कृष्णा पुरे (गवळण)

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 31 December, 2010 - 12:56

कृष्णा पुरे थट्टा अशी नाही रे बरी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी !

फोडुनी माठ साडी भिजवी भरजरी
केलीस खोडी आता नाहि का पुरी,
मारिल रे सासु माझी रागिट भारी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी,

भर मध्यान्ह झाली घट डोइवरी
चढुनी घाट धाप लागली उरी,
संगतिला नाही कुणि ऐक श्रीहरी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी,

धरु नको पदरा भर रस्त्यावरी
संसारी आग कुणी लाविल हरी,
थकले रे नन्दलाला विनवुनी परी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी,

बोलिले कान्हा राग धरू नको मनी
तुझिया चरणाविण नाही रे गती,
चरण धरुनी राधा विनविते परोपरी
वाट नको अडवू मला जाऊ दे घरी.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

नाय नाय राधे, आज मी सोडनार न्हाय. आग तू दररोज घागर भरून घिवून जातीस आन पानीपट्टी भरत न्हाय! मंग आमच्या कान्हा आमच्या कानाखाली आवाज काढीतो ना!
आज तू मातर पानीपट्टी देवूनच जायाला होवं, आगं, किसनद्येवाचा तसा वटहुकूमच हाय म्हन ना!
- पेंद्या

पदराला धरु नको, मस्करी करु नको
वाट माझी सोड...
रे कृष्णा पदराला धरु नको सोड...
रे कान्हा पदराला धरु नको सोड..
घनश्यामा पदराला धरु नको सोड...