विषवल्लरी

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

विषवल्लरी.

\
\
vish.jpg
\
\

हो हेच नाव आहे या फ़ुलांचे. हे नाव वाचून मनात जी काहि प्रतिमा उभी राहिल, त्याच्याशी अगदी फ़टकून असतात हि फ़ुले. तशी हि वेल एरवी अगदी साधीसुधी दिसते. पानेही साधीच. पानांचा रंगही निस्तेज, हिरवा.

वेल मात्र खुपच पसरलेली असते. दांडे मजबूत असतात. पण तरिही लक्ष वेधून घेण्यासारखे काहि नसते. पण एकदा का फ़ूलावर आली कि मात्र नजर हटूच शकत नाही, हिच्यावरुन.

हे असे ओंजळभर फ़ुलांचे गुच्छ, जागोजाग लटकत असतात. रंग अगदी पांढराशुभ्र. उन्हातही फ़ुले अशीच टवटवीत असतात.

आकार तरी किती देखणा. पाकळ्यांचा द्रोण झालेला. खरी वाटू नयेत, इतकी देखणी. अगदी मंदसा सुगंधही असतो. या रंगावरुनच हिला दुधळी असेही नाव आहे.शास्त्रीय नाव Vallaris solanacea .

आपल्याकडे क्वचित दिसत असली तरी उत्तर भारतात हि विपुल आहे. मी पुण्याला कोथरुड भागात एका बंगल्याच्या कुंपणावर हि बघितली होती. राणीच्या बागेत सिंहाच्या पिंजर्‍यावर आहे.

पण या वेलीला विषवल्लरी हे नाव का पडलय. खरेच विषारी आहे का ? याबाबत मला काहि कळले नाही. एरवी माझ्या बहुतेक फ़ुलांच्या फ़ोटोत, मधमाश्या, मुंग्या वगैरे फ़ुलावर असलेल्या दिसतात, या फ़ोटोत तसे काहि किटक दिसत नाहीत. रंग पांढरा आहे म्हणजे कदाचित, रात्री उडणारे किटक यांचे परागीभवन करत असावेत.

पण वरच्या फ़ोटोकडे बघून तरी, ही विखारी वाटत नाही.

विषय: 
प्रकार: 

हे सगळे फोटो ( फुलान्चे) आणि तुमचे लेख यान्चे पुस्तक काढा....

अहो प्लीज हिला विषवल्लरी म्हणू नका. आधी नाव पाहिले आणी मग फोटो पाहुन धक्काच बसला. माझ्याकडे आहे ही वेल. फुले आली की खरेच खुप सुंदर दिसते. सध्या आलिय फुलावर. मला अजुन कसलाही त्रास झाला नाही हिच्यामुळे, त्यामुळे, विषारी वगैरे नसावि बहुतेक.

साधना.

अप्रतिम फोटो आणि नेहमीप्रमाणे माहितीही छान!
बहाव्याचा फोटो तुम्ही टाकला आहे का कधी?
सध्या जागोजागी बहावा फुलला आहे.
बघितला की मायबोलीवरच्या तुमच्या फोटोंची लगेच आठवण येते.

डॉक्टर, विचार आहे.
साधना, मलाही पटत नाही, पण पुस्तकात हेच नाव आहे. नेटवर फारशी माहितीच नाही.
बेडेकर, खुप पुर्वी लिहिले होते बहाव्याबद्दल. भरभरुन फुलला आहे. कोल्हापुरच्या रंकाळा तलावावरचा रिक्षा स्टँड आहे ना, तिथे एक झाड आहे. छोटेसे आहे तरी काय फूलते म्हणुन सांगू. केवळ ते बघण्यासाठी जातो मी तिथे.

दिनेश, खरचं काय सुरेख आहेत ही फुले.
मीनाताई, सिंगापूरमधे लागेल तेवढा दिसेल तुम्हाला बहवा. नुस्त हिन्दकळत राहतो.

खरच दिनेश बहवा सध्या नुसत बहरला आहे,
ट्रेनने जाताना विक्रोळी गेले कि (मला वाटते गोदरेज मध्ये) एका लाईनित बहवा आहे, बहरला कि नजर हटत नाही,
वार्‍याबरोबर नुसता हिन्दकळत राहतो. कसला दिसतो.........,
दिनेश तुम्हि दिलेली फुलांचि माहिति आणि फोटो फारच सुंदर असतात.

बहावा झुलतोय खराच. केरळमधे एक सण, केवळ बहाव्यासाठी साजरा केला जातो.
याला म्हणतात, वृक्षप्रेम.

हे माझ पिल्लू, फार्-फार डाम्बिस आहे.I-U-Sh.jpg