बाप झाल्यावर कळलं बाप होणं म्हणजे काय
जन्म दिल्यावर कळल जन्म घेणं म्हणजे काय
बाप म्हणजे पाऊस असतो बाप असतो हिरवळ
स्वतः जळत असताना, लेकराच्या चटक्यांची कळवळ
किती उशिरा कळू लागला खाल्ल्या फटक्यांचा अर्थ
काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ
समजवून सांगायला जाता, तो जातो चिडून निघून
रागातंही मला हसू येतं, समोर माझं बालपण बघून
समजवुन समजला नाहीच तर देतो चार फटके
आई-बाप ते आई-बापच ! कुणीच नसतं हटके
दु:ख खाल्ल्या फटक्यांचं नाही, दु:ख दिल्या फटक्यांचं नाही
मी जसा बाप बनलो तस त्याचंही त्याला कळेलच की नाही ?
दु:ख येवढच आहे अजुन कितीश्या चुका म्हातारपणी कळतील ?
तेंव्हा वळुन वळायचं म्हंटलं तरी, म्हातारी पावलं कीतीशी वळतील ?
आज किती सहज काढत जातो आपण त्यांच्या चुका
त्यांनाही आपले पाढे वाचता येतात, पण बाप राहतो मुका
उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !
जळण्यामध्येही जगणं असतं येवढं आज ग्राह्य आहे
बाबा, तुमच बोट धरुन चालतोय म्हणुन सारं सुसह्य आहे !!
-सत्यजित.
सत्या
सत्या
वाह..
वाह..
छान आहे.
छान आहे.
आशय आवडला
आशय आवडला
(No subject)
आवडली..
आवडली..
सत्या, मनातलं.
सत्या, मनातलं.
>>उन्हात होरपळल्या शिवाय
>>उन्हात होरपळल्या शिवाय पाण्याची वाफ होत नाही
पाण्याची वाफ झाल्या शिवाय पाऊस होता येत नाही !
सुंदर... याला म्हणतात आशयघन कविता.
अप्रतिम
अप्रतिम
खुप सुंदर आहे
खुप सुंदर आहे
सुंदर कविता खूपच छान सत्यजित
सुंदर कविता खूपच छान सत्यजित
खुप आभार... सगळ्यांचे..
खुप आभार... सगळ्यांचे..
खुप छान ! खुप आवडली. मनाला
खुप छान ! खुप आवडली. मनाला स्पर्शणारी
सत्यजित.. आवडली कविता
सत्यजित.. आवडली कविता
ग्रेट रे सत्या ! खुप आवडली
ग्रेट रे सत्या ! खुप आवडली
मला कविता वाचायला तशा जास्त
मला कविता वाचायला तशा जास्त आवडत नाहीत.
पण सहज वाचली खुपच छान आहे....
त्याला कारणही तसच आहे.....
मी पण वर्षभरापुर्वी बाप झालो.......अगदी तत्तोतंत खर आहे.......
सत्या सही
सत्या सही
आवडली कविता, सत्यजीत
आवडली कविता, सत्यजीत
सत्या,सही रे..
सत्या,सही रे..
“काळजीला जनरेशन गॅप म्हणणं
“काळजीला जनरेशन गॅप म्हणणं किती होतं व्यर्थ”
..... छान
खुप छान..आवडली....
खुप छान..आवडली....
खुप छान ! खुप आवडली, पटली!
खुप छान ! खुप आवडली, पटली!
सुंदर!
सुंदर!
छान कविता, माणसाचा 'नजरिया'
छान कविता, माणसाचा 'नजरिया' बाप झाल्यावर कसा बदलतो, ते बरोब्बर अधोरेखित केलय तुम्ही ! अभिनंदन !
या वरून एक वक्तव्य आठवलं-
By the time a Man starts realising that whatever his father used to say was generally right, he has a son who has grown up enough to start believing that whatever his father usually says is generally wrong !
बापाची व्यथा ! अजून काय ?
खुप मनापासून आवडली
खुप मनापासून आवडली
छान कविता.
छान कविता.
छान कविता.
छान कविता.
सुंदर
सुंदर
खुप खुप आभार... सगळ्यांचे
खुप खुप आभार...
सगळ्यांचे प्रतिसाद पाहुन छान वाटलं..
सत्या, मला इतका छान 'बाप'
सत्या, मला इतका छान 'बाप' ह्या आधी नव्हता भेटला. हृदयस्पर्शी!
Pages