घरखुळ (भाग ५: फलश्रुती)

Submitted by योग on 23 May, 2008 - 14:34

माझ्या या सर्व धावपळीत राणी मनाने माझ्यासोबत होती. प्रत्त्येक दिवशी घडलेल्या घटना, आलेले अनुभव, शेवटी मिळालेल घर याची रोजची दैनन्दिनी email, sms, वरून तीच्यापार्यन्त पोचत होती. टेक्नॉलॉजी कमालच आहे.. "कबूतर जा जा" म्हटल की हे sms रुपी कबूतर पार साता समुद्रापार सन्देश देवून पुन्हा एका मिनीटात परतीचा निरोपही घेवून येत, आणि चोप्रा, बडजात्यांच्या चित्रपटासारख कुठलही "फूटेज" न खाता. शिवाय आमच्या सन्कुलाची थेट website असल्याने इतक्या दूरवरूनही जागा, लोकेशन, इमारत, घराचा प्लॅन इतर माहिती अगदी घर बसल्या तिला पाहता येत होती. राणीच्या पसंतीच शिक्कामोर्तब झाल्यावर या घरखुळ अध्यायाची तेव्हडी फलशृती बाकी होती..म्हणजे (छे छे) गृहप्रवेश नव्हे, "रजीस्ट्रेशन".

या एका गोष्टिबद्दाल मि पूर्ण अनभिज्ञ होतो हे मान्य करावे लागेल, इतक की ते रजीस्ट्रेशन ऑफिस कुठे आहे इथपासून सुरूवात.

मग पुण्याहून आल्याच्या दुसर्‍याच दिवशी वडीलान्ना घेवून त्या ऑफिसात गेलो. तिथला एकन्दरीत कारभार अन जमावडा सर्व तपशिलासकट द्यायचा तर एक नविन अध्याय सुरू करावा लागेल पण एक(च) ब्रेकींग न्यूज कशी वेग वेगळ्या अंगाने दिवसभर देतात तशी आजची ब्रेकिंग न्यूज म्हणजे "एका दिवसात रजिस्ट्रेशन" ही बातमी अशी वेग वेगळ्या अंगाने देता येईल (पाठीमागचे म्युझिक ज्याचे त्याने वाजवायचे):
१. ऑफिस बाहेर खूप मोठा जमाव, कल्लोळ, अन धकाधकी. "दंगल्/बॉम्ब अफवा/नोकरी भरती" इत्त्यादी कुठलिही शंकाजनक गतीविधीया नसून "ओ हे तर रोजचच आहे..रजिस्ट्रेशन तिकड तिसर्‍या मजल्यावर" अशी तिथल्या रखवालदाराने आमची कान उघडणि केली. "कुठून जायचे"?(अशा सरकारी इमारतींचे जीने नेहेमी कुठून तरी मागच्या बाजूने असतात लक्षात असू द्या.) या आमच्या प्रश्णावर थेट त्या ऑफिस पर्यन्त पोचेल अशी मोठी तंबाखुची पिंक त्याने टाकली, तिला follow करत आमचे आगेकूच..
२. नव्वद अंशात गुडघ्याच्या वाट्या दुमडणार्‍या पायर्‍या चढून वर गेल्यावर तिथली अवस्था पाहून या वार्ताहाराची फक्त "शा!" एव्हडीच प्रतिक्रीया...
३. जन्म, मृत्त्यू, विवाह, प्रॉपर्टी, चलन, "franking" या पाट्या अन त्याखालची खिडकी यान्चा काडीचाही संबन्ध नसल्याने "कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे.." म्हणत त्या अन्धार्‍या गाभार्‍यान्तून आपला नवसाला पावणारा देव शोधत एक गोल प्रदक्षिणा..
४. "अशा" प्रकारच्या सर्व कार्यालयातले कामकाज हे फक्त "नजरेच्या ईशार्‍यातून" होत असते (तुमची पूजेची थाळी जितकी वजनदार तितका देव लवकर प्रसन्न होतो. खरे "साधक" असाल तर त्या गाभार्‍यातील मूर्तीच्या डोळ्यातील हावभाव लगेच ओळखाल.. त्याने मिश्कील हसू दिले तर पूजा पोचली, मख्ख राहिला तर अजून रांगेत थांबा, डोळे वटारले तर संकल्प मोडला, असे समजा). मग हे सर्व कामकाज "मराठीतूनच" झाले पाहिजे हा फुकाचा वाद कशाला?..
५. "आधीच सांगत होतो खाली एजंट ला पकड" या वडीलधार्‍या सल्ल्याचा केवळ त्तत्विक कारणाने अवमान केल्याने आता असे पाय्-ऊतार होवून पुन्हा गुडघ्याच्या वाट्यांचे खुळखुळे करत तीन मजले उतरून पुन्हा खाली...
६. मगाच्याच रखवालदाराच्या बाजूला बसलेला आमच्या शहरातही न राहणारा पण इथे property विषयक कामे करून देणारा एजंट. आम्हाला वर जाताना त्याने पाहिलेले असते, पुन्हा हात हलवत आम्ही खाली परतल्यावर त्याचा "आजका रेट" वाढलेला...
७. तुम्ही इथ नसणार मग वडीलान्च्या नावाची वेगळी "registered power of attorney" लागते, दोन साक्षीदार, रेजीस्ट्रेशन अर्ज, फी, xerox, इत्त्यादी सर्व मिळून आजच्या आज काम करून हवे असेल तर package rate फक्त १०,०००/-.. package details: प्रत्त्येक खालच्या टेबलावर एक गान्धीबाबा, वरच्या टेबलावर दोन, एजंट चा पोर्‍या, धावपळ, कमिशन, रीतसर पावती (मात्र पंचवीस रुपयाची)
८. घासाघीस करून मग ६०००/ वर डील. तिकडे अजून रजीस्ट्रेशन ला आलेली एक बाई व तीचा मुलगा आमच्या अर्जावर तर आम्ही त्यान्च्या अर्जावर साक्षीदार, अशी कामानिमित्त ओळख, अन "नडलेल्यांची" जात, भेद विसरून एकजूट...
९. "आता तुम्ही या सन्ध्याकाळी चार वाजता..अजोबा घरी आराम करा.." एजंट ने property doctor असल्यागत आम्हाला दिलेला डिस्चार्ज..
१०. पाच वाजता अर्ध्या उघड्या शटरखालून माझा एजंट बरोबर कार्यालयात प्रवेश.. नेमके त्याच वेळी तिथले गेलेले लाईट, कुणीतरी चक्क स्वताची मांजर बरोबर कामावर घेवून आलेले, तीच्या शेपटीखालून माझी फाईल बाहेर काढली जाते.. बाजूची मेणबत्ती अन मनीचे हिरवे डोळे अशा प्रकाशात आमच्या स्वाक्षर्‍या करून आम्ही रेजीस्ट्रेशन उरकतो. अजून एक गांधीबाबा त्या स्वाक्षरी वाल्या टेबलवर बक्षीस म्हणून ठेवल्यावर "म्यॅव"म्हणून मनी खुशीने सम्मती देते.. इतका वेळ तीचे नुसतेच शेपूट आपटणे का चालू होते त्याचा उलगडा...
११. ६०००/ च्या डील वर पुन्हा एक पाचशेची बक्षिशी देवून अन एजंट्च्या शुभेच्छा अन आवर्जून दिलेले कार्ड घेवून आम्ही घरी परत..
१२. तिथून रिक्षाने घरी येताना केवळ पाच मिनीटात- करप्शन, लाचारी, अनैतीकता अशा सर्व कचर्‍याचा डोक्यातून पूर्ण निचरा झाल्याने "जग जिंकले" अशी भावना..

तर "एक दिवसात रजिस्ट्रेशन" ची ये थी ऑखो देखी कहानी.. देखते रहीये घरखुळ..

***************************************************************************************

आशिर्वाद, शुभेच्छा, नमस्कार, चमत्कार आटोपून मि परतीच्या विमानात बसलो अन या निव्वळ तीन आठवड्यात केलेल्या उलाढालींचा अहवाल काढता काढता मेन्दूने कधी good night म्हट्ले कळले नाही.. जाग आली तेव्हा विमान जमिनीवर उतरायला अगदी थोडा वेळ बाकी होता.
मग विमान उतरल्यावर पुन्हा दुसरे डोमेस्टीक कनेक्शन घ्यायला काऊंटर वर गेलो तर ही एव्हडी गर्दी, रांगा, कल्लोळ! न भूतो न भविष्यती अशा आगीत कॅलिफोर्निया जळत होता.. इतका की निव्वळ धूराने visibility poor असल्याने सर्व लोकल विमाने रद्द! घरापासून निव्वळ तीन तासावर असून घरी जाता येत नही अशी स्थिती..अन अचानक जाणवले:

बापरे, आमचे घरही आगीच्याच आजूबाजूच्या परिसरात होते. देशातून परत निघाल्यापासून राणीशी काहीच कॉन्टॅक्ट नसल्याने धास्तावून गेलो. काय झाले असेल?
तिकडे मि पोचतो की नाही, कधी आगीमूळे स्थलांतर करावे लागेल या चिंतेत राणी.. दोघान्ची इतकी काळजी एकमेकाना त्या एकाच दिवशी जितकी झाली तितकी आधी कधीच झाली नसेल! शेवटी विमानाची वाट बघणे सोडून एक गाडी रेंट करून थेट ड्राईव्ह करून रात्री उशीरा घरी पोचलो.

तीन आठवड्यांची धावपळ, मानसिक, शारिरीक, तात्विक स्ट्रेस, वीस तास विमान प्रवास, मग पुढे आठ तास आगीमूळे खोळंबा, अन नंन्तर दोन तास ड्राईव्ह.. एव्हाना शरीराने "राम" म्हणायची वेळ आली होती. देशातून निघालो तेव्हा कधी एकदा राणीला भेटून सर्व सांगतो, घराचे फोटो वगैरे दाखवतो अस झाल होत.. घरी पोचेपर्यंत मात्र कधी एकदा तिला बघतो इतकीच माफक अपेक्षा.

दार उघडल्यावर मला असे थेट दारात उभा पाहून राणीने एक घट्ट मिठी मारली.

"घराला घरपण देणारी माणस(च)"! अगदी पटलं!

(*समाप्त*)
**********************************************************************************
मि real estate consultant ही नाही किव्वा त्यातला फार मोठा तज्ञही नाही, पण पुढच्याला ठेच अन मागचा शहाणा केवळ म्हणून खालील आगाऊ सल्ला.
"पटल तर घ्या नाहीतर सोडून द्या.." अगदी पुणेरी इश्टाईल Happy

१. घर अन संसार एक मोठी investment.. तेव्हा दोन्हीकडे कुठलीच घाई नको. वेळ लागला तरी बेहत्तर, पण "its worth the wait"..
2. कुठल्याही मोठ्या शहरात घर घ्यायचे तर हिरव्यागार डोंगरावर हमखास शुभ्र असे घर असणारे painting मनातून प्रथम पुसून टाका. जिथे कॅनव्हासच खडबडीत आहे तिथे रंग भरणे महत्वाचे, कोलाज चिकटणार नाही.
३. घर बान्धणे, विकणे, अन ते घेणे ही एक शर्यत होवून बसली आहे.. या मॅरेथॉन मधे पळायचे असेल तर आपला मैलाचा दगड आधीच ठरवून घ्या, अन्यथा फक्त दमछाक अन पळत पळत "ये कहा आ गये हम" म्हणायची वेळ येते.
४. खिसा, पैसा, आवड, निवड, मान, मरातब, status, सुख या सर्व गोष्टी "माया" या सदरात मोडतात असे संत सज्जन सांगून गेले. मायेची माणसं जिथ आपल्या बरोबर राहतील तिथल्या वन रूम किचम मधले सुखही गगनचुंबी टॉवर पेक्षा वरचे आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवली की dream and reality यांचा सुरेख संगम साधता येतो.
५. आजकाल गृह कर्जे देणे- घेणे हे वाणिसामान मागवण्याइतके सोपे झाले आहे.. दुर्दैवाने फार कमी वित्तसंस्था अशा आहेत ज्या फक्त तुमचे हित ध्यानी ठेवतात. fsi, noc, oc, plans, blue-print (इमारतीचे सर्व नागरी अधिकार्‍यान्नी पास केलेले कागद्पत्र), बान्धकाम या सर्वाची कसून तपासणी करणार्‍या बॅन्का(च) शक्यतो निवडाव्यात.. तिथे वेळ लागेल, अन बिल्डर, सात दिवसात पैसे द्या म्हणून प्रेशरही आणेल, किव्वा आम्ही फक्त याच बॅन्केशी व्यवहार करतो असे सान्गेल.. अशा वेळी आपले हित कशात आहे हे पूर्ण लक्षात असू देत. Risk आपण घेत असतो, bank किव्वा builder नव्हे. पुढे कायमची डोकेदूखी विकत घेण्यापेक्षा "जरा सबूरीने".
६. घर घेण्याआधी त्यातील तज्ञान्कडून एकन्दरीत त्या क्षेत्राची, त्यातील टेक्निकल टर्म वगैरे माहिती करून घ्या. बहुतांशी real estate agents/consultants यान्ना त्यातल टेक्निकल (बांधकाम विषयक) ज्ञान कमीच असतं. असा एखादा माहितगार हितचिंतक कायम तुमच्या मदतीला असू द्यात.
७. प्रत्त्येक लेन देन व्यवहाराची पावती, कागदपत्रे, अगदी email communication ची कॉपी, जमलच तर साईट फोटोज, सर्व व्यवस्थित फाईल मधे असू द्यात्..
८. "सुंदर माझ घर" असा पूर्वी दूरदर्शन वर एक छान घरगुती कार्यक्रम येत असे, त्याच धर्तीवर घेतलेल्या घराच सौंदर्य "वाढवायला" पुढे अधिक खर्च येवू शकतो त्याची तजवीज आधीच गृहकर्जात करता येईल का हे बॅन्केला/कर्जसंस्थेला आवश्य विचारून घ्या.
९. सर्वात महत्वाचे म्हणजे "home insurance". काळ अन वेळ येण्या आधी धान्डे बाईन्सारखा मिस्स्ड कॉल देत नाहीत..तेव्हा कुठेही कसेही असलात तरी "कव्हरेज" आहे याची खात्री करून घ्या.
१०. अधिक काय लिहावे, हे "घरखुळ" एक आनंद देणारं खूळ आहे, तेव्हा घर पहावे बान्धून.

!!!! शुभं भवतू !!!!

योग.

गुलमोहर: 

अजून एक गांधीबाबा त्या स्वाक्षरी वाल्या टेबलवर बक्षीस म्हणून ठेवल्यावर "म्यॅव"म्हणून मनी खुशीने सम्मती देते.. >>>
========================================
मनी ला मनी समजणार नाही तर कोणाला Lol Lol

बा.जो.,
अधिक (फुकट नाही पेड) माहितीसाठी संपर्क साधा Happy
पुण्यात घर घेतल्यावर या वाक्यातील मतीतार्थ मला ऊमगला!

धन्यवाद, आपला अनुभव शेअर केल्याबद्दल आभारी आहे. लिखाण वास्तववादी झाले आहे. आता नांदा सौख्यभरे.

Pages