लंडन शहरात २ आठवडे किन्वा ३ महिने रहाण्याची सोय!

Submitted by जाईजुई on 10 December, 2010 - 02:42

ह्या रविवारी मी लेक आणि नवर्‍यासह लंडनला येत आहे.

नवर्‍याचे ऑफिस "बँक" येथे आहे.

मला अजुन प्रोजेक्ट नाही आणि म्हणून सध्या निश्चित लोकेशन नाहीये. ख्रिस्मस असल्याने ऑफिसच्या एजंट्सचा प्रतिसाद थंड आहे.

सध्या झोन ३ मध्ये सर्व्हिस अपार्टमेन्ट शोधतेय ७० पाऊंडपर्यन्त २ आठवड्यान्साठी. तोपर्यंत बहुदा माझे लोकेशन कळेल किन्वा प्रोजेक्ट मिळणार नसेल तरी कळेल. म्हणजे लंडनच्या आसपास ३ - ४ महिन्यांसाठी घर शोधेन.

१. तात्पुरती सोय ह्या दृष्टीने काही सल्ले?
२. ३ - ४ महिने ह्या दृष्टीने काही सल्ले?

वेळ कमी आहे नि सोय अजुन झाली नाहीये. त्यामुळे प्रत्येक सल्ल्याचे स्वागत आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाईजुई,

ईथे जास्त लिहीत नाही. मला ईमेल करा. मी सध्या लंडन जवळच राहतो. पण लंडन मध्ये नाही.
मी माझा फोन नंबर देईन. शक्यतोवर होईल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीन.

अगदी गेल्या गेल्या कुठे रहायचे असा प्रश्न आला घर भाड्याने मिळेपर्यंत तर YMCA होस्टेल हा त्यातल्या त्यात स्वस्त पर्याय आहे. मी राहीलेल्या त्यांच्या होस्टेलला जवळपास सगळा स्टाफ आणि नाष्टा- जेवण सुद्धा भारतीय होते.

YMCA होस्टेल ला साधारण GBP ६५-७० च्या दरम्यान आकारतात , नाष्टा आणि रात्रीचे जेवणासहीत.

प्रफुल्ल,

तुम्हाला संपर्क केला आहे. कृपया मेल पहाल काय?

सध्या मी साऊथ॑क्वे येथे सर्व्हिस अपार्टमेन्ट बुक केले आहे. परन्तु नाताळचे दर अव्वाच्या सव्वा आहेत Sad

जाईजुई, बर्‍याच उशीरा हा धागा पाहिला.
घराची व्यवस्था झाली का? नसेल तर कळवा.. माझ्या एक दोन लंडनमधल्या मैत्रिणी आपापल्या घरातली एकेक खोली काही आठवड्यांसाठी भाड्याने देत असतात तिथे सोय होऊ शकेल.

जाईजुई

मी तुम्हाला लगेच ईमेल केला होता (capgemini ID ). पण तुमचा नंतर काहीच प्रतिसाद आला नाही.
तुम्ही मला prafullashimpi@yahoo.co.in ह्या आय डी वर परत ईमेल करा अथवा तुमचा भ्रमणध्वनी (मोबाईल) नंबर द्या. मी तुमच्याशी संपर्क करतो.

ज्या भागात तुम्ही सध्या राहत आहात, तो खुप महागडा भाग आहे.

hello,
mala london madhye 2-3 mahine job search karayala rahiche ahe. mala sadharan mahinyacha kharcha koni sangu shakel ka? sadharan stay, food and travelling sathi kiti kharcha yeil. ethe konitari 65-70 pound kharcha sangitala ahe to per week ahe ka?
krupaya mala hyabaddal margadarshan karave. shakya aslyas mala job sandharbhaat margadarshan kele tar jasta changle. mi ek Software develoer ahe C++ madhala. ani banking domain ahe.
maza id nachiket.datar@gmail.com
krupaya samparka sadhava.

dhanyavaad,
Nachiket