ऋतु वर्षाचे

Submitted by वर्षा_म on 2 December, 2010 - 04:56

आला उन्हाळा ,तब्येत सांभाळा
थंडगार पाणी, माठात वाळा
आइसक्रीम नको, खा फळ
उन्हात नको, सावलीत खेळ

परिक्षा संपली, शाळेला सुट्टी
बैठे खेळ, पुस्तकांशी गट्टी
कैरीचे पन्हे, रसदार आंबा
बिघडेल पोट, आता थांबा

===============

आला पावसाळा,हॉटेलींग टाळा
आजार नको, बुडेल शाळा
इंद्रधनुष्य पहाण्यात, गेला वेळ
मस्तच रंगलाय, उनपावसाचा खेळ

छत्री रेनकोट, विसरु घरी
चिंब भिजण्या, रिमझिम सरी
चला मारुया, डबक्यात उड्या
वाहत्या पाण्यात, कागदी होड्या

================

आला हिवाळा,नको शाळा
पेटली शेकोटी, झाले गोळा
बदामाची खीर,डिंकाचे लाडु
पहाटे उठुन, जोरबैठका काढु

तेलाने मालीश, अभ्यंग स्नान
कानटोपी स्वेटर , लोकरीचा मान
सर्दी होता, तुळशीचा काढा
पांघरुण घेउन, गुपचुप पडा

गुलमोहर: 

छान Happy

Lol Lol Lol