द बिग फॅट पुणे गटग - संपुर्ण

Submitted by ऋयाम on 30 December, 2010 - 22:48

'अश्विनीमामी भेट गटग' मल्टिस्पाईस, पुणे इथे ७वा. पासून (सायंकाळी) पार पडलं.

सदस्यसंख्या ५ किंवा फार्फार तर ७ अशा जपान गेट्टूची सवय असलेल्या मला, २५एक जणांचं हे गेट्टू ते 'बिग फॅट..' वगैरे म्हणतात तसं वाटलं नसतं तरच नवल.

मी साधारण ७:१५ ला पोचलो तेव्हा साधारण ७-८ जण आले होते. 'तुम्ही अश्विनीमामी ना?' मी लगेच त्यांना ओळखलं! तोपर्यंत तेनी 'पत्ता लिवा, अत्तर मिळवा!' ऑफर काढली नव्हती. त्यामुळे अत्तरावर डोळा नव्हता होऽ मामी.. चिनुक्ष आणि एल्टी साहेबांचा फोटू (एकत्र नव्हे) कुठेतरी बघितला होता, त्यामुळे त्यांना मी ओळखलंच. मला कोणीही ओळखायचा प्रश्नच नव्हता त्यामुळे मीच गुमान नाव सांगितलं. 'अरेऽ नाव काय साङतोस, आयडी साङ!' कोणीतरी बोललं, मग मी आयडी साङला.

माझी जागा मयुरेशच्या शेजारी होती. आमच्या मधे असलेल्या एका खुर्चीवर चिनुक्ष होता. पण तो सतत \कामानिमित्त इकडेतिकडे करत असलेने ती जागा रिकामीच होती. उजवीकडे एल्टी साहेब होते. पण ते शांतचित्ताने बसले होते. ते तोंडावरून इन्स्टंट भविष्य वगैरे तर साङणार नाहीत ना, अशी शङ्का आल्याने मी त्यांच्याकडे पाठ करून बसलो. समोर मिल्ट्रीचा भारी नेकटाय घालून आलेले शरद होते. त्यांच्या शेजारी रुमा आणि पल्ली होत्या. मग चिनुक्षानी मागवलेले फिंगरचिप्स आले. ते बहुधा मीठावर कर होता त्या काळातले होते. मला चिनुक्षाला 'मीठं वै प्राणा:' म्हणून साङायचं होतं.

तेवढ्यात तिकडून एक उंच इस्त्री चालत आली. मी उठून, हसून 'अरेऽ! तु इथे कशी ?' असं म्हणणार इतक्यात ती तशीच दुसरीकडेच निघून गेली. ती माझी नातेवाईक 'अश्विनी' नसून 'स्वाती' होती.
करत करत बरीच मंडळी जमू लागली आणि गेट्टू बिगर आणि फॅटर होऊ लागलं.

मग अजून एक इस्त्री आली आणि स्वाती कोपर्‍यात परत गलका, 'आशुऽऽ'.. आशूडी असणार!!
तेवढ्यात दरवाजाकडून परत आवाज आला आणि 'ऐसी अक्षरे' असं काही लिहीलेला एक साजिरा माणुस आला. स्वाती कोपर्‍यात अजून जोरात गलका.
मी दोनतीनदा ओळख करून घ्यावी म्हणून स्वाती कोपर्‍यात गेलो खरा, पण सगळे 'माहेर' प(हा)णात व्यस्त असल्याने मी इकडेतिक्डे पाहून परत जागेवर आलो. 'अरेऽ, साजिरा!' ह्या फोटोत तू 'पत्रकार' वाटतोयस पासून 'सुशिक्षित बेकार' पासून लोकांनी 'वाट्टेल ते' बोलून घेतलं. 'साजिरा' यांनी आता 'बिचारा' आयडी घ्यावा अशी परिस्थिती निर्माण झाली.

तेवढ्यात एकदम गलका झाला आणि एक त्रिकोणी कुटंब आलं. मालकीणबाई स्वातीच्या शेजारी गेल्या. हसतमुख मालक, एल्टी साहेबांच्या शेजारी येऊन बसले. लोकांनी त्यांचं लय स्वागत केलं..
'तुम्ही मिल्या काय? ' भारी. . मी..

तेवढ्यात एक जरा कमी हृतिक आला. कहो ना प्यार है मधे असलेला तरूण निरागस हृतिकच जणु. फक्त चार वर्ष बॉडी करायला हवी ह्याने. बाकी डिट्टो. तो काही नाव घ्यायला तयार होईना. तेवढ्यात एक मॉबेटा आले. बेटा इतर मुलांकडे गेला. मॉ माझ्या शेवारच्या शेजारी. १मॉला बघताच त्या त्रिकोणी कुटुंबाच्या मालकीणबाई पळत आल्या आणि मॉला मिठीच मारली. मॉ म्हणजे मिन्वाज्जी होत्या. त्या येण्यापुर्वी काही लोकांनी 'मीन्वाज्जी येणारेत, खायचं भरपूर मागवा होऽ असं काही बोलल्याचं मला आठवतंय..'

तेवढ्यात एक जरा कमी फॉरेनर इस्त्री आणि एक ओळखीचे वाटणारे साहेब आले. त्या इस्त्रीचा फोटोही मी कुठेतरी बघितला होता. त्यामुळे नीधपला मी ओळखलंच. आणि ओळखीचे साहेब गटग मधले एकमेव 'श्री', 'श्री संदिप' होते! मुलाखती/फोटोमुळे चेहेरा ओळखिचा वाटला होता. हसतमुख, शांत व्यक्तिमत्व! नीधप माझ्या समोर बसलेल्या पल्लीच्या शेजारी बसली. शेजारी 'श्री. संदिप'.

तेवढयात! 'मी ऋयामशी बोलायला चालली आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का?' अशी आकाशवाणी झाली. मी वर बघितलं, पण आवाज उजवीकडून येत होता आणि एक इस्त्री येताना दिसली. ही इस्त्री म्हणजे त्या त्रिकोणी कुटुंबातली मालकीणबाई.
मी आठवू लागलो. "कुठल्या इस्त्रीशी एवढ्यात भांडण वगैरे तर केलं नाहीये ना?" कारण ही इस्त्री एकतर नवर्‍या-मुलाला घेऊन आलीये. सगळे मिळून मारतील. वर मिल्या विडंबन करेल. पण तसं घडलं नाही. ती इस्त्री पौर्णिमा/पूनम होती.
तिनं आधी चांगलं कौतुक वगैरे केलं, की तु अधूनमधून तसा बरा लिहीतोस वगैरे.
पण नंतर म्हटली, 'तू असा घाबरून का बसलायस?'
'बरोबर! शेजारी मिन्वा, समोर पल्ली आणि नीधप, वर पौर्णिमा. घाबरणार नाही तर काय?' कोणीतरी बोललं.
मग मला समजलं, माझ्या बाजूच्या जागा रिकाम्या का. डावीकडचा चिनुक्ष आणि उजवीकडचे एल्टी सुमडीत कल्टी मारून लांब बसायला का गेले होते.

तेवढ्यात चिनुक्ष साहेबांनी मागवलेली सुपं आली.
:बोध:
झोपेतून उठवून, १. टोमॅटो, २. मश्रुम कोणतं सुप हवं असं विचारलं गेलं, तर न चुकता 'टोमॅटो' सांगावं.
टोमॅटो सुप कितीही बिघडलं तरी तितकं वाईट लागत नाही.
:बोध:
रच्याक, चिनुक्षानं ते फिंगरचिप्स मधे नसलेलं मीठ मश्रुम सुपात टाकवलं होतं बहुतेक. Wink

त्या पांढर्‍या मश्रुम सुपात आणखीही काहीतरी होतं बहुतेक, एक सीप घेतल्या घेतल्या नीधप पांढर्‍या शाईतच बोलायला लागली एकदम....

मात्र हा 'पांशा' मोड त्या 'पांढर्‍या सुपामुळेच्च' आला, यावर माझा पुर्ण विश्वास नाही. एका व्यक्तीचं त्याच वेळी झालेलं आगमन आणि सर्वत्र उमटलेली पांशा याचा परस्परसंबंध लावुन या प्रकरणाचा छडा लावायचा आहे.

तर, आपण कुठे होतो? बरोबर! सुपात.
... एक सीप घेतल्या घेतल्या नीधप पांढर्‍या शाईतच बोलायला लागली एकदम....
पण तेव्हाच उजवीकडून एक व्यक्ती आली आणि स्वातीकोपर्‍याकडून आरोळ्या आल्या 'सर आले!'
मी 'सर' आयडी आठवू लागलो पण तितक्यात साजिरा/आशुडी/चिनुक्ष कोणीतरी ओरडलं, 'अरभाट!'
पुपुकर्सकडून वर्चेवर __/\__ मिळवणारी ही असामी 'मुर्ति लहान, सर महान' हे पटवून देते.

मी भेटून विचारलं, "तुम्हाला 'सर' का म्हणतायत?"
त्यांनी चारेक जणांना गोळा करून "हा बघ काय म्हणतोय" म्हटलं. सगळ्यांनी हसून घेतलं.
"अरे मी फिजीक्सचा प्रो आहे.", सर.
"अरे वा!" मी म्हटलं.
... "म्हणजे \भौतिक शास्त्र का हो सर?? " असं मला विचारायचं होतं.

सर आले ते थेट माझ्या शेजारी, चिनुक्षाच्या जागेवर बसले. आणि मला त्यांच्या धिटाईची कल्पना आली.
इथे आता सरांच्या दाढीचे वर्णन करणे क्रमप्राप्त आहे.
सर जराकमी 'फ्रेंच' बिअर्ड ठेवतात. किंवा जराजास्त 'डायमंड' बिअर्ड.

केवळ जिज्ञासेपोटी नीधपने सरांना एक भौतिक विषयाबद्दलचा प्रश्न विचारला, "सर, तुम्ही भौतिक शास्त्र शिकवता. तुमचा विषय काळ काम वेगाशी संबंधित आहे.
नाही का?" "आणि ही दाढी . . . . "
सर सुप पीत होते. तोंडी असलेले सुप, समोरच्यांच्या अंगावर न उडवु देता सर 'अआअ..', 'एअअ अआअ' म्हटले आणि मुक्याने हसू लागले.
"बरोब्बर! " पल्ली यांनीही सुप प्यालं होतं बहुतेक. त्या म्हणाल्या,
" पण काळ आणि काम.." का "काम आणि वेग" असं काहीतरी...
मधेच नीधपही काहीतरी म्हणाल्या आणि.. आणि सर लाजले!

जंगलमे मोर नाचा किसीने ना देखा.
म.स्पा.मे सर लाज्या, मैने देखा मैने देखा.

सरांनी शिताफीने, लांब बसलेल्या साजिर्‍याच्या फोटोकडे सर्वांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले, इतर विषय काढले पण व्यर्थ! .. मैने देखा मैने देखा.

एव्हाना उजवीकडून अजून नवनवे लोक येऊ लागले.
त्यापैकी एक 'राम'. त्यांचा आयडी रा१ मला लयच आवडला.
"मला रात्री कोल्हापूरला जायचंय" असं म्हणून, ते केवळ मामी आणि मित्रांना भेटून गेले."
पण ते लगेचच दुसर्‍या हॉटेलात गेले असं कोणाकडुन तरी ऐकलं. सचझुठ राम जाने.

मग 'माबोचा' शर्ट घालून अतुल आले. माझ्याकडे नाही म्हणून मी जळलो.
मग खास मामींना भेटायला सपत्निक 'बेफिकीर' आले. ते आले आणि भेटून लगेच निघून गेले.
त्यांना बहुतेक "बोका नक्की कोणाला शोधतो आहे?" चा शोध घ्यायचा होता...

उजवीकडे अजून लोक येत राहिले आणि मला टोटल लागेना. मी ओळखी करून घेत/देत फिरत राहिलो. ठेवणीतले प्रश्न विचारत राहिलो..
"तुमचं नाव काय? काय करता? कुठे राहता? " वगैरे वगैरे
मी शेजारच्या मिल्याला तीनदा "तुम्ही कुठे राहता?" विचारलं.
मिल्याचा पेशन्स काबिले तारिफ आहे. पेशन्सच राज काय आहे काय माहित?

बरं आठवलं, मधल्या वेळात कोणीच येत नव्हतं, तेव्हा साजिर्‍याने मला एका आयडीवरून चिडवलं. म्हणजे मी म्हणजे 'टिंबटिंब' अशी ह्रुथिकला ओळख करून दिली.
ह्रुथिक बिचारा हसून वगैरे 'हो का?' म्हटला. अश्विनीमामींनी 'अरे... काय हे? आपण नसतं ऐकून घेतलं. छ्या.. ' वगैरे म्हणून घेतलं.
मीही हसून घेतलं ह्रुथिकला काय वाटलं कळायला मार्ग नाही.

तेवढ्यात समोर नीधप अवतरली. इतका वेळ ती पौर्णिमेच्या जागेवर बसायला गेली होती. आणि पौर्णिमा मीन्वाच्या मागे उभी.
त्यांनीही बर्‍याच संयुक्ता गप्पा मारल्या, ज्या मी त्या गटात नसल्याने मला ऐकू आल्या नाहीत.
मग देवा आला. तो थेट कॉलेजातून आल्यासारखा वाटला. वय माहित नाही त्याचं..
दरम्यान चिनुक्षाने मला "वृत्तांत लिही नाहीतर.. " असं सांगितलं.

मग खाना आला. आणि लगेच केपी . दाढीवरुन आठवलं, अमिताभ डीट्टो केपींसारखी दाढी ठेवतो
बाकी, केपीही सहकुटूंब आले होते. मुलगी रुसली होती.

मग 'बाप' कवी मयुरेश चव्हाण आला. शशांकला घेऊन.
त्याच्याशी भेट झाली पण त्याला घाई असल्याने फार वेळ बोलता आलं नाही.
त्यानं बर्‍याच जणांशी बोलून घेतलं, पण माझ्या नजरेतून न सुटलेली गोष्ट म्हणजे नीधपनी त्याची श्री संदिप यांच्याशी करून दिलेली ओळख Happy लय भारी मयुरेश आणि नीधप Happy

बाकी मग सालाबादप्रमाणे सर्वांना भुका लागलेल्या, सगळ्यांनी ओरपून घेतलं. भाजीत बरोब्बर मीठ होतं. ना कम ना जियादा. मग जीएस आले.
"माझं जेवण? " असं ते चिनुक्षाला म्हटले. चिनुक्षाने "अरे, जेवणार नव्हता ना?" असा सार्थ प्रश्न केला.
"होऽ अरे. पण आता जेवतो."
चिनुक्षाला याची सवय असावी. "ऑर्डर देऊया ना मग..." म्हणून त्याने एक स्पेशल 'खीर' कोरमा मागवला.

दरम्यान चार्चार प्लेट मिक्स भज्या मागवल्या गेल्या. मी हुशारी करून मिरची भजीही गटकवली. आणि मग ठसका लागला.
त्या बाबतीत मग मी मूग गिळले. एल्टीसाहेबांनाही ठसका लागलेलं वाचलं ...
मसाला पापडही होता, पण बोलायच्या नादात ते राहिलंच.

कोणीतरी सगळ्यांना कॅडबरीज दिल्या होत्या.
"लवकरच गटग संपेल आणि मी ती एकट्याने खाईन का काय? " असा प्रश्न पडला की काय कोण जाणे,
केपींनी "ते घरी न्याचं नाही होऽ" असं म्हटलं. आणि मला ती शेअर करावी लागली.

खाणं संपत आलं, पण गप्पा संपेनात. लोकं उजवीकडून डावीकडे आणि परत उजवीकडे जात होती.
स्वाती कोपरा सदैव 'पहिल्या पानावर' होता. मीही केपींशी 'जपानबद्दलच्या गप्पा' मारुन 'जटिनी'गिरी दाखवून घेतली.
*जपानबद्दलची टिकाऊ निष्ठा. स्त्रोत : मंजिरी.

मग सर्वांचा मिळून ग्रुप फोटो काढला गेला. सगळे उभे राहिले तेवढ्यात केपींच्या मिसेसनी झाडाची फुलं तोडली आणि 'सॉरी' म्हटलं. लोकांनी फाकोगिरी करून घेतली.
फोटो काढणार एवढ्यात एक मोटारसायकलस्वार आला आणि 'एक मिनीट' म्हणून ओरडला.
मला वाटले, हा सज्जन जाऊन आमचा फोटो काढून देतो का काय?
पण त्याला धुम-३ मधे रोल मिळाला होता किंवा घाईत \जायचं होतं. कुठेतरी...

मग स्वातीनी एक पांशा डायलॉक टाकला, जो लय फेमस झाला. माबोच्या सेन्सॉर बोर्डाच्या नियमात बसत नसल्याने तो टाकत नाही.

तेवढ्यात केपींनी लगे हाथ जमावाचे चारपाच फोटो काढले.
'हे टाकून उद्या एक प्रचि पाडू नकोस केप्या.' कोणीतरी म्हटले. 'नाहीतर उद्या दिसेल, प्रचि १, प्रचि २..... '

चिनुक्षानं 'चल, चित्रपट पहावयाला येतोस का?' असं विचारलं.
मला त्याला "रात्रीच्या वेळी, झोपं वै प्राणा:" असं सांगायचं होतं.
पण मग 'कॉफी मारायला जाऊ.' असं ठरलं आणि आम्ही 'बिग फॅट गटग' च्या आठवणी मनात साठवत पुढचं 'नॅनो गटग' करायला 'कावा कॉफी' कडे गेलो...

कावा कॉफीमधे गेलो ते श्री संदिप, नीधप, चिनुक्ष, हृथिक, जीएस, श्रेयस, सर, देवा आणि मी. = ९ लोक.

काही लोकांना तिथला हुकका बघायचा होता. म्हणून आम्ही सगळे आत बसलो. आत सगळ्या शिटा रिकाम्या होत्या.
मग तिथे असलेल्या वेट्राने आम्हाला फार्फार आग्रह केला. की ५ च्या जागेत ९ जण बसा.
मी म्हटलं, ठिक आहे, उरलेल्यांना बसायला काहीतरी द्या.
ते प्रेमाने 'नाही. पाचच्च खुर्च्यात बसा म्हटले.' नाहीतर एका खुर्चीचे काहीतरी (५० पकडू) रुपये.
नीधप अजुन नॉर्मलवर आलेली नव्हती. तिने दुर्लक्ष केले.
ह्रुतिक तिथल्या अफगाणी बैठकीवर बसायला तयार नव्हता. 'अरेऽ हे बुटबिट काढायला बोर होतं..'

मग वेटरनं सांगितलं, "तुम्ही खुर्च्यांवर बसू शकता. आम्ही ८ च्या टेबलाला एक खुर्ची जोडुन देऊ."
आम्ही जाऊन बसलो. तर दुसरा एक आला आणि उठा म्हटला.
मग नीधपचा वरचा षड्ज 'ठ्यांऽऽ' लागला आणि सगळे चिडीचुप.
वेटर न सांगता ऑर्डर घेऊन आले.
शेजारच्या टेब्लावरची पोरं गिटार वगैरे सगळं विसरली.
त्यांच्या गुडगुडीतुन नुसस्ता गुडगुडगुडगुड असा आवाज येऊ लागला.

माझी आयरिश कॉफी आली.
साखर घालायची गरजच न पडावी अशी.
'मेगा गटग' झाल्यावर, त्यात मनसोक्त हसून झाल्यावर, थंड पडलेल्या त्या पुण्यात शेजारी थोड्याफार सुरात वाजणारी ती गिटारही सुरीली वाटली.
गुडगुडीचा तो आवाज मस्त बॅकग्राऊंड म्युझिक देत होता आणि 'आपण लोक खरंच पहिल्यांदा भेटतोय का?' असा प्रश्न पडु लागला होता...

काही गुडगुडी फॅक्ट्स :-
१. गुडगुडीमधे काही प्रमाणात निकोटीन असतं. ०.०५%
२. * गुडगुडी ओढण्याआधी मृत्युपत्रावर सही करून द्यावी लागते.
३. एक गुडगुडी बरेचदा ओढता येते. मधून मधून कोळसा बदलावा लागतो.
४. गुडगुडीचे बरेच फ्लेवर्स असतात. पीच लय भारी असतो.

तेवढ्यात नीधप ला कुठेतरी पांढरा रंग दिसला बहुतेक. त्यांनी तो 'वेल्क्रो' डायलॉग टाकला...
सर गुडगुडी ओढत होते.. त्यांनी परत मान हलवत, 'गगाग. गेगग गगाऽग.' आवाज काढला...
सरांचा अजूनेक गुण, 'सरांनी गुडगुडी मधे स्पेशलायजेशन केलं असावं' इतकं सहज ते गुडगुडतात.

तेवढ्यात हृथिकनं चित्रपटांविषयी ज्ञान वाढवून घेतलं. मीही 'तुमचा पुढचा चित्रपट' वगैरे विचारून घेतलं.
पण त्यांनी फार काही डिटेल सांगितलं नाही. '२०११ मधे आहे..' असं मात्र सांगितलं.
मग थोडा वेळ चित्रपटांविषयी बोलणं झालं. मग सगळे अमेरिकेत गेले.
आपला प्रांत आल्यावर हृथिक पेटला आणि भरभरून बोलु लागला.
मला ते कनेक्टिकट का काय माहित नसलेने गपचुप ऐकत बसलो. बाकी सर्वांना माहित आहे बहुतेक.

मग चिनुक्ष आणि श्रेयस यांनी दहावी बारावी आणि आजचे शिक्षण अशा काही विषयांवर बाफ काढला. नीधप आणि मी तातडीने
अ‍ॅडमिनच्या विपुत जाऊन 'हे नॅनो गटग सर्वसामान्यांसाठी आहे. असले अभ्यासु बाफ इथे काढणं बरोबर आहे का?' वगैरे लिहुन आलो..

पावणेबारा पर्यंत कॉफ्या ढोसुन 'चला निघु' म्हणत सगळे पांगलो तेव्हा मनात दोनच विचार होते.
१. इथले काही लोक लय भारी असूनही किती साधे वागतात?
२. पुण्यात आल्या आल्या बर्‍याच जणांशी भेट आणि ओळख होणं किती छान आहे.
त्यातून 'पहिल्यांदा भेटत नाहीये' असं वाटणं हे लय भारी आहे.

आता इतके लोक्स जमणं ह्यात चिनुक्ष आणि चिनुक्षेतर काही साहेबांचा मोठा वाटा आहे, ज्यांचे आभार्स मानणे क्रमप्राप्तच! तितकाच मोठा वाटा 'अश्विनीमामींचा'!
अश्विनीमामी, अशाच येत रहा आणि सगळ्यांना जमवत रहा Happy
* अत्तराची वाट पाहतो आहे. Proud

Proud Light 1 :न घडलेल्या गोष्टी चुकून लिहील्या गेल्या असतील तर कळवा, डिलीटतो:
:कोणी राहिलं असल्यास कळवा. टाकतो बा.जो. कोण आणि आले होते का खरच? Uhoh :

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे बोधाच्या, त्या तिथेच टेबलवर तिन दौती ठेवलेल्या होत्या, त्यातले तिखट आम्बट द्रव्य सुपात घालायचे अस्ते! इतर कुणीच त्याला हात लावत नव्हते, मी मात्र ने लाल तिखटजाळ मलम सुपात कालवुन चाखतमाखत सम्पवले, मश्रुमचे शिजलेले तुकडे चावायला थोडा त्रास होत होता, पण ते चालवुन घेतले Proud
माझ्याशेजारी बसुनही माझ्याकडेच पाठ केल्याने तुला हा उपाय कळला नसेल, नै का?
बाकी नीरजा त्या सुपाला कायतरी विसळवणाचे पाणी वगैरे म्हणत होती त्याकडे मी "वदनी कवळ घेता" हा श्लोक मनातल्या मनात म्हणून यशस्वी दुर्लक्ष केले! मसाला पापड खायचा (किम्बहुना चघळून गिळण्याचा) अयशस्वी प्रयत्न केला, मिरची भजे आवडीने घेतले पण हाय हाय झाल्यावर बटाटाफिन्गरचिप्स बरोबर सम्पवले, हो ना, टाकुन कसे देणार? वैट दिस्ते ते, लोक नाव ठेवतात मग!
बाकी चिप्स्/मसालापापड्/मिर्ची भजे वगैरे स्टार्टर्स पाहुन माझे अन रामचे एकमत झाले होते की ही स्टार्टर्स विशिष्ट परिस्थितीत "पूर्णवेळ" चालू शकतात, बाकी कै नसले तरी चालते मग Proud
रामभौ कुठे गेले काय की, येवढ मनावर घेतल?

Lol

अग्गागा.... फुटलोय हे वाचून... नेहमी प्रमानेच मी पुण्यातले मेगा गटग पुण्यात असून मिस केलय..

Pages