मदत हवी आहे....

Submitted by juyee on 7 December, 2010 - 02:14

माझा ३ वर्षाचा मुलगा नर्सरीत जातो. त्याच्या नर्सरीत १७ तारखेला फॅन्सी काँपिटीशन आहे. आणि त्याविषयी त्यांना दोन चार ओळी देखील सांगायच्या आहेत. कोणी प्लिज काही सुचवाल का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दडपण घेऊ नये. अवास्तव महत्वही देऊ नये. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तुम्हाला माहीत असलेली वेशभूषा तुम्ही निवडावी हे उत्तम. ती वेशभूषा कुठली, कोण करतं कुठल्या प्रसंगात करतात इतकं सांगितलं तरी पुरे..

उदा. कोळी, शेतकरी, कुचिपुडी नर्तक इ. इ. वाट्टेल ते.

मी माझा मुलगा तिन वर्षाचा असताना केलेले....

हेलमेटला काही पेपरची कात्रण लावलेली ( त्यावेळि हेलमेट सक्तीवर खुप यायचे पेपरमधे )

मुलाकडे तिनचाकी स्कुटर होती.. त्यावर हेल्मेट घालुन , बसुन त्याने छोटे गाणे ( जिंगल Uhoh )म्हटले.

हेलमेट हेलमेट हेलमेट
कशासाठी कशासाठी
डोक्यासाठी डोक्यासाठी

हेल्मेट नाही घातले तर
पोलीस मामा असतात चोकात
शंभर रुपये दंड करुन
पावती ते हातात देतात

म्हणुन कृपया हेल्मेट वापरा Happy

२रे बक्षिस मिळाले होते Happy
यात तयारी कमी आहे त्या मानाने .

वारकरी कर. धोती-कुर्ता, कपाळाला, कानाला गंध, अबिर, अष्टगंध, डोक्यावर टोपी, हातात एक छोटासा टाळ.

चाला हाती घेऊन हात, विठ्ठलाची गाणी गात
विसरलो मी जात पात, वारकरी मी वारकरी.

धन्यवाद ...

मला तसा विचार केलेला कृष्ण किंवा सुर्यफुल बनवायचा , पण मला अजून वेगळ काहीतरी कल्पना हव्या आहेत...

ईथे मायबोलीवर मला आठवत नाही आहे , पण कोणीतरी आपल्या मूलीला वांग बनवलेले , त्याची लिंक द्याल का ?

अरे माझा मुलगा ईंग्लिश मिडियमला आहे रे... >> माझाही.. पण महाराष्ट्रात असेल तर मराठी चालते Happy

कंपॉस बोक्स करुन हे गाणे देता येइल
http://www.maayboli.com/node/13305

धन्यवाद ...

<<पण महाराष्ट्रात असेल तर मराठी चालते >> अरे वा ... तस असेल तर एकदम मस्त..

धन्यवाद मंजुडी हेच तर मी शोधत होते, पण मला सुरूवातीचे फोटो दिसत नाही आहेत , शेवटचा दिसतो आहे.
ईतर आणखी काही ...

जुई खरच मंजूडीने सुचवलेल वांग छान आहे. मी माझ्या मुलीला ह्या वर्शी केल होत. तिला उत्तेजनार्थ पारितोषीक मिळाल १५० मुलांमध्ये. ती कवितापण अगदी सोप्पी आहे.
मी श्रावणी नर्सरीत असताना परी बनवल होत. मागील वर्षी काश्मिरी मुलगी बनवली होती. हवे असल्यास फोटो टाकेन.

जागू... मी परी वगैरे तर बनवणार नाही पण ईथे फोटो दिलेत तर चालतील ना, ईतर कोणातरी मदत होईलच की. मलापण ईतर कोणाला सुचवता येईल Happy

हे बघ ,मी माझ्या लेकीला कासव बनवल होत, पहिल बक्षिस पण मिळालेल आमच्या कासवाला.
हव असल्यास कस बनवल ते पण सांगेन.
फोटो साईज लहान करून टाकावे लागत असल्यामूळे क्लीअर नाही दिसत आहेत.

313.jpg312.jpg

भाजीवालीची टोपली असते ना ती घेऊन त्यावर कार्डर्बोड पेपर चिटकवला (अतिशय वेळखाऊ काम). नंतर त्यावर वॉटर कलर ने कासवाच्या पाठीप्रमाणे कलरींग केले.
लेकीला डार्क ब्राऊन कलरचा फूल स्लीव्ह्जचा टिशर्ट व फूल लेगिंग्स घातले.
हातात त्याच कलरचे हातमोजे व पायात सॉक्स घातले.
डोक्यात तशीच माकडटोपी घातली, टोपी घालताना जरा जास्तच तोंडावर येईल अशी घातली व टोपीवर डोळे म्हणून काळ्या कापडाला मार्बल वर बांधून ते शिवून टाकले दोन्हीबाजूने.
टोपलीच्या आतल्याबाजूने समोरसमोरील पट्ट्यांतून दोन नाड्या डबल करून घातल्या. टोपली पाठीवर ठेवून त्या नाड्यांनी टोपली पूढे पोटावर बांधली.
ले़कीला सांगून ठेवले होते की स्टेजवर रांगतच जा व पूर्ण स्टेजला एक राऊंड मार.
तिच्या ऊंचीच्या हिशोबाप्रमाणे टोपलीची साईज असल्यामूळे ती रांगताना टोपली कासवाच्या पाठीप्रमाणे वाटत होती.
हातापायात सॉक्स असल्याने व घातलेल्या कपड्यांच्या रंगसंगतीमूळे खरच कासव वाटत होत.

जूई, अनू ३ , मीनल, स्वाती
धन्यवाद.
हे बघा आम्ही सिनीयर के.जी.त असताना कसे थंडगार आईस्क्रिम बनलो होतो ते.sak1.jpgs2.jpg
आणि ज्युनिअर मध्ये आमचे असे फुलपाखरू झाले होते.
DSC00388.JPG

सुनिधी, प्राजक्ता,फुलपाखरू
धन्स.
आईस्क्रीम आणि फुलपाखरू बनलेली आहे ती माझी भाची आहे. बहिणाबाई अंबरनाथलाच रहात असल्यामूळे लेकीच्या व भाचीच्या सर्व कॉम्पीटिशन्सची तयारी आम्ही मिळूनच करतो.
फुलपाखरू मी आत्ताच तो रुबिक क्युब पण पाहिला. सहिच आहे.
लेकीला आत्तापर्यंत फॅन्सीड्रेस कॉम्पीटिशन्सची बरीच बक्षिस मिळाली आहेत.
मला फोटो साईज लहान करता येत नाही ग म्हणून बाकीचे फोटो टाकता येत नाहीयेत.

माझी मुलगी २ वर्षाची आहे. पण हल्ली ती काही च ऐकत नाही. सगळ्या गोष्टी साठी हट्ट करते. मी ऑफिस मधून घरी गेले कि. एकादी गोष्ट तिला पाहिजे म्हणजे पाहिजे च , ती गोष्ट जो पर्यंत तिला मिळत नाही तो पर्यंत ती रडत च राहते. आणि मी जेवायचं पण नाही, पाणी पण प्याच नाही असा करते.. म्हणजे हल्ली तर रात्री मी ती झोपल्यावर ११.४५-१२.०० वाजता जेवण करते. त्यामुळे हल्ली मला काहीच सुचत नाही तिला कस handle करू ते. please मला सुच्वर काही तरी.

..

Pages