पालखी..!

Submitted by चैतन्य दीक्षित on 20 December, 2010 - 22:48

पालखी काळाची,थांबली एकदा ।
बदलण्या खांदा,भोइयांचा ॥१॥

त्याच क्षणी माझ्या-समोर 'ती' होती ।
पेटवून ज्योती, अंतरात ॥२॥

पालखी काळाची, गेली निघोनिया ।
ज्योत ठेवोनिया, तेवतीच ॥३॥

आता वाट आहे, पहायाची फक्त ।
क्षणातून मुक्त, होण्यासाठी ॥४॥

-चैतन्य दीक्षित

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मस्त !

क्षणातून मुक्त >>> मस्त कल्पना आहे... बर्‍याच क्षणात गुंतलो आहे त्या क्षणांवर अजुन लिहिता येईल !