''प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धक आणि विजेते..... मायबोलीकरांची बाजी''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 20 November, 2010 - 12:13

स्टर माझा तर्फे,ब्लॉग लेखकांसाठी,प्रिय ब्लॉग माझा-३ स्पर्धा घेण्यात आली होती. नुकतेच याचे विजेते जाहीर करण्यांत आले असून विजेत्यांत बहुसंख्य मायबोलीकरांचा समावेश आहे. विजेत्यांची नावे व ब्लॉग्स खालील प्रमाणे.

विजेते ब्लॉग्ज

१. रोहन जगताप http://www.2know.in
२. प्रभाकर फडणीस www.mymahabharat.blogspot.com
३. सुनील तांबे http://moklik.blogspot.com/
४. नरेंद्र गोळे http://nvgole.blogspot.com/
५. मधुकर रामटेके http://mdramteke.blogspot.com/
६. तन्वी अमित देवडे www.sahajach.wordpress.com

उत्तेजनार्थ ब्लॉग्ज

१. अनघा निगावेकर http://restiscrime.blogspot.com/
२. विशाल कुलकर्णी http://magevalunpahtana.wordpress.com
3. गंगाधर मुटे http://gangadharmute.wordpress.com
४. सुहास झेले http://suhasonline.wordpress.com/
५. विवेक वसंत तवटे http://vivektavate.blogspot.com
६. एकनाथ जनार्दन मराठे http://ejmarathe.blogspot.com
७. सौरभ सुरेश वैशंपायन http://sahajsuchalamhanun.blogspot.com
८. रोहन कमळाकर चौधरी. http://mazisahyabhramanti.blogspot.com/
९. श्रद्धा भोवड www.shabd-pat.blogspot.com
१०. ओंकार सुनील देशमुख http://pune-marathi-blog.blogspot.com/
११. विठ्ठलराजे बबनराव निंबाळकर http://vitthalraje.blogspot.com/
१२. हेरंब ओक http://www.harkatnay.com/
१३. विनायक पंडित http://vinayak-pandit.blogspot.com
१४. मंदार शिंदे http://aisiakshare.blogspot.com
१५. आशिष अरविंद चांदोरकर http://ashishchandorkar.blogspot.com
१६. शंकर पु. देव http://www.shankardeo.blogspot.com/
१७. अमोल सुरोशे http://www.mukhyamantri.blogspot.com/
१८. नचिकेत गद्रे http://gnachiket.wordpress.com
१९. पंकज झरेकर http://www.pankajz.com/
२०. रणजीत शांताराम फरांदे http://zampya.wordpress.com/
२१. श्रेया देवेंद्र रत्नपारखी http://majhimarathi.wordpress.com
२२. जगदीश अशोक भावसार http://chehare.blogspot.com/
२३. मीनल गद्रे. http://www.pankajz.com/
२४. शंतनू देव http://maplechipaane.blogspot.com/
२५. विद्याधर नीलकंठ भिसे. http://thebabaprophet.blogspot.com
२६. प्रवीण कुलकर्णी http://gandhchaphyacha.blogspot.com
२७. नचिकेत कर्वे http://www.muktafale.com
२८. जयश्री अंबासकर http://jayavi.wordpress.com/
२९. कविता दिपक शिंदे http://beautifulblogtemplates.blogspot.com
३०. परेश प्रभु http://www.marathipatrakar.blogspot.com/

यात बरेच मायबोलीकर असल्याचे जाणवत आहे...पण मी खात्रीने सांगू शकतो असे,
नरेंद्र गोळे,
मधुकर रामटेके,
विशाल कुलकर्णी,
गंगाधर मुटे,
जयश्री अंबासकर
रोहन कमळाकर चौधरी

यांचा विजेत्यांत समावेश आहे. समस्त माबोकरांस अभिमानास्पद अशी ही बाब असून मी सर्वांचे हार्दिक
अभिनंदन करतो. Happy

बातमी इथे वाचा... http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1669

डॉ.कैलास गायकवाड.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद कैलासजी.
ही माझ्यासाठी फ़ार मोठी उपलब्धी आहे असे मला वाटते. मी ज्या तर्‍हेचं लेखन करतो, ते पाहता, अशा विचाराची दखल घेतली जाणे, हीच फ़ार मोठी बाब आहे.

विजेते ब्लॉगर्स यांच्या कौतुक सोहळ्याचा एपिसोड रेकॉर्डिंग कार्यक्रम डिसेंबरमध्ये मुंबई येथे होणार आहे. आणि या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम स्टार माझाच्या खास एपिसोडमध्ये प्रसारीत होणार आहे.

मुटेजी,
लीना मेहेंदळे (प्रसिद्ध मराठी ब्लॉगर व वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी), विनोद शिरसाठ (कार्यकारी संपादक, सा. ‘साधना’) आणि माधव शिरवळकर (आयटी तज्ज्ञ) या दिग्गज परीक्षकांनी निवडलेल्या ब्लॉग्स मधे आपला ब्लॉग येणं ही एक अनन्यसाधारण बाब असून आपला ब्लॉग त्या ''तोडीचा'' आहे म्हणून पुरस्कार प्राप्त ब्लॉग आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन. Happy

ब्लॉगचा विजेता ठरविण्याचे काय निकष होते याची कोणाला माहिती आहे का? मधुकरचा विजेत्यांत समावेश पाहून सखेद आश्चर्य वाटले. यापूर्वी मायबोलीवर अतिशय गलिच्छ लिखाण केल्यामुळे त्याची संयोजकांनी हकालपट्टी केलेली होती. त्याच्या ब्लॉगवरच्या लिखाणाचे वर्णन rubbish या एकाच शब्दात करता येईल. त्याच्या सर्व लिखाणातून एका विशिष्ट जातीचा व धर्माचा द्वेष व मत्सर दिसून येतो. त्या जातीतील व धर्मातील काही आदरणीय महापुरूषांबद्दल त्याने अतिशय खालच्या पातळीला जाऊन अतिशय घाणेरडे लिखाण केलेले आहे. तो आपल्या लिखाणातून जातीयतेचे विष पसरवित आहे. त्याचे लिखाण असत्य व घाणेरडे आहेच पण त्याच्यात व्याकरणाच्या असंख्य चुकासुध्दा आहेत. त्याच्या ब्लॉगला बक्षिस देऊन एक प्रकारे अशा गलिच्छ लिखाणाला प्रोत्साहनच दिले गेले आहे असे मला वाटते.

डॉ. कैलास गायकवाड,

आपण ब्लॉगविजेत्यांची यादी दिल्याबद्दल धन्यवाद. सर्व विजेत्यांचे (एक सोडून) मनापासून अभिनंदन! वरील विचार मांडून विषयांतर करण्याचा व वातावरण गढूळ करण्याचा माझा हेतू नाही. परंतु अशा वाईट लिखाणाला प्रोत्साहन मिळू नये असे मला वाटते म्हणून मी लिहिले.

३ ऐवजी ६ विजेते?? आणि तब्बल ३० उत्तेजनार्थ??? एन्ट्री जास्त आल्या म्हणून विजेत्यांचा आकडा वाढवायचा? दर्जा महत्वाचा की आकडा?? निकाल काही प्रमाणात 'आवरा' होता... Happy

निकष काय होते ते अजून समजायचे असले तरी ३६ पैकी काही ब्लॉग हे विजेत्या दर्जाचे नव्हते हे नक्की. मला स्वतःला माझा ब्लॉग यात येईल अशी अपेक्षा देखील नव्हती. एखाद्याला हा क्रमांक मिळायला हवा होता किंवा ह्याला/हिला मिळायला नको होता हा मुद्दा इथे नाही. काही नामवंत ब्लोग्गर्सनी गेल्या वर्षीचा अनुभव बघता स्वतःचा ब्लॉग स्पर्धेसाठी दाखल केला नव्हता.

मुटेजी, गोळेजी, विशाल, जयश्री, मनःपूर्वक अभिनन्दन.
आपले लिखाण मी वाचले आहे आणि मलाही खरेच ते आवडलेही आहे.
अभिनन्दन.

सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन Happy
आणि कैलासदादा तुमचे खुप खुप आभार Happy

मुटेदादांनी म्हटल्याप्रमाणे हि एक संधी आहे माझ्यासारख्या नवोदितांसाठी आणि आव्हानही उत्तमोत्तम लेखन करण्यासाठी ! धन्यवाद Happy

परिक्षकांची नावे बघता हे सर्व लोक आपल्या दृष्टीने सिनियर आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा थोडं किंवा भरपूर जास्त कळतं हे आपण मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे?
मग त्यांच्या दृष्टीने त्यांनी काही विचार करून निकाल लावला तर आपण आपल्याला पटला नाही एवढंच म्हणावं. निकालच चुकीचा असं म्हणण्याला काही अर्थ नाही.

असो..

मी मायबोलीकरांच्या शुभेच्छांचा मन:पूर्वक आणि सहर्ष स्वीकार करतो!

मराठी साहित्यास अजिबात अनोळखी वाटणार्‍या, मात्र खर्‍याखुर्‍या जीवनातील अनुभवी, माहितगार आणि चोखंदळ मराठी रसिकांचे लेखन, जालनिशींच्या रूपात उदयमान होत आहे. त्यासोबतच या माध्यमावर प्रभुत्व असणार्‍या, त्या माध्यमातच व्यवसाय म्हणून पूर्णवेळ कार्यरत असणार्‍या मराठी सुहृदांनाही अभिव्यक्तीची ही अमोल संधी सहजच उपलब्ध झालेली आहे.

ज्या प्रमाणात हे नवनवोन्मेषशाली साहित्य निर्माण होते आहे त्याच्या आवाक्याची सर्वसामान्य पारंपारिक वाचकांस पुसटशीच कल्पना आहे. अशा साहित्यातील कस, वैविध्य आणि रंजन किती अपार आहे, हे जालावर अविरत वावरणार्‍यांना देखील पुरेसे ज्ञात नाही. मग सामान्य पारंपारिक (मुद्रित माध्यमांच्या) वाचकांस ते कसे आकळावे? ह्या अशक्यकोटीतील साध्यास गवसणी घालण्याचा, “स्टार माझा”ची ही स्पर्धा, हा एक प्रभावी प्रयास आहे. त्याखातर त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार! आपला हा प्रयास महाजालावरील मराठीच्या इतिहासात एक नवे पर्व उघडणार आहे.

मला जाणीव आहे की अशा साहित्यातील काही जालनिशांची निवड करून त्या लोकांपुढे अभिप्रायार्थ आणणे किती अवघड कामगिरी आहे. असंख्य स्पर्धक उमेदवारांच्या अनुदिन्यांचे परिपूर्ण वाचन करणेही केवळ अशक्यप्राय काम आहे. वापरलेले निकष, परीक्षकसंख्या, वाचनाची खोली यांची मला कल्पना नाही. तरीही हजारोंच्या संख्येतील जालनिशांचे मंथन करून, जे नवनीत वर आणले आहे त्याचा मी आदर करतो. ते नवनीत, जालनिशींच्या होतकरू वाचकांस सुरस वाटेल यात मुळीच संशय नाही. त्यामुळे पारंपारिक वाचकांसही जालावरील अपार नवसाहित्याचा शोध लागेल.

माझी अनुदिनी उल्लेखनीय ठरवली गेली ह्याचा मला आनंदच आहे! इतर सर्व उल्लेखनीय ठरलेल्या उमेदवार-अनुदिन्यांच्या लेखकांचेही हार्दिक अभिनंदन. सर्व सहभागी अनुदिनीलेखकांचेही सहर्ष कौतुक. कारण आपण सर्वच, या नव्या युगातील अनुभवलेखनाचे आधारस्तंभ आहात!

या प्रयासात सहभाग न घेतलेल्याही असंख्य मराठी अनुदिन्या, जीवनाच्या अगणित पैलूंवर, दररोज, अपार लेखन प्रकाशित करत आहेत. त्याही वाचून, आपापले नीरक्षीरविवेक जागृत करावे, क्षीरसंचय करून आपापले जीवन समृद्ध करावे, अशी उमेद पारंपारिक वाचकांस निर्माण झाली तर हा प्रयास खरोखर सार्थ ठरेल.

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन. Happy

परिक्षकांची नावे बघता हे सर्व लोक आपल्या दृष्टीने सिनियर आहेत आणि त्यांना आपल्यापेक्षा थोडं किंवा भरपूर जास्त कळतं हे आपण मान्य करायला काय प्रॉब्लेम आहे?
>>>>>>
१००००००००००००००००००००००००००० % सहमत.

शुन्यातुन विश्वाची निर्मीती म्हणजे काय असते हे पहायचे असेल त्यांनी मधुकरचे जिवन पहावे.
जे पोटात तेच ओठात अशी व्यक्ती आहे मधुकर.
शहरी लोकांस्सारखा दांभिकपणा त्याला येत नाही हा मधुकरचा दोष नव्हे.

Pages