माझी अतिलघु चार-तृतियांशात्मक (कला?)-कुसर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago
Time to
read
1’

येथे (सध्याच्या) नव्या कॅमेरातील प्रकाशचित्रे टाकायचा विचार आहे.
त्यातील हे एक.
rang_mosquito_PC280330.JPG

f१४-४२ बरोबर ०.५ मॅक्रो भिंग वापरुन काढलेला एक डास.
अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले Sad

rang_bud_PC280319.JPG

झेंडुची कळी

rang_nest_PC240221.JPG

मॅक्रो न वापरता काढलेले घरटे

>>अजुन प्रयोग करण्याआधी कॉन्ट्रॅक्ट तोडुन मॉडेल उडुन गेले >> Rofl
कळीचा आवडला. त्या डासाऐवजी फुलपाखराला मॉडेल घ्यायला पाहिजे होते ते सहसा कॉन्ट्रॅक्ट तोडत नाहीत.

सुंदर फोटो Happy त्या डासाला तुझी पेमेंट ऑफर कमी पडली असावी. तू एक डबकं लीजवर त्याला दिलं असतंस तर कायमचं मॉडेल मिळालं असतं.

चांगले आहेत फोटो.

(हल्ली मलेरियाची एवढी धास्ती खाल्लीय की डास बधून आधी पडद्यावर आधी चापट मारावीशी वाटली. :हाहा:)

वॉव.... सुंदर आलेत फोटो!!
(रच्याकने, पहिल्या फोटोतल्या मॉडेलचे नाव Aedes aegypti असावे. पोटावर पांढरे काळे पट्टे आहेत. :P)

धन्यवाद Happy

मॉडेलचे समस्त जातबांधव blood-money मागत असल्याने कॉन्ट्रॅक्ट तुटला हे तसे बरेच झाले Happy

Cool. Happy

डासोपंत कॅमेर्‍यात का होईना, बंदिस्त केलेत! Proud बाकी फोटो छान. घरट्याची कलाकुसर पाहून उगाच व्हॅनिला-चॉकलेट आईसक्रीमची आठवण झाली! Happy