फुला पानांची नक्षी (रांगोळी)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 18 December, 2010 - 04:14

ही मी काढलेली दिवाळीतील रांगोळी आहे. ह्या रचनेसाठी शेवंती, झेंडू, त्याच्या पाकळ्या, गुलछडी गावठी गुलाबाच्या पाकळ्या, हिरवी पाने वापरली आहेत. जसे सुचले तशी रचत गेले फुल. गुलछडीच्या नैसर्गिक बाक आलेल्या देठांमुळे मला मध्ये गुलछडीचे चक्र करता आले आणि वर दोन फुले एकमेकांना फ्रिहॅन्डकरुन पाकळ्या करता आल्या.

rangoli2.JPGrangoli1.JPGrangoli.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

जागुतै सुन्दर नक्षी....अगदी गणपतीच्या मंडपाची आठवण झाली...मि ही काहीशी अशीच नक्षी काढायचो गणपतीच्या पहील्या दीवशी देवार्‍यात.
त्या दिवसांत बाजारात विविध रंगांची फुले येतात त्यात तेरड्याचि लाल भडक फुले उठुन दिसतात , त्यांनी रांगोळि (नक्षी) साजावायला मला खुप आवडतं.

ती सफेद गुलाबी फुलं.... गुलाबाच्या की तेरड्याच्या पाकळ्या आहेत????

जागु एकदम मस्त आहे तुझी रांगोळी. मला आवडली. मी कधी फुलांची रांगोळी घातली नाहीये. एकदा करेन प्रयत्न.

सुकी त्याच फुलांना निशीगंधाही म्हणतात.
चातक त्या गावठी गुलाबाच्या पाकळ्या आहेत.
साधना आता नक्की घाल ग. खुप सोप्पी पटापट होते.

जागू, सुंदरच काढली आहेस रंगोळी. मस्तच जमलेय.
मला कुठलीही रंगोळी बघीतली की सोपी वाटते, पण स्वतः काढायला घेतल्यावर सुचतच नाही.

गुलछडीचे चक्र फार छान.....
मधली ५ झेंडूची फुले मात्र खाद्यपदार्थाची आठवण करुन देताहेत. Happy

मस्त रांगोळी...

सुरेख !!