना सुस्पष्ट आणि ठाम रहावे. हे अतिशय कठिण आहे पण असाध्य नाही. Happy

..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्शा नहिये का?>> नाही. या अपेक्षा भारतीय समाजात माफक मानल्या जात नाहीत. Happy

आशू ला पूर्ण अनुमोदन.
साधना म्हणते तसा स्वैपाक प्रत्येक व्यक्तिला पोटापुरता यावाच.
पण म्हणून तो रोज, तिन्हीत्रिकाळ,कायम स्वतःच करावा किंवा नाही ही आपली मर्जी. केला तर मात्र सतत त्रागा/आदळाआपट करत करु नये हे माझं वैयक्तिक मत. आणि कामांची सवय मुलग्यांच्या आयांनी लावल्या नाही म्हणून त्यांना बोल लावणे ठिक, पण लग्नाची किती वर्षे बायकांनीही या सवयी लावल्या नाहीत तेही जरुर पहावे.

आशू, साधना, रैना अनुमोदन.

मुळात ज्याला जेवायला लागतं त्याला बेसिक स्वैपाक यायला हवा इतका साधा सोपा मुद्दा आहे.

साधनाचे मत अगदी पटते. प्रत्येकाने स्वावलंबी होणे आवश्यकच आहे.
बाकी बुजुर्गांची मतांच्या बाबतीत म्हणाल तर घरोघरी मातीच्या चुली असतात.

अगदी स्त्री पुरूष समान माननारे जोडपे असले तरी त्यातल्या प्रत्येकाला किमान ५०% सैपाक करता येणे गरजेचे आहे ना? प्रेमाने नेहमीच काही पोट भरत नाही. वर आपल्याला भुक लागल्यावरही जर जोडीदार प्रेमाच्याच गोष्टी करत असेल तर प्रेम बाजुला राहुन उलट चिडचिड होण्याचा धोकाही संभवतो... Proud म्हणुन, झुम्बर आणि रश्मी, आपापल्या आयांचे ऐका आणि सैपाक शिकुन घ्या. आया जे सांगतात ते अनुभवानेच सांगतात, आता त्यांची सांगण्याची पद्धत तुम्हाला पटत नसली तर त्यामागची कळकळ जाणुन घ्या...

तर किती कौतुक करणार इनमीन दोनतिनजणान्च्या स्वैम्पाकाच? अन त्याच्यावर समानता तोलून बघणार?
मूळात कुणाला करुन खायला घालायला वृत्तीत "दानत" असावी लागते म्हणलं, कोण्च्या शाळेत ही दानत शिकवतात का त्याची काळजी करा! (नुस्त्या "हक्कान्च्या" मागण्या करण्याचे शिकल्यावर असच व्हायच )
>> कैच्याकैच पोस्ट!

एवढं कौतुक नसेल तर तुमच्या ओळखीतल्या किती कुटूंबात पुरुष ही कामं नित्यनेमाने अन हसतमुखाने, ताठ माथ्याने करतात ? हॉटेलात, लग्ना मुंजीची जेवणं करणरे बाप्ये वट्ट मोजून पगार घेतात त्या कामाचा. खायला घायची दानतच कुठे आली त्यात ? रोज घरचा स्वैपाक करणार्‍या सासुरवाशिणीला दोन शब्द कौतुकाचे सुद्धा ऐकायला मिळतात का ?
पुण्यात आज ५०-७५ वयोगटातल्या बहुसंख्य बायका ज्या शाळांमधून शिकल्या तिथेच त्यांचे नवरे / भाऊ / दीर / मेव्हणे शिकले असणार ना ? पण त्या बायकां ( सासू कॅटेगरीतल्या ) दानत शिकल्या अन त्यांच्याबरोबरीने त्याच शाळांमधून शिकलेल्या पुरुषांनी मात्र ही दानत ऑप्शन ला टाकलेली का Angry

पण खरं सांगू का बेसिक स्वैपाक शिकावा लागतो यावरच माझा विश्वास नाही. म्हणजे वरण भाताचा कुकर, बेसिक फोडण्या यात शिकण्यासारखं काय आहे?
भाज्या-आमट्या हा निव्वळ लॉजिकचा मुद्दा आहे.
चिरणे, माप आणि पोळ्या-भाकर्‍या हा पूर्णपणे सरावाचा मुद्दा आहे.
बाकी विशेष विशेष वस्तू या शिकाव्या लागतात ते ठिके.

साधना अनुमोदक!
नी, पटलं!
हेच आमच्या मातोश्रींच म्हणणं मला पटलं नी मी स्वयंपाक शिकलो.
साला त्यात शिकाय सारखं अन् शिकवाय सारखं काय हेच मला अजून नाही कळालेलं!
आता मोदक वगैरे ठीक, पण साध्या साध्या गोष्टीही येऊ नयेत?
बाकी लिंबू नी मेधा दोन्ही पोस्टी Lol
मुळात आपल्याकडे स्वावलंबी वगैरे म्हणजेच जाच समजला जातो. हे म्हणजे हलक्या प्रतीचे काम इतपत शिकवणूक नि समज केले जातात. (याला मी चोचले म्हण्तो)
च्यायला दर गोष्टीला स्त्री-पुरुष असं विभागायचं ह्याला काय अर्थये का?
(जाउदे माझं छान मनोरंजन झालं हा नी असाच एक दुसरा बाफ वाचून. मज्जाय!)

साधना चं म्हणणं पटलं. बेसिक स्वयंपाक हा प्रत्येकाला यायलाच हवा. मी पण मुलाला शिकवणारच आहे.
नी अगदी खरं. स्वयंपाक हा सरावाने येतो. अगदी मोदक, पुरणपोळी सुद्धा प्रॅक्टिस्सनेच जमतं.

मी अमेरिकेला जाण्यापुर्वी स्वैपाक शिकलो (वरण, भात, भाजी, आमटी)..पण तिकडे जेव्हा ट्राय केला तेव्हा माझे "पाककौशल्य" पाहुन रुममेटस नी स्वैपाक करायची जबाबदारी स्वतःकडे घेउन नंतरची आवराआवर्/साफसफाई ची कामे मला दिली.
पुढे लग्न झाल्यावर असेच कायम राहिले. स्वैपाकाची जबाबदारी बायकोकडे आणि नंतर आवराआवर , भांडी स्वच्छ करणे आणि बेसिन क्लीन करणे इ. कामे माझ्याकडे. अमेरिकेतुन आता पुण्यात परत आल्यावरही ती विभागणी तशीच ठेवली आहे.
स्वैपाक केल्याने माझ्या बायकोच्या व्यक्तीस्वातंत्र्यावर वगैरे घाला पडला नाही किंवा मी घरात भांडी घासल्याने माझ्या पुरुषार्थालाही धक्का लागला नाही. थोडे समजुतदारीने घेतले तर दोघानाही सुखद होइल असा पर्याय शोधता येतो.

साधना आणि रैना.. छान पोस्ट्स..

रैना, मेधा, नीधप यांच्याशी सहमत.

साधा स्वयंपाक शिकणे काही अवघड नाही. लहानपणापासून शिकले तर कदाचित सोपे जात असेल पण उशीरा सुरुवात करूनही जमते. वयाच्या पंचविशीपर्यंत माझी मजल केवळ गॅसची आच लहान मोठी करणे आणि ढवळणे एव्हढ्यापर्यंतच होती. नंतर आपल्याला हवे आहे म्हटल्यावर आपोआप शिकले. नवरा त्याच्या तिशीपर्यंत काही न करता/ शिकता आता लग्नानंतर व्यवस्थित स्वयंपाक करतो.

कोणी आपल्या जोडीदाराला शिकवेल (किंवा बाळपणीच का शिकवले नाही) असा विचार करत बसण्याने काही साध्य होणारे नाही.

लहानपणापासून शिकले तर कदाचित सोपे जात असेल पण उशीरा सुरुवात करूनही जमते. <<
अगदी अगदी.
मला परदेशात शिकायला जाईपर्यंत कुकर लावणे व्यवस्थित येत होतं, मु डा खिचडीचं प्रॅक्टीकल एकदा झालं होतं आणि फोडणीमधे चिरलेल्या भाज्या सोडून त्या पाणी घालून शिजवतात त्याला भाजी म्हणतात हे बघून माहीत होतं. पोहे, सा खिचडी बघून माहीत होतं. पोळ्या... जाउदेत...
विद्यार्थी असल्याने आणि पुस्तकांबरोबरच आर्ट मटेरियलचा न पेलणारा खर्च असल्याने बाहेर खाणं हा मुद्दाच नव्हता. कधीही अडलं नाही. सगळं यायला लागलं. ऑम्लेट हा पदार्थ सोडला तर ३ वर्षात कुठलाही पदार्थ बिघडला नाही. तोंड उघडून/ फोन फिरवून चार लोकांना विचारणे, आईला इमेल करणे अश्यातून अडलेल्या गोष्टी पण सोडवल्या जायच्या.
गरज असताना केलं पण मुळात स्वैपाकाची आवड अजिबात नाही त्यामुळे बाई लावली स्वैपाकाला. अर्थात ती नसेल तरी अडत नाही.
खरतर कॉमन सेन्स असेल तर बेसिक स्वैपाक करण्यात कणभर पण अवघड नाही पण आवड नसेल तरी केलाच पाहिजे बाईच्या जातीला यातही काही अर्थ नाही.

हा बाफ १०० प्रतिसाद क्रॉस करेल असे वाटते आहे..
जर तुमचा बेटर हाफ हाऊस वाईफ असेल तर घरकामाची अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नसावी
पण जर वर्कींग असेल तर ५०-५० नेच घरातील कामे केली पाहीजेत..

@ झुम्बर : लेख छान आहे ..
पण तो जास्त करुन मुलीकडच्या बाजुने लिहीला गेलेला आहे असे दिसते..
आपण जे मुद्दे मुलांबद्दल मांडले आहेत.. ते फक्त घरामधे लाडावुन सोकाऊन ठेवलेल्या मुलांसाठी लागु पडतात.. ईतरांना नाही.. त्यामुळे असे जनरलाईज करणे चुकीचे आहे असे वाटते..

ज्या मुलांना शिक्षण आणी नौकरी साठी घर सोडावे लागते.. त्यांच्या साठी ह्या गोष्टी लागु पडत नाही..
गावी असताना.. आमच्या कडे खेडे गावातील मुले राहायची अगदी भाकरी पासुन सगळा स्वंयंपाक स्वतः
करायची..
मी पण घरी असे पर्यंत आजी चा लाडोबा होतो.. साधे चमचा ने स्वता:ला जेवायला पण वाढुन घेता येत नसे..
पण जेंव्हा ईंजी. साठी घर सोडले.. तिकडुन २ वर्षात सर्व स्वंयंपाक जमेल तसा शिकलो.. (आजुनही शिकतच आहे ती गोष्ट वेगळी Proud )

पु.ले.शु.

वयाच्या पंचविशीपर्यंत माझी मजल केवळ गॅसची आच लहान मोठी करणे आणि ढवळणे एव्हढ्यापर्यंतच होती.

नवरा त्याच्या तिशीपर्यंत काही न करता/ शिकता आता लग्नानंतर व्यवस्थित स्वयंपाक करतो.
>>>> ही दोन वाक्ये परस्परपूरक आहेत Proud Light 1

स्वयंपाक करणे ह्याचा बाउ करण्याची काय गरज? मला देखिल स्वयपाक अज्जिबात येत नव्हता, सुरुवातीला जाम हाल झाले. पोळया वगैरे आपण आधीच का नीट विचारून घेतल्या नाहीत ह्याचा पश्चाताप पण झाला. पण आज मी ४ जणांचा स्वयपाक पाऊण तासात (पोळ्यांसकट) करु शकते. ह्यात फक्त प्रॅक्टीस आहे बाकी काहीच नाही. माझा नवरा बहूतेक वेळा रोज संध्याकाळचा स्वयपाक (आनंदाने) करतो. ह्याच कारण की मोस्टली तो घरी लवकर येतो. समज उद्यापासून त्याला उशीर व्हायला लागला तर मी करेन. it's that simple. वेळच्यावेळी जेवायला मिळाले म्हणजे झाले Happy

मला वाटतं होतं की स्वयपाक हे इथे फक्त एक उदाहरण आहे... मुळ मुद्दा मुलगा-मुलगी यांना समान वागवण्याचा आहे.... पण माझा समज चुकीचा असु शकतो Wink

>>>. आम्ही आमच्या मुलाला स्वैंपाक शिकवला आहे. आजकालच्या मुलींचे काही सांगता येत नाही Lol
प्रचण्ड हसलो, पण वास्तव हेच्चे!
(फक्त मुलिन्चे आगोदर "शहरी, सुशिक्षित, सावित्रीच्या लेकी" असे हवे असे नै वाटत? Wink )

>>> रोज घरचा स्वैपाक करणार्‍या सासुरवाशिणीला दोन शब्द कौतुकाचे सुद्धा ऐकायला मिळतात का ?
कौतुक बाजारात विकत मिळत नाही, ते नशिबातच असावे लागते, अन नशिब देखिल बाजारात विकत मिळत नाही, चान्गलेनशिब देखिल नशिबातच असावे लागते यावर माझा ठाम विश्वास आहे. असो. बाकी तुमची कळकळ समजली Happy
मला अपेक्षित दानत ही स्वतः करुन दुसर्‍याला खायला घालण्यातली आहे, अन कोणतीच दानत कौतुकाच्या अपेक्षेने असू शकतच नाही, जर तशी अपेक्षा असेल, तर तिला दानत म्हणत नाहीत. (तोन्डपुजेपणा - वा पोटपुजेपणा(?) म्हणू शकतात Proud )

नीरजेची, "मूळात रोजच्या स्वैम्पाकात शिकण्यासारखे अवघड आहेच्च काय" या अर्थाचि पोस्ट पटली! Happy
अर्थात, बारकावे बरेच अस्तात, पण तिथे नाळकं गाडल असलं तर समजणार ना? तिकडे फिरकलच नाही तर ब्रह्मदेवालाही सम़जणार नाही! अन न फिरकण्याकरता असन्ख्य सबबी आहेतच उपलब्ध प्रत्येकाला! नै का?
पुन्हा असो.
खर तर हा माझा विषय नाही, पण "सावित्रीच्या लेकी" असे म्हणत म्हणत त्या नावाखाली नै नै ते फुटीर विचार मान्डले जातात बघुन थोडा अस्वस्थ झालो होतो. (इतिहासात डोकावुन कुणी सान्गु शकेल काय की सावित्रीबाइन्नी स्वैम्पाक करणे सोडून दिले होते का अन ज्योतिराव रोजचे शिजवत होते का? )

न फिरकण्याकरता असन्ख्य सबबी आहेतच उपलब्ध प्रत्येकाला! नै का?<<
करेक्ट. पुरूष असल्याची सबब तर सगळ्यात जास्त आणि युगानुयुगे वापरून झालीये.

सावित्रीबाइन्नी स्वैम्पाक करणे सोडून दिले होते का अन ज्योतिराव रोजचे शिजवत होते का?<<
असेलही. कुणास ठाउक. पण सावित्रीबाईंनी स्वैपाक करणे सोडले असेल आणि जोतिराव रोज शिजवत असतील तर यातून कमीपणा कुणाकडे येतो? त्या दोघांकडे निश्चित नाही. ज्याला हे चित्र खटकत असेल त्याने कमीपणा वाटून घ्यावा.

Pages