गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १८

Submitted by बेफ़िकीर on 30 November, 2010 - 05:08

इन्टर ट्रॅक्टर जर्मनी!

कंडा प्रपोजल होते हे अक्षरशः!

मोनाने स्वतःच शोधून काढली होती ही कंपनी बसल्या बसल्या! आणि स्वतःच करस्पॉन्डन्सही केला होता. चक्क सकारात्मक प्रतिसाद आल्यामुळे तिने दहा दिवसांचा वेळ मागून घेतला आणि अकराव्या दिवशी त्यांना एक चांगल्यापैकी प्रोजेक्ट रिपोर्ट इमेल केला. त्यावरही त्यांची स्तुतीपर इमेल आली.

मोना आता तिच्या कारकीर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वात मोठा मानाचा तुरा खोवायला निघाली होती. अर्देशीर हा डॅडचा शत्रू तिने मागेच कट केलेला होता. त्यानंतर अक्कलहुषारीवर डॅनलाईन स्वतःकडे ओढले होते. नाना सावंतची युनियन नेस्तनाबूत केलेली होती. जतीन आणि सुबोधला कचर्‍यासारखे फेकून दिले होते. शर्वरी, गोरे, पराग या तिघांना किड्यासारखे ठेचलेले होते. हेलिक्सच्या वर्कफोर्सच्या मनात स्वतःबद्दल एक आदराची व प्रेमाची भावना निर्माण करून घेतली होती. स्वतःला आई होण्यापासून वंचीत ठेवण्याच्या कॉस्टवर मोनालिसाने आजवर मोहन गुप्तांना अभिमान वाटेल अशीच कामगिरी बजावली होती खरे तर! पण तिच्यात उभारीही त्यांच्यासारखीच होती. किंबहुना कित्येक पटींनी जास्तच!

मोहन गुप्ता कधीच 'हेलिक्स'च्या बाहेर विचार करत नव्हते. मोनाने डॅनलाईन इन्डिया ही नवीन आघाडी उघडून मोहन गुप्तांपेक्षाही काकणभर सरसच असल्याचे सिद्ध केलेले होते. आणि आता तिचे मन झोपेतसुद्धा व्यापलेले होते ते..... इन्टर ट्रॅक्टर जर्मनी या तीन शब्दांनी!

इन्टर ट्रॅक्टर जर्मनी! फारच इन्टरेस्टिंग बिझिनेस होता यांचा! आणि मोना तो स्वतः हॅन्डल करण्याच्या विचारात होती. कारण लोहिया आणि रेजिना ऑलरेडी लोडेड होते. पाहिजे तर आणखीन एखादा काबील माणूस ठेवू असाही विचार चालला होता तिच्या मनात!

कोळश्याच्या खाणी, सिमेंट प्लॅन्ट्स आणि काही प्रमाणात स्टील प्लॅन्ट्स या सर्व उद्योगांमध्ये अवजड मशीन्स वापरली जातात. त्याला अर्थ मूव्हिंग मशीन्स असे म्हणतात. यात प्रामुख्याने व प्राधान्यक्रमाने बुलडोझर, एक्स्कॅव्हेटर, लोडर आणि डंपर ही मशीन्स असतातच असतात! बुलडोझरने प्रत्यक्ष खाण खोदण्याचे काम केले जाते. एक्स्कॅव्हेटरने ती सर्व माती, ज्यात ते खनिज असते, ती उचलून एकीकडे केली जाते. लोडरच्या सहाय्याने ती उचलून बाहेर नेली जाते. आणि बाहेर डंपर्स असतात ज्यांच्यामध्ये लोडरमधील सर्व काही ओतले जाते. डंपर्स ते घेऊन प्रोसेसिंगच्या ठिकाणी घेऊन जातात.

यापैकी बुलडोझर आणि एक्स्कॅव्हेटर या दोन मशीन्सना बहुतेकवेळा रणगाड्यांप्रमाणे क्रॉलर्स असतात. म्हणजे टायर्स नसतात तर एक अखंड लोखंडी साखळी असते. रस्त्यावर दिसणारे किरकोळ आकाराचे डोझर्स किंवा एक्स्कॅव्हेटर्स हे टायर माउंटेड असतात. मात्र खाणकामासाठी वापरले जाणारे डोझर्स आणि एक्स्कॅव्हेटर्स हे अक्षरशः राक्षसी आकाराचे असतात. पी सी ६५० हा एक्स्कॅव्हेटर एका तीन मजली अवाढव्य बिल्डिंगसारखा असतो. बुलडोझर्स असेच अवाढव्य असतात. लोडर्स जाताना पाहून धडकी भरावी असे असतात. आणि डंपर्सचे टायर्स आठ आठ फूट डायमीटरचे असू शकतात. जगातील कोणत्याही माणसाच्या उंचीपेक्षा जास्त उंच नुसते टायर्सच असतात.

या व्यवसायात, म्हणजे ही अवाढव्य राक्षसी मशीन्स बनवण्याच्या व्यवसायात ज्या आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रामुख्याने आहेत त्या म्हणजे कॅटरपिलर, जॉन डीअर, पोक्लेन, हिताची! यातील बी ई एम एल या भारतीय शासकीय उद्योगाचे कोलॅबोरेशन त्यावेळेस जॉन डीअरशी होते. टाटाचे हिताचीशी!

एकेक बुलडोझर काही कोटींचा असतो. एक्स्कॅव्हेटर तर अधिकच! ही मशीन्स म्हणजे खाणीची जान असते. त्यांच्याशिवाय खाणकाम होऊच शकत नाही. आणि या मशीन्सचा मेन्टेनन्स आणि त्यांच्या स्पेअर पार्ट्सचा एक प्रचंड मोठा बिझिनेस असतो. एक स्वतंत्र इन्डस्ट्रीच खरे तर! सर्व खाणी आणि काही सिमेन्ट प्लॅन्ट्स हे शासनाचे असल्यामुळे या पार्ट्सची सतत टेंडर्स निघत असतात.

ही मशीन्स बनवणार्‍या कंपन्या, म्हणजे कॅटरपिलर, जॉन डीअर वगैरे, मशीन्सचे अर्थातच सर्व पार्ट्स इनहाऊस बनवत नाहीत. सब असेंब्लीज इतरांकडून बनवून घेऊन शेवटी मेन असेंब्ली तयार करतात. त्यातील क्रॉलर, म्हणजे टायर्सच्या ऐवजी असलेली रणगाड्यासारखी लोखंडी साखळी हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. कारण त्याची सर्वाधिक झीज होत असते.

इन्टर ट्रॅक्टर जर्मनी ही कंपनी या सर्व ओ ई एम्स ना (ओरिजिनल इक्विपमेन्ट मॅन्युफॅक्चरर्स) हे क्रॉलर्स बनवून सप्लाय करणारी कंपनी होती. त्यांचा सप्लाय मुळातच सर्व ओईएम्सना जागतिक स्तरावर असल्यामुळे त्यांचे क्रॉलर पार्ट्स किंवा ट्रॅक चेन असेंब्लीज, ट्रॅक शू असेंब्लीज वगैरे संपूर्ण जगात रिप्लेसमेन्ट म्हणूनही विकत घेतले जायचे. ट्रॅक चेन असेंब्ली म्हणजे फक्त लोखंडी साखळी तर ट्रॅक शू असेंब्ली म्हणजे त्या साखळीला असणार्‍या लोखंडी पॅड्ससकट असलेली साखळी! या दोन्हींना भारतीय बाजारात अव्याहत मागणी होती कारण कोलफिल्ड्सच किमान दहा होती. सिमेन्ट प्लॅन्ट्स पन्नासच्या आसपास! स्टील प्लॅन्ट्स आठ!

इन्टर ट्रॅक्टर भारतातील आजवरचा सर्व बिझिनेस 'मिळाला तर मिळाला, नाही तर नाही' या तत्वावर करत होती. एजन्ट शोधत नव्हतीच असे नाही. पण मिळणारी प्रपोजल्स फारच कमकुवत पार्टीजकडून येत होती. आणि आजवरच्या सर्व प्रपोजल्सच्या तुलनेत गुप्ता हेलिक्सचे प्रपोजल आणि गुप्ता हेलिक्सचा प्रोफाईल अत्यंत इन्टरेस्टिंग वाटल्यामुळे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेले होते.

हेलिक्स संदर्भात एवढी मोठी स्टेप घेताना लोहियांना अंधारात ठेवणे शक्यच नव्हते. कारण अनेक कायदेशीर बाबी होत्या ज्यात त्यांच्या सह्या लागत होत्या. प्रत्येक पेपरवर सर्व अ‍ॅक्टिंग डायरेक्टर्सच्या सह्या लागल्यावर काय करणार! त्यामुळे लोहियांना पहिल्यांदाच मोनाने सर्व काही सांगून टाकलेले होते. आणि लोहियांनी त्याही दिवशी खरोखर आवंढा गिळलेला होता.

ग्रोथ! ग्रोथची एवढी जबरदस्त भूक मोनालिसामध्ये असेल हे लोहियांना अविश्वसनीय वाटत होते. मोहन गुप्तांना अभिमान वाटेल असे म्हणण्यापेक्षा 'मी बाप असून माझ्यापुढे मुलगी चाललीय' यामुळे लाज वाटावी अशी धडाडी होती मोनाची! लोहियांनी तर सरळ एक दिवस सुट्टी घेऊन मुंबईत आपल्या घरात बसून विचार केला होता. इन्टर ट्रॅक्टर जर मिळाली तर हा नवीन बिझिनेस जवळपास पासष्ट कोटींचा असेल आणि मुख्य म्हणजे पुढेमागे क्रॉलर्स बनवणे या स्टेपकडे आपण जाऊ शकू! पासष्ट कोटी हा आकडा जरी हेलिक्सच्या तुलनेत किरकोळ असला तरीही आहे त्याच वर्कफोर्समध्ये कोणतीही इन्व्हेस्ट्मेन्ट न करता केवळ ट्रॅव्हलिंग आणि कम्युनिकेशन कॉस्टवर मिळणारा हा प्रॉफिट, प्रॉफिटॅबिलीटीच्या मानाने हेलिक्सल कुठल्याकुठे मागे सोडणारा होता.

आपला मुलगा हितेश मोनापेक्षा दोन वर्षांनी लहान असल्याचा पहिल्यांदाच पश्चात्ताप झाला लोहियांना! मोठा असता तर या पोरीला सरळ सून करून घेतले असते आपण! आणि तसे केल्यावर काही प्रश्नच उरला नसता.

सुरुवातीला इन्टर ट्रॅक्टर या प्रपोजलमध्ये आपण पडायचे नाही अशा मताचे असलेल्या लोहियांनी त्या सुट्टी काढलेल्या दिवसाचा अंत करताना 'इन्टर ट्रॅक्टर आपण हॅन्डल करायचेच' असा निर्णय घेऊनही टाकलेला होता. याची जितकी इतर महत्वाची कारणे होती, जसे प्रॉफिट, प्रोफाईल, ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स वगैरे, तसेच आणखीन एक महत्वाचे कारण हे होते की आपण यात पडलो नाहीत तर आर आर डिसूझा पडेल आणि आपण नुसते गिअर्स बनवत बनवतच मरून जाऊ!

आणि आज त्याच गोष्टीचे सेलेब्रेशन होते ब्ल्यू डायमंडला! दुपारीच अ‍ॅग्रीमेन्ट्स साईनही झालेली होती. मात्र हे काम जर्मनीत झाले नाही. हेलिक्समध्येच झाले.

इन्टर ट्रॅक्टरचा एडी एक अवाढव्य आणि लालबुंद माणूस होता. असेल पन्नाशीचा! त्याच्या भुवयाही सोनेरी होत्या. बीअर आणि फूड याचे त्याचे कंझंप्शन हत्तीसारखेच असावे. लीगलचा साहनी हादरून पाहातच बसला होता एडीकडे! एखादा माणूस किती चिकन खाऊ शकतो याचे लिमिट एडी दाखवत होता.

मोनालिसा मंद हासत होती. कारण एडीशी संवाद साधून रिलेशन्स मेन्टेन करण्याचे काम लोहियांनी स्वतःहून स्वतःकडे घेतलेले होते. आणि त्यांचा अफाट अनुभव लक्षात घेऊन एडीही मोनापेक्षा त्यांच्याशीच अधिक बोलत होता. खरे तर दोघांनाही एकमेकांशी बोलण्यातून आनंदच मिळत होता. रेजिना नुसताच दोघांपाशी उभा होता आणि ऐकत होता. मेहरा, बिंद्रा, जोशी आणि भसीन एकत्र बसलेले होते. साहनीही होता त्यांच्यातच, पण एडीच्या आहाराकडे पाहण्यातच गुंगला होता. आणि मोना दोन्ही ग्रूप्समध्ये येऊन जाऊन होती.

मात्र... आत्ता ती रेजिनाच्या शेजारी उभी राहिलेली असताना तिला अचानक मेसेज आला. 'तुमच्यासाठी कॉल आला आहे' असा! मोनाने जाऊन रिसीव्हर उचलला...

"मॅडम... या नंबरवर कॉल करा असा एका माणसाने निरोप दिलाय.... नंबर देऊ??"

मधुमतीचा तो सॉफ्ट आवाज मोनाला जरी आवडत असला तरीही इन्ट्युशनने तिला काहीतरी जाणवले होते. काहीतरी महत्वाचे घडणार होते त्या फोनवर बहुतेक!

"हं.. सांग..."

मधुमतीने दिलेला नंबर अर्थातच नॉर्थचा होता. मोनाने अंदाज केला. जगमोहन असणार किंवा रणजीत! दुसरे कोण? कारण हा काही ऑफिशियल कॉल नसणार!

"हॅलो????"

"हां हालो... मॅडमजी??? "

"येस???"

" हां उस्ताSSSद बोलरहा हूं जी... याद है ना?? शिमलासे?? आप मिलने नही आयी थी??"

"........ "

मोना चरकलेलीच होती. या माणसाकडे आपला नंबर कसा काय? एका झोपडपट्टीत राहणार्‍या, सुबोधच्या घरी घरकामास असलेल्या गड्याच्या मुलाकडे चक्क आपला नंबर?? फारच रिलक्टन्टली ती म्हणाली...

"हां बोलो?????"

"आप मोनामॅडमजीही बात कररही है ना??"

"अरे बोलो जल्दी... मैंही बोलरही हूं..."

"हांजी... वो रणजीतसाहबने आपका नंबर दिया था मुझे... आपके लिये पैगाम छोडगये है... और कुछ चीजे भी... आप क्या लेने यहां आयेगी या भिजवानी है...??"

"कैसी चीजे.. ??"

"वो लॉकेटमे हिरेकी तरहा नही होता है वो एक छोटा टुकडासा?? वैसे काफी है इसमे..."

मोनाला आठवले. स्वतःकडच्या दोन पोत्यांपैकी एकातले ते फालतू लोलक उगाचच रणजीतने उस्तादला देऊन आपल्याला फोन करायला सांगीतला आहे म्हणून ती भडकलीच!

"वो छोडदो... तुम दुबारा फोन मत करना....

"सुनिये मॅडमजी... ये आपके पास पहुचानाही है मुझे... और पैगामभी देना है..."

"कैसा पैगाम??"

"वो साहबने कहनेको कहां है आपसे..."

" हां तो बोलो ना जल्दी... क्या पैगाम है??"

"हालो... "

"हां हॅलो... बोलो... सुनाई दे रहा है..."

"हां.. उन्होने कहां था के उन्हे कुछ दिन पहलेही पता चलगया के मौसीके मायकेमे मौसीका एक दोस्त था... रत्नाकर... उनका मौसीके साथ रिश्ता होगया था... उससे वो बेटा पैदा हुवा है... मौसीके शादीके कई साल बाद..."

हातातून फोन गळून पडतो की काय असे वाटले मोनाला! मौसी कोण अन कुठला बेटा पैदा झाला ते जरी समजत नसले तरी एक भयानक नांव ऐकायला मिळाले होते... रत्नाकर.... ब्लड प्रेशरच वाढले मोनाचे.. खटकन तिने लांबवर चाललेल्या मीटिंगकडे मान वळवली...

.... रत्नाकर.... रत्नाकर हे लोहियांचे नांव होते...

"कौन मौसी???"

"मौसी यानी डॉक्टरसाहबकी पत्नी... डॉक्टर शामताप्रसादसाहबकी"

"कौनसा बेटा ... पै... दा हुवा???"

"सुबोधसाहब..."

ब्ल्यू डायमंडच्या चकचकीत भिंती गरागरा फिरत होत्या तिच्या डोळ्यांसमोर...

... दोन कथानकांचा सशक्त संबंध लागत होता.... लोहिया त्या काळापासूनच इन्व्हॉल्व्ह्ड होते या सगळ्यात... ओह... गॉश....

"हॅलो..."

"हांजी मॅडमजी...."

"ये... तुम्हे किसने बताया??"

"कह तो रहा हूं रणजीतसाहबने...."

"वो खुद कहां है??"

"गुजर नही गये पिछले हप्ते?? एन्काउन्टरमे...???"

"क्या???????????"

"हांहां.. साहब तो गुजरगये... लेकिन उन्हे पता था उनका एन्काउन्टर होनेवाला है... इसलिये ये चीजे पहलेही पहुंचादिये मेरे पास..."

"रणजीत मरगये???"

"जी जी... गुजरगये वे..."

"कब???"

"आठ दस दिन हो गये मॅडमजी...."

"तुम आज फोन कर रहे हो???"

"मॅडमजी हमे अपनी जानकी भी फिक्र होती है... सिर्फ आप बडे लोगोंकी नही..."

"मतलब... सुबोध लोहियाका बेटा है??"

"कौन लोहिया?? लोहिया नही... रत्नाकर.. रत्नाकर..."

"हांहां... वो.. वो चीजे मुझे चाहिये..."

"मॅडमजी वो चीजे ले जानेकेलियेही मैने ये फोन किया है...."

"भिजवासकते हो???"

"हरगीज नही..."

"मतलब???"

"रणजीतसाहबने कहां था के या तो खुद आपके हाथमे देदूं.. या फिर किसी वफादारके हाथो पहुचादूं..."

" तुम आओगे क्या??"

"ना जी ना..."

"क्युं??"

"काहेको सरदर्द मोलले मॅडमजी?? .. जीनेदीजिये गरीबोंको..."

"ऐसी क्या चीजे है वो..???"

"पता नही... लेकिन ये जो चमकते टुकडे है इनके आसपास अगर बिल्ली आये तो भागजाती है.... एक उल्लूने एक टुकडा खालिया... मरगया..."

लोलक खाऊन घुबड मेलं यात विशेष काय ते समजेना मोनाला! इतकं तीक्ष्ण आणि टोकीदार लोलक गिळल्यावर गेंडाही तडफडू शकेल की?

"उल्लू तो मरहीजायेगा.. खानेकी चीजही नही है वो..."

"वो बात होती तो मै आपको क्युं बताता?? हम तो पंछीयोंको आपसे जियादा जानते है जी..."

"मतलब.. ???"

"इनको बाहर निकालके रख्खो तो कव्वे चिल्लाना शुरू करते है..."

पाठीच्या कण्यामधून एक शहारा गेला मोनाच्या!

मृत्यू! त्या लोलकांमध्ये मृत्यू होता. आणि हेच मगाचपासून उस्ताद सांगतोय हे मोनाच्या बथ्थड डोक्यात आत्ता शिरलं! काहीतरी अभद्र, भीषण किंवा भयप्रद दिसलेकी कावळे कसे ओरडतात हे मोनाला माहीत होतं!

बझट! अक्कलशुन्य मुलगी आहोत आपण! त्या लोलकांमध्ये उरलेल्या बझट असणार! आणि त्या तो फुकट देत होता आणि आपण म्हणालो 'काहीतरी फालतू दाखवू नकोस मला'! लोलक तर दिल्ली पोलिसांनाही समजले नसते. रणजीतच्या अक्षरशः पाया पडायला पाहिजे असा माणूस होता तो! पण??? पण असे कसे?? काहीतरी चुकतंय! बझट तर त्याने आपल्याला प्रत्यक्ष हातात दिल्य होत्या. मग.. मग लोलकांमध्ये पुन्हा बझटच कशाला भरून ठेवेल तो??

मोना - वो... वो चीजे मै लेने आरही हूं...

उस्ताद - आपही खुद आयेगी क्या??

मोना - हां मैही आरही हूं...

उस्ताद - तो तो ठीकही है.. कबतक पहुचेंगी आप शिमला...

मोना - शिमला नही... मै पिंजोर आउंगी...

उस्ताद - और??

मोना - और तुमभी पिंजोर आना...

उस्ताद - मारनेका इरादा है क्या मुझे भी...

मोना - मेरे पास इतना पैसा है के तुम्हे कोई छुएगा तक नही...

उस्ताद - आपके पास तो पैसा हैही जी..... लेकिन जानकी क्या कीमत???

मोना - घबराना मत... परसो शाम छे बजे हॉटेल मनस्विनीमे मिलो...

उस्ताद - हम नही जानते हॉटेल वॉटेल... आप मेनरोडपेही मीलिये हमे...

मोना - मेनरोडपे?? पागल हो क्या??

उस्ताद - जी चीजे जितना छुपाके करेंगी उतनाही शक बढता रहता है ...

मोना - मेनरोडपर कहां??

उस्ताद - गार्डनके बाहर.. खिलौनेवाली ट्रेन है बच्चोंके लिये... वहां...

मोना - ठीक है... और ऐसा मत करना के आयेही नही...

उस्ताद - मॅडमजी.. ये चीजे मेरे घरके बाहर जानेका इंतिजार तो मै खुदही कररहा हूं... आप कहे तो फेक दूं रास्तेपे??

मोना - पागल मत बनो.... परसो मिलो....

उस्ताद - ठीक ठीक....

फोन ठेवून मोना मागे वळली तर रेजिना उभा!

रेजिना - या एसीच्या थंड वातावरणात घाम कसा फुटतो तुला इतका??

मोना - रिकोह आय अ‍ॅम नॉट फॉलिग वेल.. मी... जरा घरी जाते...

रेजिना - हो पण एडीला सांगून जा...

मोना - ऑफकोर्स...

एडी आणि सगळ्यांचा निरोप घेऊन मोनालिसा घरी आली.

ब्ल्यू डायमंडमध्येच तिने थोडे खाल्लेले होते. आता खायची इच्छा नव्हती. आवरून ती बेडवर बसून कॉफी घेऊ लागली. मधुमती खाली आवराआवर करत होती.

मोना नकाशाचे विखुरलेले तुकडे हातात घेऊन नकाशा जोडावा तशी कहाणी जोडायला बसली.

डॉ शामताप्रसाद श्रीवास्तव! बरेलीतील प्रख्यात संशोधक! त्यांची संशोधने महत्वाची ठरायची! मिळकतही भरपूर असल्याने घरची श्रीमंतीच! त्याच गावात आणखीन एक कुटुंब! दोन भावांचे! रोहन गुप्ता आणि मोहन गुप्ता! गुप्ता आणि श्रीवास्तवांची विशेष ओळखही नाही. शामताप्रसाद श्रीवास्तवांच्या पत्नीचे माहेर अहमदाबादला! तिथे तिचा लग्नाआधीपासूनचा एक मित्र! रत्नाकर लोहिया!

बझटच्या कामासाठी शामताप्रसाद बरेलीहून शिमल्याला शिफ्ट झाले. नंतर काही कारणाने रोहन गुप्ताही बरेलीहून तिकडेच गेले. शिमल्याला मात्र दोघे सख्खे शेजारी झाले. दोन्ही घराण्यामधील प्रेम प्रचंड वाढले. इतके की जणू रक्ताचे नातेवाईकच! मात्र रोहन गुप्तांचा मुलगा राघव आणि शामताप्रसादांची मुलगी सानिया यांचे प्रेमप्रकरण समजल्यावर शामताप्रसादांचा मोठा मुलगा रणजीत याने दोघांनाही मारले आणि नंतर पुराव्याअभावी सुटून घरातून पळून गेला. तो वेडसर असल्यामुळे आणि सानिया मेल्यामुळे शामताप्रसाद आणि त्यांच्या पत्नीला रोहन गुप्ता आणि माधुरीचाचीने आणखीन एका अपत्याचा विचार करण्याचे सुचवले व ते श्रीवास्तव दांपत्याला मान्यही झाले. मात्र जन्माला आलेला 'सुबोध' हा मुलगा शामताप्रसादांचा नव्हताच! तो होता त्यांच्या पत्नीच्या जुन्या मित्रापासून, रत्नाकर लोहियांपासून झालेला! तो मुलगा शामताप्रसादांनी रोहन गुप्तांना देऊन टाकला. पुढे त्याच्या उदरनिर्वाहाचे वचन मोहन गुप्तांनी मोठ्या भावाला म्हणजे रोहन गुप्तांना दिले. म्हणजे सुबोध हा 'गुप्ता' तर नाहीच आहे, पण श्रीवास्तवही नाही आहे. तो आहे सुबोध लोहिया! माधुरीचाचीने केलेल्या बझटच्या वापरामुळे आपली आई, शामताप्रसाद स्वतः, त्यांची पत्नी, हे सगळे मारले गेले. उस्तादचे वडीलही मेले. माधुरीचाचीला असे करण्याचे कारण हे होते की सुबोधला स्वतःचे आई वडील केव्हाही प्रिय होतील आणि तो आपल्याला सोडून जाईल, तसेच, मोहन गुप्ता मेले की त्यांचे पुण्याचे युनिट रोहन गुप्तांन मिळेल! पण मोहन गुप्ता नेमके काही कारणासाठी बाहेर गेल्यामुळे तेच वाचले. आणि आपण वाचलो कारण आपण तेव्हा अन्न खाण्याच्या वयाचेच नव्हतो. हे होत असताना रणजीत गुप्तपणे शिमल्यात वावरत होता. आणि नंतर मोहन गुप्ता शेवटी पुण्याला स्थायिक झाले आपल्याला घेऊन!

काहीतरी गॅप आहे. बहुतेक सगळे तुकडे मिळाले आहेत नकाशाचे! पण एक तुकडा मात्र राहिलाय किंवा चुकतोय! की एकापेक्षा अधिक????????

रत्नाकर लोहियांपासून शामताप्रसादांच्या पत्नीला सुबोध झाला हे ठीक आहे. पण रत्नाकर लोहिया हेलिक्समध्ये कुठून आणि का आले? आणि हे सगळे सुबोधलाही माहीत आहे का? की तो लोहियांचाच मुलगा आहे हे??

मिसेस श्रीवास्तवांनी बहुधा लोहियांची ओळख डॅडशी करून दिली असेल! मग अर्देशीर? ते कुठून आले? की ते नुसतीच नोकरी शोधत होते.

पण या सगळ्याचा अर्थ फार गहन आहे.

लोहियांना हेलिक्स गिळंकृत करायची आहे हे तर माहीतच आहे आपल्याला! पण ज्या अर्थी आपल्यावर अजून एकही अ‍ॅटॅक झालेला नाही त्या अर्थी काहीतरी आणखीन गोम असणार! कारण आपण जेव्हा हेलिक्सचे कोणीच नव्हतो तेव्हा आपल्याला खाद्यपदार्थांमधून बझट देऊन मारणे लोहियांना सहज शक्य होते. मग का मारले नसेल आपल्याला?

काय गोम आहे नक्की?

लोहियांचे संपूर्ण वागणे आठवले तर असे जाणवते की ते अगदी खुलेआम वागतात. त्यांना आपली किंवा डॅडची काहीच भीती नव्हती आणि नाही आहे.

मग त्यांनी आपल्याला लहान असतानाच का मारले नसावे?

तेव्हाच मारले असते तर हेलिक्सला ते आणि अर्देशीर सोडून कुणी उरलेच नसते.

बझट! रणजीतलाही समजले असेल! की पृथ्वीतलावर बझटचा फॉर्म्युला बाळगणारा जरी तो एकटाच असला तरीही प्रत्यक्ष बझट बाळगणारे फक्त तो आणि सुबोध असे दोघेच नाही आहेत, तिघे आहेत. लोहियांकडे निश्चीतच बझट असणार!

काय रहस्य असेल की ज्यामुळे आपल्याला अजूनही जिवंत ठेवण्यात येत आहे? काय रहस्य आहे की डॅड गेल्यानंतरसुद्धा शामासारख्या तृतीय श्रेणीतील कामगाराची लोहिया आणि अर्देशीरांना अजून गरज भासते?? आपल्यावर जर लक्ष ठेवतात तर मारत का नसतील आपल्याला??

सिमला! अनेक उत्तरे मिळतील तिथे!

बिचारा रणजीत! मेला! मारले त्याला! का मारले असेल?? ओह... गॉश.. खरच की... याचा अर्थच असा की आता तो फॉर्म्युला जगमोहनकडे असणार आणि तो निर्यात केला जाणार बेकायदेशीररीत्या..

मला हे असलं सगळं आयुष्य नको आहे.. मला जगायचंय आणि बहरायचंय... डॅडचं स्वप्न फुलवायचंय हेलिक्सचं... का अशी परिस्थिती आहे माझ्या अवतीभोवती..?? कोणतीही चूक नसताना मी या असल्या गहन रहस्यमय घटनाचक्रातील एक अगतिक साक्षीदार का होऊन बसलेली आहे?? माझे एक पाऊल घटनांच्या पुढे का नाही?? मी चार पावले मागेच का आहे??

मेहरा!

रात्री साडे नऊ वाजता मोनाने मेहरांना फोन लावला.

मेहरा - ओह... गुड इव्हिनिंग मिस गुप्ता...

मोना - गुड इव्हिनिंग...

मेहरा - टेल मी...

मोना - बंगला रंगवायचाय... इमिजिएटली....

मेहरा - ठीक आहे... राजेश म्हणून आहे आपला कॉन्ट्रॅक्टर.. त्याला सांगतो उद्याच...

मोना - हं.. त्याला आत्ताच कळवा.. म्हणाव सकाळीच भेटायला ये....

मेहरा - शुअर...

फोन ठेवला तेव्हा अत्यंत गंभीर चेहर्‍याने मोना स्वतःचे प्रतिबिंब आरशात पाहात होती.

अठरा खोल्यांचा बंगला रंगवणे ही किमान एक महिना चालणारी गोष्ट होती. आणि त्या निमित्ताने संपूर्ण बंगला ती स्वतःच चाळून काढणार होती. कोणतेतरी रहस्य बंगल्यातच मिळेल याची तिला खात्री होती.

==============================================

कालच सकाळी राजेशला बंगला रंगवायचे एस्टिमेट एका दिवसात द्यायला सांगून संध्याकाळच्या फ्लाईटने मोना दिल्लीला आली होती. आणि आज सकाळी ती पिंजोरच्या मनस्विनीमध्ये बसलेलीही होती. अर्थातच, आपण इथे आहोत हे संपूर्ण शत्रूसमुदायाला माहीत असणार याची तिला कल्पना होती.

मधुमतीचे आपले बरे होते! भारतात मॅडम कुठेही जाणार असल्या की तिला विमानातून जाता यायचे! आजही ती खुषीत होती. कारण बोलता बोलता मॅडम म्हणाल्या होत्या की दुसर्‍या दिवशी लगेच परत निघायचे आहे. म्हणजे यावेळेस मागच्यासारखा हरीण वगैरे भाजणारा भयानक माणूस भेटणार नव्हता आणि एकाच रूममध्ये पाच पाच दिवस काढायचेही नव्हते. त्यामुळे सकाळी मनस्विनीच्या स्विटमध्ये चेक इन केल्यापासून मधुमती अगदी गुणगुणत वगैरे होती. मोना शांतपणे पेपर वाचत बसली होती.

"मॅडम समोर बाग आहे..."

टेरेसमधून आत येत मधुमतीने उत्स्फुर्तपणे मोनाला सांगीतले. आपण काहीतरी अद्भुत रहस्य सांगत आहोत अशा थाटात!

"अं?? .. हं... पिंजोर गार्डन आहे ते..."

माहितीय की या बयेला! रुक्ष आहे नुसती! असा विचार करून मधुमती पुन्हा टेरेसमध्ये गेली. पिंजोर गार्डन पाहातच बसली. अत्यंत उत्तम बाग! सात लेव्हल्स असलेली! वरच्या कोणत्याही लेव्हलवरून खालची लेव्हल जवळ गेल्याशिवाय दिसतच नाही.

मोनाला जतीनचे घर माहीत होते. पण आज तिथे जायचेच नव्हते. उगाच आत्याला वगैरे भेटून पुन्हा नवीन अडचणी निर्माण करायच्या नव्हत्या.

मधुमती पुन्हा आत आली.

मधुमती - आता बाहेर जायचंय मॅडम???

मोना - अं?? ... नाही....

मधुमती - तुमचा ब्रेकफास्ट??

मोना - मागव..

मधुमती - काय मागवू?

मोना - ऑम्लेट्स...

मधुमती - किती???

मोना - दोन...

मधुमती - म्हणजे दोन डबल का???

मोना - मागव गं बाई काहीतरी... सतरा प्रश्न विचारू नकोस...

मोनाचे लक्ष नाही असे पाहून मधुमतीने नाक उडवले.

तर्कटच आहे बया! आता काय खायचंय ते नीट सांगायला नको?? आणि ही काहीतरी खायला मागवेपर्यंत आपण स्वतःसाठी काही मागवू शकत नाही. म्हणून वाट पहावी तर या बाईला भूक लागली आहे हेही दुसर्‍यानेच सुचवावे लागते.

मधुमतीने खाली रूम सर्व्हीसला फोन लावला.

मधुमती - हॅलो... टू झिरो फोरसे बोलरही हूं...

वेटर - जी जी मॅडम... कहिये...

मधुमती - दो डबल ऑम्लेट.. और एक व्हेज सॅन्डविच.....

वेटर - जी जी.. ये डबल मतलब दो अण्डे का बनेगा ना?

मधुमती - हं.. मतलब सिन्गल नही चाहिये...

वेटर - हांहां.. वही कहरहा हूं.. मतलब चार अण्डे होजायेंगे ...

मधुमती - दो डबल अण्डे होजायेंगे... चार कैसे??

वेटर - टोटल दो अन्डे...

मधुमती - हां.. मतलब एक मे दो...

वेटर - एक मे दो मतलब??

मधुमती - प्लच.. मतलब एक ऑम्लेटमे दो अण्डे...

वेटर - वही कहरहा था मै... ऐसे दो डबल ऑम्लेट...

मधुमती - ऐसे डबल नही... दो अण्डेका एक सिंगल ऑम्लेट.. ऐसे दो...

वेटर - मॅडमजी... दो अण्डेका सिंगल ऑम्लेट कैसे बनेगा???

मधुमती - सिंगल ऑम्लेटमे आप कितने अण्डे डालते है??

वेटर - सिंगलमे सिंगल मॅडमजी....

मधुमती - तो दो अण्डे डालकर एक ऑम्लेट बनाओ...

वेटर - मतलब एक डबल ....

मधुमती - हां....

वेटर - तो एक डबल चाहिये या दो डबल???

मधुमती - एकही डबल..

वेटर - ठीक है मॅडमजी...

मधुमती - नही नही... दो डबल...

वेटर - अभी भिजवाता हूं मॅडमजी...

वैतागून मधुमतीने फोन ठेवला अन पाहिले तर मोनालिसा तोंडावर हात धरून तिच्याकडे पाहात हसू दाबत होती. फोन संपल्यावर मोनालिसाचे नियंत्रण संपले. खदाखदा हासू लागली ती! आता मधुमतीही हासू लागली.

मधु - वेडाय की नाही?? सांगतीय दोन डबल तर म्हणे चार अंडी का?? आता डबलला चार अंडी कशी लागतील????

मोना आणखीनच हसायला लागली. ही बया आपल्यालाही हसू शकत असेल अशी अंधुक शंका मनात डोकावल्यावर मधुमतीने ओशाळून 'चाललेल्या प्रकाराकडे माझे काही लक्षच नाही आहे' अशी देहबोली सुरू केली.

मधुमती - नाश्ता आधी घेणार की आंघोळीनंतर मॅडम...

मोना - आधी...

मधुमती - तुम्ही त्या बागेत गेला आहात आधी??

मोना - हं... बरेचदा...

मधुमती - मग माझ्यासाठी एवढा खर्च केलात???

मोनाने चमकून मधुकडे पाहिले.

मोना - म्हणजे???

मधुमती - सॉरी.. मला वाटलं मलाच बाग दाखवायला आणलं आहेत इथे...

आता मात्र मोना चेहर्‍यावर दोन्ही हात ठेवून हसू लागली.

ओशाळलेल्या मधुने काही झालेच नाही आहे असे दाखवत टीव्ही ऑन केला. तिचे नितंबाच्याहीखाली रुळणारे रेशमी केस पाहून मोनाला क्षणभर हेवा वाटला. आपलेही केस चांगले होते. टाकले कापून आपण!

मोना - मधु... ती बॅग आहे ना?? त्यात एक इम्पोर्टेड शॅम्पू आहे... तो घे तुला...

मधु - कुठला??? ... हा??

मोना - हं...

मधु - छान आहे वास....

मोना - हं...

मधु - मॅडम तुमचेही केस आधी लांब होते ना??

मोना - हं.. पण तुझ्याइतके नव्हते.. पाठीइतकेच...

मधु - का कापलेत??

मोना - लक्ष द्यायला वेळ नाही होत...

मधु - मलाही हल्ली वेळ होत नाही...

आज म्हणजे मधुमती हद्द करत होती. मोना पुन्हा खदाखदा हसायला लागली. मधुला कळेना आपले काय चुकले!

मोना - हो ना... फार बिझी असतेस तू... जरा ब्रेक घेत जा मधेअधे...

मधु - तुम्ही घरात नसता तेव्हा पडते मी जरा तशी...

मोना - हं.. विश्रांती पाहिजेच माणसाला...

मधु - फार नाही... एक तासभर आपलं...

मोनाला आत्ताच जाणवलं! शामाच्या सहवासात राहून मधुमती काकूबाईटाईप बोलायला शिकली होती. त्यामुळे मोनाला आणखीनच हसू यायला लागलं!

मधु - बाईमाणसाचं फार अवघड असतं जगणं...

मोना - खरंय बाई...

मधु - सतराशे साठ कामं अन राब राब राबणं...

मोना - नायतं काय...

मधु - आता कालच तुम्ही म्हणालात दिल्लीला जायचंय... असं एकदम ठरलं की टेन्शनच येतं मला हल्ली...

आता मात्र मोनाला हसू लपवणं अशक्य होत चाललं होतं!

खरे तर मधुला विमानात बसायला आवडतं हे मोनाला कळलेलं होतं! पण मानभावीपणा करत होती ती!

मोना - मग सांगायचंस... पुण्यातच ठेवलं असतं तुला....

मधु - नाही ठीक आहे.. तुम्हालाही एकटीला कंटाळाच आला असता...

मोना - ते मात्र खरं आहे...

मधुमती रिपेअर करण्याच्या पलीकडचं डोकं घेऊन जन्माला आलेली आहे हे मोनाला समजलं! आता लवकरात लवकर एखादी स्मार्ट मुलगी शोधायला लागणार होती. पण अजूनही तिला मधुचं हसूच येत होतं! मधुला मात्र ती काढणार नव्हती.

मधु - आज कुणी भेटणार आहे का??

मोना - हं! एक जण भेटणार आहे...

मधु - ते हिमालयात भेटलेले??

मोना - अंहं.. ते नाही... दुसरे एक जण

तेवढ्यात नाश्ता आला. नाश्ता करून मोनाने पुन्हा विश्रांती घेतली ती सरळ दुपारी बारा वाजताच उठली. एक वाजता साहनीचा कॉल आला. फारुख ऑटोच्या स्थलांतराला चालना मिळालेली आहे. त्यांना अर्देशीरांनी डॅनलाईनसाठी जो प्लॉट चाकणला विकत घेतला होता तो भाड्याने दिला आहे. हे मोनाला अपेक्षितच होतं! जडेजा नेस्तनाबूत झालेले नसले तरी मार्केटमधले त्यांचे स्थान अत्यंत डाऊन होणार होते आता!

संध्याकाळी सहा वाजता पिंजोर गार्डनच्या बाहेर असलेल्या मुलांसाठीच्या आगगाडीजवळ मोन उभी होती. बरोब्बर पाच मिनिटांनिच लांबवर ते डोके दिसायला लागले. उस्ताद अर्ध्या किलोमीटरवरूनही दिसू शकेल अशा अंगयष्टीचा माणूस होता. हा नुसता धिप्पाड! तो ताडताड चालत जवळ आला आणि मधुमती बघतच बसली. या रांगड्या माणसाला भेटायला विमानाने आली ही बाई? चक्रम वगैरे आहे की काय??

एक नोटांचे पुडके मोनाने उस्तादच्या हातात कोंबले. तो ओशाळला. त्याने त्याच्याकडचे एक गावठी दिसणारे पोते मोनाकडे दिले. ते मधुमतीने हातात घेतले. मनस्विनीचा स्टाफ त्या विचित्र पोत्याकडे आणि मोनाच्या अवताराकडे वळून वळून पाहात होता.

रूममध्ये रात्री मधुमतीला झोप लागल्यानंतर मोनाने एक एक वस्तू बाहेर काढायला सुरुवात केली.

सर्वात पहिल्यांदा लोलक! एक लोलक सरळ फोडावा का? नाहीतर काहीतरी भलतंच निघायचं! आणि पळता भुई थोडी व्हायची! नकोच! हा भयंकर प्रकार आहे काहीतरी! बझट मात्र नक्कीच नाही. कावळे ओरडतात याचा अर्थच या लोलकांमध्ये मृत्यू आहे. हे लोलक आपण पुण्याला गेल्यावर पाहू!

दुसरी वस्तू! सुबोधची सर्टिफिकेट्स! जी त्या दिवशी मोनाने नाकारलेली होती. ही कशाला आपल्याला मिळावीत असे रणजीतला वाटत होते काय माहीत??

असो! मोनाने ती नीट तपासून पाहिली. तिच्या माहितीप्रमाणे सर्व डिटेल्स बरोबरच होती. आपण मूर्ख आहोत का रणजीत मूर्ख आहे? ही सर्टिफिकेट्स कशाला आपल्याला लागणार आहेत?

उलटी पालटी करून पाहिली तरी काही समजेना! प्रकाशात धरून पाहिली पण त्यात काहीही गोलमाल वाटत नव्हता. पुन्हा सगळी डिटेल्स तपासली. अंहं! ऑल क्लीअर!

आणि टाळक्यात प्रकाश पडला.

अरे? हे काय? आपण इतके मूर्ख आणि बिनडोक कसे?

आपण सव्वीस वर्षाच्या! म्हणजे सुबोध एक्केचाळीस वर्षांचा असणार! म्हणजे आपल्याला चाळिशीचा भासलेला रणजीतच सत्तावन्न वर्षांचा असणार! म्हणजे रणजीतची आई आज असती तर नाही म्हंटले तरी किमान पंचाहत्तर वर्षाची तरी असती. आणि रत्नाकर लोहिया आत्ता केवळ पंचावन्न वर्षांचे आहेत. रणजीतपेक्षाही लहान! सुबोध हा त्यांचा मुलगा असण्यासाठी लोहिया चौदाव्या वर्षी बाप झालेले असायला हवेत. आणि त्यावेळेस सुबोधची आई असणार चौतीस वर्षांची! चौतीस वर्षांच्या बाईचे लग्न साधारण सतराव्या वर्षी झाले असे गृहीत धरले तर तिच्या लग्नाच्यावेळेस लोहिया असणार मायनस तीन वर्षांचे! म्हणजे जन्माला यायलाच तीन वर्षे असणार त्यांना! मग ते तिचे लग्नाआधीचे मित्र असतीलच कसे??

मूर्खासारखे उस्तादला भेटायला धावलो आपण! आपल्या डोक्याचा कचरा झालेला आहे. आपला मेंदू फुकट देऊ केला तरीही कुणी स्वीकारणार नाही. आपण ज्या मधुला दिवसभर हासत होतो ती आपल्यापेक्षा बुद्धीमान आहे. आपण दोघींसाठी एकतीस हजार रुपये घालवून विमानाची तिकीटे काढली आणि हा विचार आपल्याला आत्ता सुचला.

वर त्या उस्तादला नोटांचे पुडके दिले. मोनालिसा, आत्महत्या करण्याचीही पात्रता नाही तुझी!

सगळं रेजिनावर सोपवून तू एक हाऊसवाईफ बनून राहा! पण तीही अक्कल नाही आहे तुला! एक पोळी लाटली नाहीस आजवर!

पण... पण असे... असे कसे होईल पण??

उस्तादने अगदी तेच नांव का सांगावे?? आणि मुख्य म्हणजे... आपल्याला इतकी प्रामाणिकपणे मदत करणार्‍या रणजीतला तो स्वतः मरणार आहे हे समजल्यानंतर त्याने आपल्याला असे खोटेनाटे सांगून का फसवावे?? त्याने तर बझट फुकट दिल्या होत्या आपल्याला!

घोळ! मोठा घोळ आहे काहीतरी! अजूनही आपल्याला काहीच कसे समजत नाही?

जितकं सुलभ वाटतं तितकी दलदल वाढतेच कशी काय?

हे काय आहे? हं! ते फोटो! हेही आपण नाकारले होते. काय आहे या फोटोंमध्ये? अंहं! काहीही विशेष नाही.

पोतं उपडं केलं तेव्हा फक्त एक टुथपिकच्या साईझची स्टीलची कांडी खाली पडली अन त्यात एक छोटासा कागदाचा तुकडा अडकलेला होता. त्या कांडीला पुढे लहानसं फ्लॅट आकाराचं पातं होतं! इतकं लहान पातं कसल्या कामाचं असेल असा विचार करत मोनाने कागद उघडला.

'इससे निकालो...'

काय 'इससे निकालो'????

लोलक??? कशाला?? आत विष असलं की मी पकडले जाणार! गेलं खड्यात! मी नाही लोलक उघडणार पुण्याला गेल्यशिवाय!

तरीही मोह होऊन मोनाने एक लोलक हातात घेतलाच. सर्व बाजूंनी फिरवून पाहिला. एकाही बाजूला त्या पात्याने उघडण्यासारखे काहीही नव्हते. सरळ दिसत होते. लोलक फोडायलाच हवा आहे. फोडला तरच आत काय आहे हे कळेल! जे काय आत आहे ते आत कसे काय गेले असेल?? बराच वेळ प्रकाशात लोलक निरखून बघत होती मोना!

काही कळत नाही. पण पुण्याला गेलो की सगळे लोलक फोडून टाकू. बघूच काय निघते आतमध्ये!

पण हे पातं कशाला आहे मग इतकसं टीचभर! याने 'काय निकालो' म्हणतोय तो???

आणि 'जे काय निकालो' म्हणतोय ते त्या उस्तादने आधीच काढून पाहिले नसेल कशावरून??

मात्र मोनाने आता पुन्हा सर्टिफिकेट्स हातात घेतली. प्रकाशात पाहिली तर ट्रान्स्परन्ट वाटली. ठेवून दिली. फोटो मात्र अर्थातच जाड असल्याने पारदर्शक नव्हतेच! मग एक फोटो तिने हातात घेतला. फ्लाईटमध्ये किंवा ट्रेनमध्ये जसे बटर, जॅम एका पाऊचमध्ये देतात, ज्याच्यावरची पातळ पट्टी नखाने ओढून काढावी लागते, तसे मोनाने ते पाते फोटोच्या कडेवर ठेवले. रात्रीचे अकरा ते मध्यरात्रीचे पावणे दोन! अव्याहत मोना प्रत्येक फोटो तसा सोलून पाहात होती. चौसष्ट फोटो होते ते! बहुतांशी सिमल्याच्या निसर्गसौंदर्याचेच! आणि बेचाळिसाव्या फोटोच्या वेळेस ते जाणवले...

... त्या फोटोची एक बाजू आधीच जराशी उकलल्यासारखी झालेली होती... पाते अगदी सहज फिरले त्यावरून...

... लेटर!

पावणे दोन वाजता मोनालिसाने बेडवरच बसल्या बसल्या एक लहानशी उडी मारली.

लेटर तिलाच उद्देशून होते. रणजीतने लिहीलेले.

मोनालिसा,

पहिल्यांदा रत्नाकर हा सुबोधचा बाप असेल हा विचार डोक्यातून काढून टाक! उस्तादचा घोळ व्हावा म्हणून मी त्याला तसे सांगीतलेले आहे. जगमोहनच्या 'माझ्या एन्काउन्टरवरच्या अ‍ॅप्लिकेशनचा' शासन विचार करते आहे अशी आतली बातमी समजली आहे. मी किती दिवस असेन माहीत नाही. त्यापुर्वी, मला नव्याने माहीत झालेल्या गोष्टी तुला सांगत आहे. या तुझ्यापर्यंत पोचल्या तर मी आणि तूही सुदैवी! उस्तादने तुला फोनच केला नाही, किंवा तुला ते पाते मिळालेच नाही किंवा हा फोटो सोलावा हेच तुझ्या मनात आले नाही तर निरुपाय आहे. अर्थात, हे तू वाचत असशील तर तू आधीच सुदैवी ठरली आहेसच! प्रश्न इतकाच आहे, की हे तूच वाचत आहेस की दुसरे कुणी हे मला माहीत होणार नाही कदाचित! त्यामुळे मी मात्र दुर्दैवी असू शकेन!

लोहियांचे वडील माझ्या आईच्या माहेरी कामाला होते. त्यांचा मुलगा चांगला शिकतोय हे पाहून माझ्या आजोळच्या लोकांनीच त्यांना इंजीनीयर बनवले त्या काळात! सगळा खर्च त्यांनीच केला. माझी आई तर त्यांना मानसपूत्रच मानायची. मी कधी अहमदाबादला वगैरे गेलो तर मला तो कधीच दिसायचा नाही कारण त्याचे वडील कामाला होते. तो शिकायला बाहेर असायचा! माझ्यापेक्षा दोन तीन वर्षांनी लहानच आहे तो! त्याच्या वडिलांना मी आणि मला ते अतिशय चांगले माहीत होते. पण मी लहान होतो. मला हे माहीतच नव्हते की यांच्या मुलाच्या शिक्षणाचा वगैरे खर्च माझे आजोबा करतात.

माझ्या आईनेच मोहनचाचांशी रत्नाकरची गाठ घालून दिली होती. पण रत्नाकर वाईट स्वभावाचा होता. त्याला सगळंच हवं होतं! ज्याने उपकार केले त्या माणसालाच नष्ट करण्याच्या प्रवृत्तीचा होता तो!

रत्नाकरने मोहनचाचांचे पुण्याचे युनिट भरभराटीस आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मोहनचाचांनी हळूहळू त्यांना भागीदारीही द्यायला सुरुवात केली. मात्र रत्नाकरला सगळेच हवे होते. मोहनचाचांनीच उपकार केलेले असूनही मोहनचाचांनाच संपवून ते युनिट घशात घालायचे होते त्याला! इतकेच काय तर माझ्या आईशीही त्याचे जोरदार भांडण झाले होते. कारण तो माझ्या वडिलांच्या इस्टेटीत हक्क मागत होता. पण अर्थातच, मोहनचाचा चांगले असल्यामुळे त्यांचा रत्नाकरवर कायम विश्वासच होता.

माझ्या वडिलांनी शोधून काढलेली बझट ही गोळी रत्नाकरचे डोळे दिपवून गेली. त्याला तो फॉर्म्युला हवा होता. पण त्याला तो अजूनही मिळालेला नाही. मात्र त्याने पाकिस्तानातील एका गुन्हेगार टोळीशी कसातरी संबंध प्रस्थापित केला होता. ती गोळी तो त्या टोळीला विकणार होता. इन टर्न, ती गोळी पाकिस्तान आर्मीकडे जायची शक्यता होती. भारतीयाने भारतासाठी लावलेल्या शोधाचा शत्रूला असा संहारक उपयोग होण्याची शक्यता आहे हे माझ्या वडिलांना ज्ञातही नव्हते. ते त्या गोळिवर बॅन येऊ नये म्हणून प्रयत्नशील होते.

आश्चर्य म्हणजे सुबोधही रत्नाकरसारखाच हरामखोर वृत्तीचा होता. दोघांचे एकमत झाले होते की ती गोळी त्या टोळीला विकायची आणि जमल्यास फॉर्म्युला शोधायचा! पण माझे वडील इतके हुषार होते की त्यांनी तो फॉर्म्युला कुठे आणि कसा लिहीला आहे हे त्यांनाच माहीत होते.

कसे ते माहीत नाही, पण माझ्या आई वडिलांच्या आणि तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तब्बल बारा वर्षांनी मोहनचाचांना अचानक समजले की या दोघांनी मिळून ऑलरेडी काही गोळ्या त्या लोकांना विकलेल्या आहेत. बहुधा मोहनचाचांना काहीतरी कागदपत्रे किंवा फोटो किंवा संदेशांची देवाणघेवाण प्राप्त झाली असावी. दरम्यान मीही तोच फॉर्म्युला शोधायच्या मागे होतो. कारण तो फॉर्म्युला शासनाने बॅन केलेला असल्यामुळे शासनाकडून मला तो मिळणे शक्यच नव्हते. शोधावाच लागणार होता. माझा फॉर्म्युला शोधण्यातील हेतू होता तुझ्या माधुरीचाचीला मारायचा! आणि तेव्हा जर मला रत्नाकर आणि सुबोधच्या या कृष्णकृत्यांबाबत समजले असते तर त्यांनाही मी मारायला बझट वापरली असती. पण तेव्हा मला ते माहीतच नव्हते.

मला तो फॉर्म्युला मिळाला. माझ्या वडिलांनी अतर्क्य पद्धतीने तो लिहून ठेवला होता. आमच्याकडे असलेल्या एका झुंबराचे लोलक वडिलांनी लॅबमध्ये कशाला ठेवले असतील ते मला समजतच नव्हते. जवळपास शंभर एक लोलक होते लॅबमध्ये! मी ते सगळेच जवळ ठेवलेले होते. वडिलांची सर्व कागदपत्रे माझ्याकडे होती. कशातही काहीही लिहीलेले नव्हते बझटबद्दल! 'बझट' हा शब्दच नव्हता कोणत्याही कागदावर! मात्र एका कागदावर नुसतेच आकडे होते. १, ६, २३, १६, ४५, ११ वगैरे असे! कोणत्याही क्रमाने ते समजण्यासारखे नव्हते. त्या आकड्यांमध्ये काही शिस्तच जाणवत नव्हती. मी अनेक बेरजा, वजाबाक्या, गुणाकार, भागाकार केवळ काल्पनिक पद्धतीने केले. पण कोणत्याही नियमानुसार दोन आकड्यांच्या पुढचा आकडा हवा तो यायचा नाही. या आकड्यांचा मी लोलकांशी संबंध जोडायला हवा आहे हेसुद्धा मला सुचू शकणार नव्हते कारण माणसाची कल्पनाशक्ती तेवढी नसतेच!

मात्र एक दिवस चमत्कारच झाला. मी सहज म्हणून ते लोलक माझ्या मनालीतील घरातील बेडवर ठेवले. अचानक कावळे ओरडायला लागले. मला लक्ष देण्याइतपत ती बाब महत्वाची वाटली नाही. पण त्यानंतर मी सहज लोलक आत ठेवायला लागलो तशी कावकाव बंद पडली. अचानक मला त्यात परस्पर संबंध असेल की काय असे वाटून गेले. म्हणून मी ते पुन्हा पलंगावर ठेवले. तर खरच पुन्हा कावळे ओरडायला लागले. मला मजा वाटली म्हणून मी ते लोलक सरळ अंगणात नेऊन ठेवले. अक्षरशः कर्कश्श कावकाव करू लागले कावळे!

मी एक लोलक फोडून पाहिला. त्यात काहीच नव्हते. मला वाटले उगाचच आपण लोलक फोडला. झुंबराबरोबर आलेल्या लोलकाच्या आत नंतर कसे काय काही घालता येईल? पण एक गोष्ट मात्र मला दिसून आली. तो लोलक फोडल्यावर तर कावळे अधिकच ओरडू लागले होते. हा प्रकार काही समजेना!

असाच एक दिवस मी पुन्हा कागद तपासत असताना एका ठिकाणी अस्पष्टपणे लिहीलेले दिसले.

100 पिसेस = टेन सेट्स

मी लोलक मोजले. खरच शंभर होते. बहुधा मी कसलातरी एक सेट वाया घालवला इतकंच मला समजलं! मी वडिलांची ती वही अक्षरशः डोळ्यात तेल घालून वाचली. आणि फॉर्म्युला मिळाला. प्रत्येक पानावर खाडाखोड होती. किमान सात आठ वेळा तरी! इतर कागदपत्रांमध्ये विशेष खाडाखोड नसायची! ती वही सतरा प्रकारांनी वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं! प्रत्येक पानावरची जी अक्षरे खोडून पुन्हा लिहीली होती ती अक्षरे त्याच क्रमाने जर वरपासून खालपर्यंत वाचली तर एक शब्द तयार होत होता. हे पहिल्या पानावर झाले म्हणून दुसरे पान पाहिले तर त्यावरही झालेले होते. तो शब्द वेगळा होता. तिसर्‍याही पानावरच्या खोडलेल्या अक्षरांपासून एक शब्द! दोनशे पानी वहीची एकशे त्रेसष्ट पाने लिहीलेली होती. आइ त्या सर्व पानांवरचे शब्द मी जेव्हा लिहून घेतले तेव्हा चक्क चोवीस वाक्ये तयार झाली होती. ही वाक्ये म्हणजेच फॉर्म्युला होता. त्या घटकांचे मिलीग्रॅममधील प्रमाण म्हणजे दुसरीकडे लिहीलेले आकडे होते!

या वाक्यांमध्येच फॉर्म्युला तयार होत असेल तर लोलकांचा संबंध काय ते मला समजत नव्हते. पण बराच वेळ विचार केल्यावर लक्षात आले. कोणत्यातरी पर्सनल फाईलमध्ये, ज्यात महिन्याचा हिशोब वगैरे असायचा, कोणत्यातरी फ्रेमवाल्याची बिले होती. आता मी ती फाईल शोधली. त्या बिलांवर कसलाही उल्लेख नसला तरीही एकाच ठिकाणी शंभर पिसेस असा उल्लेख मात्र होता.

मी त्या फ्रेमवाल्याकडे गेलो. त्याला त्यातला एक लोलक दाखवला. आधी तो काही बोलेना! पण नंतर त्याने धाक दाखवल्यावर कबूल केले. तो म्हणाला यात साहेबांनी काहीतरी घातलेले होते. मी लोलक माझ्याकडच्या हिरकणीने कापून पुन्हा बेमालूम चिकटवलेले आहेत.

काय घातले होते हे मात्र त्याला माहीत नव्हते.

पण मला माहीत झाले ते! बझटमधे असलेल्या सोळा इन्ग्रेडिएन्ट्सपैकी फक्त एकच असा असतो जो मृत्यूस कारणीभूत ठरतो आणि त्याच घटकामुळे बझट बॅन झाली. कितीही प्रयत्न करूनही त्या घटकाला पर्यायी घटक वडिलांना देता आला नाही. इतर सर्व पंधरा घटक हे 'झालेला मृत्यू नैसर्गीक होता' हे सिद्ध करणारे परिणाम करतात. त्यामुळे तो घटक वडिलांनी लोलकांमध्ये भरून ठेवला. आता लोलकांचा कुणालाच संशय येणे शक्य नव्हते. हा घटक हवाबंद अवस्थेत पॅक केला तर वायूरुपात राहतो. वापर करायचा असल्यास लोलक ड्राय आईसच्या रेफ्रिजरेटरमध्ये किमान एक दिवस ठेवावा लागतो, मग तो घटक सॉलिडिफाय होतो. सॉलिड स्वरुपातील तो घटक केवळ अर्ध्या मिनिटात उडूनही जातो. मात्र तो जर अती थंड बेव्हरेजमध्ये मिसळला तर त्यात काही काळ टिकून राहतो व माणसाच्या शरीरात जातो. बझट या गोळीच्या फॉर्ममध्ये तो फार तर महिनाभर राहून संपत संपत जातो. मी तुला दिलेल्या गोळ्या निरुपयोगी झालेल्या होत्या आणि आता सुबोधकडे आहेत! मूर्ख आहे तो सुबोध! होय, दिल्लीतील तुझ्या चौकशीनंतर पोलिस खात्याला पैसा चारून त्याने त्या गोळ्या हस्तगत केल्या, पण त्या निरुपयोगी आहेत हेच त्याला माहीत नाही. आणि पोलिस खात्यातील भ्रष्टाचार कोणत्या अवस्थेला पोचला आहे ते दिसतेच आहे.

तर तात्काळ मृत्यू देणार्‍या पोटॅशियम सायनाईडपेक्षा हा घटक हळू काम करतो. पण या घटकाने आलेला मृत्यू भयानक असतो. म्हणजे इतर पंधरा घटक न वापरता फक्त हाच घटक वापरला तर! भयानक मृत्यू म्हणजे असा की माणसाच्या सर्व शिरांमध्ये पोचून हा घटक रक्ताच्या उष्णतेमुळे वायुरुप घेऊ लागतो आणि भयानक प्रेशर निर्माण होते अंतर्गतरीत्या! शिरा अक्षरशः फुटू लागतात. असह्य वेदनांनी माणूस तडफडू लागतो. रक्तस्त्राव इतका वाढतो की मेंदूचे कार्य केवळ चार ते पाच मिनिटात थंडावते. मेंदू मेल्यावर मिनिटभरातच हृदयही मरते. मात्र, फक्त हाच घटक वापरून झालेला मृत्यू हा विषबाधा या सदराखाली गुन्हा ठरू शकतो.

महत्वाचे असे की इतर पंधरा घटकांपैकी सहा घटक असे आहेत जे गरम अन्नामध्येही काही काळ हा घटक शाबूत ठेवण्यास सहाय्यभूत ठरतात. आणि बाकीच्या नऊ घटकांमुळे 'तो खून होता' हे समजू शकत नाही. इव्हन कित्येकदा डॉक्टर्सनाही! आणि याच घटकांमुळे पाच मिनिटात होऊ शकणारे मरण पंधरा मिनिटे घेते.

नव्याण्णव लोलक तुझ्याकडे पोचले असतील. यातील तो महत्वाचा विषारी घटक हा फुरसे या अत्यंत विषारी सापापासून बनवलेला असल्यामुळेच कावळे ओरडतात.

मला फॉर्म्युला मिळाला असावा अशी शंका सुबोधला असणे याचा मला अंदाज होता. पण रत्नाकर लोहियाही त्यात गुंतलेला आहे हे मला माहीत नव्हते. हाच फॉर्म्युला मिळावा म्हणून मला जगमोहनकरवी ते सतत त्रास देत होते दोघेही! माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांच्याकडच्या बझट संपलेल्या असाव्यात विकून! आता अंडी विकायच्या ऐवजी एकदम कोंबडीच विकून नवकोट नारायण व्हावे असा त्यांचा विचार असावा!

मात्र... या सगळ्यात एक महत्वाचा तिढा आहे.

हा जो तिढा आहे तो नीट वाच!

मोहनचाचांकडे असा काहीतरी पुरावा आहे ज्या योगे या दोघांना समाजकंटक म्हणून फाशी दिले जाईल! तो पुरावा नेमका काय आहे ते मला तरी माहीत नाही. मोहनचाचा तर गेलेच! पण तो पुरावा तुमच्याच घरात असण्याची शक्यता आहे. आणि तो तुमच्याकडे आहे म्हणूनच ते अजून तुला हात लावत नाही आहेत. तुझ्या अपरोक्ष कधी ना कधी ते त्य घराची झडती घेत असतीलही! किंवा त्यांचा एखादा माणूसही तिथे तुझा नोकर म्हणून वावरत असेल! तुला कळणारही नाही ते! एकदा ती गोष्ट त्यांच्या हाती लागली की तुझा खेळ खलास! ती जी काय गोष्ट आहे ती तुझ्याकडे आहे तोपर्यंत ते फक्त याच कारणासाठी तुला इजा करत नाही आहेत की वडिलांसारखाच मृत्यू मुलीलाही कसा आला याचा संदेह निर्माण होऊन तुमच्या घराची पोलीस तपासणी करतील आणि त्यात पोलिसांना जर ती गोष्ट मिळाली तर याच दोघांचे भांडे फुटेल! म्हणून ते तुला बिचकून आहेत.

लक्षात ठेव, तुझ्या घरात तू अत्यंत विश्वासार्हच माणसे ठेव! सर्व घर स्वतः तपास! बावळटासारखी घळेपणा करू नकोस! रत्नाकर आणि सुबोधबरोबर कुठेही काहीही खाऊ किंवा पिऊ नकोस!

मी तुझी मदत करण्याचे कारण हे आहे की सध्या तरी तुझे आणि माझे शत्रू एकच आहेत. मला झालेला भयंकर मनस्ताप आणि शारिरीक छळ यामुळे मी सुबोध आणि रत्नाकरचा जीवही घ्यायला तयार आहे. पण त्यांची शक्ती जास्त आहे. आणि ते तुझ्याही जीवावरच उठलेले आहेत. म्हणून मी तुझ्या माद्यमातून स्वतःचा सूडही उगवून घेण्यासाठी तुला मदत करत आहे.

फॉर्म्युलाही दिला आहे मी तुला! सुबोधच्या बारावीच्या सर्टिफिकेटवर आहे तो! ते मी मुद्दाम बनवून घेतलेले आहे सर्टिफिकेट! त्यातील वरपासून बोल्ड असलेली अक्षरे जर एकत्र लिहीलीस, म्हणजे डावीकडून उजवीकडे व वरून खाली अशा क्रमाने, तर तुला फॉर्म्युला मिळेल.

मात्र या गोळ्यांचा उपयोग तू अशा नराधमांना मारण्यापुरताच मर्यादीत ठेवशील अशी मला आशा आहे. स्वार्थी बनू नकोस! नाहीतर माझी छोटीशी बहीण आहेस याचा मला पश्चात्ताप होईल!

मी जगलो तर इथेच पुन्हा भेटू! तू मेलीस तर वर भेटू! मी बहुतेक चित्रगुप्ताच्याच दरबारात रॉयल स्टॅग घेत बसेन! कारण मला स्वर्गात पाठवायचे की नरकात हे तू इथे काय करतेस त्यावर ठरणार आहे. आणि तू वर आलीस तर येताना टीचर्स घेऊन ये बरोबर! चांगली असते ती!

बाय!

----- रणजीत शामताप्रसाद श्रीवास्तव.....

(टीप - उस्तादच्या आईने मरायच्या आधी मला हे सांगीतले. ती पंडीत बाई होती. नवरा मेल्यावर वेडसर झाली इतकेच!)

पहाटेचे तीन!

टक्क डोळ्यांनी मोनालिसा पत्राकडे बघत बसली होती. आमुलाग्र बदल झाला होता तिच्यात! संपूर्ण इतिहास आता तिच्या लक्षात आलेला होता. लोहियांची पातळी किती हीन आहे हेही समजलेले होते. रणजीत किती अफाट बुद्धीमान होता हेही समजलेले होते.

आणि मनातल्या मनात प्रतिज्ञाही केली होती तिने! या सर्वांची लायकी बझटनेच मरण्याची आहे... किंवा जमावाने दगडाने ठेचून मारावे यांना! अशी लायकी आहे. आपण उगाच क्षमाशील वगैरे व्हायचे नाही. जळवा आहेत या जळवा! हेलिक्सला लागलेल्या! आपल्या आणि डॅडच्या आयुष्याला लागलेल्या!

आपण सिवाला इतके पैसे उगाच देत आहोत याचीही जाणीव झाली. कारण सिवाने सांगीतलेल्या माहितीपेक्षा रणजीतकडची ही जिवंत माहिती हजारपट महत्वाही होती.

मेहरांना आपल्या घरातील फोन पहाटे चार वाजता वाजतोय हे लक्षात यायलाच दहा सेकंद लागले. डोळे चोळत त्यांनी घाबरूनच फोन घेतला तर मिस गुप्ता..

मेहरा - येस मिस गुप्ता???

मोना - अं.. ड्राय आईस रेफ्रिजरेटर... मिळतो का???

मेहरा - काय????.... हो... मिळतो... का???

मोना - हवाय... लगेच....सकाळी अ‍ॅरेंज कराल का??

मेहरा - हो?? करेन की?? लोहिया साहेबांनाही दिला होता आपण तसा एक!

गुलमोहर: 

अतिशय वेगवान आणि सुरेख झाला आहे हा भाग. रेजीनाच्या लवस्टोरी पेक्षा मोनाचे डावपेच आणि कथेतील रहस्य फारच चांगले झाले आहेत असे मला वाटते.

हा भाग जबरदस्त!!!

बेफिकीर,

अत्यंत सुसंगत, कोठेही विस्कळीतपणा जाणवत नाही.

खरच . पण मोना ने bazat न वापरता आपला सूड घेतला पहिजे.
कारण तिच्या कडे intelligence आणी Power आहे.
हे माझे मत अहे.
मी नेहमी सगळे भाग वाचते.
पण आज गोष्ट वेगळॅ वळण घेउ बघतिये, म्हणून प्रतिसाद दिला.

रेजीनाच्या लवस्टोरी पेक्षा मोनाचे डावपेच आणि कथेतील रहस्य फारच चांगले झाले आहेत असे मला वाटते.>> अनुमोदन...

सुसंगत रीतीने कथा पुढे पुढे पळतीये.. कथेतील रहस्ये मति गुंगून टाकणारे आहे..दर वेळी पुढे काय होणारे मोनाचं अशी काळजीच लागून राहीलीये Happy

बेफिकीरजी तुम्ही ज्या अवस्थेत कथा लिहीत आहात त्याबद्दल तुम्हाला सलाम...
आता कथेबद्दल बोलायचे झाले तर मला व्यक्तीश असे वाटत आहे की यात ही गुंतागुंत विनाकारण निर्माण झाली आहे. म्हणजे आधी असे वाटत होते की सुबोध, लोहिया हे ग्रे शेड कॅरॅक्टर आहेत. म्हणजे अतिमहत्वाकांक्षी असल्याने मोहन गुप्तांना फसविणारी आणि मग या चौकडीचा मोना तिच्या पद्धतीने कसा बिमोड करते हे वाचायला जास्त मजा आली असती.पण आता लोहीया, सुबोध हे सरळ सरळ समाजकंटक झालेत..एकदमच खलनायक...
मान्य आहे केवळ सत्तास्पर्धा दाखविण्यापेक्षा त्या नातेसंबंधाची गुंतागुंत दाखविल्यामुळे कादंबरीला एक वेगळे परिमाण मिळाले आहे. पण ही तारेवरची कसरत आहे. दोन्ही गोष्टी समतोल राखल्या तरच कादंबरीत बहार येईल. आत्तापर्यंत तुम्ही अतिशय उत्कृष्टरित्या हे केलेले आहे. आता मात्र थोडे अतिरंजित वाटले..
विशेषत सुबोध आणि लोहिया यांनी बझटची माहीती पाकिस्तानला कळविणे....
हे प्रकरण एकदम आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेत तुम्ही...झेपले नाही..

दबंग,

अत्यंत कुजकट मतप्रदर्शन.

मी बेफिकीर यांचा चाहता नाहीये पण ज्या वेगाने ते लिहीतात ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
ते ज्या मनःस्थितीतुन जात आहे ते पाहता, तुमची सभ्यतेची पातळी सोडुन केलेला प्रतिसाद, हीन मनोव्रुत्तीचे लक्षण आहे असे मला प्रकषाने जाणवले.

दुखा:तुन बाहेर निघण्याचा प्रत्येकाचा मार्ग वेगवेगळा असतो.,कोणी काय करावे हे कोणी ठरवू नये.

अश्या परिस्थितीत शत्रूवर हल्ला करण्याआधी सुजाण व्यक्ती हजारदा विचार करते.

प्रफुल्लजी अनुमोदन...पण माझा असा अंदाज आहे की मुद्दामहूनच हे हलकट पोस्ट टाकण्यात आले आहे...
हा आयडी दोन वर्षे जुना आहे..आणि त्यात फक्त दोन प्रतिसाद दिले आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की केवळ बेफिकीर व त्यांच्या वाचकांना चिथावण्यासाठी हे वाक्य टाकले गेले आहे..आपण चिडलो तर त्याचा अथवा तिचा हेतू साध्य होणार आहे...त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रीया देऊन तिला अपेक्षित असे वर्तन करू नका. आपण चिडावे असेच त्या व्यक्तीला वाटत आहे. या बालीशपणाकडे पूर्णत डोळेझाक करावी....

आशु,
मी त्या व्यक्तीला प्रतिसाद देत नाहीये, पण बेफिकीर तुम्ही अशा प्रतिक्रीयांकडे सपशेल दुर्लक्ष करा.

आशूचॅम्प - काय बोलू? मनापासून धन्यवाद असे छापील उत्तर देणे अयोग्य आहे. आपण मला भेटलेला आहात, माझी आई तेव्हा मागे बसलेलीही होती. ती गेली हो! आणि मी अजून धड रडलेलोही नाही. हे असे प्रतिसाद! असो!

Even this could be viewed as a marketing plan.

====================================================

दबंग - जमीनीवर आणलंत मला! खरच थॅन्क्स! एक विनंती करतो आहे. समजा तुम्हाला पुन्हा असे वाटलेच, की मी या तेरा दिवसांमध्ये, म्हणजे पुढच्या बुधवारपर्यंत काही लिहायला नको आहे, तर निदान....

.... तसे जाहीररीत्या मेन्शन करणे रोखाल का??? इट रिअली हर्ट्स!

=================================================================

-'????'!

.

दबंग | 30 November, 2010 - 20:54 नवीन
प्रसिद्धीसाठी हपापलेला लेखक , निदान १३ दिवस तरी थांबायचे होते असे मला वाटते

जाहिर शब्दात म्हणतो अतिशय हिण हिणकस आनि नीच प्रतिसाद तुम्हाला नक्कि काय दर्शवायचे आहे हो दबंग तुम्ही ह्या संकेतस्थळावर दोन वर्षे आहात त्यात तुमच्या प्रतिक्रिया किती तर दोन हि असेल म्हणा तिसरी वा चवथी पण अस लिहिण कितपत योग्य वाटत स्वतः काय लिहिलत ह्या दोन वर्षात

लेखन
अजून यांनी काही लेखन केले नाही

अजून यांनी काही लेखन केले नाही

अहो तुमच बघाना राव काहिही न लिहिता असे हरामखोर निच प्रतिसाद देता पहिल स्वताच अस काही तरी सकस लिहा मग बोला समजल नको तिथे नाक खुपसु नका

@अ‍ॅडमिन माझ्या प्रतिसादातील एखाद वाक्य पटत नसेल तर माझ येथील खात गोठवलत तरी हरकत नाही

बेफिकीरजी, तुम्ही लिहीले नसते तरच तुमच्या आईला खटकले असते --- नक्कीच ती तुमचे स्फुर्तीस्थान होती, आहे --- आणि राहील

आता रहाता राहीला प्रश्न विकॄत प्रतिक्रियेचा --- त्यावर प्रतिसाद तुम्ही लिहावा ही लायकी सुध्दा नाही त्या व्यक्तीची

पु.ले.शु.

सुप्रभात ,
कोन काय म्हनतो ते महत्त्वाच नाहि. दुख व्यक्त न करता इतरान्चे मनोरन्जन करने हे खुप धैर्याचे कम आहे. खुप सुन्दर कथानक आहे.

नमस्कार बेफिकीर,
हे तुमच्या साठी लिखान आहे का ?
नाही, नक्कीच नाही. हा तुमचा धर्म आहे, नैसर्गिक स्वभाव आहे आणि जगण्याची उर्जा आहे.
आजवर तुमच्या जगण्याच्या दोन उर्जा होत्या १) लिखाण २) आई
आता मात्र एक आयुष्यातुन वजा झालिये. आता उरते फक्त लिखान.

आई,

चुकलो...>> हे का बरं? तुमच्या आईना सुद्धा माहित होतं. आपल्या नंतर आपला मुलगा सुखदु:खाच्या काळी लिखाणाच्या हृदयाला बिलगुन रडेल व लिखाणाच्याच मांडीवर डोक ठेवुन विश्रांती घेईल. आता लिखाण हे नुसत लिखाण न उरता तुमच्या पुढच्या आयुष्यात आईची जागा घेतोय. कारण आजवर तुम्ही दोन ठिकाणी व्यक्त व्हायचे. एक लिखाण, दुसरी आई. आता मात्र तुम्ही फक्त ईथेच व्यक्त होणार आणि हेच सत्य आहे. थांबु नका, स्वतःला त्रास करुन घेऊ नका.

उलट तुम्ही लिखाण बंद केल्यास आईचा आत्मा अस्वस्थ होईल. पोरानी जगण्याचा मार्ग बदलायला नको होतं असं वाटेल.

जास्त काय लिहु, तुम्ही सुज्ञ आहात.

बेफिकीर | 1 December, 2010 - 00:59 नवीन
आई,

चुकलो...

******************************

बेफिकीरजी,
डोळे नम झालेत माझे. अंगावर अक्षरशः शहारे आलेत. तुमची काय मनस्तिथी असेल याची कल्पना आली.

Just Ignore It.

बेफिकीरजी,

तुमच्या लिखाणाचे कौतुक करावे तेवडे कमी आहे.
किति detailing.....amazing ahat tumhi......

इतर....आपण आपल्या नावा प्रमाणेच राहा.....बेफिकीर...:)

बेफिकीरजी,

खरोखर तुम्ही जर घरात बसुन रडत राहीला असता तर आपल्या आईला किती त्रास झाला असता या गोष्टीचा विचार करा. नकोत्या गोष्टी बद्द्ल विचार करणे सोडुन दया. तुमच्या समोर पाण्याचे दोन ग्लास टेवले आहे. त्यापै॑की एकात स्वच्छ पाणी आहे दुसरयात गढळ पाणी आहे तर तुम्ही कोणते पाणी पिणार. तसेच इथे चा॑गले प्रतिसादाचा विचार करा वाईट प्रतिसादाचा विचार करु नका हि नम्र वि॑नती.
मला माफ करा मी लहान असुन तुम्हाला काही सा॑गते. प्रत्येकाची आपआपले दुख विसरायची पद्द्थ्त वेगळी असते. आपले दुख विसरुन नव्याने जगण्यासाठि तयार व्हायला हवे.

आयुष्य हे सु॑दर आहे.
आयुष्याच्या वाटेवर सुख दुखाचे खा॑बे उभे असतात त्याना॑ पार करुन आपल्याला पुधे जावे लागते.

मला खात्री आहे की केवळ बेफिकीर व त्यांच्या वाचकांना चिथावण्यासाठी हे वाक्य टाकले गेले आहे..आपण चिडलो तर त्याचा अथवा तिचा हेतू साध्य होणार आहे...त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की या पोस्टवर कोणतीही प्रतिक्रीया देऊन तिला अपेक्षित असे वर्तन करू नका. आपण चिडावे असेच त्या व्यक्तीला वाटत आहे. या बालीशपणाकडे पूर्णत डोळेझाक करावी....

एकदम बरोबर....कारण सन्डास च्या टाकि मध्ये दगड टाकल्या वर बुड्बुडे येतात
व घाण वास येतो ..

बेफिकीरजि, तुम्ही अशा प्रतिक्रीयांकडे सपशेल दुर्लक्ष करा.

अरेरे!!!! किती ती विघ्नसंतोषी मनोवृत्ती Sad देव ह्या लोकांना सुबुद्धी देवो!!!!
बेफिकीरजी, असल्या प्रतिक्रियांकडे दुर्लक्ष करुन तुम्ही लिहित रहा, ही कळकळीची विनंती...

बेफिकिर छान वाटला आजचा भाग ...
<<रेजीनाच्या लवस्टोरी पेक्षा मोनाचे डावपेच आणि कथेतील रहस्य फारच चांगले झाले आहेत असे मला वाटते.>> मला पण हेच जाणवले...

आता राहिला प्रश्न त्या प्रतिसादाचा, मला वाटत ईथे प्रत्येकाने त्या व्यक्तीची लायकी दाखवलीच आहे.

तुम्ही या अशा व्यक्तीच्या प्रतिसादाला दादही देऊ नये असे मला प्रामाणिकपणे वाटते, त्यामुळे तुम्ही लिहलेली .... आई... चुकलो ... हा प्रतिसाद तुम्ही डिलीट करावा हेच वाटते.

अहो नुसत ईतरांना दाखवायच म्हणून किंवा समजाला मान्य म्हणून १३ दिवस शोक करून काय होणार आहे. उलट आम्हाला तुमचा अभिमान वाटतो या ओढवलेल्या प्रसंगातही तुम्ही लिखाण केलेत याचे. Happy

बेफिकिर , आई सारखे दैवत या जगात नाही, मग काय झाले तुमची आई या जगातून गेली , हे तर केव्हातरी होणारच होते ना, ती तुमच्या मनातून तर कधीच जाणार नाही ना.. मग झाले तर.

पु.ले.शु. Happy

Pages