Submitted by ह.बा. on 18 November, 2010 - 00:18
***************
मला माहिती ना तुला माहिती
कुणाच्या मनाला किनारे किती?
लुटावी कशी कोण सांगेल का
सुन्या काळजाची कपाटे रिती
नका रसरसू रे फुलांनो तिथे
जिथे ओठ ओठास बोलाविती
मरण घेउनी जन्मतो जीव जर
जिवाला जिवाची कशाला भिती?
तुका, ज्ञानराजा मराठीच का?
कपाळास नाहीत भगव्या फिती!
- ह. बा.
****************
गुलमोहर:
शेअर करा
गंगाधरजी, के अंजली,
गंगाधरजी, के अंजली, जयवी-जयश्री,
सर्वांचा आभारी आहे!!!
ग ज ब बनाई
ग ज ब बनाई
धन्यवाद मुत्केश!!!
धन्यवाद मुत्केश!!!
कपाटे रिती - हा शेर छान आहे.
कपाटे रिती - हा शेर छान आहे.
बेफिकीरजी, आपला आभारी आहे!!!
बेफिकीरजी,
आपला आभारी आहे!!!
हब्या खासच रे... खासकरुन
हब्या खासच रे...
खासकरुन "सुन्या काळजाची कपाटे रिती"....
कसली भन्नाट कल्पना आहे मित्रा...! जियो यार..... जियो !!
हबा मस्त मतला आवडलाच.. रिती
हबा मस्त मतला आवडलाच.. रिती कपाटे पण मस्त
विशाल, मिल्या दोघांचा आभारी
विशाल, मिल्या
दोघांचा आभारी आहे!!!
Pages