Submitted by अज्ञात on 3 June, 2008 - 13:45
रमली जुळली रुळली खाती
जी कधीच नव्हती
ज्ञात न हे कोणाला
कुठून आली ही नाती
अथांग सागर थेंब तयातिल
कसा लागला हाती
ओंजळीत हस्ताच्या
स्वाती घेउन आली मोती
शंख शिंपले असंख्य जाती
खारे पाणी भवती
शोध नेमका रत्नाचा
ही नशिबाची महती
................अज्ञात
१२३७,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
अज्ञाता,
अज्ञाता, छान रे! मस्तच लिहित आहेस. लिहित रहा....
थॅंक्स
थॅंक्स पल्ली. कालच्या तुझ्या शंकेचं निरसन झालं की नाही गं. कळवलं नाहीस. अशा तुझ्या कवितेच्या आत प्रवेश करून वाचणं आणि ती पूर्ण समजून घेणं याला माझी मनपासून दाद. come any time.
.....................................अज्ञात