मातृत्व

Submitted by अज्ञात on 15 November, 2010 - 21:48

वाहिले मी मोहक्षण माझे सुखाचे
अंतरी माया; मनाचे चोचले
राहिला ओटीत ह्या बिलगून पान्हा
तृप्तसे मातृत्व मजला लाभले

नाहि कळले; रोहिण्यांतुन स्वत्व ओघळले खरे
उमलले गात्रांतुनी अंकूर तान्हे ते कसे
आज मी माझी न आहे एकटी-
द्विज भावना अंकीत माझ्या अंगणी

झाला सखा माझा पिता; मी आदिभार्या वत्सला-
ऋण जन्मदेचे फेडतांना जन्म अवघा व्यापला
देह अंगारून गेली चांदणी;.....
रवि-चंद्र ओवाळून सजल्या भावना..............

....................अज्ञात

गुलमोहर: 

वाहिले मी मोहक्षण माझे सुखाचे
अंतरी माया; मनाचे चोचले
राहिला ओटीत ह्या बिलगून पान्हा
तृप्तसे मातृत्व मजला लाभले

छान कविता !!

सृजनाचा नवोन्मेष आहे हा..!
तुझ्या मनात उसळणारा हा निर्झर असाच वहाता राहू देत..!
Water_spring_350.jpg

शेवटच्या दोन ओळी खास आवडल्या.

देह अंगारून गेली चांदणी;.....
रवि-चंद्र ओवाळून सजल्या भावना..............

>>> क्या बात है!