Submitted by अज्ञात on 1 June, 2008 - 07:01
किती फुले रमणीय तळ्याशी
पाखरांसवे उलगडती
शुद्ध कळ्यांवर मधुगंधास्तव
भ्रमरव गुंजारवती
भिरभिरणारी फूलपाखरे
रंगांवरती प्रीती
क्षणभंगुर जीवन
मरणावर जगण्याची अनुभूती
का न कळावी आपणास
ही मूक साजरी नीती
प्रेम करावे कसे कुणवर
आकळू नये रीती
धुंद जगावे जगूही द्यावे
प्राण हवेची ज्योती
हवे तेवढे घ्यावे
बाकी सोडुन द्यावे भवती
..................अज्ञात
१२३३,नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
अज्ञाता, छा
अज्ञाता,
छान आहे...
का न कळावी आपणास
ही मूक साजरी नीती
प्रेम करावे कसे कुणवर
आकळू नये रीती
आवडलं!
आभार
आभार पल्ली,
.................................अज्ञात
छान
छान
धन्यवाद
धन्यवाद गणेश, असाच प्रतिसाद देत रहा. जसा असेल तसा. माझ्या आत्मपरीक्षणासाठी तो आवश्यक आहे.
......................................अज्ञात
धुंद जगावे
धुंद जगावे जगूही द्यावे
छान विचार!