रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी

Submitted by जिप्सी on 23 December, 2010 - 23:19

=================================================
=================================================
रत्नागिरीच्या या सफरीत आज आपण भेट देणार आहोत ते डेरवण येथील शिवसृष्टीला.
चिपळुण शहरापासुन साधारण १४ किमी अंतरावर आणि सावर्डे गावापासुन साधारण ४ किमी अंतरावर
श्री सितारामपंत वालावलकर या सत्पुरुषाच्या स्मृतीप्रित्यर्थ हि शिवसृष्टी उभारण्यात आली आहे. यात
श्री शिवाजी महाराज यांच्या जीवनातील काही निवडक प्रसंग शिल्परूपात साकार करण्यात आले आहे. एकदा तरी आवर्जुन भेट द्यावी असे हे ठिकाण आहे.
=================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" क्रमश: :-)=================================================

गुलमोहर: 

रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045

रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073

रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107

इथे आत फोटो काढायला परवानगी आहे पण तुम्हाला फ्रेम बरोबर स्वतःचा फोटो घेता येत नाही..

फक्त फ्रेम आणि चित्रांचे फोटो घेऊ शकता.

फोटो छान आहेत. Happy

इथुन अर्ध्यातासावर माझं आजोळ, त्यामुळे आज्जीकडे गेल्यावर हमखास 'डेरवण'ला भेट असायचीच. तिथे मुली, स्त्रियांना पंजाबी ड्रेसमध्ये आत सोडत नाहीत. कम्प्ल्सरी साडीच नेसावी लागते.

योग्या, प्रवेशद्वाराजवळ २ मोठे हत्ती आहेत त्यांचा नाही काढलास फोटो? अगदी खरे वाटतात.

व्वा... डेरवणला १६ वर्षापुर्वी गेलो होतो... अजूनही तोच रंग, तशीच साफसाफाई... उत्तम Happy

परंपरेच्या कारणावरून सलवार कमीज घातलेल्या स्रियांना तेव्हा प्रवेश निषिद्ध होता... होता काय परिस्थीती आहे?

मस्त..

छान फोटो. Happy

तिथे मुली, स्त्रियांना पंजाबी ड्रेसमध्ये आत सोडत नाहीत. कम्प्ल्सरी साडीच नेसावी लागते >>>

मी ही ऐकलं होतं शिवसृष्टीबद्दल. पहायला ऑलमोस्ट गेलेही होते (आणि त्यादिवशी पंजाबी ड्रेसच घातला होता) पण जेव्हा ही अट समजली तेव्हा 'झाईर णिषेद' म्हणून न जाण्याचं ठरवलं.

योगेश,
ने .अ. फो. Happy

मी डेरवणला २७-२८ वर्षापुर्वी गेलो होतो. त्यावेळी कामही पुर्ण झालं नव्हत. पुन्हा फेरी मारायची आहे.

मस्त फोटो!!

आता पँट, ट्राऊझर घातलेल्या स्त्रियांनाही आत सोडतात, फक्त मठात प्रवेश करायची परवानगी मिळत नाही. शॉर्ट पँट घातलेल्या पुरुषांना सुद्धा मठात प्रवेश नाही. Happy

लले, मी जवळपास १७-१८ वर्षांपुर्वी पहिल्यांदा गेले होते, तेव्हा हे नुकतंच तयार होत होतं. प्रवासात म्हणून आम्ही मुलींनी पँट्स आणि बायकांनी पंजाबी ड्रेस घातले होते. मग काय, त्या टिशर्ट-पँटवर मुलींनी फ्रॉक घातले आणि बायकांनी तशीच पंजाबी ड्रेसवर साडी गुंडाळली आणि आम्हाला प्रवेश मिळाला............ तो पोषाख परंपरेत बसला बरं का Proud

छान आहेत. तूम्हा कुणाला आठवत नसेल साधारण ३५ वर्षांपुर्वी मुबईला शिवाजी पार्क वर असे प्रदर्शन भरले होते. त्याचेही नाव शिवसृष्टीच होते, (त्यावरुनच आमच्या कॉलनीला हे नाव दिले गेले.)
जाणता राजा ची सुरवात पण बहुदा तिथेच झाली. त्यावेळी फक्त राज्याभिषेकाचा प्रसंग सादर करत असत.

मी चिपळूणला असताना कुणीही पाहुणे आले कीं चिपळूण परिसर दर्शनमध्ये डेरवण असायचंच. त्यामुळे माझंही अनेकवेळां तिथं जाणं झालं. जिप्सीजी, तुमच्या फोटो सेशनसाठी शिल्पांवरून खास रंगाचा हात फिरवण्यात आला होता का !
<<तिथे मुली, स्त्रियांना पंजाबी ड्रेसमध्ये आत सोडत नाहीत. कम्प्ल्सरी साडीच नेसावी लागते >>>यामागचं कारण कांहीही असो, पण हा नियम खटकतो, हें नाकारता येत नाही. यामुळे, मी बर्‍याच पर्यटकाना हिरमुसले झालेले, कांहीना तर संतप्त झालेले पाहिले आहेत. पण संस्थेचे चालक मात्र या नियमाबाबत ठाम असावेत, असं दिसतं.

मस्तच , आम्ही पण आत्ताच जाऊन आलो .तिथे मुली, स्त्रियांना पंजाबी ड्रेसमध्ये आत सोडत नाहीत. कम्प्ल्सरी साडीच नेसावी लागते >>>> आम्ही गेलेलो तेव्हा सोडले आम्हाला आतमधे फक्त मठात जाऊ देत नाही .

प्रतिसादाबद्दल धन्स लोक्स Happy

प्रवेशद्वाराजवळ २ मोठे हत्ती आहेत त्यांचा नाही काढलास फोटो?>>>>खुप गर्दी होती हत्तीजवळ (शाळेची पिकनिक आली होती.) म्हणुन नाही काढला फोटो Happy

आता पँट, ट्राऊझर घातलेल्या स्त्रियांनाही आत सोडतात, फक्त मठात प्रवेश करायची परवानगी मिळत नाही. शॉर्ट पँट घातलेल्या पुरुषांना सुद्धा मठात प्रवेश नाही.>>>>>होय, आता शिवसृष्टी पहावयास आता पँट, ट्राऊझर, पंजाबी ड्रेस घालुनही स्त्रियांना जाता येते. मात्र मठात प्रवेश करण्यासाठी साडी नेसुनच जावे लागते.

आता आता मठात बंदी आहे फक्त सलवार कमीजला पण आता सोडतात. १०-१२ वर्षांपुर्वी शिवसृष्टी बघायलाही सोडायचे नाहीत.

<<<<<होय, आता शिवसृष्टी पहावयास आता पँट, ट्राऊझर, पंजाबी ड्रेस घालुनही स्त्रियांना जाता <<<<<>>>>
ही तर चांगलीच बातमी आहे. आम्ही काही वर्षांपूर्वी गेलो तेव्हा वाट वाकडी करून लांब वळसा घालून गेलो होतो. प्रवास आणि सगळ्या तरुण मुली, म्हणुन सगळ्या जणीच सलवार किंवा जिन्स मधे होत्या. हल्ली किति जणी साडी नेसतात? आज काल तर आज्ज्या आणि आया सुद्धा प्रवासात सुट्सुटीत म्हणुन सलवार घालतात. तो मुद्दा नाही, वाईट वाटलं की all the way जाऊन इतकी सुंदर गोष्ट miss केली.
Thanks to जिप्सि. तुमच्यामुळे आज चित्रात का होईना, बघायला तर मिळाली शिवसृष्टी. आम्ही सगळे तळमळलो होतो दारात उभे राहून. जे काही बाहेरचे पुतळे होते, ते फक्त पहिले, मग सगळ्यांच्या नवर्‍यानी भाव मारून घेतला, कारण त्यांना आत जायला मिळालं होतं. आम्ही कसा स्वर्ग miss केला त्याची वर्णनं ऐकली त्यांच्याकडून. साडी नेसणं कसं जरूरी आहे, ते पण ऐकावं लागलं होतं. Happy

जाऊ देत झालं, परत एवढ्या लांब जाणं कधी होइल तेव्हा होइल. चित्रं तर पहिली आज. मस्तच !