भारतातील सर्वात आकर्षक ५० घरे

Submitted by वर्षू. on 6 January, 2011 - 04:01

यावेळी एकतीस डिसेंबर आत्याकडेच साजरा करायचा म्हणून एक आठवड्याकरता अहमदाबादला गेलो होतो.
तिचं सुरम्य३ मधे असलेलं रिट्रीट वजा घर बघूनच हॉलिडे मस्त जाणार याबद्दल खात्री पटली. हे घर तिचा मुलगा उदय आणी त्याची पत्नी मौसमी अंधारे या दो तरूण आर्किटेक्टसनी स्वतःच डिझाईन केलेय. २००५-६ साली त्यांच्या या ड्रीम हाऊस ने व्हाईट्फ्लॅग कंपनी पब्लिश करत असलेल्या
'50 most beautiful houses in India' या मॅगझिनमधे स्थान पटकावले.
रच्याकने उदय आणी मौसमी ला /कोबा हाऊस डिझाईन करण्याकरता गुजरात गव्हर्न्मेन्ट कडून अवॉर्ड मिळालय.
या वेब्साईट वर आधिक माहिती मिळू शकेल
http://www.indigo.net.in
हे पान मॅगझिन मधले(फोटो चा फोटो)
udu1.jpgudu2.jpgudu3.jpgudu4.jpgudu5.jpg

या इथे घरात राहण्याची मज्जा अनुभवली.. जॉईंट न्यूक्लिअर फॅमिली या बेसवर घराची कल्पना मांडलेली आहे.सर्वांसाठी सेपरेट युनिट असून लिविंग,डायनिंग आणी किचन एकत्र आहे
ओपन लिविन्ग रूम
udu6.jpg

दोन युनिट्स्मधे असलेले विशाल लॉन
udu7.jpg

घराच्या किचनगार्डनमधला पॉन्ड्,त्यात पडलेले काठावरच्या झाडाचे प्रतिबिंब

udu8.jpg

बगिच्यातले पाहुणे
udu9.jpgudu10.jpg

अंगणातली संध्याकाळ

udu12.jpgudu13.jpg

नातवांच पाळीव कासव' स्पीडो' काकड्यांवर ताव मारतांना
udu14.jpg

घरावरून रोज थोल तलावाकडे जाणार्‍या अबाबिल पक्ष्यांचे थवे
udu11.jpg

गुलमोहर: 

दुबई, मस्कट, सिंगापूर , मलेशिया , अमेरीका, इंग्लड या सारख्या देशात अजून सुद्धा भारतीय प्राचिन स्थापत्यकलेची मागणी आहे. बर्‍याच १० पाश्चात्य शौकिनांच्या घरी एक तरी भारतीय स्थापत्य कलेचा नमुना दिसतो.

हा खरोखर गौरवशाली अभिमान आहे भारतीय स्थापत्य कलेचा. इथले आर्किटेक्ट्स तंत्रज्ञान आणि वास्तुशास्त्राला अनुसरून जेव्हा काम करतात तेव्हा ते घर खरोखर सुंदरच होतं

याचा एक उत्तम नमुना तुम्हाला पुण्यात पहायला मिळेल तो म्हणजे 'डीसके" यांचा बंगला. घराला घरपण देणारी माणसं या जाहीरातीमधे दाखवला जातो तो भाग अन ते आंगन पहिल्या मजल्यावरचं आहे.

वर्षुताई, फारच सुरेख आहे घर. मी आर्किटेक्ट आहे त्यामुळे जास्तच अ‍ॅप्रिशिएट करु शकते कदाचित की या घराचे डिझाईन आणि कन्स्ट्रक्शनमागे किती मेहेनत घेतली असेल या दोघांनी. प्लिज माझ्याकडुन अभिनंदन कळव दोघांना आणि ऑल द बेस्ट पण!!

हाय लाजो,ऐ.. तुझंही हेच फील्ड, विसरलेच होते.. तू पण टाक नं तुझ्या प्रोजेक्टचे काही फोटो

वर्षू नील , पुण्यामधे अशी बरीच घरे पाहण्यासारखी आहे. सुदैवाने मला ती पहायला मिळाली आहेत. Happy जमल्यास माथेरानमधील ब्रिटीशकालीन घराची पद्धत एकदा पाहून घ्या. खूप सुंदर रचना असते त्यांची. गोव्यात ओल्ड गोव्यातली घरे, कोकणातली घरे. इतकं सगळं वेगळे पण फक्त महाराष्ट्र भारतातच पहायला मिळेल.

ओ थॅन्क्स.नादखुळा..तुझं कार्यक्षेत्र पण हेच आहेका???
नेक्स्ट ट्रिपमधे जी जमतील ती पाहू.. गोव्याची पाहिलीत..

माझं कार्यक्षेत्र वेगळं आहे पण स्वतःचं घर कसं असावं हे स्वत: ठरवलेलं जास्त आवडतं.

शेवटी काय पहावे एकदा घर बांधून.

- अजून एक सांगायला विसरले.. ही जागा अहमदाबादहून ३०,३५ किमी अंतरावर असून दोन्ही बाजूला अरण्यच आहे. घराच्या आसपास नीलगाईंचे कळप,ससे,क्वचित रानडुकरे दिसतात... परसातल्या पॉन्ड मधे शे पन्नास मोठमोठ्या बेडकांनी वस्ती केल्यामुळे कधीमधी कोब्रा महाराज पण दर्शन देतात

सुंदर.

'या घरात राहणारी माणसेही अशीच मोकळ्या मनाची असणार.'

दिनेश दा अगदी!!अगदी!!! आईदादांची जागा आत्या आणी तिच्या मिस्टरांनी अगदी अलगदपणे केंव्हाच घेऊन टाकलीये.. आणी आतेभाऊ म्हंजे सख्खेच भाऊ अशी आमची लहानपणापासूनची कल्पना ही कल्पना नसून वास्तवच होती आणी आहे

वर्षु नील -
फारच सुंदर . आवारातले मस्त हिरवे लॉन
एल टाईप मस्त घर ,मोठा प्रचंड हॉल
पौर्च मध्ये ठेवलेला बसलेला पुतळा [?]
बंगल्याच्या बाजूचे सुंदर तळे त्यातील कमळे [?]
आजूबाजूचा निसर्ग हिरवळीवर खरी मस्त मजेने ....
खिडकीतून दिसणारी झाडची फांदी .छोटेसे मुल
आभाळात संध्याकाळची पाखरांची भिरी .निव्वळ अप्रातिम
तुमच्या डोळ्यांनी निसर्गाचे सुंदर रूप मस्त अटक केलेत.
आभार . तुमचे नि तुमच्या नजरेचे ..!!

निलतै, अवघा निसर्गच एकवटला आहे घरात, घराच्या आवारात. एखाद्या "रीसॉर्ट" ला ही लाजवेल अशी रचना केली आहे. 'स्वर्ग' असाच असेल maybe.
अंधारे कुटुंबियांना 'गुजरात गव्हर्न्मेन्ट कडून अवॉर्ड' मिळाल्या बद्द्ल 'अभीनंदन'. आणि तुला हे 'स्वर्गसुख' अनुभवायला भेट्तंय म्हणुन तुझही.. Happy
Thanx for share with us.

अरे वा..प्रकाश्..सुंदर शब्दात लिहिलेल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्स Happy

चातक ,सुजा आपला आनंद मित्रमैत्रीणींबरोबर शेअर करायची संधी दिल्याबद्दल माबो चे ही खूप आभार
थांकु तुम्हालाही माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल Happy

@प्रकाश..पौर्च मध्ये ठेवलेला बसलेला प@प्रकाश्..तो एका आदिवासी बस्तीतून मिळालेला हनुमानाचा पुतळा आहे.. यात हनुमानालाही आदिवासी कपड्यात दाखवले आहे. खूप जुना आहे .. ७०,८० वर्षांपूर्वीचा

फार सुंदर घर! तुम्ही दिलेल्या वेबसाइटवर 'Architects' own residence' या लिंकवर जाऊन पुन्हा एकदा या घराचे फोटो बघितले. सुरेख!!

Pages