लपंडाव

Submitted by अज्ञात on 29 May, 2008 - 10:45

एक कवडसा साद घालतो
पडद्यामागे कुणीतरी
झिरमिळ होते अंधाराची
चाहुल येते माजघरी

रेष कणांची चमचमते
गतकाळाचे मन जरतारी
लपंडाव सरल्या वेदांचा
राज्य पटावर सोनेरी

हळवेले डोळे हृदयाचे
तुडुंब भरती गाभारी
नेउ घालती युगे पलिकडे
डोहतळाशी माघारी

इथे वाटते थांबावे
थांबणेच आहे कधीतरी
शब्दांच्या अल्याड असे हे
खेळ चालती घरोघरी

...................... अज्ञात
१२३०,नाशिक

गुलमोहर: 

शब्दांच्या अल्याड ... ही संकल्पना फार छान आहे.
व्हृदयचे.. हृदयाचे म्हणायचे आहे का? एच्-कॅपिटल आर्-यु-डी-ए-वाय्-ए-ए-सी-ई...लिहुन पहा Happy (विदाउट डॅश)

हां..... बरोबर आहे तुझं. "व्हृ"ऐवजी "हृ" हवा आहे. मझ्या लक्षातच नाही आलं. मला वाटतं सगळीकडे मी असंच लिहिलं आहे. पुढच्यावेळी दुरुस्त करीन.
थँक्स.
..................अज्ञात