गुड मॉर्निंग मॅडम - अंतीम भाग - भाग २१

Submitted by बेफ़िकीर on 10 December, 2010 - 07:58

मोनालिसा रंगवणे माझ्यासाठी अवघड होते. पेलले की नाही माहीत नाही. एक स्त्री निश्चय केल्यास निश्चीतच भल्याभल्यांना धूळ चारू शकते हे आपण सगळे जाणतोच! मोनालिसाही जिंकलीच, पण तिच्या नशीबातील 'ऑड्स' खूपच होते..

ही कथा चालू असतानाच माझी आई गेली.. सगळ्यांनी दिलेला मानसिक आधार अत्यंत मोलाचा होता...

माझ्या आईने खूप गरीबीत दिवस काढलेले होते... आणि लढली ती जीवनाशी.. कर्करोगाशीही! सगळ्यांच्याच आया अशाच लढाऊ असतात... म्हणूनच संस्कार मिळतात पुढच्या पिढीला..

हे कथानक आईमधल्या मोनालिसाला समर्पीत!

कथा आवडली, नाही आवडली, संदर्भ चुकल्यासारखे वाटले तर जरूर कळवावेत!

मायबोली प्रशासन, वाचक व प्रतिसादक यांच्या आत्मीयतेच्या ऋणात...

- 'बेफिकीर'!

==============================================

"या... या... या... मोनालिसाताई... या.. बसा..."

अर्देशीरांच्या स्वरातला कुजका उपरोध जाणवूनही मोना आत आली आणि रेजिनाच्या शेजारी 'बहुधा मुद्दाम तीच रिकामी ठेवलेल्या' खुर्चीवर बसली.

पार्टीतच ड्रिन्क्स बरीच झालेली असल्याने मोनाने सुबोधने ऑफर केलेले ड्रिन्क समोर तसेच ठेवले.

अर्देशीर - हे काय? ड्रिन्क नको?? हेलिक्सच्या एम डी ला ड्रिन्क नको म्हणणे शोभते का??

पुन्हा सुबोध फस्सकन हासला.

मोना - हेलिक्सच्या एमडीलाच सगळे शोभते...

मोनाचा हा वार वातावरण क्षणात गंभीर बनवून गेला.

पण ते गांभीर्य सहन न होऊन दारू चढलेला सुबोध पटकन बोलून गेला...

सुबोध - हो ना... बँगलोर सांगून सिमल्याला जाणे...

त्यानंतरचे त्याचे हासणे हे 'मूर्ख मुली, तू माझ्यासमोर जिंकू शकणार नाहीस' अशा थाटाचे होते.

मोना - ओह खरच की?? ... त्याचदिवशी तू डॅनलाईन हातातून घालवलंस नाही का??

सुबोध - ........द हेल विथ डॅनलाईन...

मोना - का?? चांगला प्रॉफिटेबल बिझिनेस आहे.. हो की नाही अंकल???

लोहिया - प्रॉफिट मी खूप मिळवलाय आजवर...

मोना - आता ते काय मला माहीत नाही??

सरळ बोलणार्‍यातली ही बया नाही हे सगळ्यांना समजलेले होते. रेजिनाची उपस्थिती आत्ता कुणालाच ऑब्जेक्शनेबल कशी काय वाटत नाही हेच मोनाला समजत नव्हते. पण तिला तो तिथे असल्यामुळे बरे वाटत होते.

अर्देशीर - मी तर कधी प्रॉफिट बघितलाच नाही...

यावर जतीन, सुबोध आणि लोहिया तिघेही जोरात हासले. ते हास्य स्विटमध्ये विरायच्या आतच मोना हासत हासत उद्गारली...

मोना - ते दिसतंच आहे की...

पुन्हा वातावरण गंभीर झाले.

आज तिला इथे बोलवायचे आणि टोचून टोचून हैराण करून शेवटी सर्वात महत्वाचा वार करायचा असा त्या चौघांचा विचार होता. पण तीच यांना टोचू लागली होती. हे प्रकरण तिसरेच असल्याचा सुगावा लागू लागला होता. अर्देशीर सरांना इतक्या धीटपणे इतके उघड बोलणे आजवर मोहन गुप्तांनाही जमलेले नसावे.

अर्देशीर - अरे हो... ते डॅनलाईनवाले माझ्यामागे लागले होते आधी.. आमची एजन्सी घ्या.. आमची एजन्सी घ्या... म्हंटलं हेलिक्सशी बोलताय ना?? मग हेलिक्सकडेच जा... माझं आता वय होऊ लागलं आहे...

मोना - हो.. मलाही सांगीतलं डॅनीयलने...

सगळे चुपचाप होऊन मोनाकडे बघू लागले...

अर्देशीर - .....???...... काय सांगीतलं???

मोना - की तुमचे प्रपोजल आले होते म्हणून... म्हणाला रिजेक्ट केले...

अर्देशीर - अच्छा?? .... का म्हणे???

मोना - तेच म्हणाला तो... तुमचं आता वय होऊ लागलं आहे... तुम्हाला इतकं झेपणार नाही आता...

अर्देशीर - हा हा हा हा! हुषार आहेस...

मोना - नक्कीच... नाहीतर डॅनलाईन मला मिळालंच नसतं...

अर्देशीरांना हे चांगलंच झोंबलं वाक्य!

अर्देशीर - मोहनला मी नेहमी सांगायचो... मोनाला ट्रेन कर.. मोनाला ट्रेन कर... तर म्हणायचा... तिला ट्रेन करणे शक्य नाही....

लोहिया - का???

अर्देशीर - ती आधीच सगळे माहीत असल्यासारखी वागते...

आत्ता सुबोध आणि लोहिया दोघेही हासले. रेजिना अस्वस्थ झालेला होता आणि जतीन फक्त पीत होता.

मोना - मलाही डॅड सांगायचे....

लोहिया - काय??

मोना - ट्रेनिंग घे... ट्रेनिंग घे...

लोहिया - हो?? .. मग??

मोना - नाही घेतले...

लोहिया - का?? वारसा हक्काने एम डी होता येणार होते म्हणून???

मोना - अंहं... नोकरीवर चांगली माणसे नेमलेली होतीच.. मग काळजी कशाची?? परफॉरमन्स देतायत तोवर ठेवायचं त्यांना... नाहीतर हाकलून द्यायचं!

शेअर होल्डर्स असले तरीही अर्देशीर आणि लोहिया शेवटी नोकरच होते. आणि मुख्य म्हणजे त्यांना सुरुवातीच्या काळात नोकरीवरच घेतले होते मोहन गुप्तांनी! नंतर भागीदार करून घेतले. आणि सुबोध आणि जतीन तर सरळ सरळ एम्प्लॉयीच होते. आणि त्या दोघांनीही डॅनलाईन घालवल्यानंतर त्यांना तिने खरच हाकलूनही दिलेले होते.

मोनाचे हे विधान सहन होण्यासारखे नव्हतेच! पण आज ती सुनावणारच होती सगळ्यांना!

थट्टामस्करी बरीचशी जीवघेण्या वळणावरून होत होती आत्ता! मनात रागच होता प्रत्येकाच्या! पण वरवर 'हासण्यासाठी कारण' असे प्रयोजन दाखवले जात होते थट्टेचे!

लोहिया आता मात्र मुद्यावर येऊ लागले.

लोहिया - सर... मला वाटते आपण आता महत्वाचे बोलायला घेऊयात...

अर्देशीर - शुअर... आय अ‍ॅम रेडी...

लोहिया - हं! तर मोना.. आता आपण ज्याच्यासाठी भेटायचे ठरले होते ते बोलूयात का??

मोना - शुअर...

लोहिया - एकंदर माझ्या असे लक्षात आले आहे की तुला अजून खूपच अनुभवाची आणि परिपक्वतेची आवश्यकता आहे... त्यासाठी तुला कदचित एखादा कोर्स वगैरेही करावा लागेल.. सुरुवात्ला जेव्हा तू या पदासाठी आग्रह धरलास तेव्हा आम्ही सगळ्यांनी अर्थातच त्या प्रस्तावाचे आनंदाने स्वागत केले याचे कारण असे की एक तर मोहनजींची तू वारसदार आहेस आणि त्या पदाबाबत कुणालाच मोह नव्हता.. पण आता परिस्थिती अशी आलेली आहे की हेलिक्समधील अनेक महत्वाचे डिसीजन्स चुकीचे घेतले गेले आहेत... जसे फारुख ऑटोची जागा काढून घेऊन त्याचे भाडे उगाचच घालवणे, हेलिक्सच्या कोअर बिझिनेमध्ये भांडवलाची गुंतवणूक होण्याऐवजी ती ट्रेडिंगच्या ज्या नव्या ऑफर्स आहेत, जसे डॅनलाईन, इन्टर ट्रॅक्टर अशांमध्ये होण्याचे ठरणे, त्या ऑफर्स कितीही ल्युक्रेटिव्ह असल्या तरी आपण त्यातील तज्ञ नाही आहोत.. तरीही आपण त्याच ऑफर्स पुढे रेटणे वगैरे... हे सगळे करत असताना जुन्या जाणत्या लोकांना प्रवाहापासून दूर लोटणे हाही प्रकार झाला.. अर्देशीर सरांसारखा अत्यंत अनुभवी माणूस केवळ दुखावलाच गेला असे नाही तर बाजूलाही केला गेला... आज त्यांच्या अफाट अनुभवाला आणि प्रचंड कॉन्टॅक्ट्सना आपण मुकतो आहोत.. तसेच जतीन आणि सुबोधचेही झाले... दोघांनी अथक परिश्रम घेऊन अनेक पातळ्यांवर यश मिळवलेले होते... मात्र आज त्यांच्या त्या हाय एनर्जी लेव्हलला, परिश्रम घ्यायच्या तयारीला आणि डेडिकेशनला आपण मुकतो आहोत...

मोनालिसा... यात कुणीही तुला दोष देत नाही आहे.. याचे कारण हे आहे की एक तर तू पूर्णपणे नवीन होतीस.. दुसरे म्हणजे तू आमचीच आहेस... लहानपणापासूनच सगळे तुझ्यवर प्रेम करतात.. मोहनजींचेच रूप तुझ्यात दिसते... एखाद्या क्षेत्राची काहीच माहिती नसतानाही तू डॅनलाईन, इन्टर ट्रॅक्टर अशी प्रपोजल्स सक्सेसफुली मॅनेज करत आहेस... त्यातच तू नवीन युनियनही उभारून दाखवलीस.. संप टाळून दाखवलास... इतकेच काय.. हेलिक्सलाही चांगला प्रॉफिट झाला..

मोनालिसा.. तुझ्या या लहानश्या कारकीर्दीत अनेक चांगल्याही गोष्टी घडल्या आणि काही वाईटही! त्यातही एकट्या माणसाची जबाबदारी फार कमी असते... ते एक टीमवर्क आहे.. जसे.. डॅनलाईन यशस्वीरीत्या मॅनेज करण्यात स्वतः मिस्टर डिसूझाही सहभागी आहेतच...

पण आता वेळ आली आहे ती एक नवी भरारी घेण्याची... ही भरारी हेलिक्सने घ्यायची आहे... आजवर आपण करत असलेल्या बिझिनेसच्या तिप्पट क्वान्टम हे आता आपले उद्दिष्ट आहे... हे कसे साध्य होणार याचा एक आराखडाही तयार आहे.. बेसिकली सिम्प्लेक्स ही कंपनी आपण आपल्या पंखाखाली घेणार आहोत.. याचा विचार मी स्वतः आणि अर्देशीर सरांनी मिळून केलेला आहे... मोहनजी असते तर हे त्यांनीच केले असते... आणि अत्यंत कार्यक्षमपणे केले असते.. इन फॅक्ट ते मला म्हणालेही होते की हेलिक्स नंबर दोन वर गेलेली पाहायची आहे.. सिम्प्लेक्स आपल्या हातात आली तर आपण आज नंबर चारवर आहोत ते नंबर तीनवर जाऊ... 'आय सी बावर' चे इरफानचे प्रपोजल आपण नाकारले असले तरीही नव्याने डिस्कस करू शकतो.. तुझ्या डॅडचे स्वप्न आपल्याला सर्वांना साकारायलाच हवे आहे...

ही प्रचंड मोठी उडी मारण्यापुर्वी .... आपल्याला काही विशिष्ट चेंजेस करावे लागतील.. कंपनीचा चेहरा एक अननुभवी माणूस असावा असे तुलाही वाटणार नाहीच...

माझ्यामते त्या जागी अर्देशीर सर किंवा मी यापैकी कुणीतरी कार्यभार सांभाळावा.. अर्देशीर सर जर ही जबाबदारी घेणार असतील तर ते तुला विकलेले शेअर्स परत विकत घ्यायला तयारही आहेत.. ते वयामुळे फ्रन्टवर राहण्यास तयार नसतील तर तू त्यांचे घेतलेले शेअर्स मला विकत दे... मी ती जबाबदारी घेईन.. याचवेळेस सायमल्टेनियसली तू डॅनलाईन आणि इन्टर ट्रॅक्टर या दोन्ही आघाड्यांवर स्वतंत्ररीत्या लढावेसच... कारण ती प्रपोजल्स फारच चांगली आणली आहेस तू.. अभिनंदन त्यासाठी.. आणि हेलिक्समध्ये सुबोध आणि जतीन या दोघांनीही पुर्वीप्रमाणे पदभार घ्यावा असे मी त्यांनाही विनवतो...

मित्रांनो... आपल्यात पुर्वी काहीही झालेले असो... आज हेलिक्सच्या या उडीकडे आकाशातून मोहनजींचा आत्मा डोळे लावून बसलेला आहे... त्यांच्या आत्म्याच्या दृष्टीने आपणच सगळे हेलिक्सला त्या स्थानावर नेऊ शकतो.. तेव्हा पुर्वीचे कलह, कडवटपणा... सगळे सगळे विसरून एकत्र येऊयात...

मोनालिसा... तूही होकार दे.. जतीन.. सुबोध.. तुम्हीही फॉर्मली हो म्हणा... मग आपण अर्देशीर सरांना हे पद घ्यायची विनंती करूयात...

साखरेच्या पाकातील मिरची होती हे भाषण म्हणजे!

रेजिना अजूनही शांतच होता. पण मोनाला आता काहीतरी स्टॅन्ड घ्यावा लागणारच होता.

मोना - सिम्प्लेक्सबाबत तुम्ही दोघांनी डिस्कस केलेत तेव्हा मला का नाही कळले ते??

मोना अनेक गोष्टी शिकलेली होती गेल्या काही महिन्यात! एखादा साधा माणूस असता तर 'मला का नाही सागीतलेत' अशी शब्दरचना असती प्रश्नाची! पण एम डी च्या पदावरचा माणूस असे किरकोळ प्रश्न विचारतच नाही हे मोनाला माहीत झालेले होते. 'मला वेळेवरच का नाही कळले' हा प्रश्न तिला तिच्या अधिकारांची पूर्ण जाणीव आहे हेच सिद्ध करत होता.

लोहिया - बेसिक गोष्टीच डिस्कस झालेल्या आहेत...

मोना - पण सिम्प्लेक्स फॉर सेल आहे??

लोहिया - होय...

मोना - हेही मला कळले नाही...

लोहिया - आम्ही विचार केला की संपूर्ण प्रपोजलच एकदम डिस्कस करूयात...

मोना - काय प्राईस आहे?? सिम्प्लेक्सची??

लोहिया - एक्केचाळीस ...

मोना - फक्त मशीन्स??

लोहिया - हो...

मोना - मग जागा कुठे आहे आपल्याकडे??

लोहिया - अर्देशीरांचा प्लॉट आहे ना.. चाकणला...

मोना - तो तर जडेजांनी घेतला ना??

लोहिया - हो पण जागा भरपूर आहे...

मोना - आणि फंडिंग??

लोहिया - माझे आणि तुझे काही शेअर्स.. बाकी बँकर्स...

मोना - कोणते बॅन्कर्स??

लोहिया - बरोडा..

मोना - त्यांच्याशी डिस्कस झालंय??

लोहिया - अंदाज घेतलाय नुसता आम्ही...

मोना - पण धीमन रेंशी चर्चा झालीय का??

लोहिया - त्यांनीच अर्देशीरांना पहिल्यांदा हे सांगीतलंय...

मोना - हंहं... ठीक आहे....

एकदम चेहर्‍यांवर जणू पालवीच फुटली....

सगळे मोनाच्या पुढच्या वाक्याची वाट पाहू लागले..

मोना - आय अ‍ॅम नॉट इन्टरेस्टेड इन धिस...

चक्रावलेच सगळे!

तिचा अधिकार ती असा वापरेल याचा अंदाजच नव्हता कुणाला! ही गेमच वेगळी होती. धीमन रे यांचे अर्देशीरांशी असलेले अत्यंत चांगले संबंध वापरून या चौकडीने ही गेम टाकलेली होती. धीमन रे यांनी कोणताही लेखी करस्पॉन्डन्स न करता 'सिम्प्लेक्स विकायची आहे' असे बडबडत नुसतीच चर्चा करायची! या प्रक्रियेत हळूहळू मोनालिसाचे निम्मे शेअर्स डायल्यूट करून ती रक्कम बँकेत 'पैसा' या स्वरुपात ठेवायची. त्यानंतर धीमन रे यांनी शब्द पाळायचा नाही. अर्देशीर यांच्या एका वेगळ्याच कॉन्टॅक्टने मोनाचे ते शेअर्स अ‍ॅक्च्युअली विकत घ्यायचे! आणि नंतर ते अर्देशीरांनी विकत घ्यायचे.

हे सगळे करण्यासाठी त्या कॉन्टॅक्टला आणि धीमन रे या दोघांना प्रचंड रकमांची भेट द्यायची! आणि लोहियांना अर्देशीरांनी भेट म्हणून काही शेअर्स द्यायचे. या सगळ्याचा फायदा असा की हेलिक्सचा प्रॉफिट आजवर ज्या प्रमुख दोन भागात विभागला जात होता त्याऐवजी तीन भागात विभागला जाईल! मोना, लोहिया आणि अर्देशीर! आणि त्यातील मोनाचा भाग खूपच कमी असेल आणि लोहिया आणि अर्देशीर यांची ताकद प्रमाणाबाहेर वाढेल!

हे प्रपोजल मोनालिसासारख्या अतीमहत्वाकांक्षी स्त्रीला अत्यंत आवडेल या एकाच गृहीतावर हे कुभांड रचण्यात येणार होते.

पण मोनाने सरळ त्या गोष्टीला नकारच दिला. आता तिला कन्व्हिन्स करणे आले. कन्व्हिन्स करण्याच्या कामी अर्थातच जतीन असायचा नेहमी!

जतीन - मोना.. मला वाटते तडकाफडकी निर्णय होऊ नये याबाबत... हे अत्यंत उत्तम प्रपोजल आहे.. मामांचे स्वप्न तर साकार होईलच... पण हेलिक्स अशा स्थानी पोचेल की ते कित्येक दशके वाट पाहूनही जमले नसते...

आपण मासे मारायला जाळे टाकतो आहोत या भ्रमात असलेल्य कोळ्याचा जर एक पाय मगरीनेच धरला तर काय होईल?? मोनालिसा आज 'आर या पार' ही भूमिका घेऊन आलेली आहे हेच त्या चौघांना माहीत नव्हते.

मोना - जतीन... मला वाटते हेलिक्सचे भवितव्य मी बघेन...

'तू आता हेलिक्समध्ये नाहीच आहेस तर मध्ये का बोलतोयस' हे विधान अत्यंत पॉलिश्ड शब्दांमध्ये बोलली होती मोना! आणि असेच शब्द वापरण्यात हयात गेलेल्या चौघांनाही ते लगेच समजले. हा अपमान जतीनला भयंकर झोंबलेला होता. पण आत्ता जास्त बोललो तर ही निघूनच जाईल या भयाने त्याने फक्त मान खाली घातली.

अर्देशीरांना त्यांची कंड स्वस्थ बसू देत नव्हती.

अर्देशीर - बट बेटा.. डोन्ट यू थिंक धिस इज अ ग्रेट आयडिया??

मोना - शुअर इट इज सर... पण आत्ता मला त्यात इन्टरेस्ट नाही आहे...

अर्देशीरांना 'तुम्ही कोण सांगणारे' असे म्हणणे मोनालाही शक्य नव्हते अजून!

अर्देशीर - का पण??

मोना - जरूर वाटत नाही मला.. इतके मोठे होण्याची...

अर्देशीर - इट्स नॉट लाईक अ बिझिनेसमन बेटा... ग्रोथ इज व्हेरी नेसेसरी...

मोना - हेलिक्स इज ग्रोईंग सर...

अर्देशीर - बट नॉट लाईक धिस.. सिम्प्लेक्स आपल्याला मिळाली तर विचार कर.. काय होईल..

मोना - अंहं... आय अ‍ॅम नॉट इन्टरेस्टेड...

आता मात्र सगळेच भडकलेले होते. पण तिच्याकडे मॅक्सिमम शेअर्स असल्याने राग काढता येत नव्हता बाहेर!

पण तो हळूहळू कृतींमधून दिसायला लागलाच! पहिल्यांदा सुबोधने त्याचा ग्लास जरा जास्तच जोरात टी पॉय वर ठेवला. लोहियांच्या ओठांवर एक कडवट हास्य निर्माण झालेले होते. जतीन तर वर बघतच नव्हता.

अर्देशीर - बेटा... मी हे प्रपोजल समजल्यानंतर पहिला विचार काय केला असेल तर हा.. की हे मोहनचे स्वप्न होते... वास्तविकपणे हे प्रपोजल मी स्वतःही स्वतंत्रपणे अंमलात आणू शकलो असतो.. माझ्याहीकडे पैसे आहेत.. बॅन्क मलाही मदत करेल.. पण हेलिक्स माझ्या रक्तात आहे बेटा.. म्हणूनच मी लोहियाला म्हणालो की हैदराबादला सगळे भेटतोच आहोत तर आधी मोनाशी हे डिस्कस करूयात... आणि आता तू नाही म्हणतीयस....

अर्देशीरांचे 'बापाच्या' भूमिकेतील बोलणे ऐकून मोना नक्कीच सिरियसली विचार करेल हा ठोकताळा होता चौघांचा! पण जे ऐकायला मिळाले ते ऐकून रेजिनासुद्धा बसल्याजागी शॉक्ड झालेला होता... इतरांचा तर प्रश्नच नाही...

मोना - सर... डॅनलाईनसुद्धा तुम्ही स्वतंत्रपणेच हॅन्डल करायला चालला होतात... कुठे जमले तुम्हाला??

आयुष्यात अर्देशीरांनी असा अपमान सहन केलेला नव्हता. आयुष्यात... !!!

त्यांचा चेहरा केवळ क्षणभरच हिंस्त्र झाला आणि लगेच मृदू भाव आले त्यावर!

अर्देशीर - डॅनलाईन माझ्या मागे लागलं होतं मोनालिसा.. मी त्यांच्या नव्हे...

मोनालिसाचा आजवर त्यांनी 'मोनालिसा' असा उल्लेख फारसा केलेला नव्हता. बहुधा ते तिला 'बेटा' म्हणूनच हाक मारायचे.

मोना - सर.. डॅनलाईनला मी बारा टक्यांवर अ‍ॅग्री करवलेले होते... तुम्ही साडे सहा टक्यांची ऑफर दिलीत त्यांना..

आता मात्र अर्देशीरांचा तोल सुटू लागला.

अर्देशीर - मी माझे हेलिक्सचे शेअर्स विकून नवीन मशीन्समध्ये पैसे लावलेले होते... आणि ते प्रपोजल तू अचानक कॅन्सल केलेस आणि हे डॅनलाईनचे भूत उभे केलेस...

मोना - ते भूत खूप फायदेशीर आहे.. नाही रेजिना???

अर्देशीर - आणि हा डिसूझा... त्या दासप्रकाशकडे नोकरीला होता नोकरीला... आज तुझ्यासाठी हा सबकुछ बनलेला आहे... मी दासप्रकाशला भेटायला गेलो तर याला आत प्रवेशही नसायचा....

रेजिना पटकन उठला..

रेजिना - मिस गुप्ता.. मी माझ्या स्विटमध्ये बसतो...

मोना - काहीच कारण नाही रेजिना.. तुम्ही इथेच बसा...

अर्देशीर - हेच.. धिस इज व्हॉट आय कॉल इमॅच्युरिटी.. याच्याबरोबर तू दिल्लीत काय राहतेस.. काय चाललेलं असतं तुझं... आम्ही रक्त आटवून हेलिक्स उभी केली आणि तू सत्यानाश करतीयस...

मोना - रक्त आटवून नाही सर....

पुन्हा सगळे चेहरे मोनाकडे वळले. तिचा स्वर फारच जहरी झाला होता हे वाक्य बोलताना...

मोना - ... रक्त शोषून...

अर्देशीर - व्हॉट द हेल यू मीन??

मोना - फारुख ऑटो तुमचीच आहे हे काय मला माहीत नाही??

अर्देशीर - असली म्हणून काय झाले?? ते तर मोहनलाही माहीत होते...

मोना - हो पण डॅडनी शेव्हिंग मशीन्स डेडिकेट केलेली नव्हती फारुखला..

अर्देशीर - तेव्हा तो प्रश्नच नव्हता..

मोना - पण आत्ता होता ना?? तुम्ही जर रक्त आटवून 'हेलिक्स' उभी करत असाल तर असे अ‍ॅग्रीमेन्ट झाल्यावर पुढे होऊन ते रद्द का नाही केलेत?

अर्देशीर - मी का रद्द करायचे?? तू मशीन्सचे प्रपोजल रद्द केलेस तेव्हा विचारले का मी एका शब्दाने??

मोना - का?? सतरा फेर्‍या मारल्यात की ऑफीसमध्ये...

अर्देशीर - मोनालिसा.. तू कुणाशी बोलतीयस?? मोहन सुद्धा माझे निर्णय अंतीम मानायचा.. तुला ए बी सी डी माहीत नाही या धंद्यातले..

मोना - म्हणून तर ए टू झेड असलेली माणसे आज माझ्याच मागे लागतात सिम्प्लेक्स विकत घ्यायच्यावेळी..

अर्देशीर - कुणीही मागे लागत नाही आहे.. आम्हाला काय कामं नाहीत?? मोहनचे स्वप्न म्हणून आणि तू लहान आहेस म्हणून मार्गदर्शन करायला गेलो तर उलट बोलतीयस तू...

मोना - ठीक आहे... रागावताय कशाला?? मी नाही अ‍ॅक्सेप्ट करत आहे हे सिम्प्लेक्सचे प्रपोजल.. पण म्हणून तुम्ही कशाला रागावताय??

अर्देशीर - कारण तू मूर्ख आहेस...

मोनालिसा गुप्ता! एम डी! या स्त्रीला सर्वांदेखत असे कुणी म्हणू शकेल यावर कधी विश्वासही बसला नसता कुणाचा! मूर्ख आहेस?? सरळ सरळ मूर्ख??

आता मात्र मोना उसळली.

मोना - मी मूर्ख आहे म्हणूनच डॅनलाईन माझ्याकडे आहे.. इन्टर ट्रॅक्टरच्या मागे लोहिया लागलेत तेही माझ्याचमुळे... हेलिक्समध्ये आयुष्य घालवूनही तुम्हा लोकांना कधी अशी ग्रोथ सुचलेली नाही आहे...

अर्देशीर - डॅनलाईन डॅनलाईन डॅनलाईन... आधी हेलिक्स नीट चालव... उड्या कसल्या मारतेस??

अर्देशीरच तिला असे बोलू शकत होते त्या सगळ्यांपैकी! आत्ता त्यांचे बोलणे ऐकून तर जतीन आणि सुबोधही शॉक्ड होते. अर्देशीरांना इतके चिडलेले कधी पाहिलेच नव्हते त्यांनी!

मोना - रादर लेट्स डिस्कस समथिंग एल्स.. अप्रिय विषय कशाला चघळायचे???

लोहिया मात्र आता भडकले.

लोहिया - देअर इज नथिंग एल्स टू डिस्कस... आणि हे प्रपोजल तू अ‍ॅक्सेप्ट करायलाच पाहिजेस...

मोना - का??

लोहिया - बिकॉज यू हॅव टू...

मोना - का पण??

लोहिया - का म्हणजे?? तुझ्या आततायीपणामुळे आणि या डिसूझातल्या वाढत्या इन्टरेस्टमुळे हेलिक्स बरबाद झालेली आम्हाला चालणार नाही...

मोना - हेलिक्स तर ग्रो होतीय पण??

लोहिया - कासवाच्या गतीने... सिम्प्लेक्सची उडी आपण मारायलाच पाहिजे...

मोना - आय रिपीट... आय अ‍ॅम नॉट इन फेव्हर ऑफ धिस...

लोहिया - ओके... देन फेस द ब्लडी सर्कम्स्टन्सेस...

मोना - व्हॉट सर्कम्स्टन्सेस??

लोहिया - यू विल.... यू विल बी...

मोना आणि रेजिना, सुबोध आणि जतीन... चौघेही लोहियांकडे थिजल्यासारखे पाहात होते... या म्हातार्‍याने काय शक्कल लढवलीय ते मोनाला आणि रेजिनाला माहीतच नव्हते... आणि सुबोध आणि जतीनला ते माहीत असले तरीही त्यांना वेळ इथपर्यंत येईल याची कल्पना नव्हती.. अर्देशीर मात्र शांत झालेले होते..

मोना - .... आय विल व्हॉट???

लोहिया - यू विल बी सून बिहाइन्ड द बार्स..

मोना - बि... ..... ... व्हाय???

लोहिया - बिकॉज पझेसिंग बझट इज लाईक टेररिझम..

नग्नता... लोहियांच्या या एकाच विधानामुळे सगळे मुखवटे गळून पडले.. ग्रीन पार्कच्या त्या स्विटमध्ये चेहरे नग्न झालेले होते... प्रत्येकाचे हेतू उघड झालेले होते... शंख फुंकला गेलेला होता... आता फक्त वार करायला सुरुवात करायची होती..

बझटचा उल्लेख असा आणि इथे होऊही शकेल याची कल्पना रेजिनाला अजिबात नव्हती. त्या चौकडीला होती. आणि मोनाला ती चौकडी तो उल्लेख करेल याची कल्पना नसली तरी आज ती स्वतः मात्र त्या गोष्टीचा उल्लेख करणार होतीच!

मोना - अच्छा.... पझेसिंग बझट इज अ टेररिस्ट अ‍ॅक्ट हं??

मोनाचा त्याही परिस्थितीतला तो शांत आणि 'हवा घालवणारा' स्वर मात्र चरकवून गेला सगळ्यांना!

सगळे ती पुढे काय म्हणते त्याची वाट पाहू लागले.

पण मोना नुसतीच हासली. ते तिचे हासणे 'मी तुमच्या पुढे अनेक पावले आहे' असे दर्शवणारे होते. नेमका अंदाज कुणालाच येत नव्हता की कोण कुणाच्या पुढे आहे आणि कुणाचा हात दगडाखाली अडकलेला आहे.

मोनाने शांतपणे हायलॅन्ड पार्कचा एक घोट घेतला आणि ग्लास खाली ठेवून थेट लोहियांच्या डोळ्यात डोळे मिसळले. ती अधिकाराची नजर भेद घ्यायला लागली तसे लोहियांनी आपले डोळे झुकवले आणि पुन्हा वर करून ते तिच्याकडे पाहू लागले.

लोहिया - व्हाय द हेल आर यू स्मायलिंग???

मोना - बिकॉज यू पझेस द ब्लडी टॅब्लेट...

लोहिया - हो... आहेत माझ्याकडे... तुझा बापही सिद्ध करू शकणार नाही ते...

ही पातळी मात्र यायला नको होती संवादांची! पण लोहियांमधला 'एका गड्याचा अत्यंत स्वार्थी मुलगा' उफाळून बाहेर आला होता.

मोना - तोंड सांभाळून लोहिया... होत्याचा नव्हता होशील...

खदाखदा हासले लोहिया! अर्देशीर मात्र अती गंभीर झालेले होते.

जतीन आणि सुबोध हे दोघे तर फक्त पाहूच शकत होते. मधे बोलणे अशक्य होते त्यांना!

लोहिया - होत्याचा नव्हता... होत्याचा नव्हता होईन ... हं??? तुझ्या माहितीसाठी... तू होणार आहेस होत्याची नव्हती....

मोना - हंहं??? गुड... विश यू लक लोहिया...

लोहिया - डोन्ट बी ओव्हर कॉन्फिडन्ट मोनालिसा...

मोना - माझं नाव तोंडातून घ्यायचं नाही पुन्हा.. आय अ‍ॅम यूअर बॉस...

लोहिया - ओहो... ओहोहोहोहो... बॉस... सॉरी मॅडम... चुकून झालं.. माफ करा... काढून बिढून टाकू नका हां???

लोहिया अजूनही हासतच होते.

अर्देशीर आता बोलू लागले.

अर्देशीर - मोनालिसा... तू हे प्रपोजल अ‍ॅक्सेप्ट कर... त्यात तुझं भलं आहे.. सुरक्षित राहशील..

मोना - नाहीतर काय होईल???

आत्ता सुबोध हासला.

अर्देशीर - नाहीतर वाईट होईल...

मोना - काय पण???

अर्देशीर - ऐकायचंय???

मोना - जरूर...

अर्देशीर - नाना सावंत मारहाण करणार आहे तू निर्माण केलेल्या युनियनमधील मेंबर्सना.. तिकडे दिल्लीत तुझी केस री ओपन होणार आहे... त्यात तू आणि हा तुझा फालतू मित्र अडकणार आहात.. त्या हॉटेलवरही केस होणार आहे.. त्यातच.... सिंगापोरला तुझे अ‍ॅबॉर्शन झाले ही माहिती हेलिक्समध्ये सगळ्यांना कळणार आहे.. हेलिक्सचे गव्हर्नमेन्ट कस्टमर्स तुझ्यावर बझटची केस झाल्यामुळे बिथरणार आहेत.. धंद्याला उतरती कळा लागणार आहे... लोहिया शेअर्स एलेकॉनला किंवा सिम्प्लेक्सला विकणार आहे... ते जाहिराती करणार आहेत की आता हेलिक्स त्यांचीच कंपनी आहे... महत्वाचे म्हणजे मोहनकडे त्याच्या बंगल्यावर अनेक बझट आहेत याचे प्रूफ लोहियाकडे आहे... त्यामुळे तोही मरणोत्तर 'परम अतिरेकी' असा किताब मिळवेलच... आणि हे सगळे होत असताना....

शेवटच्या वाक्याच्या वेळेस अर्देशीरांचा स्वर अत्यंत जहरी झालेला होता...

अर्देशीर - हे सगळे होत असताना... अत्यंत नैराश्याच्या भरात... तू 'बझट' खाऊन 'आत्महत्या' करणार आहेस...

आत्महत्या हा शब्द अर्देशीरांनी असा काही उच्चारला होता की ती आत्महत्या नसेल हेच त्यातून सुचित होत होते. रेजिनाल्डो डिसूझा ही व्यक्ती त्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत किरकोळ व्यक्ती होती. त्याच्यासमोर असे काहीतरी बोलून उलट तो घाबरेलच हाच त्यांचा कयास होता.

कुणाचेही काहीही टेन्शन न घेता मोनालिसाने चक्क रेजिनाकडची रॉथमन्स घेतली आणि शिलगावली.

आजवर डॅडचे मित्र म्हणून लोहिया आणि अर्देशीरांसमोर अदबीनेच वागण्याचे संस्कार होते! पण आज तिने ते धुडकावले. जतीनला तर माहीतही नव्हते की ही स्मोकही करते म्हणून!

मोना - मी म्हणजे मोहन गुप्ता वाटले का तुम्हाला??

चरकले! सगळेच चरकले. या मुलीला नेमके काय आणि किती माहीत असावे हे कुणालाच समजत नव्हते.

लोहिया - मोहन गुप्ता असे नव्हते.. ही वॉज अ डिअर फ्रेन्ड ऑफ अवर्स...

मोना - आय नो दॅट व्हेरी वेल लोहिया... आणि तुम्ही या सुबोधच्या आजोळी घरगडी म्हणून राबणार्‍या नोकराचा मुलगा आहात... एका सामान्य घरगड्याचा...

बुब्बुळे डोळ्यातून बाहेर येतील असे वाटावे इतके डोळे विस्फारले होते लोहियांनी! शॉक लागल्यामुळेही आणि रागावल्यामुळेही! कारण्मोनाची लेटेस्ट पिंजोर ट्रीप नेमकी कशासाठी होती हेच कुणाला समजले नव्हते. भर रस्त्यामध्ये गर्दीत उस्तादने दिलेले पोते सिवाच्या माणसाच्या लक्षात आले असले तरी त्यात काय असेल हे कळणे अशक्यच होते. आणि सुदैवाने मोनानेही ते सिवाला सांगीतले नव्हते!

अर्देशीर मात्र जहाल चेहरा करून जमीनीकडे पाहात होते. सुबोध त्याच्या वृत्तीप्रमाणे बाह्या सरसावू लागला होता. जतीन मात्र धक्का बसलेल्या अवस्थेत सगळ्यांकडेच पाहात होता. आणि रेजिना आढ्याकडे पाहात रॉथमन्स ओढत होता.

लोहिया - सो व्हॉट??? सो व्हॉट??? आय हॅव अर्न्ड धिस पोझिशन टूडे...

मोना - काय सांगताय?? खरं वाटेल कुणालातरी... डॅडनी चांगुलपणा आणि भूतदया म्हणून तुम्हाला पार्टनरशिप दिली होती हे मला माहीत आहे... पात्रता नसतानाही...

काही झाले तरी लोहियांनी हेलिक्सचे कामही बरेच केलेले होते. त्यामुळे 'पात्रता नसताना' हा शब्दप्रयोग ऐकून ते स्वतः तर रागाने थिजलेच पण अर्देशीर बोलू लागले.

अर्देशीर - मूर्ख मुली... ज्या व्यक्तीला अजून गिअर्सचे स्पेलिंगही येत नाही तिने रत्नाकरला असे म्हणावे?? तुझ्या बापाने हाकलून दिले असते इथून तुला...

मोना - त्यापेक्षा तुम्हाला हाकलायला हवे होते योग्य वेळी... फिरोज मॉड्यूल काढून अलोकतोडीतर्फे हेलिक्सपेक्षा कमी किंमतीची टेन्डर्स भरल्यावरच.. फारुख ऑटो उभी करेपर्यंत तुम्हाला ठेवले हेच त्यांचे तुमच्यावर उपकार समजायला हवेत तुम्ही... आणि आणखीन एक.. तुम्ही किंवा लोहिया जन्माला आलात तेव्हा आईच्या पोटातून हॉबिंग मशीन घेऊन आलेला नव्हतात.. नंतरच शिकलात सगळं.. उलट माझ्याच डॅडमुळे रोजीरोटी मिळाली... कुत्रेसुद्धा इमानी असतात पण तुम्हाला हॉनेस्टी या शब्दाचे स्पेलिंगही येणार नाही....

सुबोध - माइन्ड यूवर टन्ग मोना... यू आर ऑलरेडी इन सूप.. तुला केव्हाही अटक होऊ शकते याचे सेटिंग केलेले आहे आम्ही सगळ्यांनी... सगळ्यांची हात जोडून माफी मागीतलीस तरच विचार करू त्यावर आम्ही...

सुबोधला अर्देशीरांना कुत्र्यापेक्षाही खालची जागा दिल्याचा भयानक राग आला होता. राग सगळ्यांनाच आला होता पण सुबोधने तो व्यक्त केला. त्याच्या नेहमीच्या भांदकुदळ प्रवृत्तीप्रमाणे...

मोना - बघितलेस रेजिना?? दोन बाप असलेली मुले कशी वागतात ते??

सुबोध - मोनाSSSSSSSS

अर्देशीरांच्या स्विटमध्ये सुबोधची ती कर्कश्श हाक घुमत होती. पण मोना निश्चल होती.

मोना - सुबोध... तू कुणाचा मुलगा आहेस हे तरी तुला माहीत आहे का?? तू आहेस शामताप्रसादांचा मुलगा..

सुबोध - यू रास्कल.. आय नो द ब्लडी हिस्टरी... यू डोन्ट हॅव टू रिपीट इट ओव्हर हिअर... एव्हरीवन नोज दॅट.. तेव्हा तुझा जन्मही झालेला नव्हता..

मोना - तुझाही झाला नसता... तुझा मोठा भाऊ जर व्यवस्थित वागत असता तर तुला जन्माला घालण्याचे पातकही केले नसते त्या आईबापांनी...!!!

सुबोध - हरामखोर मुली... तुझ्या काकूने माझ्या आई वडिलांना मारले...

मोना - माझ्याही आईला मारले.. माझेही वडील मेले असते त्यात... पण वाचले.. कारण तुमच्यासारख्या भिकार्‍यांना जगवायला कुणीतरी पाहिजे ना जगात??? तुझ्या आई वडिलांना मारले म्हणून माझ्या काकूवर चिडतोस?? ती नालायक होतीच! पण मग तू श्रीवास्तव असूनही गुप्ता आडनाव कशाला लावतोस?? त्या शर्वरीबरोबर मालाडच्या हॉटेलमध्ये धिंगाणा घालण्यासाठी मोहन गुप्तांचेच पैसे उडवत होतास ना?? आज गेली कित्येक वर्षे त्यांच्याच कष्टाच्या पैशावर कुत्र्यासारखा जगतोयस तू...

अचानक सुबोध हिंस्त्र आणि विकट हास्य करू लागला. बर्‍याच क्षणांनी थांबल्यानंतर लोहियांना म्हणाला..

सुबोध - लोहिया अंकल.. शी डिझर्व्ह्स टू बी अ‍ॅरेस्टेड... यू प्लीज कॉल दॅट शर्मा... ही विल टेक द अ‍ॅक्शन्स..

मोना - कोण शर्मा???

सुबोध - दिल्लीतील अधिकारी... तो तुला लवकरच आत घेईल..

मोना - अच्छा??? माझ्याकडे त्याला काय सापडणार आहे???..... त्या एका...... लाईफलाईन अ‍ॅम्ब्युलन्सच्या रिसीटशिवाय??

अणूबॉम्ब! ......अणूबॉम्ब फुटला स्विटमध्ये!

लोहिया ताडकन उठून उभे राहिलेले होते. सुबोधचा चेहरा भकास झालेला होता. अर्देशीर थक्क होऊन मोनाकडे पाहात होते. रेजिना आणि जतीनला काही संदर्भच लागत नव्हते. कसली रिसीट अन कसली अ‍ॅम्ब्युलन्स???

हताश होऊन लोहिया खाली बसत होते. मोना निवांत हायलॅन्ड पार्कचा पुढचा घोट घेत होती.

आत आल्यापासून मोना इतकी तोर्‍यात का होती ते आत्ता कुठे सगळ्यांना समजत होते. आणि आपण चांगलेच सापडलेलो आहोत या भावनेने सुबोधला कापरे भरायची वेळ आलेली होती. लोहिया त्याही क्षणी अत्यंत वेगात विचार करत होते.

लोहिया - त्या रिसीटचा काय संबंध??

मोना - लोहिया.. पझेसिंग बझट इज अ टेररिस्ट अ‍ॅक्ट... अ‍ॅन्ड सेलिंग इट???

रेजिना आणि जतीन पुतळ्यासारखे निश्चल होऊन मोनाकडे पाहात होते.

लोहिया - बझट तुझ्याही घरात आहे...

मोना - गड्याचा मुलगा म्हंटल्यावर अक्कल पण तेवढीच असणार...

लोहिया - मोनालिसा.. फार वेळा अक्कल काढलीस.. मुलगी आहेस म्हणून.. नाहीतर गड्याच्या मुलाचा हात कसा बसतो तेही दाखवले असते...

मोना - का?? स्त्रियांवर हात उगारत नाहीस?? इतका पौरुषत्वाचा अभिमान आहे?? मग सायरा??? सायराला का मारलंस?? तुझं पाप वाढत होतं तिच्या पोटात म्ह़णून???

लोहिया - या हॉटेलच्या बाहेर तू जाऊ शकणार नाहीस अशी व्यवस्था केलेली आहे मी...

नक्कीच लोहियांची काही माणसे ग्रीन पार्कमध्ये राहात असणार होती. त्याशिवाय असे विधानच केले नसते त्यांनी! पण आत्ता कुठे रेजिनाचा रोल सुरू होत होता. मोनाला दिलेली धमकी ऐकून त्याला ते सहनच झाले नाही.

रेजिना - मिस्टर लोहिया.. तोंड आहे ना तोंड?? ते सांभाळून बोलायचं.. मोनालिसा एकटी नाही...

रेजिनाची शरीरयष्टी, बेदरकार आवाज आणि राकट आवेश पाहूनच सुबोध हादरलेला होता.

अर्देशीर - डिसूझा... शहाण्या मुलासारखा बाहेर जा बरं?? आपल्याला ज्यातलं काही कळत नाही किंवा ज्या लोकांची आपण नोकरी करतो तिथे बसून अशा सिगारेटी फुंकून त्यांच्याशी वाट्टेल ते बोलू नकोस..

आता रेजिनाचा अपमान मोनाला सहन झाला नाही.. आयुष्यात पहिल्यांदाच तिने अर्देशीर सरांचा उल्लेख अर्देशीर असाच केला..

मोना - अर्देशीर... तुम्ही पण नोकरीच करायचात गुप्तांची... इथे बसायची तुमचीही लायकी नाही आहे...

अर्देशीर अक्षरशः चवताळून उठून उभे राहिले. बोट मोनाकडे दाखवत म्हणाले..

मोना - यू... तू अन तुझा बाप.. मस्ती तुम्हाला दोघांना... फक्त मस्ती.. पैशाची... ती अरेरावीच मला सहन व्हायची नाही.. त्या नालायकाला बोकारोमधल्या लाचखाऊ माणसांनी सांगीतले फिरोज मॉड्यूलच्या एल वन कोटबद्दल! माझे सगळे आयुष्यच संपले... कायम एक नोकर... फक्त एक कामाला ठेवलेला आणि मोठ्या मनाने पार्टनर्शिप देऊ केलेला सामान्य नोकर... अर्देशीर इंजीनीयर... माझी स्वप्ने होती... फिरोज मॉड्यूल हेलिक्सपेक्षाही मोठे करायचे... एम डी व्हायचे.. चेअरमन व्हायचे... सत्ता गाजवायची... आणि हे सगळे व्यवस्थित गिअर्स विकूनच... पण तुझ्या बापाला माझा उत्कर्ष सहन झाला नाही.. त्याने माझ्या स्वप्नांची धुळधाण उडवली.. मी गप्पच होतो... उलट हेलिक्सचाच उत्कर्ष करत होतो... पण त्या माणसाने कायम फिरोज मॉड्यूलच डोक्यात ठेवलेले होते... येता जाता त्यावरून कमेन्ट्स पास करायचा.. मी म्हणजे एक लाफिंग स्टॉक झालेलो होतो... जस्ट अ जोकर.. आणि एवढे करून पुन्हा हेलिक्स सांभाळतच होतो... नंतर फारुख ऑटो काढले.. तेव्हाही गुप्ता बोललाच... याचे फिरोज मॉड्यूल करू नका म्हणून.. तुझ्या बापाची नोकरी करायला मी जन्माला आलेलो नाही... मी मालक आहे मालक.. एम्प्लॉयी नाही...

मोना - खाली बसा... मला सगळं माहीत आहे... फिरोज मॉड्यूल आणि हेलिक्सचे सुरुवातीचे अ‍ॅग्रीमेन्ट मी वाचलेले आहे... तुमच्या खास विनंतीवरून उलट त्या कंपनीसाठी डॅडनी फंडिंगसुद्धा अ‍ॅरेंज केलं! लाईफ टाईम हॉबिंगचे जॉबवर्क मिळेल असा क्लॉजही अ‍ॅक्सेप्ट केलेला होता... विच इज व्हेरी व्हेरी रेअर थिंग टू हॅपन.. जसे शेव्हिंग मशीन्सना डेडिकेट करणारा क्लॉज या नालायक लोहियाने घातला तसा तुमच्या बेनिफिटचा क्लॉज डॅडनी अ‍ॅक्सेप्ट केला होता... पण म्हणतात ना... मांजराला पोत्यात घालून लांब सोडले तरी ते पुन्हा लाळघोटेपणा करत येतेच... आणि कुत्र्याला कितीही लाथा घातल्या तरी पाय चाटतेच.. तशी तुमची वृत्तीच लाळघोटी... नुसती लाळघोटी असती तरी चालले असते... सांभाळले असते तुम्हाला आम्ही... पण त्या उप्पर तुम्ही अप्रामाणिक.. माझ्या वडिलांनी चालू करून दिलेल्या आणि त्या कंपनीला स्वतःच्या कंपनीचे तहहयात कॉन्ट्रॅक्ट दिलेल्या कंपनीत तुम्ही डॅडसारखेच गिअर्स बनवून बोकारोत टेंडर भरलंत! याला म्हणतात अर्देशीर इंजीनीयर! हो की नाही? आं?? रक्तात हेलिक्स आहे म्हणे! रक्तात बेईमानी आहे बेईमानी तुमच्या!वेळ पडली तर स्वतःच्या आईला विकून याल तुम्ही! वय वाढलं पण अक्कल नाही अशी परिस्थिती आहे. आम्हाला पैशाची काहीच मस्ती नाही.. का मस्ती नाही आहे माहीत आहे?? हा लोहिया ज्या घरी काम करायचा त्या बाईचा हा मुलगा सुबोध! या सुबोधला केवळ त्याच्या मानलेल्या वडिलांना दिलेल्या शब्दाखातर डॅडनी आयुष्यभर हेलिक्समध्ये ठेवलं.. हा आहे श्रीवास्तव, नाव लावतो गुप्ता... तरी ठेवल... कारण मस्ती नाही... लोहिया असाच... गड्याचा मुलगा.. रक्तात अशीच बेईमानी... दहा बायकांना नादी लावलं.. पण त्यालाही पार्टनर बनवलं.. कारण पैशाची मस्ती नाही... ऐकायचंय का मस्ती नाही ते??? आं??? मस्ती यासाठी नाही की ते त्यांनी स्वतःच्या बुद्धीचातुर्यावर पांढरा धंदा करून मिळवलेले पैसे आहेत.. म्हणून मस्ती नाही आमच्या रक्तात... स्वतःच्या रक्ताच्या बापाने बनवलेली आणि गव्हर्नमेन्टने बॅन केलेली बझट पाकिस्तानातल्या मुहम्मद आरिफला विकून मिळवलेले पैस नाहीत... आणि ते करणार्‍या मुलाची मदत करून मग मोहन गुप्तांच्या भीतीने ते मिळालेले पैसे लाईफलाईनला देणारी अनैतिक जातकुळ नाही आमची... सायरा... सायराचा मृत्यू मी अजून विसरू शकत नाही... यू ऑल आर गोईन्ग टू पे फॉर ऑल धिस... व्हेरी सून...

होऊ नये ते झाले! अर्देशीरांनी हात उगारला मोनावर! ते करायची इच्छा सगळ्यांनाच होती. पण रेजिनाच्या भीतीने सगळे गप्प होते. पण अर्देशीर महा इगोइस्टिक! त्यांना कसले सहन होणार मोनाचे हे बोलणे?

जोरात उगारलेला त्यांचा हात... खाली मात्र मेंगळटासारखा आला... कारण रेजिनाचे बोट त्यांच्या चेहर्‍याकडे रोखलेले होते...

रेजिना - सांभाळून... वयाचे भान ठेवा.. आणि आम्हालाही ठेवू द्या...

अर्देशीर - तू कोण उपटसुंभ???

रेजिना - मला बोललात तर परिणाम वाईट होतील... डॅनलाईनमध्ये जॉब करणारा माणूस असलो तरीही बाहेरच्या दुनियेतील एक सामर्थ्यवान माणूस आहे मी... यू पी चा गृहराज्यमंत्री माझा क्लासमेट आहे.. जगणे मुश्कील होईल तुमचे... आणि अजून आदर ठेवतोय वयाचा... तोवरच शहाणपण बाणवा अंगी...

परिणाम असा झाला की अर्देशीरांना दम दिल्यामुळे बाकीचेही सगळे हादरले.

मोना - तेव्हा लोहिया... सिम्प्लेक्स वगैरे विकायचा प्लॅन आपण नंतर पाहू... आता आधी हितेशच्या लग्नापर्यंत तुमची बातमी लीक तर होत नाही ना याची काळजी घ्या...

लोहिया - क... कसली बात... मी???

मोना - हितेश आणि मी लहानपणी एकत्र खेळायचो... ते आठवून मी थांबलीय... त्याच लग्न झालं की ती बातमी लीक होईल... एक अतिरेकी कृत्य करणारा माणूस ही तुमची नवी ओळख जगाला पटेल.. एटीस आणि पोलीस या दोन्ही संघटनांना देण्यासाठी सर्व पुराव्यांच्या कॉपीज आणि पत्रे तयार आहेत... ती एका माणसाकडे गुप्तपणे ठेवलेली आहेत... लग्न झालं की ते कागद तो त्यांच्याकडे सुपुर्द करणार आहे...

अचानक लोहिया हसू लागले. ते का हसले ते मोनाला बरोबर समजले...

मोना - अंहं.. इतक्यातच हसू नको लोहिया... तो माणूस म्हणजे सिवा नव्हे... तो कोण आहे ते तुला माहीत नाही...

पायाखालची वाळूच सरकली लोहियांच्या!

मोना - आणि मला कोणत्याही प्रकारची इजा झाली तर त्यानंतरच्या दोन तासात ती सर्व कागदपत्रे योग्य ठिकाणी पोचणार आहेत.. त्यामुळे... मोहन गुप्तांची... म्हणजे आपल्या मालकाची मुलगी व्यवस्थित राहणे.. हे तुमचे सगळ्यांचे आता आद्य कर्तव्य आहे...

अर्देशीर - मोना... मी असला काहीच गुन्हा केलेला नाही... तेव्हा मला असल्या धमक्या देऊ नकोस..

मोना - तुम्हाला काय वाटतं?? जग बिनडोक आहे आणि आपण एकटेच हुषार आहोत?? लोहिया आणि तुम्ही एकत्रच जाणार आहात जेलमध्ये...

अर्देशीर - गाढव मुली... तुझ्या घरात त्याच वस्तू आहेत...

मोना - तुमचं वय पाहून तुम्हाला मी गाढव म्हणणं योग्य होणार नाही... पण ... इतकंच सांगते की नेहमी करता तसा एक फोन इथूनच... शामाला करा....

अर्देशीर चमकले. पण आता अभिनय करणे आवश्यक होते.

अर्देशीर - शामा कोण??

मोना - तुमची मैत्रीण... आमच्याकडे कामाला ठेवलेली बाई...

अर्देशीर - जीभ सांभाळून बोल...

मोना - हो?? मग दिवसातून चार फोन तर करता की तिला...

अर्देशीर - माझा काय संबंध??

मोना - ते तिला इथूनच एक फोन करून विचारा तर खरं...

तब्बल अर्धा मिनिट अर्देशीर स्तब्धपणे मोनाकडे पाहात होते. शेवटी 'शामाशी माझा संबंध नाही' ही भूमिका घेण्यापेक्षा 'नेमके काय झाले आहे ते समजणे' महत्वाचे आहे हे त्यांना पटले आणि त्यांनी फोन ओढला.

अर्देशीर - अर्देशीर बोलतोय...

शामा - ...

अर्देशीर - काय काय झालं तिकडे???

शामा - .....

अर्देशीर - विशेष काय काय झालं???

शामा - .....

अर्देशीर - हं... हं.... ... आणि???

शामा - .....

अर्देशीर - ती पोरगी आहे का???

शामा - .......

अर्देशीर - .. हं... ठीक आहे... एक मिनिट...

अर्देशीरांनी मिश्कील नजरेने मोनाकडे पाहिले...

अर्देशीर - तुला काही विचारायचंय तिला???

मोना - अंहं.. तिला फक्त विचारा की ती माळ लावली का घरात तुमच्या???

संतापातिरेकाने अर्देशीर मोनाकडे बघत होते. क्षणात त्यांनी स्वतःला सावरले आणि फोनवर तो प्रश्न विचारला.. काय उत्तर आले ते कुणालाच समजले नाही... पण जाणवले मात्र खचितच...

अर्देशीरांनी सगळे संपलेले असल्याच्या हताशपणे फोन ठेवून मोनाकडे पाहिले...

अर्देशीर - यू ............... आय... आय विल किल यू...

मोना - त्यासाठी तुम्ही राहिला पाहिजेत ना????

तब्बल पंधरा सेकंद अर्देशीर भग्न नजरेने मोनाकडे पाहात होते. हळूहळू ते शांत झाले. कारण आता त्यांना उपायांचा शोध घ्यायचा होता.

लोहिया मात्र हादरलेले होते...

लोहिया - काय....... काय झालं काय???

अर्देशीर - माझ्या घरात पाठवलीय कसलीतरी लोलकांची माळ पाठवलीय शामाबरोबर... आणि त्या संजयने ती भिंतीवर लावून तिचा फोटो घेतलाय..

लोहिया - मग??

अर्देशीर - अरे मूर्खा.. त्या लोलकांमध्ये बझट असणार हे समजत नाही का तुला???

तो ताण असह्य होऊन सुबोध एकदम उठून मोनाच्या अंगावर धावला... रेजिनाला काहीही समजायच्या आतच त्याने मोनाचा गळा धरला.. पण रेजिनाने त्याला ढकललेच... आणि आश्चर्य म्हणजे जतीननेही त्याला ढकलले..

जतीनकडे पाहातच बसला रेजिना! मोनाला मात्र क्षणभर खरच आपण मरतो की काय असे वाटून गेले होते...

मोना - यू नो समथिंग सुबोध?? यू कॅन बी अ‍ॅरेस्टेड अ‍ॅट धिस मोमेन्ट..

सुबोध घुसमटत्या स्वरात शिव्या देत होता.

लोहिया - तू... तू आमचं आयुष्य उद्ध्वस्त करतीयस....

मोना - ओरडू नका.. तुम्ही काय केले होतेत डॅडचे???

लोहिया - ही डिझर्व्ह्ड टू बी किल्ड...

मोना - सो डू यू... अ‍ॅकॉर्डिन्ग टू मी...

लोहिया - मी म्हणजे कच्चा खिलाडी नाही...

मोना - लोहिया... मुहम्मद आरिफ आजही जिवंत आहे हे तुला माहीत आहे का??

लोहिया - असला तर काय??

मोना - गेलास तू लोहिया... इव्हन इफ यू डोन्ट वॉन्ट टू अ‍ॅक्सेप्ट इट... यू आर गॉन..

शांतता! एक भकास आणि भयाण शांतता स्विटमध्ये उरलेली होती. जो तो आपापल्या परीने विचार करत होता.

आपण नेमके किती खोल रुतलो आहोत याचा प्रत्येक जण अंदाज घेत होता... आज विजय साजरा करणार होते सगळे.. मोना तिच्या स्विटमध्ये निघून गेल्यावर... पण पराजयाचे दु:ख तर राहोच... जीव वाचवायची समस्या उभी ठाकलेली होती... आणि मोना इतकी प्रिपेअर्ड आलेली असेल ही कल्पनाच करू शकत नव्हते कुणी!

हायलॅन्ड पार्क कुणीही घेत नव्हते. मोनाव्यतिरिक्त! ती मात्र भेदक नजर भिंतीवर रोखून अविश्वासाने स्वतःचाच विचार करत होती. आपण हे सगळे करू कसे शकलो???

पाच मिनिटे! अत्यंत असह्य मानसिक अवस्थेत हा अवधी गेल्यानंतर लोहियांना तोंड फुटले. त्यांनी आधी एक मोठा घोट घेतला आणि विजयी नजरेने सगळ्यांकडे पाहिले. मग मिश्कील स्वरात मोनाला म्हणाले..

लोहिया - हे सगळे तू केले आहेस याला पुरावा काय??

मोना - कसला पुरावा??

लोहिया - की एटीस, पोलीस या सगळ्यांकडे फाईल्स पोचतीलच...

मोना - मी कशाला पुरावा देऊ??

लोहिया - म्हणजे तू ते केलेले नाहीच आहेस...

मोना - तसं समज..

लोहिया - नीट बोल... साठीला आलोय मी आता...

मोना - ते तूच लक्षात ठेव... मोलकरणींवर डोळा ठेवताना...

लोहिया - अस?? पाच मिनिटे थांब... नक्षाच उतरवतो तुझा...

लोहियांनी फोन ओढला आणि एक नंबर फिरवला. ०२२ हा आकडा लांबूनही दिसला मोनाला! नक्कीच सिवाशी बोलणार होते ते!

लोहिया - लोहिया हिअर... यू नो आय अ‍ॅम पेयिंग यू फॉर समथिंग?? यू नो समथिंग?? शी हॅज ट्रॅप्ड अस...

सिवा - .............

सिवा मिनिटभर एकटाच बोलत होता. तो बोलत असताना लोहियांचा चेहरा उजळत नव्हता. अधिकाधिक काळवंडत होता..

आणि फोन ठेवल्यावर मात्र त्यांनी मान खाली घातली...

अर्देशीर - कुणाशी बोललास???

लोहिया - अरे गप?? मला मूर्ख म्हणालास तू... आयुष्यभर तुझ्या हरामखोर उपद्व्यापांमध्ये तुझी साथ दिली मी... मी कुणाशीही बोलेन... तुझा संबंधच काय??

अर्देशीर - लोहियाSSSSSS कुणाशी बोलतोयस??

लोहिया - अरे काय कुणाशी बोलतोयस, कुणाशी बोलतोयस?? आहेस काय तू?? त्या मोहनने पाळलेला एक कुत्रा... जो कुत्र्यासारखाही वागू शकत नाही...

अर्देशीर - थोबाड पहिल्यांदा बंद कर...

सुबोध मधे पडला.

सुबोध - अंकल.. तुम्ही आणि सर भांडू नका.. आत्ता परिस्थिती वेगळी आहे..

लोहियांनाही भान आले..

लोहिया - सॉरी अर्देशीर..

अर्देशीरांचा मात्र चेहरा रागाने लालबुंद झालेला होता.

लोहियांनी पेग रिपीट केला आणि उठून खोलीत फेर्‍या मारू लागले. अर्देशीर नुसतेच लोहियांकडे रागाने पाहात होते. रेजिना मिश्कीलपणे रॉथमन्स ओढत होता. जतीन ग्लासवर बोटांनी आवाज करत होता. आणि सुबोध सगळ्यांकडे पाहात होता.

जतीन करत असलेला आवाज असह्य होऊन लोहिया ओरडले..

लोहिया - स्टॉप दॅट नॉन्सेन्स.. इथे काय चाललंय अन तू ग्लास वाजवतोयस बेअक्कल???

आता इतका वेळ शांत असलेला जतीन उसळला... तो इतका भडकतो हे मोनालाही नवीनच होते..

जतीन - काय समजता काय तुम्ही स्वतःला?? स्वतची कातडी वाचवण्यात आणि मामांचा पैसा हडप करण्यात जिंदगी गेली तुमची... समजता काय स्वतःला?? मामांनी ठरवले असते तर शर्टवर बसलेल्या चिलटासारखे नखांनी उडवले असते तुम्हाला.. ते माणुसकीने वागले त्यामुळे तुम्ही आज इथे बसून बोलू तरी शकताय...

लोहिया बघतच बसले.

अचानक त्यांना भान आले की जतीनही सर्व पापांमध्ये सहभागी होताच!

लोहिया - लुक हू इज टॉकिंग?? अर्देशीर?? पाहिलंत???

अर्देशीर - तू माझं नाव घेऊ नकोस.. तुझ्याशी बोलण्याइतका मी खालच्या पातळीचा नाही...

लोहिया - अच्छा??? कुठली पातळी आहे तुझी???

पुन्हा सुबोध मधे पडला...

सुबोध - हे काय चाललंय?? काय चाललंय काय हे??

मोना मात्र मगाचपर्यंत सुबोध हासत होता तशीच अगदी हासली... फस्सकन...

सुबोध ओरडलाच तिच्यावर!

सुबोध - हरामखोर... तुझ्यामुळे झालंय हे सगळं... मी तुला अशीतशी सोडणार नाही...

रेजिना उठून उभा राहिला आणि सुबोधच्या समोर आला..

रेजिना - मोनावर आवाज चढवलेला मला आवडत नाही... काळजी घ्या..

सुबोध - यू मदर फ**

खण्ण!

कळलेच नाही कुणाला काय झाले ते! रेजिनाने सरळ थोबाडात उलट्या हाताची दिली होती सुबोधला! सुबोधच्या चेहर्‍यासमोर संपूर्ण स्विट गरगरत होता.

आता मात्र सगळ्यांनाच भीती बसली. जतीनने उठून रेजिनाला आवरले. रेजिना त्याचा हात झटकून स्वतःच्या जागी येऊन बसला.

स्विटमध्ये भयावह वातावरण तयार झालेले होते. रेजिनाने अत्यंत शांतपणे केलेला तो प्रहार पाहून एक क्षणही मोनाला असे वाटले नाही की रेजिनाने असे करायला नको होते. उलट तिला त्याचा अभिमानच वाटला.

वातावरण निवळल्यावर लोहिया समोर येऊन बसले पुन्हा!

लोहिया - मोना... लेट्स क्लोज द इश्यू...

मोना - म्हणजे??

लोहिया - मी आणि सुबोधने बझट विकून जमाना झालेला आहे... ती केस री ओपन होणे अवघड असले तरी मोहनकडे जे पुरावे तुला सापडले त्यावरून ती केस री ओपन होईल हे मला मान्य आहे... ती री ओपन न होण्यासाठी मी काय करू तेवढे सांग...

मोना - सगळे शेअर्स मला विकायचे...

लोहिया - धिस इज टू मच...

मोना - आय डोन्ट केअर...

लोहिया - ती व्हॅल्यू प्रचंड असेल...

मोना - मला माहीत आहे.. एकोणतीस टक्के म्हणजे कमी नसणारच... पण तुझ्या जीवापेक्षा कमी आहे असे निदान तुला तरी मानायला हवे...

लोहिया - आय अ‍ॅम नॉट लायकिंग धिस 'तू, तुला' टाईप ऑफ कॉन्व्हर्सेशन..

मोना - चॉईस कुठे आहे तुला इतर???

लोहिया - मोनालिसा... एक लक्षात घे... त्या गोळ्या मी एकदा विकल्या हा अपराध होताच.. पण त्याची भरपाई मी लाईफलाईनला सगळे पैसे देऊन केली... आणि त्यानंतर मी हेलिक्स भरभराटीस आणलेली आहे.. तू जे मागत आहेस ते त्यापेक्षा बेसुमार आहे..

मोना - लोहिया... आपण सगळे अंगणवाडीत शिकायला आहोत का???

लोहिया - म्हणजे???

मोना - डॅड कसे गेले ते मला माहीत आहे... फिरोज मॉड्यूल माहीत आहे.. शेव्हिंग मशीन्स माहीत आहेत.. फारुख ऑटोबरोबरचे अ‍ॅग्रीमेन्ट माहीत आहे... त्यांना जागा कुणी दिली ते माहीत आहे.. तू सिवाला पे करतोस ते माहीत आहे.. डॅनलाईन तुम्हाला चोरायचे होते ते माहीत आहे... 'सेल'कडून पत्र पाठवलंत हे माहीत आहे... असे असताना मी तुला मागतीय ती किंमत फार म्हणजे फारच कमी आहे..

पुन्हा लोहिया वाघासारख्या फेर्‍या मारू लागले.

अर्देशीर आता टुकूटुकू लोहियांकडे बघत होते. कारण लोहियांकडे द्यायला निदान शेअर्स तरी होते. त्यांच्याकडे काहीच नसल्यामुळे त्यांचा सगळा हवाला मोनाच्या मनात चांगुलपणा उरला आहे की नाही यावर होता!

दहा मिनिटांनी लोहिया पुन्हा समोर बसले.

लोहिया - अ‍ॅग्रीड... मार्केट रेटने जी काय व्हॅल्यू असेल ती फायनल करू... शेअर्स देऊन टाकतो..

मोना - मी शेअर दलाल वाटले का तुला???

लोहिया - म्हणजे??

मोना - मी खरेदी करत नाही आहे शेअर्स.. यू जस्ट हॅव तू ट्रान्स्फर देम इन व्हेरियस नेम्स दॅट आय विल टेल यू...

लोहिया ओरडलेच एकदम! अगदी कफल्लक व्हायची वेळ येणार नव्हती. पण दहा हजारांपैकी नऊ हजार पाचशे गेल्यावर कसे वाटेल तसे वाटत होते. पथेजांनी त्यांची मुलगी हितेशला देताना लोहियांची श्रीमंती पाहिलेली होती. पण ती सासरी येईपर्यंत श्रीमंतीला कितीतरी मोठे भगदाड पडलेले असणार होते..

पण जतीनने लोहियांना शांत केले... पहाटेचे दोन वाजलेले होते... ग्रीन पार्कचा हा एकच स्विट जागा असावा...

लोहिया - मोना... माझी आयुष्यभरची कमाई तू घेत आहेस... पण त्या बदल्यात ती केस क्लोज होणार आहे.. या एकाच गोष्टीसाठी मी ते करायला तयार आहे..

मोना - कधी????

लोहिया - कधी म्हणजे??

मोना - आज गुरुवार आहे.. पुढच्या गुरुवारी मला ही गोष्ट पेंडिंग असलेली चालणार नाही...

लोहिया - अशी भाषा मोहनही वापरायचे नाहीत कधी....

मोना - ते नंतर बघू.. आधी कन्फर्म कर...

लोहिया - ठीक आहे.. अर्देशीर.. यू अल्सो हॅव टू पे..

अर्देशीर - तू तुझे बघ आधी.. मी आणि मोना बोलू नंतर...

मोना - नंतर बिंतर काहीही नाही.. मला कमिटमेन्ट्स आत्ता हव्या आहेत...

अर्देशीर - कसली कमिटमेन्ट??

मोना - फारुखचे शेअर्स मला हवे आहेत..

अर्देशीर - डोकं ठिकाणावर आहे का??

मोना - जगायचंय का गजाआड जायचंय??

अर्देशीर - त्या केसमधून मी स्वतःला सहीसलामत वाचवू शकतो पोरी...

मोना - ठीक आहे.. मग मी सांगून टाकते.. बझटचा फॉर्म्युला तुमच्याकडे आहे म्हणून..

सुबोधच उभा राहिला ताडकन... लोहिया डोळे फाडून बघत होते.. जे शोधण्यासाठी ते कित्येक वर्षे जीवाचे रान करत होते ते मोनाने अलगद अर्देशीरांच्या घरात पोचवलेले होते...

अर्देशीर - विल एनीवन बिलीव्ह?? साधे लोलक आहेत ते...

मोना - तुम्हाला काय करायचंय?? तुम्ही सहीसलामत वाचणारच आहात त्यातून...

सुबोधने विचारलेच मात्र...!

सुबोध - तो फॉर्म्युला आहे???

मोना - होय... तुझ्या मोठ्या भावानेच दिला.... रणजीत...

सुबोध - त्या लोलकांमध्ये कागद आहेत??

मोना - तुझ्या बापाने काय रहस्य वापरले फॉर्म्युला जपायला ते तुझ्या टाळक्यात शिरणार नाही.. मी मात्र ते सहज सिद्ध करू शकते...

अर्देशीर - आय विल नॉट गिव्ह अ पेनी..

मोना - गो टू हेल.. सुबोध.. तुझे काय??

सुबोध - म्हणजे???

मोना - मला तुझ्याकडून एक कोटी रुपये हवेत..

सुबोध - वेड लागले का?? माझ्या सात पिढ्यांमध्ये असा पैसा कमवला नाही कुणी...

मोना - ते तू बघ.. एक कोटी दिलेस तर वाचशील.. कॅश.. मी सांगेन त्या माणसाला..

सुबोध - लोहिया अंकल.. काय बोलते ही... ????

मोना - ते काय उत्तर देणार?? कंगाल झालेत ते..

लोहिया - सुबोध.. तुझी लायकी नसेल एक कोटी द्यायची तर अटक करून घे स्वतःला..

सुबोध - भिकारच्योत साला.. माझ्या आजीकडे फरशी पुसायचा...

लोहिया - त्याला जमाना झालाय...

सुबोध - जतीन...

जतीन - सॉरी...

सुबोध - .... सर...

अर्देशीर - तुला एक कोटी देऊन मी मला पकडून घेऊ काय??

सुबोध - म्हणजे??

अर्देशीर - तू विकतोस बझट.. अन मी तुला पैसे दिले की मीही संपलो...

सुबोध - हरामखोर आहात सगळे... मोना..

मोना - बरोबर... सगळे हरामखोर आहेत... मी तुला कर्जाऊ एक कोटी द्यायला तयार आहे... पण एक अट आहे...

सुबोध - मला मान्य आहे अट..

मोना - ओके... मग देईन...

सुबोध - अट काय आहे??

मोना - मान्य केलीस की आधीच??

सुबोध - हो पण काय अट आहे??

मोना - दोन खून करायचे...

सुबोध - त्यापेक्षा केस कर...

मोना - ओके... हे अधिक सोपे आहे माझ्यासाठी...

सुबोध - कुणाचे खून??

मोना - जगमोहन आणि सिवा...

सुबोध - किती दिवसात??

मोना - दोन महिन्यात...

सुबोध - जास्त वेळ लागला तर??

मोना - दुर्दैव तुझं..

सुबोध - गेलं खड्यात.. तू कर केस.. मी बघतो काय करायचं ते..

मोना - बेटर... जतीन.. तू???

चमकलाच जतीन!

जतीन - ... काय??

मोना - तू काय देऊ शकतोस मला??

जतीन - मोना?? आर यू मॅड?? अगं मी काय केलंय???

मोना - डॅडची बॉडी मॉर्च्युरीमधे ठेवून तुम्ही चौघे पुन्हा बंगल्यावर येऊन दारू पीत होतात.. तेव्हा एकदा तू हासलास ... सायराने सांगीतले आहे मला...

जतीन - स्टुप्पिड यू आर अ‍ॅन्ड दॅट सायरा...

मोना - ठीक आहे.. सो 'जन्टलमेन'?? लोहिया कंगाल व्हायला तयार आहेत.. बाकीच्यांना केस झाली तरी चालणार आहेच..

लोहिया मी एक पैसा देणार नाही..

मोना - का म्हणे??

लोहिया - यांच्यावर केस लावल्यावर मी ओढला जाणारच ना??

मोना - ओक्के.. ठीक आहे.. मग सगळेच फेस करा सर्कम्स्टन्सेस.. आय अ‍ॅम लिव्हिंग नाऊ..

दारापर्यंत गेलेली मोना पुन्हा मागे वळली.

मोना - फॉर यूअर इन्फर्मेशन 'जन्टलमेन'... ही केस अजून खूप लांब आहे अशा भ्रमात राहू नका.. मी आत्ताच माझ्या स्विटवर गेल्यावर काही कॉल्स करणार आहे... कदाचित ग्रीन पार्क ही तुम्ही स्वतंत्रपणे पाहिलेली शेवटची जागा असू शकेल..

आत्ता अर्देशीर खडबडून जागे झाले..

अर्देशीर - बेटा?? अगं काय करतेस हे?? आं?? आम्ही कुणीच नाही तुझे??

मोना - तोंड बंद कर म्हातार्‍या... मोहन गुप्तांना बझट गिळायला लावताना ते आणि मी तुझी कुणीच नव्हते का??

लोहिया एकदम तरतरून उठले.

लोहिया - थांब.. थांब.. तू ही केस करू नकोस... आय विल डू व्हॉट यू डिमान्ड..

मोना - ती वेळ गेली आता..

लोहिया - नाही.. मी शेअर्स ट्रान्स्फर करेनच.. वर या सुबोधसाठीचे एक कोटीपण देतो..

मोना - आणि त्या म्हातार्‍याचे??

अर्देशीर - कॅन यू स्टॉप फॉर हेवन्स सेक कॉलिंग मी लाईक दॅट ???

मोना - शट अप अर्देशीर..

लोहिया - काय? अर्देशीरचे काय??

मोना - ते काहीच देत नाही आहेत..

लोहिया - आहे काय त्याच्याकडे द्यायला?? भिकारी केलायस त्याला आधीच..

मोना - भिकारी होताच तो...

अर्देशीर - आय विल किल यू...

मोना - डेअर डू दॅट.. लोहिया.. फारुख ऑटो ही कंपनी हेलिक्समध्ये मिसळण्याची प्रक्रिया दिड महिन्यात वेग पकडायला पाहिजे.. आणि मी फक्त तीन महिने थांबेन केस करण्याची...

अर्देशीर - गो टू हेल..

लोहिया - अर्देशीर... अक्कल वापर... ती जे म्हणतीय ते ती करेल... महामूर्ख बाई आहे ती.. ती नक्की करेल म्हणतीय तसं... आणि तुझ्यामुळे मी जाईन आत.. तू येशीलच म्हणा..

अर्देशीर - लोहिया.. आय विल किल यू टू...

लोहिया - आधी स्वतःला वाचव भिकारड्या.. ते शेअर्स तरी ट्रान्स्फर कर नाहीतर कायद्याने प्रोसेस तरी चालू कर...

अर्देशीर - मी मेलो तरी ते करणार नाही..

लोहिया - तुझ्या हट्टीपणामुळे मी अडकतोय..

अर्देशीर - तुझी लायकीच ती आहे...

लोहिया - तुझी तितकीही लायकी नाहीये..

अर्देशीर - माझा बझटशी संबंधच नाही आहे..

सुबोध चवताळला..

सुबोध - संबंध नाही आहे??? त्या शामाला मोहनचाचांच्या कोणत्या ड्रिन्कमध्ये बझट मिसळायची हे तूच सांगीतलंस ना??

मोना किंचाळून अर्देशीरांकडे धावली. तिला रेजिनाने आवरले. अर्देशीर मोनाचा तो अवतार पाहून गर्भगळीत झालेले होते. मात्र आता मोना डॅडच्या मृत्यूचे रहस्य समजल्यामुळे ओक्साबोक्शी रडू लागली. तब्बल पाच मिनिटांनी सुबोधकडे वळून म्हणाली..

मोना - तू नुसता या नालायक अर्देशीरवर केस करशील का?? डॅडला मारल्याची?? आणि साक्ष देशील?? मी तुला वाचवेन...

सुबोध - नक्की मोना.. अगदी नक्की...शामाही मदत करेल.. इतकेच काय... गोरे आणि शर्वरीही..

अर्देशीर - यू बॅस्टर्ड्स...

सुबोध - शिवी दिलीस तर जीभ हासडेन म्हातार्‍या..

सुबोध आणि अर्देशीरांमध्ये किंचित झटापट झाली. काय दृष्य होते ते! स्वतःवर आले की हीच पॉलिश्ड माणसे किती उघडीनागडी होतात हे दिसत होते. ती झटापट जतीनने आवरली.

लोहिया - सुबोध.. तुला अक्कल आहे का?? तो फोटो पुरावा म्हणून दिल्यानंतर तुला ती वाचवूच कशी शकेल??

मोना - लोहिया.. फोटो हा एकच पुरावा नाही आहे.. तुझे पत्र आहे.. त्या पत्रात तू सुबोधला भरीला पाडल्याचा उल्लेख आहे.. फोटो मी सबमिटच केला नाही तर... ???

सुबोध लोहियांकडे बघत हसत म्हणाला..

सुबोध - एकटाच अडकतोयस थेरड्या तू... मला मधे घेऊ नकोस..

लोहियांनी सुबोधच्या अंगावर हात उगारला. सुबोधने तो वर धरला आणि त्यांना ढकलून दिले. दारू आधीच जास्त झालेली! त्यात ढकलले गेल्यावर लोहिया मागे पडले. जतीनने त्यांना उठवले.

लोहिया - गाढवाच्या **त गेलात तुम्ही सगळे जण.. माझं मी बघणार.. तुम्ही मरा..

हे वाक्य ते चुकून त्यांना सावरणार्‍या जतीनकडेच बघून बोलले. आता जतीनने दिले त्यांन ढकलून! पण यावेळेस ते स्वतःच्याच खुर्चीवर कोसळले आणि बसले.

अर्देशीर - लोहिया... तू आणि मी मिळून या सुबोधला अडकवू... मोना.. मी तुला शेअर्स द्यायला तयार आहे.. तसली केस करू नकोस..

मोना - माझ्या डॅडचा मृत्यू म्हणजे काय चेष्टा वाटली??

अर्देशीर - पण तो सिद्धच होणार नाही ...

मोना - सायराची टेप आहे माझ्याकडे... त्यात सगळे सांगीतलेले आहे तिने..

अर्देशीरांनी एक किंचाळी फोडली आणि ते हताश होऊन खुर्चीवर बसून रडू लागले..

सुबोधचा तोल गेलेला होता. याक्षणी रडणारा हा म्हातारा मगाचच्या क्षणी आपल्यालाच अडकवायला बघत होता हे आठवल्यावर त्याने बसलेल्याच अर्देशीरांना बुकलायला सुरुवात केली. ग्रीन पार्कचा स्टाफ येऊन गोंधळ होऊ नये म्हणून रेजिनाने त्याला धरून ठेवले.

जतीनला कंठ फुटला..

जतीन - मोनी... सायराची टेप आहे तर तू इतके दिवस का गप्प बसली होतीस??

अर्देशीरांना आशेचा किरण दिसला.. किलकिल्या डोळ्यांनी त्यांनी मोनाकडे पाहिले बसूनच!

मोना - का?? तुला फासावर जायची घाई आहे?? तेव्हा मला सुबोध हा गुप्ता नाहीच आहे हे माहीतच नव्हते..

हे खरे तर अत्यंत असंबद्ध विधान होते. सुबोध हा माणूस 'गुप्ता' असला काय अन नसला काय! त्याचा सायराच्या टेपशी संबंधच नव्हता. पण आत्ता ते समजलेच नाही कुणाला! अर्देशीरांचा मात्र जीव टांगणीला लागल्यामुळे त्यांनी आशेने विचारले..

अर्देशीर - मग तुला सांगीतले कुणी ते??

जणू ते सांगणार्‍यानेच गुन्हा केला होता आणि अर्देशीर त्याच्यावर सूडच उगवणार होते.

मोना - हा लोहिया म्हणाला मला एक दिवस.... की सुबोधचे खरे आडनाव श्रीवास्तव आहे..

आता रेजिनाच्या हातातून सुटका करून घेऊन भडकलेला सुबोध लोहियांच्या अंगावर धावला. पुन्हा धरपकड झाली पण तोवर लोहियांनी दोन फटके खाल्लेले होतेच!

लोहिया - एक मिनिट... एक मिनिट.. .. ए.. ए अरे थांब.. एक मिनिट... एक मिनिट.. थांब.. हा सुबोध श्रीवास्तव आहे याचा सायराच्या टेपशी संबंध काय???

मोना - त्याशिवाय मला कसे कळणार की डॅडना मारण्यासाठी अर्देशीरने बझट कुठून मिळवली??

घोळ करून ठेवला होता मोनाने! सगळे नुसते एकमेकांकडे पाहातच बसलेले होते. आत्ता या क्षणीतर रेजिनालाही काही समजेनासे झालेले होते. तो आपला एक दुसर्‍याच्या अंगावर धावला की त्याला धरणे एवढेच करत होता.

लोहिया - सुबोध.. मी या नालायक मुलीला कधीही सांगीतलेले नाही आहे की तू गुप्ता नाहीस.. मूर्खा.. मीच नाही का अडकणार त्यात??

आता बिनडोकासारखा सुबोध मोनाकडे पाहू लागला..

मोना - अच्छा... आज तुम्ही सुबोधशी प्रामाणिक होताय वाटतं.. आणि तेव्हा काय म्हणाले?? डॅनलाईन आपण दोघेच हॅन्डल करू... अर्देशीर नालायक आहे.. आणि सुबोध आणि जतीनला काहीतरी कारणावरून हाकलून दे...

आता लोहिया ऑफ झाले..

लोहिया - वाट्टेल ते बोलतीय... वाट्टेल ते बोलतीय ही..

तेवढ्यात जतीन बरळला..

जतीन - माझा माझ्या बहिणीवर विश्वास आहे...

लोहिया - तुझा विश्वास खड्यात गेला..

अर्देशीर आता उठून उभे राहिले होते. त्यांना 'नक्की कोण अडकणार आहे' हेच समजेनासे झालेले होते.

अर्देशीर - लोहिया... यू टू... ???

लोहिया - अरे काय यू टू यू टू?? हितेशची शप्पथ... ही काहीही बोलतीय..

मोना - टेप केलंय मी बोलणं तुझं नालायका..

हे 'टेप' प्रकरण आत्ता तिने उगाचच फेकले. पण परिणाम व्हायचा तोच झाला. प्रत्येकाची अफाट दारू झालेली. अत्यंत ताण आलेला मनावर! आणि त्यात एकेकाचा असली चेहरा आजच कळतोय असं वाटायला लागलेलं! सुबोध व्हायोलन्ट माणूस होता. त्याने लोहियांना पुन्हा ढकलले..

विवेकबुद्धी मगाशीच नाहीशी झालेली होती सगळ्यांची! आता कुणीही कुणालाही शिवीगाळ करू लागलेले होते. काय चाललंय तेच कुणाला समजत नव्हतं!

मोनाशिवाय!

लोहिया - काय टेप केलंय?? कुठे आहे टेप??

सुबोध - हरामी म्हातार्‍या... माझ्या आजोळी नोकर होतास तू...

अर्देशीर - तू गप्प बस... तू श्रीवास्तव आहेस हे कळल्यामुळे तिला समजले की मी ती गोळी घातली ड्रिन्कमध्ये.. तू काय लोहियाला नोकर म्हणतोयस..

अर्देशीर लोहियांच्या बाजूने बोलले तर लोहिया त्यांच्यावरच उसळले..

लोहिया - तू थोबाड बंद कर... तू खून केलायस...

जतीन - मोनी... दिज गाईज आर ऑल बॅस्टर्ड्स..

खण्ण!

सुबोधने आता जतीनला प्रसाद दिलेला होता. अजून ग्रीन पार्कमधल्या कुणी तक्रार कशी केली नाही याचेच रेजिनाला आश्चर्य वाटत होते. मोना मात्र अत्यंत गंभीर चेहरा धारण करून गंमत बघत होती.

शेवटी रेजिना ओरडला तसे सगळे थांबले..

मोना - सो... ऑल ऑफ यू आर गोइन्ग टू बी अ‍ॅरेस्टेड.. सून...

ताडताड पावले टाकत मोना जेव्हा स्विटच्या बाहेर चालली होती तेव्हा तिच्या मागोमाग जाणार्‍या रेजिनाला तिच्या डोळ्यातले अश्रू दिसलेच नव्हते.... ते अश्रू होते.. डॅड कसे मेले हे कळल्यामुळे आलेले..

=============================================

भोसरी एम आय डी सी मध्ये गुप्ता हेलिक्स दिमाखात उभी आहे.. आजही... आता मात्र मोहन गुप्तांचा आत्मा खरोखरच आशीर्वाद देत हासतो आहे आपल्या मुलीकडे बघून...

वर्ष लोटले त्या प्रकाराला.. !

खरोखरच केसेस री ओपन केल्या मोनाने! प्रचंड पैसा आणि प्रभाव वापरले तिने... हितेश आणि त्याच्याबायकोचे शत्रूत्व पत्करावे लागले.. पण ते तिने सहज सोसले.. रावी ही तिची मैत्रीण तिला दुरावली.. पण तेही अ‍ॅफोर्डेबलच होते..

परिणाम अगदी हवा तसा झाला नसला तरी चांडाळ चौकडी उद्ध्वस्त मात्र झाली...

अर्देशीरांवरचा एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही... पण मर्डर केसमध्ये नाव गोवले गेल्याचा ठपका मात्र बसला... फारुख ऑटोचे निम्मे शेअर्स त्यांनी मोनाच्या नावे केलेले होते.. त्याचा टॅक्सच प्रचंड गेला.. पण मोनाला त्याची चिंताच नव्हती... कारण आता जडेजा समोर उभे राहून रिपोर्ट करायचे तिला..

लोहिया मात्र जबरदस्त अडकले.. त्यांचे प्रकरण गाजलेच.. अर्थात.. शासनदरबारी सगळ्या गोष्टी हळूहळू हालतात ... त्यामुळे ते नुसतेच अडकले.. मात्र.. त्यांचे सर्व शेअर्स मिळाल्यामुळे मोनालिसा ही अनभिषिक्त सम्राज्ञी झाली हेलिक्सची.. अर्थात.. लोहियांची केस अजून चालूच होती.. आणि त्यातील दोन इतर मुख्य आरोपी होते सिवा आणि सुबोध..

सुबोध मात्र खचलेला होता.. शर्वरीची साथही नव्हती आता.. पैसेही नव्हते... लोहियांच्या मनात औदार्य आले तर त्यांनी देऊ केलेल्या आणि त्यातही त्यांचाच स्वार्थ असल्यामुळे देऊ केलेल्या टिचभर पैशांवर तो कसाबसा लढत होता एक वकील ठेवून..

जतीनचे अर्थातच मोहन गुप्तांच्या मर्डर केसमध्ये अडकला सगळ्यांप्रमाणेच.. पण मुळात अर्देशीरच सुटले तसे इतरही सगळे सुटले...

पण कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने आता त्या सर्वांचे स्थान एक संशयीत गुन्हेगार असेच होते...

या रपाट्यात जगमोहनची नोकरी गेली..

अर्देशीरांविरुद्धच्या केसमध्ये सायराची टेप आणि शामाची साक्ष महत्वाच्या ठरल्या असत्या.. पण त्या तशा सिद्धच झाल्या नाहीत..मोहन गुप्तांच्या बॉडीचे पोस्ट मॉर्टेम केले नाही म्हणून डॉ. पटवर्धनही अडकले.. पण नंतर तेही सुटले... मोनाने त्यांना मात्र आर्थिक मदत केली...

या गडबडीत इन्टर ट्रॅक्टर आणि डॅनलाईन या दोन्ही आघाड्यांवर रिकोच लढत होता... पण यशस्वीपणे लढत होता..

आणि हेलिक्सकडे जेव्हा मोनाचे लक्ष नसेल तेव्हा मेहरा आणि जोशी बघत होते सगळे..

आणि ... एवढे सगळे विजय मिळूनही... मोना एकटीच राहिली होती.. रेजिना होताच.. पण..

.... पण मोहन गुप्ता नव्हते.. डॅड नव्हते...तिचं कौतुक करायला..

... आणि आत्ताही सकाळि जाग आल्यानंतर नेहमीच्या सवयीप्रमाणे मोनालिसाने कपाटातून डॅडचा हासरा फोटो काढला.. त्यांच्या गालांवर ओठ टेकवले.. आणि त्यांच्या डोळ्यातील भाव पाहिले..

नक्कीच... नक्कीच मिस एम एम गुप्तांना पाहून डॅड म्हणत होते...

"गुड मॉर्निंग मॅडम"

गुलमोहर: 

मस्त

सुन्दर. खुप आवडलि. आत्ता सुन्न झालय. थोड्या वेळानी सविस्तर प्रतिक्रिया देते.
या वेळि पुढ्च्या कदंबरीची announcement
न दिसल्यानि मात्र चुकल्या चुकल्या सरख वाटतय
-शिरीन

अप्रतिम बेफिकीर,

अत्यंत ऊत्क्रूष्ट कादंबरी. मनापासुन आवडली.

पूढची कादंबरीची घोषणा वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती. कधी पुर्ण होणार.

अप्रतिम ... सुरेख .. खुपच भान्नत ...... हि कदम्बरि वचुन मला वातल कि मि मोनलिसा अस्स्ते तर ....

बेफिकीरजी, मस्त कादंबरी Happy
नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावरची कादंबरी असुन खूप छान रंगवलीत...
नविन कादंबरीची सुरवात लवकरच कराल अशी अपेक्षा...

ह्म्म्म मला आवडली ही कादंबरी... बिझीनेस मधले चढ उतार असल्यामुळे जास्त आवडली.. काही ठिकाणी अतिरंजित वाटली थोडी, पण बिझीनेस पॉलीटिक्स मध्ये ते सहज खपून जाते. शेवट मात्र मस्त... वेगळा आणि टचिंग... नेहमीसारखा ऑफीसातला कोणीतरी "गुड मॉर्निंग मॅडम" म्हणतो तर ते एवढं स्पर्षून गेलं नसतं.. पुन्हा एकदा बाप-मुलीचं हळवं रिलेशन प्रभावीपणे मांडलं... छान!

मस्त.. अप्रतिम.. बेफिकिरजी..........
बाप नंतर ही कादंबरी छान वाटली.
पुढच्या कांदबरीसाठी खुप खुप शुभेछा !!!

सगळे भाग वाचलेत. बरी वाटली. रोज टाईमपास चांगला व्हायचा. २१ भागांनंतर एकदातरी प्रतिसाद दिला पाहिजेच ना.. पुढची कादंबरी केव्हा सुरू करताय?

ओहो................ बेफिकिरजि तुम्हि ग्रेट आहात, माझ्या कडुन Standing ovation तुम्हाला. अगदि खर खुर, प्रत्यक्षातल, मला खरच कळाल नाहि माझ्याहि नकळत मि कधि ऊठुन ऊभा राहिलो हे. ह्या पुढे काय लिहु.
आजचा भाग वाचतांना आंगावर काटा आला, कधि भितिने, कधि ऊत्क्ठेने. काय लिहिलत राव तुम्हि आज... मोना ने टाकलेलि गेम तर मस्तच होति, जमलेले शिकारिच एकमेकांचेच लचके तोडत आहेत हे पाहुन तर, काय कोतुक वाटल पोरिच........... मोना ने ओपन केलेला एक एक पत्त्ता भावला, ति अचुक वेळ हि भावलि. हि कादंबरी मला अगदि प्रचंड आवडलि. ह्या कादंबरिचि प्रिटेड व्हर्जन मला हवे आहे(नक्कि.. प्लिज..), कोणताहि प्रकाशक हसत तयार होईल. आणि खरच एक अप्रतिम कथा आहे, आणि तेवधिच अप्रतिम मालिका ह्या कथानकावर चित्रित होई शकते, लोकांचा प्रतिसादाचा अंदाज मि हा आत्त्ताच सांगु शकतो, चित्रपट नाहि म्हणु श्कत कारण कि, कथानक मोठे आहे(३ तासांत मावणार नाहि, आणि कत्रि लावलि तर मजा येणार नाहि).

राजे................. त्रिवार मुजरा.

शब्दच नाहीत.. यू आर ग्रेट Happy
आतापर्यंतची सर्वात आवडलेली कादंबरी
पुढच्या कांदबरीसाठी खूप खूप शुभेच्छा

सर्वांचा आभारी आहे.

अनघा मीरा - तसा काही आग्रह नाही. आपण नुसते वाचलेत किंवा नाही वाचलेत तरी चालेल. मला वाइट वाटणार नाही.

-'बेफिकीर'!

कथा आवडली, नाही आवडली, संदर्भ चुकल्यासारखे वाटले तर जरूर कळवावेत! >>>>>
ह्यासाठी कळवले.. Happy तुम्ही एवढ पानेच्या पाने लिहीलत, तर २ ओळी लिहणे काय हो कठिण.. माझ्या मनानेच मी दिलाय प्रतिसाद, अन एकेका भागानंतर केवळ कंटाळा म्हणून प्रतिक्रिया देत नसे. असो. अजुन मला काही स्पष्टीकरण नाही द्यायचेय की का प्रतिसाद दिलाय तो..
अन हे सगळं मी अर्थातच सरळपणे लिहीलय..

तसं नाही हो! हा तुमचा प्रतिसाद पहा...

सगळे भाग वाचलेत. बरी वाटली. रोज टाईमपास चांगला व्हायचा. २१ भागांनंतर एकदातरी प्रतिसाद दिला पाहिजेच ना>>>>

२१ भागानंतर एकदा तरी प्रतिसाद दिला पाहिजेच - या बाबत माझे असे म्हणणे आहे की तसा माझा आग्रह नाही. आपण आता ही चर्चा इथेच थांबवूयात. तुम्ही उपरोधिकपणे म्हणालात असे मला मुळीच म्हणायचे नाही. मला इतकेच म्हणायचे आहे की 'इतकं इतकं लिखाण केल्यावर तरी प्रतिसाद द्यायलाच पाहिजे' असे काहीच नसते, हे तुम्हालाही ठाऊक असणारच!

-'बेफिकीर'!

सही, शेवटचा भाग पर्फेक्टच वाटला, वाचण्याआगोदर विचार केलेला की मोना किंवा ईतर कोणावर तरी बझटचा वापर होणार आणि.... पण त्यातल काही न होता,.... सर्व लेख सही smileyvault-cute-big-smiley-animated-023.gif

बेफिकिर,
थोड्या शंका,
लोहिया २९% भगिदार होते तर त्यांचा हेलिक्स बुडवण्या मागे खुन वगिरे करण्या एवढ motivation काय होत ते मला नीटस कळल नाहि. अर्देशीर च कळाल.

सिवा नक्कि कुठ्ल्या point la आणि का दुसर्या बाजुला समिल झाला ते clear nahi zala. What did he talk to lohiya on phone in climax ते अम्हाला कळलच नाहि.

मोना नि ते ४ फोने नक्कि कुणाला केले आणि काय बोलण झाल ते पण अम्हाला कळलच नाहि Sad

बर त्या जतिन ला मुळात opposition ला जायला कय कारण होत?

आणि climax च्या meeting ला रेजिना ला या लोकानि काय बुवा येउ दिल?

-शिरीन

सॉरी शिरीन,

अनेक चुका असाव्यात! क्षमस्व!

पुन्हा एकदा तपासून बघतो.

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

Pages