दुर्ग भ्रमण गाथा

Submitted by मदत_समिती on 4 June, 2008 - 21:01

जुन्या हितगुजवरचे आधिचे दुर्ग भ्रमणाचे अनुभव इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विश्राम गड(पट्टाकिल्ला)अहमदनगर जिल्हा,अकोले तालुका. हा किल्ला नाशिक व अहमदनगर या जिल्ह्यांच्या सिमेवर आहे.मुंबई हुन कसारा घाटांतुन घोटी मार्गे सर्व तीर्थ टाकेद गावातुन पुढे गेल्यावर समोर एक डोंगरतोच हा पट्टा किल्ला. याचे इतिहासात विश्राम गड असे नाव आहे.या किल्ल्यात राजे फक्त विश्रांतीसाठी येत असे येथील लोक सांगतात्.त्यामुळे या किल्ल्याचे नाव विश्राम गड असावे.या किल्ल्यावर शिवाजी काळातील तोफा होत्या.त्या आता सरकारच्या संग्रही जमा आहेत.किल्ल्याचे बुरुज उभे आहेत किल्ल्याची शाक्श द्यायला.किल्ल्याच्या माथ्यावर एक दगडी चैकोनी घर आहे. किल्ल्यावर् पाण्याचे सात खंदक आहेत पण ते सर्वाच्या दुर्लक्षामुळे बुजत आहेत्. किल्ल्यावर पट्ट्यांआई देवीचे एक मंदीर आहे.मंदीराच्या उजव्या हाताला पुढे एक खाली जाणांरा कल्याण दरवाजा आहे.किल्ल्यात
चार कोट्या(राहण्याची जागा) आहेत्.एका कोटीत आता साधु लोक राहतात.चोर वाटा असणारे पाण्याचेखंदक आहेत. एका कोटीत किल्ल्याच्या पायथ्यालगत कोकणवाडी गावातील लोकांसाठी धाण्या दळण्याची एक गिरण आहे(आताची).किल्ल्याच्या समोरील बाजुस असलेल्या डोंरावर एक टेहाळणी बुरुज आहे. किल्ल्यात आजुन कोट्या,शिव कालीन नाणी,वस्तु सापडतात्.तसा हा किल्ला पुर्ण दुर्लशित आहे. ह्या किल्ल्याच्या बाजुला पवणचक्क्या( वार्‍यापासुन वीज निर्मिती केंद्र)उभारल्या गेल्या आहेत्.त्यामुळे पावसाळ्यात हा एक चांगला पिकिंक पॉईट(सहलीचा) आहे.सभोताली धुके त्यात गोल वार्‍याच्या साय्याने फिरणारे पवणचक्कीची पाते. किल्ल्यापर्यंत आता चांगला रस्ता आहे .

गणेश,

गेल्या वर्षी पुर्ण पावसाळाभर आणि नन्तरही, आम्ही TCS च्या कडून कोकणवाडी आणी पट्टा परिसरात दुर्ग सम्वर्धन आणि base village development वर काम करत होतो. सध्या सिद्धगडावर सुरु करायचा विचार चालू आहे.
-येडचाप

मला राजगड - तोरणा - लिंगणा - रायगड ट्रेक करायचा आहे. फार पुर्वी केला होता. आता तोरणा - लिंगणा भाग पुर्ण आठवत नाहिये. कुणाला महिती आहे का? तोरण्याहुन बोपलघर - सिंगपुरची नाळ किंवा बोचेघोळ - लिंगाणा असा रुट आहे असं वाटतय. महिती असेल तर क्रुपया सांगा. जॉईन झालात तर फारच छान. दिवाळीच्या सुट्टीत जाण्याचा विचार आहे.

जयदीप ... तोरणावरून निघून बोराट्याची नाळ मार्गे किंवा सिंगपुरची नाळ मार्गे लिंगाणा असा रुट आहे. खूप आधी ट्रेक केला होता हा.. त्यावर लिखाण करतो लवकरच.. Happy

येडचाप... तुम्ही पता येथे काम केले तेंव्हा 'दिपा' सोबत होत्या का??? ह्या कामाबद्दल मी ऐकून आहे त्यांच्याकडून.