तार मनाची दे झंकारून

Submitted by अभय आर्वीकर on 12 December, 2010 - 22:39

तार मनाची दे झंकारून

सूर शब्दांचे अलगत छेडून
तार मनाची दे झंकारून ....!!

भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ....!!

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!!

मनफ़ुलांनी गंधीत वारा
दे दरवळूनी भावफ़ुलोरा
बोल अभय जे कानी येईल
तन्मयतेने घ्यावे ऐकून ....!!

गंगाधर मुटे
..........................................

गुलमोहर: 

वा वा!

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!!

मुटेजी,
मस्त कविता !
Happy

(पण आता य वर्षी आणखी पाऊस मात्र नको :डोमा:)

छान.

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!!

वा वा .. फारच ओघवती.. Happy

भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ....!!

सुंदर कविता Happy

sorry..पण तितकीशी जमली नाही कविता...feel कळतोय्..पण त्याला एकदम अचूक शब्दांत नाही पकडता आलेलं असं मला वाटतं..

( तुम्हाला दुखवण्याचा हेतू मुळीच् नाही पण मी frankly बोलतोय्...चू.भू.दे.घे.)

धन्यवाद परीक्षितजी,
ही कविता लयबद्ध आणि गेयपुर्ण आहे.
ही कविता एखद्या चालीत गुणगुणतांना आनंद देवू शकते.

त्यामुळे इतर अंगाचे निकष या कवितेत पुर्ण होत नाही, हे खरे आहे. Happy

छानच कविता आहे.

परिक्षित यांचा प्रतिसाद समजला असला तरी नीटसा समजला नाही. त्यांनी अधिक एलॅबोरेट केल्यास बरे होईल.

(मुटे - कविता लयबद्ध आहेच. पण अनेक ठिकाणी दीर्घचे र्‍हस्व लयीसाठी आवश्यक आहे. अर्थात, वाचताना काही बिघडत नाही आणि आशयावर तर काहीच प्रभाव पडत नाही. मी फक्त लयीबाबत म्हणालो. आपण मस्त कविता केलीत.)

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

<<तितकीशी जमली नाही कविता.>>

मला वाटते कदाचित हा दृष्टीकोणाचा भाग असावा. Happy

मला वाटते कदाचित हा दृष्टीकोणाचा भाग असावा. >>> तुम्हाला वाटते आहे म्हणजे तसेच असेल.

ओघवती.... आशय कळला.....

मलाही काही म्हणायचे होते, पण वरचं तुम्ही लिहिलेलं दृष्टीकोनाचं वाचलं आणि म्हटलं आपण "कोनाड्यातच" बरे.... Happy

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ....!!

>>>>> हे सर्वात जास्त आवडले.

भावबंध हे मनगर्भिचे
उधळण करतील चितरंगाचे
सुप्तभाव ते पुलकित होता
हात मोकळे तू द्यावे सोडून ....!!

मेघ गर्जुनी करतील दाटी
सुसाट वारा रेटारेटी
मनी विजाही करता लखलख
थेंब टपोरे तू जावे वर्षून ...

हे
...........................
हात मोकळे द्यावे सोडून ........

.......................
थेंब टपोरे जावे वर्षून ...

असं अधीक तालात वाटेल का?

तू, कुठेतरी ताल चुकवतोय असं वाटलं...
बाकी कविता झकास आहे!

<< तू, कुठेतरी ताल चुकवतोय असं वाटलं...>>

अगदी खरेय.
तालात घेतांना दोन्ही "तू" जास्तीचे आहेत.

पण वाचतांना "तू" काढून टाकला तर
ते आभाळाचे वर्णन आहे आणि
थेंब टपोरे जावे वर्षून
असे मेघांना सांगीतले आहे, असा प्रथमदर्शनी ग्रह होऊ नये म्हणून
"तू" निष्कारण तेथे ठेवला आहे. Happy