कोकण

Submitted by भाऊ नमसकर on 4 January, 2011 - 11:16

अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन.

kokan.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छाने Happy

प्रपोर्शन आणि डेप्थ मस्त जमलय! शेडिंगही मस्त केलय! हे सगळं तपशिलात पेंटमध्ये करणं खरच खूप कौशल्याचं काम आहे! हॅट्स ऑफ... Happy

भाऊ... _/\_ .. एमएस पेंट मध्ये काढलेले भासत नाही इतके सुंदर आलेय !!!! फार कमी जणांना जमते हे.. खूप खूप छान !!

भाऊ, साष्टांग दंडवत तुमका. किती मस्त काढलास ह्या चित्र. आणि काळा-पांढराच छान दिसताहां. Happy आमचा कोंडीतला घर असाच दिसता.

हे पेंट मधे काढलंय??? विश्वास ठेवणं कठीण जातय इतकं सुंदर काढलंत ते.
पेंट म्हणजे अगदी टुकार आमच्यासाठी, पण त्यातूनच तुम्ही हे निर्माण केलंय हे अजूनही मनाला पटत नाहीए...
हॅट्स ऑफ बॉस.... Happy अफलातून खोली दाखव्ली गेलीए.....

उत्तम!

अजून "फोटोशॉप" आत्मसात करणं जमत नाहिय; पण "डिजीटल आर्ट" या नवीन सदरात आपलंही कांहीतरी रुजूं असावं, या बालीश हट्टापायीं एमएस ऑफीसच्या "पेंट"मध्ये केलेलं कोकणातील एका टिपीकल घराचं हे चित्र. चित्रांसाठी "पेंट" फार प्राथमिक सुविधा आहे व त्यात माझं मर्यादित कसब. तेंव्हा फार चोखंदळपणे हे जोखू नये, हे नम्र आवाहन>>> हे उगाच लिहीलंत! फार उत्तम कलाकृती म्हणायला हवी ही! माझी प्रामाणिक दाद!

-'बेफिकीर'!

अहो अतिशय उत्तम आहे हे चित्र.. चित्राची खोली खरेच सुंदर जमलीय.. अजुन काही केले असेल तर टाका इथे.

डिजीटल आर्ट वगैरे ह्यातल्या तांत्रिक बाबी मला कळत नाहीत.. जे भावते त्याला आपला नमस्कार... Happy

हे बेस्ट आहे.. एकदम सही.. Happy चालू ठेवा.. पुढचे एखादे येउद्या अजून.. Happy

या भरघोस प्रतिसादाने मी भारावून गेलो व सुखावलोही. सर्वाना धन्यवाद.
<< रंगीत करायचा प्रयत्न केला का?>> फारएण्डजी, "पेंट"मध्ये फारच मर्यादित "टूल्स"व रंगांच्या छटा असतात, त्यामुळे तीं वापरून निसर्गचित्र रंगीत करायचं तर ते अनैसर्गिकच वाटेल; निदान मला तरी तसं वाटतं. मी "पेंट"चा रगीत व्यंगचित्रासाठी मात्र वापर करतो.
<<डिजीटल आर्ट वगैरे ह्यातल्या तांत्रिक बाबी मला कळत नाहीत.. >> पक्का भटक्याजी, ह्याला डिजीटल आर्ट म्हणतात, हे मला तरी कुठं माहित होतं !

सुंदर आलं आहे, डेप्थ, प्रपोर्शन, शेडिंग व्यावसायिक दर्जाचे आहे ! तुम्ही माऊस ऐवजी प्रेशर पॅड/ टॅबलेट वापरुन बघा, अजुन चांगली चित्र ( पेन्ट मधेसुद्धा) येतील !

Pages