चांदण्यांचे गाव!

Submitted by के अंजली on 5 December, 2010 - 11:46

सांगेल का कुणी मला चांदोबाचे नाव
भेटेल का कुठे सांगा चांदण्यांचा गाव..?

चांदण्यांचे घर हवे चांदण्यांचे दार
चांदण्यांच्या झाडालाही चांदण्यांचा पार..
चांदण्यांच्या वाटेवर चांदण्यांना भाव..

चांदण्यांची शेज तिथे, चांदण्यांची नीज
आभाळात रोज हवी चांदोबाची तीज..
चोहीकडे चांदण्याच,चांदण्यांचा ठाव..?

काय खाई,कुठे राही, कुठे जाई रोज?
कुठे आई, कुठे बाबा, कसा घेई नीज?
कुणासवे खेळे असा रोज लपंडाव..?

सांगा त्याला द्यायचीये तुपाचीच वाटी
आईनेच दिली आहे फक्त तुझ्यासाठी
वाटे आता चांदोबाची मीच सखी व्हावं...!

गुलमोहर: 

छान बालगीत .... मस्तच.

चांदण्यांच्या वाटेवर चांदण्यांचे दव.

या ओळीतील दव चं काही तरी कर...... चांदण्यांचे डाव्/चांदण्यांना वाव/ चांदण्यांची धाव/ चांदण्यांची नाव........वगैरे वगैरे. Happy

अर्ध्यात संपल्यासारखी वाटली.
गाण्याचा रियाझ चांगला चाललेला दिसतोय, सगळ्या कविता तालात येताहेत.

कैलासजी खूप धन्यवाद!आपण सुचवलेला बदल करुन पहाते..!

भरतजी धन्यवाद आणि कस्चं कस्चं!!
विपु करते..!

सावली आणि झंडु खूप आभार!

ए ते शेवटच्या कडव्यामध्ये सखी व्हाव असं वाचलं तरच यमकात येतंय आणि अर्थात तसं वाचून चालणार नाही!!!

बाकी मस्त!! Happy
ही वाचताना माझी जुनी बालकविता आठवली- 'बाहुलीची टोपी' नावाची...

मस्त Happy