Submitted by nikhilmkhaire on 29 May, 2008 - 07:57
मनाच्या दूरवरच्या कोपर्यात असते
निर्वाताची पोकळी...
भूतंखेतं, भितीबिती,
रागबीग, प्रेमबीम, मायाबिया
यांच्या पलिकडे असते ना तिच ती...
हळुहळू तयार होते
हळुहळू वाढत जाते...
सारं मन व्यापते
पण बाहेर नाही पडत...
मग भूतंखेतं, भितीबिती,
रागबीग, प्रेमबीम, मायाबिया
यांच्यासाठी ठरतो मी निषिद्ध...
उरतो फक्त मी...
बधिरपणे गतस्मृतींच्या गुंगीखाली
तरंगत..
ना जगत, ना मरत..
मग उरते स्वतःभोवती आणि स्वतःमधली
निर्वाताची फक्त पोकळी!
---
निखिल.
गुलमोहर:
शेअर करा
मस्त !
मस्त !
छान
छान निखिल,आवड्ली बुआ
जियो मेरे
जियो मेरे लाल!!
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
आर्ट ऑफ
आर्ट ऑफ लिविंग मध्ये सुदर्शन क्रिया केल्यानंतर असा अनुभव येतो. समाधी असे त्याला म्हणतात....
आवडले काव्य.
!!!
!!!
ओह.. हॅट्स ऑफ फॉर दॅट स्टेज.
ओह..
हॅट्स ऑफ फॉर दॅट स्टेज.
ग्रेट यार !
ग्रेट यार !
ग्रेट.
ग्रेट.
सुरेख विचार!
सुरेख विचार!
कडक... ! @ पल्ली.. सांभाळा...
कडक... !
@ पल्ली..
सांभाळा... समाध्या लागाला लागल्या म्हणे तुमच्या..