काही दिवसांपूर्वी 'Hey dude!', 'Hi dude!' अशी काही वाकये माझ्या कानावर सारखी पडत असायची,.. अजूनही पडतात ... मला कळायचे नाही की ही 'dude' भानगड काय आहे? हा 'dude' असतो कसा ? करतो काय? मला का लोक 'dude' म्हणत नाहीत? ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी मी 'dude' म्हणल्या जाणाऱ्या लोकांवर जरा लक्ष ठेवले... काही गोष्टी लक्षात आल्या ... ज्या आल्या त्या लिहाव्याश्या वाटल्या ...
पहिले म्हणजे Dude आपण कसे दिसतो ह्या गोष्टीची फार काळजी घेतो.. नेहमी branded कपडे वापरतो...कपड्या वरचा brand सगळ्या लोकांना दिसणे ही त्याच्या दृष्टीने आवश्यक बाब असते .. तो नेहमी shoppers stop, lifestyle अशाच दुकानातून कपडे घेतो.. नेहमी brand च्या भाषेतच बोलतो.. तो कधी कधी लक्ष्मी रोड वर पण खोट्या दाढ़ी मिशा लावून जात असावा... कारण तिथे तो कुणाला दिसला तर त्याचे dude त्व धोक्यात येऊ शकते ..तो कोल्हापुरी चप्पल, कुड़ता- पायजामा आशा टाकाऊ मालाचा वास सुध्धा अंगाला लागू देत नाही.. असले काही धारण करणाऱ्या व्यक्तीला तो 'चीप' म्हणून संबोधतो .. मेसेज प्रिंट नसलेल्या टी शर्ट कड़े तो ' बुजुर्गों के शौक की चीज' म्हणून पाहतो.. जर मेसेज प्रिंट नसेल तर अतर्क्य रंग संगतीतील ठिगळे तर शर्ट वर हवीतच !
त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास प्रेम असावे असे मला वाटते ... कारण बोकडाची दाढ़ी , सिंहाची आयाळ आशा बऱ्याचश्या गोष्टी त्याच्या अंगावर दिसत असतात.
आता त्याचे खाणे ... 'हा काय खातो म्हणून ह्याला dude म्हणतात अणि मला नाही?' असा कधीकधी प्रश्न डोक्यात येत असेल तर सांगतो.. dude बनायचे असेल तर मिसळ, वडा पाव हे शब्द हिब्रू च्या डिक्शनरी तून आले आहेत असा चेहरा करावा लागतो... dude ला नेहमी बर्गर , हॉट डॉग , पिझ्झा असले पदार्थ आहारात लागतात .. ह्यातला हॉट डॉग हा पदार्थ कुत्र्यापसून बनवतात असा माझा एक समज होता .. तो नंतर दूर झाला.. ( नशीब मी हा प्रश्न कुठल्या dude ला विचारला नाही..) बर हे सगळ खाल्ल्यावर त्याला कुठले तरी सॉफ्ट ड्रिंक हवे असते.. खासकरून त्याला रेड बुल वगैरे भारदस्त नाव असणारी ड्रिंक्स हवी असतात ... लस्सी वगैरे पेयांना तो सेरेलाक, ग्राइप वॉटर सामान मानतो.. त्याचे आवडते पदार्थ ज्य़ा हॉटेल मधे मिळत नाहीत तेथे त्याला नेले तर तो 'हे हॉटेल माझ्या लेवल चे नाही' हे शंभर वेळा बोलून दाखवेल.. मैकडोनाल्ड अणि कैफे कॉफ़ी डे एवढीच क्षुधा पूर्तीची ठिकाणे असतात आणि बाकी ठिकाणी जेवणात घुशी, पाली इ. मारण्याचे औषध घालतात अशा अविर्भावात त्याचे बोलणे असते..
त्याला मैत्रिणी असतील किंवा नसतीलही. पण एक असली dude कधीही म्हणत नाही कि 'I don't have a girlfriend'... त्याला गर्ल फ्रेंड समजा नसलीच तर तो सांगतो कि 'मैं बहुत सारी लड़कियों के साथ घूमा हूँ ... लेकिन कोई भी मेरे टाइप की नाही थी'... आता ह्या मेरे टाईप ची जगातल्या कुठल्याही भाषेत व्याख्या करणे कठीण आहे.... बाकी dudes पण त्याला 'Ya! Right Maa'n' असा दुजोरा देतात.. तर काय .. प्रत्येक dude हा 'different' असतो .. ('वेगळा' हा शब्द वापरून मी अखिल भारतीय Dudes चा अपमान करणार नाही ..).. अशाच एका दुडे च्या फोन मध्ये मला खूप मुलींचे नंबर दिसले .. माझ्या dude संशोधनाचा भाग म्हणून मी त्यातले एक दोन त्याच्या नकळत डायल केले.. पलीकडून 'हा नंबर अस्तित्वात नाही' असा संदेश आला .. म्हणून मी नाद सोडून दिला ..
Dude चे आणि एक वैशिष्ट्य म्हणजे तो नेहमी dudes च्या ग्रूप मध्येच वावरतो.. 'चीप' लोकांमध्ये गेल्यास आपल्या dude त्वाला हानी पोहोचेल अशी भीती कदाचित त्याला वाटत असावी.. त्याला त्याचे मित्र सुध्धा Dude असावे लागतात ...Dude लोकांची टोपण नावे सुध्धा त्यांना शोभणारी अशीच असतात ... 'अरे सम्या, भडव्या काय करतोयस हे ??' अशी हाक मारल्यावर सम्या ला कमीपणा येण्याची शक्यता असते.. 'what the **** Sam! Wot the crap yo are doin!' असे काहीतरी कुणी म्हणाले कि सम्याला आपलेपणा जाणवू लागतो... Dude हा सर्वार्थाने Dude असतो... त्याला दुसरे काही विशेषण देणे म्हणजे त्याच्या Dude त्वाचा अपमान आहे. Dude ला सगळे non-Dudes 'चीप, बकवास' वाटणे आवश्यक आहे.. त्यांच्याकडे क्षुद्र नजरेने किंवा कपाळावर आठ्या आणून न पहिल्यास अश्या Dude ला त्यांच्या कॅम्यूनिटी तून वाळीत टाकले जाईल का असे वाटत असावे..
Dude च्या आवडी निवडी वरून सुध्धा त्याचे Dude त्व सिद्ध होत असते... तो नेहमी मैडोना, एमिनेम, मायकेल जाक्सन वगैरे भाषेत बोलतो.. गल्ली बोळातल्या रॉक band ची नावे सुध्धा त्याला माहित असतात .. लता, किशोर वगैरे त्याला देशाला मागे नेणारे लोक वाटतात ... त्यांची गाणी ऐकणार्यांना तो अंकल आणि ऑन्टी म्हणतो.. शास्त्रीय संगीत तर त्याच्यासाठी चेष्टेला पात्र ठरणारी गोष्ट असते.. 'वा ! शुध्द मध्यमावर काय सम घेतली!' वगैरे वाक्ये त्याला कळत नाहीत.. त्याला एवढंच कळत कि काहीतरी 'crap' बडबड चालली आहे.. मी असेच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर दुकानात गेलो होतो.. आमच्या दोघांचे बोलणे चालू होते .. आम्ही आपले आपापल्या नादात .. एका गायकाचा जोगकंस आणि तोडी किती सुंदर आहेत असा विषय चालला होता.. मधेच माझी जरा बाजूला नजर गेली .. तर एक dude आमच्याकडे जोगकंस आणि तोडी ही पिशाच्च हडळीची नावे असावीत आणि हे लोक चेटूक करत असावेत अशा नजरेने पाहत होता!!
अशी आणखीही काही dude लक्षणे सांगता येतील.. भारत हा कसा 'country without any future' आहे वगैरे बोलताना तो आढळेल .. rap वगैरे म्युझिक भारतात जास्त ऐकले न गेल्याने देशाची किती हानी झाली आहे वगैरे आक्रमकपणे सांगेल .. यंग जनरेशन ला इथे भविष्य नाही इत्यादी बरीचशी बडबड करेल .. नेहमी fashion, superbikes इत्यादी वरील मासिके वाचेल... मराठी पेपर वगैरे गोष्टींना तो अस्पृश्य आणि 'small town public' च्या गोष्टी समजेल.. मल्टी प्लेक्स ला तिकीट मिळाले नाही तर सिनेमाला जाणार नाही.. इंटरनेट वर chat करताना नेहमी स्पेशल short form वाल्या भाषेत बोलेल इत्यादी इत्यादी इत्यादी ...
Dude च्या अशा सगळ्या खास गोष्टी त्याला आम लोकांपेक्षा विशेष बनवत असल्या तरी काही गोष्टी त्याच्या सामन्यांगत असतात .. उदा. dude लोक सर्वसामान्यांगत क्रिकेट आवडीने पाहतात .. चौकार षटकाराची मजा लुटतात .. चर्चा करतात .. चालताना ठेच वगैरे लागली तर 'आई ग ' म्हणूनच ओरडतात ... 'ओह नो! ओह माय मदर! ' म्हणत नाहीत.. अशाच काही इतर गोष्टी.. तर सांगायचे काय.. काही कॉमन गोष्टी त्यांच्यामध्ये असतात .. ( ह्या वाक्याबद्दल मी सर्व dudes ची माफी मागतो)..
dudes ची सर्व लक्षणे सांगणे अवघड आहे... त्यासाठी मला dude बनावे लागेल.. मी dude बनण्याचा प्रयत्न केलाही होता... मी ४-५ ठिकाणी ठिगळे असलेला एक T shirt आणि एक low-waist जीन्स विकत घेतली ... ती मी वापरलीही .. दुकानाच्या ट्रायल रूम मध्ये .. त्यानंतर काही मला ते dude त्व अंगावर पेलवेना.. मी बऱ्याच वेळा विचार केला कि उद्या dude बनायचे..पण त्याची अवस्था दुकानातल्या ' आज रोख कल उधार' गत झाली.... शेवटी माझ्या ध्यानात आले कि dude बनणे काही माझ्या नशिबात नाही..
हल्ली मी dude बनण्याचा आणि त्याच्यावरच्या संशोधनाचा असे दोन्ही नाद सोडून दिले आहेत.. फक्त सर्व dude लोकांना एकाच म्हणावे वाटते... 'Heyyy dudes.. frgv this cheap prsn for writin this crap article!'
हे डुडे ... भारी लिव्हलयस
हे डुडे ... भारी लिव्हलयस गड्या...
मस्त
मस्त
मस्त. आवडलं.
मस्त. आवडलं.
मस्त लिहिलंय.. 'ड्यूडत्व' हा
मस्त लिहिलंय.. 'ड्यूडत्व' हा शब्द मस्त आहे
ज्या सगळ्यांना वाटतं, की आपली अभिरूची, समज, उमज, आवड काय ती 'उच्च' आणि बाकी सगळे म्हणजे 'Aww maan, sooo ordinary!' ते सगळेच 'ड्यूड्ज' असतात एक प्रकारे
हिम्सकूल आणि रंगासेठ ह्यांनी
हिम्सकूल आणि रंगासेठ ह्यांनी 'माझी विचारपूस' केली आणि मला षड्जातला 'ष' दुरुस्त करून login name व्यवस्थित करण्यास मदत केली.. धन्यवाद..
यासी म्हणावे लेखनु.
यासी म्हणावे लेखनु. निरीक्षीले ते तपशिलात कथीले. अनेक शुभाशिर्वाद तुम्हास.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
झकास लिहिलय .. मजा आली
झकास लिहिलय ..
मजा आली वाचताना..
मी पण अगदी ४ आठवड्या पुर्वी अशा मराठी कम अमेरिकन कन्व्हर्ट झालेल्या ड्युड ला भेटलो..
त्याला मी मायबोली मिसळ्पाव अश्या साईट्स बद्द्ल माहीती सांगितली..
तर मी ५० शी गाठलेला म्हातारा आहे आणी आता रिटायर्मेंट जवळ आली आहे अश्या रिअॅक्शन ऐकल्या..
मुंबई मधे होता तोवर हा डूय्ड कंट्रोल मधे राहिला.. पण अमेरिकेत (ड्युड लोकांची पंढरी) येऊन त्याच्या ड्युड गिरीच्या ठिणगी चा वणवा पेटला आहे..
आता हा ड्युड पब मधे वगैरे दर आठवडी जातो.. तो फक्त नॉनवेज खातो.. (बीफ, पोर्क वगैरे )
तो जातीने मराठा आहे.. त्यामुळे त्याला जरा वळवण्याचा प्रयत्न केला.. शिवाजी महाराज त्यांचे आदर्श संस्कार .... गो हत्या पाप आहे.. वगैरे सांगुन पण सगळे मुसळ केरात
ह्या ड्युड ने दारु आणी सिगरेट्चा रतीब लावला आहे...
मी अमेरिकेत येऊन दारु आणी सिगरेट ला स्पर्श ही केला नाही.. हे ऐकल्यावर त्यानी माझ्यावर एक तुछ कटाक्ष
टाकला..
आणी वरुन एक डायलॉग पण
" hey man you ****** off your life.. you are not passionate about your life..
life is too short to follow the rules .... " वगैरे वगैरे बरळत होता. .
ड्युड ला अमेरिका सोडायची नाहीच आहे.. त्यासाठी ड्युड नी जबरदस्त प्लॅन पण केला आहे..
कंपनी ने जर ग्रीन कार्ड केले नाही तर त्याने एका ABCD मुलीला बॅकप म्हणून पण ठेवले आहे..
असो ही ड्यूड गाथा मस्त वाटली... आजुन वाचायला आवडेल..
@सुकि
ड्युड म्हणजे उच्चवर्णीयांच्या चालीरीतीचे डोहाळे लागलेला गरोदर पुरूष >>>>>>>>>>>>>>
लै भारी
सहिये
लै भारी....... खळखळून
लै भारी....... खळखळून हसलो.
ड्युड म्हणताच माझ्यासमोर, ३ इडियट्स मधला '' सुहास टंडन'' (प्राइस टॅग) उभा राहतो.
लै भारी!! जोगकंस आणि तोडी
लै भारी!!

जोगकंस आणि तोडी ह्या तुमच्या पिशाच्च हडळी आपल्याला पण माहिती नाहित बुवा...
षड्ज्भाई... मस्तय..
षड्ज्भाई... मस्तय..



बोकडाची दाढ़ी , सिंहाची आयाळ ..
इकडे आम्हाला शेकड्यांनी ड्यूड्स पाहायला मिळतात.. आता त्यांच्या मदर्सना विंग्रजी धडसं येत नसलं तरी आमच्या हिन्दी प्रश्नाला ठेचकाळलेल्या अंगरेजीमधूनच उत्तर मिळतं
षड्जपंचम, माईंडब्लोईंग ड्युड
षड्जपंचम, माईंडब्लोईंग ड्युड !
फक्त ड्युड्सचं इंग्रजी संभाषण याचे संशोधन राहीलय... "लुक दॅट बेडकी सिटींग ऑन पत्रा " टाईप बोलणारे ड्युड्स हा माझा प्रवासातला विरंगुळा. त्यांच्यामुळे माझा इंग्रजी बोलण्याचा अट्टाहास नामशेष झाला.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
प्रतिसादांबद्दल धन्यवाद !
धमाल
धमाल
अहो ... बेब / ड्यूडेट
अहो ... बेब / ड्यूडेट राहिल्या की हो ...
ड्यूडेट म्हटलं की मला ड्यू डेटच आठवते .......... बिल भरायला पाहिजेत लवकर ...
लै भारी....
लै भारी....
त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास
त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास प्रेम असावे असे मला वाटते ... कारण बोकडाची दाढ़ी , सिंहाची आयाळ आशा बऱ्याचश्या गोष्टी त्याच्या अंगावर दिसत असतात.
झकास म्हटले तर या लेखाला
झकास म्हटले तर या लेखाला शोभणार नाही. म्हणूण - इट्स ऑसम ड्यूड!
त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास
त्याला पशुपक्ष्यांबद्दल खास प्रेम असावे असे मला वाटते ... कारण बोकडाची दाढ़ी , सिंहाची आयाळ आशा बऱ्याचश्या गोष्टी त्याच्या अंगावर दिसत असतात.>>>
पलीकडून 'हा नंबर अस्तित्वात नाही' असा संदेश आला .. >>>
मस्तच...

मस्त लिहिलं. भारत हा कसा
मस्त लिहिलं.
भारत हा कसा 'country without any future' आहे >>> म्हणजे झक्की पण dude च की...
(No subject)
झक्की ड्युड दिवा घेतला असेल
झक्की ड्युड
दिवा घेतला असेल 
nice article dude!
nice article dude!
सर्वांनाच प्रतिक्रियांबद्दल
सर्वांनाच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद ....
डुडत्व!! हा लेख वाचून जाम
डुडत्व!!
हा लेख वाचून जाम हसले. जबरा लिहलाय!
परवाच नवरा माझ्या लेकाला विचारत होता "काय रे खाली जमलेल्या तुझ्या आठही मित्रांची नाव डुड कशी?" हे आठही जण एकमेकांना "डुड" म्हणून हाका मारत होते. "आणि बरोब्बर "राईट डुडला" कस कळत की "हा डुड" आपल्याशी बोलतोय?"
आमच्या लेकाच उत्तर " Somehow all Dudes do. If not, we start calling them Dork"
मस्त आहे लेख
मस्त आहे लेख
एकदम डुडेस्ट जमलाय! <<तर एक
एकदम डुडेस्ट जमलाय!
<<तर एक dude आमच्याकडे जोगकंस आणि तोडी ही पिशाच्च हडळीची नावे असावीत आणि हे लोक चेटूक करत असावेत अशा नजरेने पाहत होता!!<<>> बेफाम हसले....
जबरी लिहिलंय अगदी हहपुवा अशा
जबरी लिहिलंय अगदी हहपुवा
अशा डुडच्या डुड्या पण अस्तात. त्यांचे भडक मेक-अप आणि विचित्र अॅक्सेसरीज तर अनाकलनीय असतात.
अजून एक, ड्युडचे केस एक तर पोनी बांधलेले असतात अथवा सेट वेट ने जागोजागी उभे केलेले. पहार्याला ठेवलेल्या सैनिकांसारखे. आणि एका कानात स्टोन.
dude लोक बरेचसे माहित आहेत...
dude लोक बरेचसे माहित आहेत... duedette नुसत्या दिसतात.. पण फारसा संबंध ना आल्याने मला त्यांच्याबद्दल लिहिता आले नाही..
... लिहायला आवडेल पण 
Pages