माझ्या भाच्यासाठी केलेले जाकीट

Submitted by मीन्वा on 16 December, 2010 - 09:31

IMG_2518.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

सध्या विदर्भात कडाक्याच्या थण्डीची लाट आलीय.
त्यामुळे जाकीट जरा जास्तच आवडलं.
रंग पण सुंदर.

आमची आई लहानपणी हे सर्व करायची. सुताची बनियन विणणे हा तीचा आवडता छंद. Happy

मीन्वा ,
अगं ते क्रोशाचे विणकाम भारीच आवडलय मला.... गंमत काय आहे माहितेय का? माझी मुलगी साडेतीन वर्षाची आहे आणि तिला नुकतीच एक बाहुली कम बाळ आणलेय तर इथे अमेरिकेत सध्या थंडी खूप आहे ना मग कन्यारत्नाचा हट्ट अग बा ळाला स्वेटर, टोपी, हातमोजे सगळे करून दे. तुझे विणकामाचे फोटो बघून तर फारच हुरूप आलाय. मी पुण्यात असते तर तुझ्याकडे आले असते शिकायला सध्या आता तू दिलेल्या लिंकवर बघते कसे जमतेय ते. आधी क्रोशाची सुई आणण्यापासून तयारी आहे माझी. मदत करशील ना?

धन्यवाद. तुमच्या सगळ्यांचे प्रतिसाद बघून अजून काही तरी नविन करायला हुरूप येतो.
अंजली अगदी नक्की मदत करेन सांग काही लागेल ते.

सुंदर झालंय जाकीट Happy आजकाल विणायचा सपाटा लावलाय बाईसाहेबांनी ! मधल्या बोटाला घट्टा पडला की नाही एव्हाना?

छान झालय हे पण स्वेटर.
मीन्वा तू कबुल केल्याप्रमाणे टोपीचा पॅटर्न लिहायची तुला परत एकदा आठवण करून द्यायला लागेल का? Happy

छान झालय Happy

मीन्वा तू कबुल केल्याप्रमाणे टोपीचा पॅटर्न लिहायची तुला परत एकदा आठवण करून द्यायला लागेल का?>>>>>
एक विनंती आहे मीन्वा टोपीचा पॅटर्न तुम्ही ईथे किंवा नविन लिंक वर लिहा म्हणजे मला किंवा बाकीच्यांना पण करता येईल...:)

http://www.maayboli.com/node/19914 इथे आधीचा स्वेटरचा पॅटर्न लिहीलाय. अंजली हे माप त्या बाहुलीला बसेल बघ.

रचु तुलाही पाहता येईल पॅटर्न वर दिलेल्या लिंकवर.

रुनी हो गं टोपीचा पॅटर्न लिहीते.

लाल्या तू मला मापं दिली नाहीयेस त्यामुळे तुझ्या आठवणीचा अनुल्लेख करावा की काय ? Happy अगं माप दे ना. त्याबद्दल मी तुला इमेल किंवा विपु लिहीलेय.

पाचवीत असताना छोट्या बाळाच्या मापाचा बेबी पिंक रंगाचा स्वेटर केला होता दोन सुयांवर.
एक सुई सुलट , एक सुई उलट. बरच विणून झाल्यावर लक्षात आलं की एक टाका मधेच सुईवरून उतरून गायब
आहे. शिवणाच्या बाईंच्या लक्षात येऊ नये म्हणून मागच्या बाजूनी काहीतरी गडबडगुंडा करून ठेवला.तरी त्यांना एका नजरेत कळलच........ आणि वर्गात सगळ्यांसमोर घोर अपमान केला.
बालमनाच्या अगदी ठिकर्‍या ठिकर्‍या झाल्या हो ! झालं ते चांगलं का वाईट माहीत नाही पण
तेव्हापासून प्रत्येक गोष्ट perfect करायची सवय लागली.
मिन्वा, तुझं हे क्यूट जाकीट पाहून आठवलं सगळं !

मीन्वा ,
खूपच सुंदर झालं.
पॅटर्न टाकणार का आणि बटन कोणते वापरले ?
मि तुमच्या आधिच्या पॅटर्न प्रमाणे एक स्वेटर बनवले पण त्याला अजुन बटण नाहि मिळाली .........

Pages