रत्ननगरी "रत्नागिरी" – (१० – अंतिम) - एक खाद्य भ्रमंती

Submitted by जिप्सी on 30 December, 2010 - 23:30

=================================================
=================================================
कोकण हे जसे स्वच्छ,सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार झाडांतुन धावणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे, हिरवागार निसर्ग, प्रेमळ कोकणी माणसे या गोष्टींसाठी जरी प्रसिद्ध असले तरी ते प्रसिद्ध आहे ते इथल्या खाद्यसंस्कृतीसाठीही. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे, हापूस आंबे, फणस, करवंद न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. तेंव्हा रत्ननगरी रत्नागिरीच्या शेवटच्या भागात आपण "कोकणी खाद्यभ्रमंती" करूया. Happy
=================================================
=================================================

प्रेमळ इशारा – ENTER AT OWN RISK Proud

=================================================
=================================================
व्हेज थाळी
कोकणची प्रिती......वडे सागुती Happy
मांदेली ताट
मांदेली फ्राय
चिकन बिर्याणी
सुरमई ताट
सुरमई फ्राय
स्वीट डिश
कोकण सफर आणि कोकणी मेव्याशिवाय कशी पूर्ण होणार???

कोकम सरबत
हापूस आंबा (जुना फोटो)
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
फणस (जुना फोटो)
रानमेवा – करवंद (जुना फोटो)

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – समाप्त Happy
=================================================

गुलमोहर: 

हॉटेलात मांदेली मिळत असेल कदाचित पण कोकणातल्या घरात तुम्हाला कधीच मांदेली मिळणार नाही.>>>>मी पण हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय कि माझी हि भटकंती "पर्यटक" म्हणुनच आहे. नंदिनीनेही सांगितले कि हे "टुरीस्ट फोटो" आहेत. आणि ते हॉटेलातलेच आहेत.

माझं घरच कोकणात असल्यामुळे हॉटेलमधे खाण्याची कधी वेळ आली नाही,त्यामुळे कोकणातल्या हॉटेलात काय मिळतं याबद्द्ल मला काहिच माहिती नाही.>>>>>जसं मी आधीच्या पोस्टमध्येही लिहिले आहे कि मी मूळचा कोकणातला नाही त्यामुळे माझी भटकंती हि बाहेरच जास्त झाल्याने कुणाच्या घरी राहण्याची वेळच आली नाही. :-). असो.

आता तुम्हीच मला आमंत्रण द्या आणि कोकण खाद्यसंस्कृतीची ओळख करून द्या.
नक्कीच आवडेल जाणुन घ्यायला. Happy

सोलिड फोटो आहेत रे जिप्स्या.. मला तर एकुण एक फोटो आवडले नि शेवटचा तर हात पुढे करुन खेचुन घ्यावासा वाटलाय.

हॉटेलात जे मिळते आणि तिथले रहिवाशी घरात जे बनवुन खातात त्याच्यात फरक असणारच.

मांदेली कोकणात मिळत नाही हे अंशतः खरे असावे कारण तिथल्या समुद्रात ती मिळत नाही. मुंबईहुन येते नी काही ठराविक मार्केटात मिळते. अर्थात पर्यटकांसाठी हॉटेलवाले मांदेली घेत असणार विकत. (यावेळी गावी गेलेले तेव्हा कोळणीकडे मांदेली मागितली, तिने ही माहिती दिली)

बाकी जिप्स्याने मांदेली खाल्ली हे पाहुन खुप बरे वाटले. अजुन एकजण कन्वर्ट झाला तर (जागु जिंदाबाद Happy ) नाव जरी जिप्सी असले तरी हा प्राणी फक्त जिप्सींसारखा भटकंती करणारा आहे, मांसाहारी नाही. आता मांदेलीपासुन सुरवात केलीय तर काही दिवसात तंदुरी चिकनचेही फोटो येतील तर... बाकी सुरवात करायला मांदेलीसारखा चविष्ट मासा दुसरा नसावा Happy

<<मांदेली कोकणात मिळत नाही हे अंशतः खरे असावे कारण तिथल्या समुद्रात ती मिळत नाही. मुंबईहुन येते नी काही ठराविक मार्केटात मिळते. अर्थात पर्यटकांसाठी हॉटेलवाले मांदेली घेत असणार विकत.>>हे १००% खरं आहे साधनाताई.
जिप्सी,तसं बघायला गेल तर तुम्हीच माझ्यापेक्षा कोकण जास्त फिरला आहात.मी माझ कोकणतलं घर सोडलं तर बाकी कुठेही फिरलेली नाही.गणपतीला गावाला जायचा विचार आहे. नक्की झालं की सांगेन. Happy

नाव जरी जिप्सी असले तरी हा प्राणी फक्त जिप्सींसारखा भटकंती करणारा आहे, मांसाहारी नाही. आता मांदेलीपासुन सुरवात केलीय तर काही दिवसात तंदुरी चिकनचेही फोटो येतील तर... >>>>साधना, Biggrin

गणपतीला गावाला जायचा विचार आहे. नक्की झालं की सांगेन.>>>>>>धन्स, हर्षदा Happy

दक्षे, तुझ्या हापिसात परत पिकासा ब्लॉक केला वाटतं. Uhoh

कोकणातली माहिती शोधताना हा बीबी नजरेला पडला. फोटो मस्तच आहेत. पिकलेल्या हापूस आंब्याचे जास्त करुन आवडले.
प्रतिक्रिया चाळताना दिनेश यांनी लिहिलेलं >>'चहासुद्धा कोराच. दूधदूभते मिळायला गायीम्हशी कुठे होत्या कोकणात ?' >> हे नजरेला पडलं आणि वाचून हसावं की रडावं कळेना.
आमच्या लहानपणापासून प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही कोकणात आजोळी गेलो आहोत. आमच्याकडे आणि आमच्या कोकणातल्या नातेवाईकांकडे, शेजारी, पाजारी सगळ्यांकडे गाई,म्हशी पाहिलेल्या आहेत त्यामुळे गाई, म्हशी कोकणात नव्हत्या तर होत्या कुठे? कोकणात मुळचीच गरिबी आहे त्यामुळे जे काय दूध मिळत असेल ते विकून पैसे मिळवायचे म्हटल्यावर घरात चहाला वगैरे दूध असणारच नाही. काहीतरी पटेल असं लिहा. उगाच काय आपलं!!

Pages