एक एकटा

Submitted by अज्ञात on 1 June, 2008 - 06:53

एक एकटा जन्मा आलो
अगणित रुण पावलो
बीज रुते मातीत
पावलागणी पोरका झालो

शत जन्मांचे घोटाळे
संभ्रमी सदा वावरलो
कशास आणि कुठे चाललो
इथे खरा बावरलो

रोज परीक्षा उपवासाची
नव्या रसांनी मढलो
विजयासाठी दिशा शोध
संदर्भ मिळे ना हरलो

पडद्या आडुन पुढे ये हरी
दाव कुठे मी चुकलो
अथवा दे मज दृष्टी
कळु दे दूर किती राहिलो

................अज्ञात
१२२५,नाशिक

गुलमोहर: 

पडद्या आडुन पुढे ये हरी
दाव कुठे मी चुकलो
अथवा दे मज दृष्टी
कळु दे दूर किती राहिलो

सुंदर!

बीज रुते मातीत
पावलागणी पोरका झालो
म्हणजे नाही समजले Sad

पल्ली,
कळत नव्हतं तो पर्यंत आनंदात होतो. एकदा मोठं झाल्यावर लहान होता येत नाही. होऊन गेलेलं पुन्हा मिळ्त नाही.
पोरकंच नाही का होत जात आपण. परत तसं स्वतंत्र-निरागस होता येईल का आता ? ???????
...........................................................अज्ञात

अप्रतिम....
शत जन्मांचे घोटाळे संभ्रमी सदा वावरलो
कशास आणि कुठे चाललो, इथे खरा बावरलो

पडद्या आडुन पुढे ये हरी, दाव कुठे मी चुकलो
अथवा दे मज दृष्टी, कळु दे दूर किती राहिलो

आर या पार! इतका सरळ सरळ सवाल आहे..... सुंदर!

शत जन्मांचे घोटाळे
संभ्रमी सदा वावरलो>>>>>< छान !
पूर्ण कविता - सगळया सामान्य माणसाच्या मनातल्या 'आतल्या' भावना . पण आम्हाला इतके उत्तम शब्दबद्ध करता येत नाही. Happy

दाद आणि मराठी वाचक,
अरे यार तुमचे मार्मिक प्रतिसाद मला किती मजा आणतात काय सांगू . मूल एकदा होऊन जातं पण मग त्याच्या बाललीला, त्याच्या गमती जमती आणि स्तुती ऐकून आईला कसं वाटत असेल तसं वाटतंय. खरंच. आभारी आहे.
.....................................अज्ञात