सावध व्हावे हे जनताजन

Submitted by अभय आर्वीकर on 24 December, 2010 - 06:37

सावध व्हावे हे जनताजन

मळभटं सारी द्यावी झटकून
सावध व्हावे हे जनताजन ....॥१॥

कुणी फ़ुकाने लाटती पापड
कुणी झोपला ओढुनी झापड
मुखा कुणी तो कुलूप ठोकुनी
चिडीचिप झाला मूग गिळून ....॥२॥

आग लागुनी जळता तरूवर
म्हणती आहे मम घर दूरवर
सोकाविती मग कोल्हे-दांडगे
आणिक पिती रक्त पिळून ....॥३॥

किमान थोडा लगाम खेचा
नांगी धरुनी त्यांची ठेचा
झोपेचे हे सोंग फ़ेकूनी
अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥

गंगाधर मुटे
.................................................

गुलमोहर: 

इ. सः
सहमत आहे.

पण रचना खूप छान वाटली.

ग. मु:
विषय राजनितिक आहे का? मला वाटते आहे कि सद्य न्याय परिस्तिथि वर लिहिले आहे - काहि 'खास' खट्ल्यान्बाब्तीत. पण हा केवळ अन्दाज आहे.

मुटेजी,
सद्य स्थितीवर रामबाण कविता !

किमान थोडा लगाम खेचा
नांगी धरुनी त्यांची ठेचा
झोपेचे हे सोंग फ़ेकूनी
अभय पहा तू डोळे उघडून ....॥४॥

झोपेचे हे सोंग फेकुन देणं दिवसेंदिवस महागात पडत आहे
Happy

अरे बाबांनो, समाजात आपल्याच संसारात, स्वार्थात डोळ्यांना झापड बांधुन जगणाऱ्यां आपल्या सगळ्यांना सांगताहेत, जागे व्हा!

मुठ्भर मंडळी आपल्याला पिळून सगळा मलीदा खाताहेत, अगदि योग्य सांगण आहे.

अप्रतिम कविता.

अगदी खरे... कुसुमाग्रजांची कविता किंवा 'एक तुतारी द्या मज आणुनी' अशा टाइपमधील कविता आहे. छान आहे..