Submitted by गिरिश देशमुख on 4 December, 2010 - 11:54

-
अवसेच्या अंधारातही
समोरच्या प्रवाहाचं अस्तित्व,
अस्पष्टसं जाणवतय...
कुणा अंधार-पक्ष्याची
असहाय फडफड,
गूढता अधिकच वाढवतेय...
गावाबाहेरच्या देवळातलं
किर्तन संपवून सारीजणं,
परतली आहेत घरोघरी,
केव्हाचीच....
नदीपल्याड घाटावर
मसणातल्या चिता
विझू विझू आल्या आहेत...
कुणा अनाम शक्तीचा वावर
भोवताली
होत असल्यागत वाटतय...
अस्तित्वाच्या वेशी वरला
तेव्हाचा अस्फूट कल्लोळ
वाढू पहातोय आता
धीरे धीरे....
दिवसाच्या लक्तरांना
गुरफटून घेत,
दूर कुठेशी
क्षीण लुकलुकणा-या
एकाकी दिव्याला आणि
आभाळातल्या लक्ष तारकांना,
साक्षी ठेवून,
रात्र प्रयत्न करते आहे
झोपी जाण्याचा....
पण,
झोप येत नाहिये...
आणि येणारही नाही बहुदा..
कारण,
इथे काहीतरी घडून गेलंय..
काही तरी घडणार आहे...
की या क्षणीच
घडत आहे....
नक्की काय ते,
नेमकं कळत नसलं,
तरी त्याची
व्याकूळ, सूक्ष्म जाणीव
आत खोलवर...
खुपते आहे.....!
(गिरिश देशमुख)
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
मित्रांनो..ही नुस्तीच एक गूढ
मित्रांनो..ही नुस्तीच एक गूढ कविता नाही....माझा प्रत्यक्ष अनुभव आहे...त्याबद्दल लिहीन सवडीने..!:-)
छान जमली
छान जमली
गिरिशराव, तुमच्या सर्व कविता
गिरिशराव, तुमच्या सर्व कविता वेगळ्याच असतात, सुन्न करणारे विशय असतात. माझ्या २८ वर्शाच्या वयात आता पर्य्यन्त अशी कविता फस्ट टाइम् च वाचली..तुम्ची एकटाच मी ही कविता पण खूप जास्त आवड्ली.
ही कविता तु म्हि कोणत्या अनुभवा वर लिहली ते शेयर करावे.
धन्यवाद, wiseman !
धन्यवाद, wiseman !
आवडली कविता
आवडली कविता
अनुभव सान्गितला तर तीव्रता
अनुभव सान्गितला तर तीव्रता अजुन योग्य रीतिने वाचकांपर्यंत पोहचेल...
छान आहे कविता...
http://merakuchhsaman.blogspot.com/