गुड मॉर्निंग मॅडम - क्रमशः - भाग १३

Submitted by बेफ़िकीर on 16 November, 2010 - 05:06

अत्यंत संमिश्र, गुंतागुंतीच्या वैचारीक मनस्थितीत मोना आत्ता बेडवर पहुडली होती. दुपारचे चार वाजलेले होते. भारतात येऊन दोन दिवस झालेले होते.

म्हंटले तर शामाची हकालपट्टी करणे सहज शक्य होते. पण खूप विचार करून ती अशा निष्कर्षाप्रत आली होती की शामा हे एक महत्वाचे हत्यार ठरू शकत होते या सगळ्या बाबतीत! तिला इंग्लीश येत नव्हते इतकीच अडचण होती. त्यामुळे मोना मुद्दाम मराठी आणि हिंदीत शक्य तितके संवाद करायला लागली होती घरात आणि फोनवर! सरळ आहे. जे अर्देशीर आणि लोहिया कंपनीपर्यंत पोचावे असे मोनाला वाटत होते तेवढेच तिथे पोचणार होते आता! आणि प्रत्यक्षात मोना काहीतरी वेगळेच करणार होती. या प्रकारापासून शामा अनभिज्ञच राहणार होती.

मात्र ती अर्देशीरांना भेटली का असावी हे काही मोनाच्या लक्षात येत नव्हते. सायरा तर म्हणत होती की शामा कुठे गेलीच नाही. कदाचित सायराचे लक्ष चुकवून गेलेली असावी. आणि बहुतेक अर्देशीरांकडून बर्‍यापैकी पैसे मिळाले असावेत तिला! याचाच अर्थ, सायराने मागे सुबोधला सांगीतले नसले तरीही शामामुळे सगळ्यांनाच समजले असेल की आपण सिमल्याला होतो.

व्वा! काय परिस्थिती मागे सोडून गेलेत डॅड!

यशाच्या नवनव्या पायर्‍या चढताना इतके शत्रू होत होते याचे त्यांना भान तरी असेल का? आणि शामा ही त्या काळापासून अर्देशीरांना फोन करत असेल का? शक्यच नाही. कारण तसे असते तर सिवाने ते कधीच सांगीतले असते आपल्याला! आणि अर्थातच त्याने ते डॅडनाही सांगीतले असते. त्यांनी तिला एका क्षणात हाकलूनही दिले असते. मात्र एक गोष्ट लक्षात येत नाही. की सायरा त्यावेळेस डॅडच्या विरुद्ध होती हे सिवाला माहीतच कसे नव्हते? नाहीतर त्याने ते नक्कीच सांगीतले असते आणि डॅडनी तिलाही काढले असते. पण सायरा भ्रष्ट नीतीची होती हे सिवाला समजलेच नाही? असे कसे? की आपण पिक्चरमध्ये आल्यावरच सिवाने तिच्यावर लक्ष केंद्रीत केले? डॅडनी सिवाला नेमकी काय कामगिरी दिली होती? किती पैसे देत होते डॅड? अर्थातच, ती कॅश असणार आणि पर्सनल अकाऊंटमधून दिली गेलेली असणार! तिचा हिशोब सापडणारच नाही. पण डॅडकडून असे पैसे घेऊन जाणारा कुणीतरी माणूस तर असेलच ना? कोण असेल तो? असा कुणी आहे का की जो आपण डॅडबरोबर वारंवार पाहिलेला होता पण आज हेलिकमध्ये जो महत्वाचा नाही आहे. त्यांचे मित्र तर कित्येक होते. पण सगळे आपल्यासारखेच अतीश्रीमंत! हे असे काम कोण करणार त्यातले? कुणीच नाही. की पराग करत होता हे सगळे? मग तर पराग सगळेच अर्देशीरांना सांगत असणार!

भयंकर प्रकार आहेत सगळे!

पैसा, पैसा, पैसा!

बाकी काही नाही. एकेक ज्ण आता साठीला आला आहे. पण ... पैसा हवाच आहे अजून! आत्ता जवळ आहेत तेवढे पैसे रोज उडवले तरी यांच्या पुढच्या पिढीला पुरतील इतके आहेत. पण तरीही लोभ आहेच!

सिवा! या सिवाला आपण अधिक मोठी जबाबदारी द्यायला हवी. नुसते फोन कॉल्स समजून काय होणार आहे?

शामा! आजपासून कुणीतरी नवीन मुलगी ठेवायला हवी. या शामाला आपल्या बेडरूमच्या उंबर्‍यात येऊ देता कामा नये! मात्र तसे तिला भासवायचे मात्र नाही.

हुषारी हुषारी हुषारी! किती हुषारी दाखवायची मी प्रत्येक बाबतीत? का असे जगायचे?

सायराचे मूल! सायराचे मूल या बंगल्यात वाढणार! ही काय कॉन्सेप्ट आहे नक्की? आपण ते का मान्य करायचे? केवळ ती आपल्याशी प्रामाणिक आहे म्हणून? अर्थातच! चांगुलपणा हे आपल्या आयुष्याचे अधिष्ठान असायला हवे. आपण मुद्दामहून कुणाचेही काहीही वाईट करायचे नाह. पण जे हेलिक्सचे किंवा आपले व्यक्तीशः वाईट करू इच्छितात त्यांना धडा शिकवायलाच हवा आहे.

एक एम डी या नात्याने आपण आत्ता काय काय करू शकतो! पहिले म्हणजे लोहियांचे अधिकार कमी करू शकतो! पण आज त्यांच्याकडे तेवीस टक्के शेअर्स आहेत. नाही म्हंटले तरी ते दोन क्रमांकाचे मालकच आहेत. डॅडनी ही फार मोठी चूक केली असे वाटत आहे. लोहिया दुरावले तर ते हेलिक्सचे बाजार्मूल्य घटवू शकतात! मोठे अस्थैर्य निर्माण करू शकतात! त्यांच्या कॉन्टॅक्ट्समधून आपला बिझिनेस घटवू शकतात! एखादी नवीन कंपनी काढू शकतात! हा एकच शत्रू असा आहे की जो घालवायला आपल्याला कदाचित आपले आयुष्य तरी खर्ची घालावे लागेल की लोहिया तरी मरावे लागतील..

... मरावे?? लोहिया मरावे लागतील?? कसे?? आणि का?? का नको?? आपल्या आईला मारले. बहुतेक डॅड.... डॅडही... बझट??? व्हॉट द हेल इज धिस बझट???

मोना उठली आणि पीसीवर बसली. सिवा ऑनलाईन असण्याची शक्यता होती. तिने इमेल केली.

Please give more information on BAZAT. I might meet Mr Ranjeet in a day or two.

अर्ध्या पाऊण तासाने उत्तर आले.

BAZAT is actually a medicine formula invented by Dr Shamataprasaad Shreevastav long back. It does not act as a poison. It creates blood clots. If a man swallows BAZAT, he can die within fifteen minutes. The symptoms are like food poisioning. Any medical practitioner would normall certify this death as a natural death. Food poisioning can also be viewed as a crminal act. But that's possible only when someone lodges a complaint.

BAZAT acts as blockages in nerves thereby blockng the blood flow to heart & due to this there is immense pressure on the entire system & lungs. The person who has consumed BAZAT struggles to breathe & perspirates heavily. It is just like heart failure.

In the post mortem however, the symptoms of having eaten BAZAT are not at all traceble. This is the biggest problem with this drug, since the reason of death can not be determined. This is the reason, BAZAT was not accepted as a break through invention by All India Association of Medical Reasearch. However, BAZAT was basically invented for army, where, such tablets could be mixed with the food of the enemy.

BAZAT is not manufactured anywhere. Only few people know about it. Dr Shamtaprasad himself, few scientists from AAMR, Mr Ranjeet & your entire family, except you. Even Number 4 knows about it. Also, few people at Shimalaa may be knowing about it.

The papers related to BAZAT were destroyed by AAMR that time itself. But, I trust that Mr Ranjeet has a clue. It is made from some agro products, which are normally available in cold areas, which is why probably, it was first made at Shimalaa! HO Government has already banned growing those seeds completely.

BAZAT was used to kill your mother. There was no police case at all since it was viewed as a natural death, even certified as that too.

No one is sure, but I suspect that the same method was used to kill number zero.

Thanks. Shall get in touch with you over phone this night.

SIVA.

मोना बराच वेळ दु:खी मनाने ते सगळे परत परत वाचत होती. डॅडवर कस काय प्रयोग केला असेल त्या गोळीचा? पंचवीस वर्षांनंतर? आणि असाच का संशय आहे सिवाला? की त्यांनाही मारलेच असेल? पण.. जर डॅडनाही मारले असेल तर... ही माणसे जगण्याच्याही लायकीची नाही आहेत. मी या सगळ्यांना खलास करणार आहे. आणि डॅडचाच काय प्रश्न आहे? आईलाही मारलेच की? पण.. तिला निदान लोहिया आणि अर्देशीरांनी मारलेले नसावे. कारण तेव्हा...

... अरे?? तेव्हा तर हेलिक्स होतीच की?? आणि १९७८ साली अर्देशीरांनी फिरोज मॉड्यूल काढले. १९८० साली आई गेली. काही कनेक्शन असेल??

रणजीतबद्दल काहीच लिहीलेले नाही आहे सिवाने! आज संध्याकाळी फोनवर सांगेल बहुधा!

रणजीत श्रीवास्तव! गुगलवर सर्च मारला पण कुणी भलतेच निघतायत त्याच्यात! आपल्याला पाहिजे तो रणजीत नाही आहे त्यात!

शामताप्रसाद श्रीवास्तव हे नाव आहे पण त्यात बझटचा उल्लेखच नाही आहे.

बहुतेक, बहुतेक मी अशा ठिकाणी आहे जिथे.. मी केव्हाही मरू शकते. माझ्या आहाराचे काय? एखाददिवशी शामाने ती गोळी ज्यूसमध्ये मिक्स केली तर?

सायराSSSSSSSSSSSSSSSS

बेभान होऊन मोनालिसाने हाक मारली. सायरा धावत आली. मागोमाग शामा आणि एक रंगू नावाचा नोकरही आले.

मोना - तुम्हाला दोघांना बोलावले का मी???

शामा आणि रंगू मॅडमच्या चिडक्या आवाजाला घाबरून चटकन निघून गेले.

मोना - सायरा...

सायरा मोनाच्या जवळ आली. मोनाच्या चेहर्‍यावरूनच मोना प्रचंड ताणाखाली आहे हे सायराच्या लक्षात आलेले होते. सायराने आपला एक हात मोनाच्या कपाळावर ठेवला.

सायरा - नॉट फीलिंग वेल मॅम??

मोना - सायरा... गेट अ गर्ल फॉर मी इन प्लेस ऑफ शामा.. शामा हॅज ग्रोन ओल्ड नाऊ...

सायरा - शुअर मॅम... मी... एक दोन दिवसातच बघते....

मोना - नाही... आज... आत्ता या क्षणी शोध सुरू कर आणि रात्रीपासून ती ड्युटीवर यायला हवी...

सायरा - शुअर मॅम...

मोना - मी तुला बोलावले ते वेगळ्याच गोष्टीसाठी...

सायरा - हं??

मोना - स्पेनमध्ये मला एक डॉक्टर भेटले. म्हणजे मीच त्यांची भेट घेतली...

सायरा - का?? काय झाले??

मोना - मला... मला जरा त्रास होतो हल्ली... त्यांनी मला आहाराचे एक शेड्यूल लिहून दिले आहे सायरा...

सायरा - अच्छा...

मोना - त्यात फक्त सॅलड, ज्यूस आणि बॉईल्ड व्हेज आहेत...

सायरा - ठीक आहे मॅम...

मोना - तर.. घरात असा आहार बनवायला घेतल तर त्यातील न्युट्रिशन व्हॅल्यू प्रेडिक्ट करता येत नाही...

सायरा - .......

मोना - त्यामुळे.. तू आजपासून ते हे आहे ना?? ... रेंजो कॅफे... तिथे ही ऑर्डर देत जा... आणि.. पॅकेट्स आणि डिशेस माझ्याच समोर आणत जा... आय'ल ओपन इट...

सायरा - काहीच प्रॉब्लेम नाही मॅम.. लगेच सुरू करते..

मोना - सायरा... मला एक सांग... डॅड गेले त्या दिवशी... त्यांना.. खूप घाम आला होता???

सायरा - हो.. प्रचंड...

मोना - आणि.. आणि काय झाले होते???

सायरा - तेच मॅम.. तुम्हाला आजवर जे सांगीतले तेच...

मोना - गुदमरले होते...

सायरा - खूपच...

मोना - सायरा... ते त्यांना का झाले ते तुला माहीत होते ना???

सायराने मान खाली घातली.

मोना - ... बोल...

मोनाचा आवाज आता तापला होता.

सायरा - मॅम.. मी तुमची शप्पथ घेते... मला.. मला स्वतःलाच खूप आश्चर्य वाटले... कारण इतकी सुंदर हवा होती... केवळ दहा पंधरा मिनिटात सरांना एकदम काय झाले ते समजलेच नाही.. पण.. मी इतके नक्की सांगते मॅम... मी लोहियांच्या अत्यंत जवळ असूनही.. त्यांनी मला ... गुप्ता सरांना जे काही झाले.. त्याबाबत कधीच काही सांगीतले नाही.. ते फक्त इतकेच म्हणायचे की... त्यांना हेलिक्स संपवायची आहे... मॅम.. तुम्हाला वाटत असेल की मी अजूनही इथे निर्लज्जपणे राहते.. खरंच सांगते... बाहेर माझ्या जीवाला भीती आहे हे तुम्ही ओळखताच... म्हणून मी तुमच्या आश्रयाला राहाते आहे... पण.. त्या दिवशी जे झाले त्यामुळे.... मी प्रचंड घाबरलेले होते मॅम... मला काहीही समजत नव्हते.. आणि.. आज... आज मी तुम्हाला म्हणून सांगते... की... मला त्या वेळेला खरच वाटले होते की... इट वॉज अ ...

मोना - .... अ मर्डर???

सायराने होकारार्थी मान हालवली.

मोना - सायरा... तुला माहीत आहे की तुझे काय होऊ शकते??

सायरा - पूर्णपणे मॅम.. तुम्ही मला... यू कॅन सिम्पली फिनिश मी... पण... विश्वास ठेवा.. हे मीच स्वतःहून तुम्हाला सांगतीय आणि इथे राहतीय.. याचा अर्थच मी निष्पाप असणार.. कारण त्या शिवाय मला इतके साहस करावेसे वाटणारच नाही... मला काहीही निश्चीत माहीत नसले तरीही.. त्य दिवशी काहीतरी विचित्र झाले असे मात्र वाटत आहे... अजूनही.... मी लोहियांच्या कितीही निकट असले... त्यांना सरांबद्दल जमेल ती सगळी माहिती पुरवत असले तरीही... हे कृत्य..माझ्या डोक्याच्या बाहेरचेच आहे मॅम... या गोष्टीची मला काही एक कल्पना नव्हती... मात्र... सतत संशय मात्र वाटत होता..

मोना - एक मिनीट....मी तुझ्यावर अजूनही विश्वास ठेवला नाही तर??

सायराच्या डोळ्यात पाणी आले. तिला बाहेरच्या विश्वात लोहियांची भीती होती. तिला तिचे बाळ हवे होते. पण या गोष्टीसाठी एखादा भक्कम आधार हवा होता. आणि आत्ता तो आधार मोना होती. मोनानेच तिला वार्‍यावर सोडले तर अवघड होणार होते.

सायरा - मॅम.. माझ्यावर तुमचा विश्वास नसला तर... प्लीज मला.. भारताबाहेर कुठेतरी पाठवून द्या... तो खर्चही मी करेन तिकिटाचा.. पण कुठेतरी पाठवा... मला भारतात राहायचे नाही आहे... मला अटकही करवू नका.. सरांना मी काहीही केलेले नाहीये मॅम...

मोना - त्या दिवशी त्यांच्या खाण्यात तू काही मिसळले होतेस??

सायरा - एक टक्काही शक्यता नाही....

मोना - ड्रिंकमध्ये??

सायरा - अजिबात म्हणजे अजिबात नाही..

मोना - डॅडची बॉडी मॉर्च्युरीमध्ये ठेवल्यावर हे चौघे पुन्हा घरात येऊन ड्रिंक घेत होते तेव्हा तू काय करत होतीस???

सायरा- मी प्रचंड घाबरलेले होते... पण मला लोहियांनी आत येऊन धीर दिला होता.. मी त्या चौघांनाच सर्व्हीस देत होते पहाटेपर्यंत...

मोना - त्यांचे बोलणे काय चालू होते??

सायरा - सरांच्या डेथबद्दलच! अनेकांना फोन लावले होते त्या चौघांनी...

मोना - चौघे गंभीर होते की हासत वगैरे होते???

सायरा - एकदाच... एकदाच मला जतीन हासल्यासारखा भास झाला.

ताडकन उठून बसली मोना! जतीन आणि सायरा शाळेपासून एकाच वर्गात होते. आज अशी परिस्थिती निर्माण झालेली होती की सायराला मोनाचा आधार आणि प्रेम या दोनच गोष्टी हव्या होत्या. बाकी काहीही नको होते. त्यामुले तिने खरे ते सांगून टाकले होते.

मोना डोळे विस्फारून सायराकडे बघत होती.

तेवढ्यात सायरा म्हणाली....

सायरा - तुम्ही परागला घालवलेत तेही चांगले केलेत...

मोना काहीच अंदाज नसल्याप्रमाणे म्हणाली.

मोना - का??

सायरा - तो अर्देशीर सरांना फोन लावायचा इथून...

मोना - पण हे... हे तुला माहीत होते तर... डॅडना का सांगीतले नाहीस???

सायरा - मॅम.. प्लीज... एक काळ असा होता की मी इथेच राहून लोहिया सरांशी प्रामाणिक होते...

मोना - आता??

सायरा - आता काय राहिले आहे माझे??? सरांनी त्यांचा या मुलाशी असलेला संबंध नाकारलेला आहे हे तुम्हाला सांगीतलंच मी... माझ्य आयुष्याला काहीही अर्थ नव्हता... पण या होणार्‍या मुलामुळे मला असे वाटले की निदान अशी एक व्यक्ती तरी असेल आपल्याला... जी फक्त आपली असेल.. त्यामुळे मला हे मूल हवेच होते... पण.... आत्ता तुमच्याशी बोलल्यानंतर असे वाटत आहे की... गुप्ता सरांना जर...या लोकांनी काही दगा फटका केलेला असेल तर... मला.. मॅम मला हा लोहिया या नालायक माणसाचा अंशही नको होईल..

सायरा रडत होती. मोनाने तिला थोपटले.

मोना - रडू नकोस... एक लक्षात घे... मी केवळ तुझ्या आत्ताच्या प्रामाणिकपणावर अवलंबून तुला इथे सुरक्षित ठेवत आहे.. तू जर काही विचित्र वागताना आढळलीस तर माझ्यासारखी वाईट व्यक्ती नाही हे तुलाही माहीत आहे.. मात्र... जोपर्यंत तू प्रामाणिक आहेस तोपर्यंत... तुला कुणीही काहीही करू शकणार नाही.. फक्त मला विचारल्याशिवाय या घरातून बाहेर पडायचे नाही... समजले???

सायराने मान डोलावली.

मोना - आता मला सांग... आपल्याकड एकंदर नोकर किती आहेत आणि कोण कोण आहेत???

सायरा - शामा आणि तिचा नवरा कदम! त्यांना मूलबाळ नाही. मात्र त्या शामाची एक अर्धवट बहीण आहे. ती बागकाम करते! वैशाली! त्यानंतर संजय! आपला ड्रायव्हर! तो एकटाच आहे. एक काका म्हणून म्हातारे गृहस्थ आहेत. त्यांची बायको यमू घरकाम करते. त्यांचा मुलगा रंगू! तो सगळे बाहेरचे काम करतो. भाजी आणणे, बाजार करणे वगैरे! आणि त्याची बायको सुधा सासूला मदत करते घरकामात!

मोना - यापैकी कोण किती शिकलेले आहेत वगैरे काही कल्पना आहे??

सायरा - मला वाटते संजय बारावी झालेला आहे. आणि सुधा, म्हणजे रंगूची बायको .. बहुतेक बर्‍यापैकी शिकलेली असावी.. कारण तिच्याकडे एक इंग्लीश मासिक पाहिले मी एकदा!

मोना - शामा??

सायरा - अंहं.. ती नाही शिकलेली...

मोना - सायरा, यापुढे मला देण्यात येणार्‍या कोणत्याही आहाराबाबत, अन्नपदार्थाबाबत प्रचंड जागरूक राहा! प्रत्येक नोकरावर जातीने लक्ष ठेव! मी बंगल्यावर नसले तर तू एक नंबरची आहेस आणि माझ्य जागी आहेस असे त्यांना वाटायला पाहिजे या दृष्टीने वागायला लाग! कोणत्याही परिस्थितीत माझ्या संदर्भात घडणारी गोष्ट ही तुझ्या अपरोक्ष घडता कामा नये.

सायरा - मॅम... तुम्ही माझा... माझ्या मुलाचा जीव वाचवत आहात.. मी वचन देते... तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी मी स्वतः जातीने लक्ष देईन! मॅम.. मला आणखीन एक गोष्ट बोलायची आहे.. डॉ नगरकर या भागात आहेत... त्या गायनॅक स्पेशालिस्ट आहेत.. मला नाव एनरोल करावे लागेल मॅम..

मोना - लगेच कर... आजच कर संध्याकाळी... सायरा.. मला एक सांग... डॅडच्य संपर्कात असा कुणी माणुस होता??? जो हेलिक्सशी संबंधीत नव्हता पण... कायम इथे यायचा किंवा संपर्कात असायचा वगैरे...???

सायरा - नाही... का??

मोना - अंहं... डॅडनी कधी कुणाला कॅश वगैरे देऊन कुठे पाठवल्याचे माहीत आहे??

सायरा - कॅश.. नाही.. तसे काही नाही... म्हणजे विशेष काही नाही...

मोना - विशेष म्हणजे???

सायरा - म्हणजे दोन पाच हजार वगैरे... काही बिल वगैरे भरायचे असले तरच...

मोना - सायरा तू इथे दहा वर्षे आहेस.. डॅडच्या किती क्लोज होतीस तू??

सायरा - मॅम... सर मला तितके जवळ येऊ द्यायचे नाहीत.... नोकरासारखे वागवायचे असे अजिबातच नाही.. मुलीप्रमाणेच विचारपूस करायचे.. पण... त्यांच्या एका विशिष्ट वर्तुळात माझे महत्व काहीच नव्हते...

मोना - वर्तुळ म्हणजे लोहिया वगैरे???

सायरा - अंहं... बोट क्लब.. पूना क्लब.. मित्र वगैरे...

मोना - डॅडची कुणी ... मैत्रीण वगैरे??

सायरा - नाही.. तसं कुणीच नव्हतं...

मोना - तू कधी रणजीत श्रीवास्तव हे नाव ऐकलं आहेस???

सायरा - रणजी....रणजीत श्रीवास्तव... रणजीत... नक्की आठवत नाही.. पण.. बहुतेक...सुबोध सर एकदा घरी आले होते तेव्हा काहीतरी म्हणत होते...

मोना - डॅड तुझ्यशी काहीच बोलायचे नाहीत??

सायरा - नाही... कधीच नाही... ते मला तितकी जवळची समजायचेच नाहीत...

मोना - सायरा.. आय अ‍ॅम सॉरी.. पण... मला एक सांग.. तुझी.. लोहियांबरोबर जशी रिलेशन्स होती... तशी.. तशी कधीच येऊ शकली नसती ना डॅडबरोबर???

सायरा - छे:.....काहीतरी काय???

मोना - तू लोहियांसाठी काय काय करायचीस सायरा???

सायरा - सरांचे फोनवरचे बोलणे ऐकून ठेवायचे... त्यांच्या हालचाली सांगायचे... आज मुंबईला येणार आहेत... उद्या दिल्लीला जाणार आहेत वगैरे...

मोना - त्यांच्या फाईल्स वगैरे???

सायराने मान खाली घातली.

मोना - ... बोल...

सायरा - मॅम.. सॉरी.. पण एक काळ असा होता की मी लोहियांसाठी सगळे करायचे...

मोना - म्हणजे???

सायरा - फाईल्स तपासायचे... इमेल्स तपासायचे....

मोना - इमेल्स?? इमेल्स तर गोरेलाही माहीत असतील की??

सायरा - हो... पण.. मला असे वाटत आहे की...

मोना - काय???

सायरा - सरांचा.. एक आय डी... रेडिफवर पण होता... तो.. मला कधीच चेक करता आला नाही...

मोनाने मनातल्या मनात रिलीफ मिळाल्याचा श्वास घेतला. निदान 'सिवा' या आघाडीबाबत सायराला काहीही माहीत असण्याची शक्यता नव्हती.

मोना - दहा वर्षं?? दहा वर्षं तू हे करत होतीस???

सायरा - होय...

बराच वेळ बोलणी झाली आणि संधीप्रकाश पसरला तशी सायरा उठून खाली गेली. आजपासून ती जातीने रेन्जो कॅफेमधून पार्सल आणणार होती मोनासाठी! तेवढ्यापुरती मात्र तिला बाहेर जायची परवानगी होती, पण ती संजयबरोबर, मर्सिडीझमधून!

मात्र त्या संध्याकाळी मोनाने दोन गोष्टी केल्या. एक म्हणजे कुठेतरी फोन लावून चौकशी केली आणि चक्क दोन बॉडीगार्ड्स नियुक्त केले दुसर्‍या दिवसापासून! स्वतःसाठी!

दुसरे म्हणजे सायराने सिलेक्ट केलेल्यांपैकी मधुमती नावाची एक मुलगी शामाच्या जागी पर्सनल सहाय्यिका म्हणून नियुक्त केली. तीही उद्यापासून येणार होती.

आज एक नवीनच ताप झालेला होता.

डॅनलाईनच्या अ‍ॅग्रीमेन्टचे हेलिक्सभर पेढे वाटले जात असतानाच नाना सावंतने वर्कर्समध्ये असंतोष पसरवायला सुरुवात केल्याचे समजले होते. सर्व वर्कर्स आता पाऊण तास लंच टाईम असल्याप्रमाणे वागू लागले होते. सुपरवायझर्सना किती जॉब झाले याऐवजी किती वेळ मशीन ऑन होते त्याचा हिशोब द्यायला लागू लागले. त्यावरून भांडणे होऊ लागली. जरा आवाज चढवल्यावर गपचूप नेहमीप्रमाणे हिशोब द्यायला लागले. हे सगळे गेले तीन चार दिवस चाललेले होते म्हणे! पण आज एका सुपरवायझर आणि एका वर्करमध्ये पर्सनल कारणांवरून झालेल्या भांडणाला नाना सावंत अ‍ॅग्रीमेन्टचा रंग फासून त्याची जाहिरात करून दाखवली. भसीन हतबुद्ध होऊन नाना सावंतच्या विषारीकरणाकडे बघत बसलेला होता. भसीनला त्यच्या क्षमतांची उद्या आठवण करून द्यावीच लागणार होती. मोनाच्या मनात विचार आला! किती आघाड्यांवर एकाच वेळी ताण सहन करायचा आपण?

तेवढ्यात सिवाचा फोन आला. शामा आसपास घुटमळत होतीच! मोनाने तिला आत जाऊन चहा करायला सांगीतले. तरीही ती येऊन जाऊन असल्यासारखे करत होती. आता मात्र मोनाने इंग्लीशमध्ये सुरुवात केली.

सिवाच्या बोलण्यातून इतकेच जाणवले की मुंबईत चार माणसे आणि पुण्यात तीन माणसे ठेवणे अत्यावश्यक आहे. त्यांची टोटल कॉस्ट मिळून महिन्याला दिड लाख होतील. पण ते वर्थ होते. मोनाने त्याला क्लीअरन्स देऊन टाकला. त्याच फोनवर हेही समजले की बझटबद्दलची एवढी माहिती सिवाला डॅडकडूनच कळलेली होती. हा मात्र मोठाच धक्का होता. म्हणजे आपल्याच घरात कुठेतरी बझटबद्दल माहिती मिळणे शक्य होते. आता सगळे घर शोधणे म्हणजे महाकर्मकठीण काम होते. पण करायलाच हवे होते.

सिवाचा फोन संपला आणि काही वेळाने सायरा आली. मोनासमोरच पॅकेजेस ओपन करत तिने सर्व पदार्थ मांडून ठेवले. फार वाईट वाटले दोघींनाही!

याला काय अर्थ आहे? स्वतःच्याच घरात असे का बाहेरचे खावे लागावे? पण त्यामुळे मोनाने एक निर्णय ठामपणे घेऊन टाकला.

शामाला घालवायचेच! कंप्लीट स्टाफ बदलावा लागला तरी चालेल, पण बदलायचा! हे असले लोक नकोतच!

आजची एक रात्र शांततेची होती! उद्या एकदा कंपनीत गेले की नाना सावंत आणि बिझिनेस या दोन पातळ्यांवर लढायला लागणारच होते. स्वतःला वाचवायचे की डॅड आणि आईच्या मरणामागचे रहस्य शोधायचे की कंपनी वाचवायची की सूड घ्यायचा?

काही नाही! निवांत झोपायचे.

खरे तर पडल्या पडल्याच झोप लागायला हवी होती. पण पाठ टेकल्याबरोबर रेजिनाची आठवण अधिक यायला लागली. मोनाने त्याला ताबडतोब फोन केला. दिवसभरात दोन वेळा बोलणे झालेले होते. पण आत्ताचा कॉल पर्सनल स्वरुपाचा होता. त्याच्याशी एक दिड मिनिट लाडीक संवाद पार पडल्यानंतर तिने फोन ठेवला.

झोप लागण्यापुर्वी मनात आलेला शेवटचा विचार...

.... या सर्वांना यमसदनी धाडणार आहे मी.... एक एक करून...

===============================================

अ‍ॅग्रीमेन्टसाठी असलेल्या मीटिंगमध्ये लोहिया, मेहरा, जोशी, भसीन, बिंद्रा आणि स्वतः मोना होती.

नाना सावंतने राजकारणातील एक स्थानिक नेता आणलेला होता. एक वकील आणलेला होता.

आणि चहा कॉफी झाल्यानंतर कॉन्फरन्समध्ये बोलणी सुरू झाली.

नाना - बोला लोहियासाहेब... आमच्या पत्रावर काय काय विचार झाला??

लोहिया - हं! नाना... तुझ्यासारखा युनियन लीडर असेल तिथला वर्कर म्हणजे कुबेरच होणार...

लोहिया नानाला अरेतुरेच करायचे! त्यांचे हे वाक्य ही तक्रार आहे की स्तुती या गोंधळात पडण्यापेक्षा स्तुती मानून नाना हासला.

लोहिया - हे आठ हजार वगैरे सध्या राहूदेत.. आत्ताच एक संप झाला त्यामुळे कंपनी पडलीय मागे... आता जास्त ताणण्यात अर्थ नाही आहे.. आपण तीन तीन हजाराचे अ‍ॅग्रीमेन्ट करू आणि याच्यावर पडदा पाडू!

नाना - आता थट्टाच करायची आहे म्हंटल्यावर आम्ही तरी काय बोलणार? काय करायचे ते करा... वर्कर बिचारे रडतील आणि येतील कामावर...

थोडक्यात 'वर्कर्स येणार नाहीत' असे नाना सुचवत होता.

लोहिया - तू एकदम ही जी आक्रमक भूमिका घेतोस ना.. ती मला फार आवडते... तुझ्याकडे आपला सेल्स असता तर जोशींना कामच राहिले नसते... काय जोशी???

जोशी - हो सर...

नाना - आता काय आहे साहेब.. आमचे काळ्याचे पांढरे झाले अ‍ॅग्रीमेन्ट करण्यात... आणि तुम्ही या जमान्यात तीन हजार देताय...

लोहिया - नाना आपल्याकडे अ‍ॅव्हरेज बेसिक चौदा हजार आहे वर्करचा... चौदा हजार बेसिक हा काय कमी पगार आहे मशीनवर?? त्यत तीन हजार आपण वाढवणार...

नाना - नाही जमणार साहेब...

लोहिया - कंपनीलाही जमायला पाहिजे ना पण??

नाना - काय साहेब... आता ते काय काय स्वितझर्लंड, अमेरिका, जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया काय काय चाललंय कंपनीच... उलट मोठीच होत्य की कंपनी..

मोनाने चमकून नानाकडे पाहिले. तिच्या आणि रेजिनाच्या स्पेन टूरचा इथे नाना स्वतःसाठी उल्लेख करेल हा तिच्यासाठी नवीन अनुभव होता.

लोहिया - सॉरी नाना.. आठ हजार इज इन्पॉसिबल..

नाना - नाही ना.. आपल्याला नाही त्या खाली जमणार...

लोहिया - हे म्हणजे तू माझे ऐकत नाहीस अन मी तुझे ऐकत नाही.. असा प्रकार आहे...

आता तो राजकीय नेता बोलू लागला.

नेता - साहेब.. आम्हाला गरीबी माहीत आहे.. आज जन्तेला जे प्रॉब्लेम्स आहेत ना.. त्याची कल्पना तुम्हाला इथे बसून नाय येणार... आम्ही अक्षरशः जीवाचं रान करून एकेक माणूस जपतो आमच्या वॉर्डातला...

लोहिया - तो प्रश्न नाही आहे... हेलिक्सनेही आजवर सगळ्या कामगारांना जपलेले आहे.. तूच विचार कर नाना... जॉनी कुट्टी, थॉमस, चौधर, पीटर हे वर्कर्स आपल्याकडे पंचवीस वर्षापेक्षा जास्त काळ आहेत... आहेत की नाही???

नाना - साहेब ते विषयांतर झालं.. आज जमाना बदलला आहे... आज आम्ही इथे मान मोडून काम करतो.. घरी मुलाला साधे शाळेत घालायचे तर डोनेशन लागते.. नाही देता येत... सगळेच प्रॉब्लेम्स असतात साहेब.. तुम्हाला काय काय सांगायचे... आजारपणे.. मृत्यू.. शिक्षणे... घरखर्च.. कपडे... वस्तू.. काय एक आहे का?? तुम्हाला मी सांगीतलं होतं बघा मोना म्याडम त्या दिवशी.... आमच्या वर्कर्सच्या घरात साधा टी व्ही नाही टी व्ही... आज एम आय डी सी भोसरी अन पिंपरीमध्ये अकरा अकरा हजाराची अ‍ॅग्रीमेन्ट्स होतायत...

लोहिया - नाना... आपण टाटा आणि बजाजला मॅच करू शकत नाही...

नाना - अहो म्याच बिच नका करू.. पण आठ हजार तर व्हायलाच पाहिजे...

लोहिया - एक मिनिट.. तुमचे बाकीचे जे म्हणणे आहे तयवर आधी बोलू.. हे .. हे मला काय समजले नाही.. मशीन अप टाईमवर कसे काय ठरू शकते काम??

नाना - म्हणजे काय? दोन्ही एकच आहे ना? जितका वेळ मशीन अप आहे तितके जास्त जॉब नाही होय होणार??

लोहिया - नाना.. काय बोलतोस तू.. दोन्ही एकच आहे तर मग मान्य का करत नाहीस जॉबवर मोजणी...

नाना - अहो मटेरिअल बेकार असतं.. मशीनला सतरा प्रॉब्लेम्स आहेत.. जॉब बिघडला की तो नाही मोजत सुपरवायझर...

लोहिया - एक मिनीट.. रिजेक्सनचे पर्सेंटेज ठरवले आहे ना दोन्हीकडून??

नाना - ती भानगडच नको ना पण?? रिजेक्शन मोजा, हे मोजा, ते मोजा...

लोहिया - म्हणजे काय? म्हणजे एकही जॉब अ‍ॅक्सेप्टेबल नसला तरी केवळ मशीन चालू होते म्हणून पैसे मिळणार... असेही होऊ शकेल...

नाना - साहेब हे वर्कर काय डेली बेसिसवर आहेत का?? हे वर्षानुवर्षे इथे आहेत.. त्यांचे पैसे तुम्ही मासिक पगार बेसिसवर देता ना?? मग मशीन अप टायम मोजला तर काय बिघडले.. जॉबवर कुठे पैसे द्यायचे आहेत??

लोहिया - वा वा! असं कसं?? मग रिजेक्शनचे पर्सेंटेज वाढले की कोण जबाबदार??

नाना - वाढलंय का कधी??

लोहिया - याला काहीही अर्थ नाहीये.. पे रोल वर असले तरीही वर्कर्ससाठी हे नियम आहेत ते मुळातच यासाठी की प्रॉडक्शन व्यवस्थित व्हायला पाहिजे...

नाना - तुम्ही काहीच मान्य करत नाही याला काय अर्थ आहे??

लोहिया - ही मागणीच चुकीची आहे.. म्हणजे दुकान उघडून ठेवले की धंदा होतो का? माल विकला जायला नको का??

नाना - साहेब मला काय बोलायचे नाही.. हे आहे ते असं आहे..

त्या राजकारण्याने शहाणपणा शिकवायला सुरुवात केली.

नेता - नाना ... माझं काय म्हणणंय... जे काय आहे ते सामोपचाराने व्हायला हवं... एकमेकांशी सुसंवाद साधण्यातूनच प्रगती होते एरियाची... लोहिया साहेब... तुम्ही काय मान्य करणार ते तर सांगा...??

लोहिया - आम्हाला पहिलं म्हणजे ही मशीन अप ची मागणी काढून टाकायला हवी आहे...

नेता - ऐका.. माझं म्हणणं ऐकून घ्या... मी मगाशीच ही माहिती जमवलेली आहे.. आत्तापर्यंतचे मॅक्झिमम रिजेक्शन दोन टक्यांच्यावर नाही आहे...

लोहिया - नाही नाही.. तुम्हाला अशी मागणी करायची असेल तर मग हे म्हणा ना.. की आम्ही पावणे दोन टक्यांवर काम करू...

नेता - आता तुमची मशीन्स जुनी असली तर आम्ही काय करणार??

मेहरा पहिल्यांदाच मध्ये बोलले.

मेहरा - मशीन्स जुनी नाही आहेत.. व्यवस्थित आहेत...

नेता - आपण कोण??

मेहरा - मी मेहरा आहे... लॉजिस्टिक्स...

नेता - मशीन्स अठरा वर्षापुर्वीची आहेत...

मेहरा - ती फक्त दोनच.. बाकी सगळी नवी आहेत..

नेता - नाही पण रिजेक्शन होतंच नाहीये ना??

मेहरा - तो वेगळा भाग आहे.. लोहिया साहेब जे म्हणतायत ते असं की अशी मागणी मान्य झाल्यावर रिजेक्शनवर नियंत्रणच राहणार नाही.. म्हणून अशी मागणी मान्य व्हायला हवी असेल तर रिजेक्शनचाही क्लॉज घाला त्यात...

लोहिया - एक्झॅक्टली...

नाना - नाय नाय.. आपल्याला नाय जमणार... कमगार म्हणजे काय शोषण करून घ्यायला तयार असलेला माणूस आहे का काय??

लोहिया - नाना... उगाच आवाज चढवू नको... शांतपणे बोल...

नाना - आवाज चढवू नको म्हन्जे?? हे नाही मान्य, ते नाही मान्य... वरचे होत राहणार गब्बर आम्हाला पिळून...

लोहिया - ही असली फार स्टॅन्डर्ड स्टेटमेन्ट्स असतात नाना.. वर्षानुवर्षं तू हेच बोलत आला आहेस...

नाना - स्ट्यांडर्ड बिंडर्ड जाऊदेत... काय ठरवताय ते सांगा आधी...

लोहिया - मशीन अप ची मागणी मान्य नाही..

नाना - ठीक आहे.. पुढे???

लोहिया - आता हे लंच टाईम... लंच टाईम पाऊण तासाचा कशाला पाहिजे?? अर्ध्या तासात मेसमध्ये जेऊन येता येत नाही का??

नाना - साहेब तुम्ही वाकड्यात धरताय सगळं... मीटिंग बंद करा... काय देऊ नका आम्हाला... काय करायचं ते आम्ही करू...

लोहिया - म्हणजे काय? तू स्पष्टिकरण तर दे ना आधी?? कशाला हवा पाउण तासाचा लंच टाईम??

नाना - अरे? कशाला म्हन्जे?? ऐन वेळेला सुपरवायझर नवीन जॉब लावायला सांगतात.. त्याचं सेटिंगच तास तास चालतं... अन जेवून यायला दोन मिनिटे उशीर झाला की त्यावरून तासणार... हा काय कैदखानाय का?? जेवायला नको व्यवस्थित???

एच आर च्या भसीनने पहिल्यांदाच तोंड उघडले.

भसीन - मी स्वतः पंधरा मिनिटात जेवून येतो...

भसीनवर नानाचा राग होता.

नाना - ओ साहेब.. तुम्ही टेबलवर बसून नाश्ता करत असता.. एसीत बसून बोलायला काय जातंय... आमचे लोक माना मोडून काम करतात.. तुम्ही आलायत त्या नेरोलॅकमधून ... इकडची परिस्थिती वेगळी आहे.. हे तुम्हाला समजणार नाही...

थोडक्यात 'तुम्ही गप्प बसा' असा संदेश नानाने सगळ्यांसमोर भसीनला दिल्यामुळे भसीन उखडला.

भसीन - समजणार नाही काय? न समजायला आहे काय याच्यात? टाईमपाससाठी वेळ हवा आहे तुम्हाला हा... पाऊण तास मला एक जण नुसता जेवून तरी दाखवेल का रोजच्याच स्पीडने??

नाना - लोहिया साहेब हे बोलणार असतील तर आम्हाला ही मीटिंगच नको...

लोहिया - तू सारखं मीटिंग नको मीटिंग नको काय करतोस?? तयची पद्धत राहूदेत.. पण मुद्दा काय चुकीचा आहे???

नाना - मला सांगा साहेब.. ते फॉरीनर्स जर्मनीहून आले होते... तुम्ही डायमंडला त्यांच्याबरोबर चार चार तास जेवता... गरीब वर्कर एक दहा मिनिटे आणखीन जेवला तर काय होणार आहे कंपनीचे???

आता मात्र लोहिया भडकले.

लोहिया - नाना... काहीही वाट्टेल ते बोलू नकोस... तो प्रश्न आणि हा प्रश्न वेगळा आहे.. तिथे करोडो रुपयांचे डिसीजन्स होतात... ते काय आम्हाला चोचले पुरवायचे नसतात... आणि तू असा बोलणार असशील तर या मीटिंगला काही अर्थच नाही...

नेता - नाना... तुम्ही थांबा जरा... साहेब.. मला सांगा... पंधरा मिनिटांनी काय प्रॉब्लेम होणारे???

लोहिया - अर पण कशासाठी ही पंधरा मिनिटे?? आं??उगाच?? मग मी म्हणतो सात सात मिनिटांनी ऑफीस टाईमच वाढवा की.. ते चालेल का?

नाना - असं कसं चालेल?? म्हणजे आधीच थंडी गारठ्याचे बिचारे निघतात घरून.. ते तुम्ही आधी निघायला सांगणार... आणि त्यावर पुन्हा परत निघताना आणखीन थांबायचं.. आं?? हा कुठला हिशोब??

लोहिया - मग हा पंधरा मिनिटांचा कसला हिशोब आहे???

नेता - थांबा.. आधी आपण एक काम करू... पगारवाढीचं आधी मिटवू....

लोहिया - आठ हजार अशक्य आहे...

नाना - यांना सगळं अशक्यच आहे.. यांची मुलं अमेरिकेत एम बी ए होणार... आमच्या मुलांना मार्कं पडूनही इथेच कुजणार... कुठल्यातरी फडतूस कॉलेजला जात राहणार... तो आबा? परवा मला म्हणाला अजून दहा हजार मिळाले असते तर ग्रॅन्ट असलेल्या कॉलेजला मुला घलू शकलो असतो... तुम्हाला काय आमची दु:खं समजणार आहेत??

लोहिया - नाना.. तू आधी एक गोष्ट लक्षात घे की टॉप मॅनेजमेन्ट आणि वर्कर्स यांच्या राहणीमानाची जर तुलना करत बसलास तर आपली मीटिंग कुठेच पोचणार नाही...

नाना - का नको करू तुलना?? तुम्ही प्रॉफिट कमावणार आमच्या जीवावर... आं?? आणि आम्ही मरत मरत कसबसं जगायचं... होय??

लोहिया - काही वाईट चाललेलं नाहीये लोकांचं... कित्येक वर्कर्स मला पर्सनली माहीत आहेत.. सगळं व्यवस्थित आहे त्यांचं...

नाना - अरे वा? म्हणजे आम्ही त्यांच्यात राहून आम्हाला माहीत नाही.. आन तुम्हाला माहीत.. आं??

लोहिया - नाना.. आपण आठ हजार देऊ शकत नाही...

नेता - साहेब.. तुम्ही किती देणार??... मला सांगा...

लोहिया - तीनचे फार तर आम्ही साडे तीन करू... त्या उप्पर नाही...

नाना - चला... चला चला... चला हितनं... लोहिया साहेब नमस्कार.. आम्हाला वेळ दिल्याबद्दल आभार..

लोहिया - नाना जाऊ नकोस.. इथे बस.. आज काय तो सोक्षमोक्ष लावायचाच आहे...

नाना - नाही लागणार सोक्षमोक्ष... ही असली दळभद्री इन्क्रीमेन्ट्स नकोच्चेत...

लोहिया - तुमचं फायनल काय आहे??

नाना - आमचं एकच आहे.. पहिलं आणि फायनल.. आठ म्हणजे आठ...

लोहिया - आठ शक्य नाही...

नाना - मग जाऊदेत ना??... कशाला आपापला वेळ घालवायचा आपण?? है की नाय??

लोहिया - याला काय अर्थ आहे?? मी मुंबईहून इथे आलो कशासाठी मग??

नाना - साहेब तुम्ही मुंबईहून आलात त्याचे बर्डन कंपनीवर टाकाल हो... पण आमच्यातल्या कामगाराला त्याच्या आईची तब्येत मुंबईला दाखवायची वेळ आली तर त्याला परवडणार नाही...

लोहिया - ठीक आहे... आपण चार हजारात मिटवून टाकू... बस इथे...

नाना - चार हजार?? कसले चार हजार? चार हजार मला नकोतच.. ठेवा तुम्हालाच...

लोहिया - साहेब तुम्ही सांगा यांना.. कंपनीची परिस्थिती सुधारली की काहीतरी करता येईल.. आत्ता चार हजार बरोबर आहेत...

नेता - नाना... इथे बसा.. ऐका.. साहेब पुढे आलेत एक पाऊल.. तुमचं काय म्हणणं आहे??

नाना - मला आता काही म्हणायचंच नाही...

नेता - नाही नाही.. आपल्या बांधवांचा प्रश्न आहे.. ते आशा लावून बसले असतील बाहेर.. सांगा मला..

नाना - नाही नाही.. सांगायचंच नाही मला काही.. आठ हजार असेल तर थांबणार मी...

नेता - असं कुठे होतं का?? तुम्ही पण निगोसिएशन्स मार्जिन ठेवलेलंच असणार ना??

नाना - काहीही मार्जिन बिर्जीन नाही.. जे काय आहे ते हे आहे...

नेता - बर चला... मी काय म्हणतो..... सात हजारात उरकून टाका...

लोहिया - सात हजार आम्हाला मान्यच नाही आहे...

नाना - मग ठीक आहे ना??... प्रॉब्लेम काय आहे?? मी सांगतो सगळ्यांना.. अ‍ॅग्रीमेन्टच झालं नाही म्हणून... मग त्यांची इच्छा...

लोहिया - मोनालिसा... तुला काय वाटतंय??? काय करावं?

अचानक हा प्रश्न विचारल्यावर मोना गांगरून जाईल आणि काहीतरी भावनिक उत्तर देईल हा अंदाज खोटा ठरला लोहियांचा...

मोना - ठीक आहे नाना... जा तुम्ही... सांगा त्यांना नाही झालं अ‍ॅग्रीमेन्ट म्हणून...

मोनाचं हे त्या मीटिंगमधलं पहिलंच वाक्य होतं! पण अख्खी कॉन्फरन्स दचकली. भसीन मात्र खुष झाला. नानाला थोबाडात लगावणारा एक तरी होता मॅनेजमेन्टमध्ये हे पाहून!

नाना - म्याडम... तुम्हाला काही बोललो तर ते बरं नाही.. पण एक सांगतो... अजून तुम्हाआ अनुभव नाय.. काहीच माहीत नाही.. आमचे अन लोहिया साहेबांचे हेच करण्यात काळ्याचे पांढरे झालेले आहेत.. अ‍ॅग्रीमेन्ट झालं नाय तर वर्कर्स असले भडकतील.. की माझंही काहीही नियंत्रण राहणार नाही...

मोना - म्हणजे काय होईल???

नाना - घ्या.. म्हणजे काय होईल ... आता यांना काय सांगायचं???.. अहो स्ट्राईक होईल स्ट्राईक...

मोना - करा म्हणाव....

क्षणभर लोहियांना आपल्या शेजारी मोहन गुप्ताच बसल्याचा भास झाला. दचकलेच लोहिया! ते काहीतरी बोलणार तेवढ्यात नाना म्हणाला..

नाना - तुम्ही काय म्हणताय ते तुमचं तुम्हाला कळतंय का म्याडम??

मोना - एक शब्द जास्त बोललात तर सिक्युरिटीला बोलावून हाकलून देईन... ताबडतोब संपावर जायला सांगा सगळ्यांना..

हे वाक्य बोलताना मोनाचा स्वर अजिबात चढलेला नव्हता. आणि त्यामुळेच तो भयंकर होता. विषारी! नानासारखा माणूसही शहारला. नेता आता मध्ये पडला.

नेता - मॅडम.. एकदम असं बोलून आपल्याला काहीही साध्य होणार आहे का??

मोना - आपण कोण???

नेता - जगदाळे.. इथल्या वॉर्डाचा मेन आहे मी...

मोना - तुमचा या गोष्टीशी काही संबंध आहे???

आता लोहियांनी मधे बोलणेच सोडून दिले होते. जोशी, बिंद्रा आणि भसीन हादरून मोनाकडे पाहात होते. मेहरा मात्र मिशीतल्या मिशीत मिश्कीलपणे हासत होते.

नेता - बास का?? म्हणजे आता घरातूनच आम्हाला विरोध आहे म्हणायचं??... आं??

मोना - तुमचा हेलिक्सशी काही संबंध आहे का??

नेता - माझा जन्तेशी संबंध आहे... सगळ्या...

मोना - पुन्हा या मीटिंगला यायचं नाही... काय?? ते काय पद बिद आहे महापालिकेतलं ते विसरावं लागेल..

ही असली धमकी मिळेल हे जगदाळेच्या बापालाही सुचले नसेल! तो नुसताच ताडकन उभा राहिला आणि अचानक मवाळ झाला. त्याला जाणवले. ही बया मोहन गुप्तांची मुलगी आहे. शहरातील सर्वात श्रेष्ठ क्रॉस सेक्शनमध्ये आहे. आपल्याला कुठेही सहज अडकवेल.

गरीब गायीप्रमाणे तो निघाला तसा वकीलही निघून गेला.

आता आला नानाचा प्रॉब्लेम!

नाना - हे काय चाललंय लोहिया साहेब??

नानाचा स्वर फारच विदीर्ण होता.

मोना - आता माझ्याशीच बोला.. लोहिया साहेबांशी झालंय आता बोलून तुमचं.. फायनल ऑफर देतीय.. अडीच हजाराचं अ‍ॅग्रीमेन्ट होईल... नाहीतर जे करायचे ते करा... लंच टाईम अर्धा तास... आणि नंबर ऑफ अ‍ॅक्सेप्टेड जॉब्जवर प्रॉडक्शन रेट धरणार...

नाना - ओ बाई.. आत्ता साहेब चार हजार म्हणालेत...

मोना - तेव्हा साहेबांना तुम्हाला चार हजार ऑफर करायची इच्छा होती.. आता नाहीये त्यांना तशी इच्छा!

नाना - हे फार होतंय...

मोना - अजून थांबलात तर रक्कम कमी होऊ शकेल..

नाना उठला. बघून घेईन अशी मान हालवत निघून गेला.

चारच दिवसात सर्वत्र बातमी पसरली. मोना मॅडमने अचानक अडीच हजार ऑफर केले आणि जगदाळे साहेबांना हाकलून दिले. नानासाहेबांनाही जा म्हणाल्या! करायचं ते करा म्हणाल्या! असंतोष वाढू लागला. मोनावर लोहिया लॉबीचे प्रेशर येऊ लागले. इमेल्सची तीव्रता वाढली.

इकडे मोना वेगळ्याच कृत्यात एन्गेज्ड होती. सर्वात जुन्या अशा दहा वर्कर्सना तिने बंगल्यावर बोलवून मस्त नाश्ता बिश्ता दिलेला होता. ते आधी वचकून होते. मोनाने नाना सावंतचे चित्र उभे केले. त्यातून हे सिद्ध केले की जरी आठ हजार कंपनी देऊ शकत नसली तरि चार हजार द्यायला तयार झाली होती. नाना सावंत अचकट विचकट बोलला आणि म्हणाला कामगारांची जात कधीही समाधानी नसते. कितीही द्या बोंबलणारच! त्यात पुन्हा लोहिया सरांना आणि मलाही वाट्टेल ते बोलला. त्यामुळे आम्ही चिडून करायचे ते करा असे सांगीतले. चार हजाराची ऑफर अजून व्हॅलीड आहे. मात्र नाना युनियन लीडर असेल तर आमचा स्टॅन्ड अजूनही तोच आहे.. करायचे ते करा...

केवळ सहा दिवसात थॉमस नावाचा वर्कर आतल्याआतच नेता निवडला गेला. त्याने स्वतंत्रच युनियन काढली. हळूहळू पन्नास एक जणांना चार हजार मिळणार आणि नाना सावंतवाल्यांना काहिच नाही हे समजायला लागले तसे थॉमसकडची स्ट्रेन्थ वाढायला लागली. नाना सावंत धुमसत होता. इकडे लोहियाही हादरलेले होते. मोना गुप्ता आणि मोहन गुप्ता या दोघांमध्ये काहीही फरक नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलेले होते. त्यांचा आणि अर्देशीरांचा प्लॅनही तयार झालेला होता. काय करायचे त्याचा!

आणि अकराव्या दिवशी नवीन युनियन रजिस्टर्ड झाली. त्यात बहुसंख्य कामगार होते. नाना आता कामावरही येत नव्हता.

केवळ महिन्याभरात चार हजारांचे इन्क्रीमेन्ट मिळालेल्या कामगारांच्या बालबच्च्यांनी हेलिक्सला दुवा दिली.

एक गिअरही कमी न बनता आणि नाना सावंत हा विरोधक नेस्तनाबूत होऊन हेलिक्स आता दरवर्षीच्या अ‍ॅन्युअल डे कडे प्रवास करत होती.

आणि आज रात्री नाशिकच्या ताजमध्ये मोना आणि रेजिनाचा प्रणय रंगात आला होता.

रेजिनाच्या जिभेमुळे मोनाच्या कानात गुदगुल्या होत होत्या. ती खुसखुसत असतानाच त्याच्या पाठीवर आपली मिठी घट्ट करत होती.

रेजिना - फार गॅप आहे... आपल्यात...

मोना - हंहं?? ... कसली???

रेजिना - हा तुझा शर्ट... अन आत काय काय...

मोना - अच्छा... आणि तू???

रेजिना - मी काय... एका सेकंदात शर्ट काढून टाकतो... हा बघ...

रेजिनाच्या कमावलेल्या सौष्ठवाकडे पाहताना मोना अवाक झाली होती. बर्‍याच दिवसांनंतर, खरे तर स्पेननंतर पहिल्यांदाच असा एकांत मिळत होता. नाशिकच्या कोका कोलाच्या छोटेखानी प्लॅन्टमध्ये डॅनलाईनला दोन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता होती म्हणून ते इथे आले होते. आणि ताजमध्ये जरी स्वतंत्र स्विट्स घेऊन राहिलेले असले तरी आत्ता दोघेही मोनाच्याच स्विटमध्ये होते.

संध्याकाळचे साडे सात वाजलेले होते.

मोना - तू म्हणजे रेसलरच आहेस...

रेजिनाने रेसलर प्रमाणे बॉडी शोची नक्कल करून दाखवली.

मोना हसू लागली.

रेजिना - आता तू...

मोना - काय???

रेजिना - बॉडी शो...

मोना - हॅ...

रेजिना - हॅ काय?? बघायचंय मला...

मोना - मी काय ब्युटी क्वीन आहे???

रेजिना - आहेस... माझ्यासाठीतरी आहेस...

मोनाने शर्ट काढून टाकला. बेडवर रेजिना झोपलेला होता. ती बेडवर उभी राहिली. डब्ल्यू डब्ल्यू ई मधील दिवाजप्रमाणे हातवारे करू लागली. रेजिनाने बराच वेळ बघून शेवटी शिट्टी वाजवली. त्यानंतर मात्र लाजून मोना त्याच्यावर कोसळली.

रेजिनाच्या अ‍ॅथलीट शरीरात ती केव्हाच सामावली गेली. गुदमरल्यामुळे धडपडत असतानाच रेजिनाने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.

कित्येक दिवसांनी पुन्हा स्पेन उतरला होता नाशिकमध्ये!

रेजिना - तुला एफ टीव्ही मध्ये जॉब निश्चीत मिळेल...

मोना - अच्छा?? म्हणजे आता तू मला जॉब देणार???

या वाक्याने रेजिनाला क्षणभर जाणीव झाली.. अरे.. ही आपली बॉस आहे... पण क्षणभरच.. लगेचच त्याची आवडीची थिअरी त्याला आठवली... काम व्यवस्थित झाले की मग पर्सनल लाईफ सुरू...

मोना - मिशा काप...

रेजिना - असूदेत..

मोना - कशाला??

रेजिना - तुला आयुष्यात कसली तरी बोच पहिजेच ना???

दोघे हसायला लागले.

रेजिना - यू आर टू गुड हिअर...

मोना - हंहं???

रेजिना - तू मला कधी काही म्हणतच नाहीस...

मोना - आहे काय तुझ्यात म्हणण्यासारखं???

रेजिना - की बुवा तुझे शोल्डर्स चांगले आहेत वगैरे....

मोना - अच्छा... बर चल म्हणते... तुझे हात चांगले खरखरीत आहेत...

रेजिना - काय काँप्लिमेन्ट आहे...

मोना हसायला लागली तोवर दोघेही पूर्ण निर्वस्त्र झालेले होते....

....आणि खेळ ऐन रंगात आलेला असताना मोनाच्या शेजारचा फोन वाजला... शामा होती फोनवर....

"मॅडम... फार वाईट बातमी आहे... सायरा मॅडम अपघातात गेल्या... तुम्ही लगेच या..."

गुलमोहर: 

>>>>मॅडम... फार वाईट बातमी आहे... सायरा मॅडम अपघातात गेल्या... तुम्ही लगेच या
आता पुढे काय? Sad

धन्यवाद नविन भागाबद्दल!!!!!!!!!!!!
सहि आहे!!!!!!!!!!

बापरे, हे नको होत व्हायला, मोना ने शब्द दिला आणि तो पाळला नाहि गेला, ठिक आहे ति एकटि किति ठिकाणि लक्ष देणार, पण घेतलेलि जबाबदारि पार पाडायला हविच, ति नाशिकला आहे म्हणल्यावर एखादा बॉडिगार्ड तरि सायरा संगे हवा होता, किंवा दुसरा कोणताहि ऊपाय. ज्या घरात मोहन गुप्तांना मारल गेले तिथे सायरा चि काय किंमत, हे मोनाला समजायला पाहिजे होत. ति एकटिच मोनाच्या बाजुने होति राव, आता........

बाकि नाना चा पत्त्ता काय सॉलिड ऊडवलाय, नाद खुळा. ४ ह्जार VS २.५ हजार, अचुक पॅरॅमिटर वर तोडलय Happy

मी पहिल्या॑दा प्रतिसाद देते आहे
आता कस होणार मोनाच, रेजिना चा॑गला असेल ना
बाकि काद॑बरी भारि लिहिता

बेफिकीर,

हा भाग ३ दिवस ऊशीरा आलाय, तेव्हा
.......... पुढच्या १४ आणि १५ व्या भागाच्या प्रतिक्षेत.

Happy

मस्तच जमलाय. नानाची अजून तासायला हवी होती.

हे कामगार नेते म्हणवणारेच कामगाराण्ची जास्त बाट लावतात.

वा! रहस्य छान रंगतय.
वेगवेगळ्या गोष्टी, भाषा सांभाळुन वेगवेगळ्याप्रकारे सादर केल्याबद्दल अभिनंदन!
तुम्ही गेल्या ४ वर्षापासुनच लेखन चालु केले आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जात आहे.

अरेरे सायरा गेली!!!! Sad

मोनाच्या अ‍ॅटिट्युडच्या मी एकदम प्रेमात!!! सही आहे ती... मस्त डिल केले तिने सगळे प्रकरण... ब्राव्हो ब्रेव्ह गर्ल Happy
मोना आणि रेजिना ची स्टोरी भलतीच सेन्शुअल होतेय... जाम भारी लिहिता हो बेफिकीरजी... क्लास एकदम! त्या दोघांसाठी आता मला एक गाणं आठवतंय... त्यांच्या कथेला साजेसं आणि तितकंच सेन्शुअल....माझं अत्यंत आवडतं.... हा व्हिडिओ:प्यार की ये कहानी सुनो

बेफिकीरजी,
कथा छान रंगत आहे, पण एक गोष्ट फार खटकतय, कोणतीही स्त्री २-३ भेटीत किंवा २-३ महिन्यात एका पर पुरुषा बरोबर एव्ढं जवळिक साधत नाही , आणि मोना तर गुप्ता हेलिक्स ची MD.

बाकी Corporate जग छान रंगवताय आपण.

ह्या भागा साठी फार वाट बघायला लावलीत आपण, पुढचे भाग लवकर येऊ देत.

पुलेशु.

- म्हमईकर

परेश व सर्वांचे धन्यवाद!

मी जरा विचित्र मानसिक अवस्थेत आहे. काही काही चुका होत आहेत. कृपया लोभ असावा.

http://www.maayboli.com/node/21266

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीरजी,
तुम्ही प्रेशर न घेता आधी आईंच्या सुश्रुषेवर लक्ष केंद्रित करा ते सध्या महत्त्वाचे आहे. फार धावपळ होत असेल
व मनाची अवस्था पण नाजूक असेल. जास्त सिगारेट वगैरे ओढू नका. घरच्यांना तुमची गरज आहे. स्वतःची
पण काळजी घ्या. वी आर विथ यू.

बेफिकीरजी,
माझ्या कडुन काही कमी जास्त प्रतिक्रिया दिली गेली असल्यास क्षमस्व, I was not aware.
Let God Give You Enough Strenght And Courage To Handle This.

बेफिकीर तुम्ही तुमची आणि आईंची काळजी घ्या. लिखाण काय होतच राहील. आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत. आमच्या सर्वांच्या प्रार्थना तुमच्या पाठीशी आहेत.

भुषणराव, खरच काहिहि लिहु नका... जेवढा वेळ आहे तेवढा आईसंगे घालवा, स्वताला जपा आणि तुम्हि खंबिर आहातच पण स्वत खचु नका.

Pages