नाईची पानं आणि निर्गुंडीची पानं म्हणजे काय आणि कशी दिसतात?

Submitted by सावली on 27 November, 2010 - 09:37

नाईची पानं आणि निर्गुंडीची पानं म्हणजे काय आणि कशी दिसतात?
याची माहिती कुणाला असेल तर प्लिज देणार का?

यांना बोली भाषेत काही वेगळे शब्द आहेत का?
दुकानात यांची पुड , चुर्ण असं काही मिळतं का?

धन्यवाद Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्गुंडीची पानं कि निरगुडीची पान ??

निरगुडीच्या पानाचा उपयोग (माझ्या माहितीप्रमाणे) मुका मार लागला असेल तर सुज ओसरण्याकरीत हा पाला थोडा गरम करून बांधतात.
निखार्‍यावर याची पाने ठेवली असता धुराने डास घरात येत नाहीत.
अजुन काही माहिती/उपयोग असतील तर जाणकारांनी प्रकास टाकावा. Happy

हा निरगुडीच्या पानाचा फोटो.

निरगुडीची विकिपिडियावर मिळालेली लिंक : http://en.wikipedia.org/wiki/Vitex_negundo
दुकानात सामान्यतः ह्या वनस्पतीचं तेल मिळतं. शेताच्या बांधाला ही वनस्पती मोठ्या जोमाने फोफावताना दिसून येते. रस्त्याच्या कडेलाही निरगुडीची झुडुपे आढळतात. पानं हातात चुरडली की त्यांचा गंध हातालाही येतो.

याला दगडिचा पाला पण म्हणतात. वरच्या फोटोत आहेत ती पांढरी. याची एक काळी जात पण असते. पाने काळसर आणि पानांचा कडा किंचीत दातेरी असतात. याला निळ्या रंगाची फूले येतात. त्याचा पण एक मूख्य तूरा असतो आणि बाजूला दोन चार छोटे तूरे असतात. याचा वास उग्र असला तरी तो छान असतो (तूलना शेवंतीच्या पानाच्या वासाशी करता येईल.)

धन्यवाद. जिप्सी तुम्ही दिलेली पानं आणि अरुंधतीच्या लिंकमधली वेगळी दिसताहेत. दिनेशदा म्हणाले तशी ती दुसरी जात असावी का?
याची चुर्ण बाजारात मिळू शकतात का?