Driving?नको रेss बाबा!!

Submitted by प्रज्ञा९ on 23 May, 2008 - 14:18

"छे!गेली १० वर्षं गाडी चालवतेय,पण असलं भयानक ट्रॅफिक बघितलं नाही कधी!"

मी जामच वैतागले होते.आईपण कशीबशी माझ्या मागे जीव मुठीत धरून बसली होती.
तशी मी भित्री नव्हेच,किंबहुना शूरवीरच म्हणायला हवं मला,पण आज मी हात टेकले!
खरं म्हणजे lisence नसताना पुण्यासारख्या ठिकाणी मी व्यवस्थीत driving केलं होतं,तेही १७व्या वर्षी.मस्तपैकी रस्ता-बिस्तापण चुकले होते,पण त्यातलही thrill(?) enjoy केलं होतं.आईला हे समजलं तेव्हा तिने चांगलीच हजेरी घेतली होती माझी!
***********************
पण नाशिकचं traffic बघुन मात्र ती चकित झाली होती.
"इथे शिस्त कशी ती नाहीच!त्यातून हा पुणा-नाशिक हायवे!जीव थार्यावर नसतो घरी परतेपर्यंत."

माझ्या driving वर आईचा खूप विश्वास्.मी नीट सांभाळून गाडी चालवते असं तिचं मत.(खरंच आहे ते!)मी जेव्हा Permanent Licence काढायला RTO मधे गेले होते तेव्हा तिथल्या एजंटने सहज विचारलं होतं,कुठे कुठे गाडी चालवलीय म्हणून्.मी बिन्धास्त सांगितलं होतं,पुण्यात चालवल्याचं.
"हो ना!मग तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गाडी चालवाल!"
पुण्यातलं Traffic अतिशय बेकार असल्याचं अनेक पुणेकरांनीच कबूल केलं होतं..

आज हे सगळं आठवलं कारण आज अगदी पडता पडता वाचले मी.सिग्नल वगैरे आपल्यासाठी नसतातच असा इथल्या रिक्क्षावाल्यानी ग्रह करून घेतला असावा.मला ग्रीन सिग्नल मिळल्यावर मी निघाले तेव्हा शेजारून एक रिक्षावाला सुसाट गेला.वर पुन्हा मलाच काहीतरी बोलून गेला.
मी गाडी थांबवली नि सरळ Traffic Police शोधून त्यांना विचारलं.
"काय सांगू मॅडम,आहो यातल्या येकाला जरी आमी पकडलेलं कळलं तरी कोन्तातरी राजकीय पक्ष रस्त्यावर उतरतोच बघा!आमी तरी काय करनार्?आमालाबी फ्यामिली न पोरंबाळं हायेत."
या उत्तरावर मला पुढे काही सुचेचना.मी शांतपणे किक मारली.आई आणि मी घरी निघालो.ती बिचारी माझी समजूत घालत होती.मधेच मागे बसून running comentry करत होती.
"...थांब,मागून volvo येत्येय,ती जाऊदेत.."
"..अगं अगं,जरा हळू घे!समोर बघत्येस ना?"
"लाल सिग्नल आहे,लक्ष आहे ना?.."
शेवटी,"घे!तूच चालव आता!!"असं मी म्हटल्यावर ती शांत झाली.कारण तिला माहिती होतं,तिने नुसती किक मारायचा प्रयत्न केला अस्ता तरी आसपासचे ४ लोक गोळा झाले असते.

या सगळ्या गोंधळातून वाट काढत,२५च्या स्पीडने मी गाडी चालवत होते,नि आई मात्र वाणसामानाच्या पिशवीचं टोक,पदर आणि जीव मुठीत घट्ट धरून बसली होती!

घरी आलो तेव्हा मला जाणवलं,माझ्या हातांत आणि पायातही गोळे आले होते!

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी शिकतानाची गम्मत Happy
ड्रायवींग टेस्ट च्या अगदी आदल्या दिवशी सरावाच्या वेळी गाडी उंचावरून री-व्हर्स आणताना अगदी एका कुशल जलतरंग वादका प्रमाणे मी सगळे खांब वाजवत आणली Happy
आणि वेडा इन्स्ट्रक्टर माझ्या संगीत वादनाला दाद द्यायच्या ऐवजी विवादी सूरात माझ्यावर डाफरत राहीला Proud

मी जेव्हा लेग-गिअर एम-८० शिकत होते(मला सगळ्यांनी स्वदेस-बाईक म्हणून खूप चिडवलं होतं,स्वदेस रिलीज झाल्यावर!) तेव्हा अशीच धमाल आली होती.
गाडी 1st वर घेणं जमेना.कधी बंद पडे,तर कधी जास्त accelerate होउन २ फूट वर!तरी बरं,बाबा मागच्या सीटवर बसूनच शिकवत होते!२५ km १ल्या दिवशी झाले,आणि मी गाडीचे पैसे पाण्यात घालवले(भर जुलैमधे रत्नागिरीतला पाऊस!)अशी आईबाबांची खात्री झाली.पण जमलं एकदाचं!
नव्याने चालवायला लागले तेव्हा एका बंद दुकानाच्या बाहेर असलेल्या कायनेटिकच्या मोडक्या सांगाड्याला ठोकलं होतं.त्यानंतर कावासाकी मात्र शिस्तीत शिकले.

..प्रज्ञा

लहान पणी सायकल शिकताना मी हँडल अगदी व्यवस्थीत धरायचो पण पँडल मारण्याच्या बाबतीत अगदी आळशी होतो (आहे) Happy
गाडी शिकताना अगदी तसच. सुकाणू (स्टीयरींग) मी व्यवस्थीत धरायचो आणि ब्रेक आणि ऍक्सलेटर मारायच काम इन्स्ट्रक्टर करायचा Proud

माझे गियर टाकण्याचे प्रयोग
***********************************************

गियर गाडीतच असतो मग आपण गियर टाकणे अस का बर म्हणतो Happy
.
मी गियर टाकताना माझ्यात आणि इंस्ट्रक्टर मध्ये घडलेला संवाद Happy
" गियर बरोबर पडलाय का ?"
" नाही अजून "
" आता? "
" बरोबर पडलाय. पण १ ल्याच्या ऐवजी ३ रा पडलाय"
" आता ? "
" ..."
" काहीतरी जळल्याचा वास येतोय ."
" हू .. "
" लोकांना समजत नाही"
" ह .. "
" रस्त्यावर जाळतात रबर"
" नाहीतर काय. "
" पण काय बर जळतय ? "
" आपला गियर बॉक्स"
*************************************************

अनेकांचं रंगीबेरंगी लिखाण खणताना माझ्याच जुन्या पाऊलखुणा वर काढाव्याश्या वाटल्या!
माझं मायबोलीवरचं हे पहिलंवहिलं लिखाण! Happy जस्ट अ शेअरिंग..

प्रज्ञा, उत्खनन करता करता रिक्षाही चालवायला लागलीस की! Lol

तर छान जमलंय हे पण स्पेलिंगच्या चुका दुरुस्त करणार का? (पहिलं लेखन असलं तरिही?) Happy

केदार . कुशल जलतरंगवादक Lol , काय बरं जळतय? आपला गियर बॉक्स!! Lol
मी लहानपणी सायकल शिकत असतांना एका म्हशीला ठोस मारली होती व पुढले चाक वाकडे झाले होते. Lol