मुडदुशांचे (नगली) कालवण

Submitted by शैलजा on 12 November, 2010 - 23:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

६ ताज्या नगली, मोठ्या मिळाल्या तर मज्जाच!नाहीतर जरा मध्यम आकाराच्या चालतील. काय करणार?
वाटपासाठी : २ टीस्पून धणे, १ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा तिखट, छोट्या आकाराचा एक कांदा - चिरुन, ५-६ मिरी, १ नारळाचे खोबरे (कोकणी/मालवणी पद्धतीमध्ये नारळाचा सढळ हस्ते वापर असतो, तुम्हाला कमी वापरायचा असल्यास, त्याप्रमाणे घ्या. चवीत मात्र फरक पडेल. )
इतर: किंचितसे आले - छोटा तुकडा अगदी बारीक चिरुन, १ टेबलस्पून तेल.
मीठ, थोडासा चिंचेचा कोळ.

क्रमवार पाककृती: 

ताज्या नगल्या ओळखायची खूण म्हणजे त्या अगदी चकचकीत दिसतात. अतिशय देखणी आणि स्वच्छ अशी ही मासळी आहे. साफ करण्यासाठीही अधिक कष्ट घ्यावे लागत नाहीत.

खवले काढून टाकून नगल्या साफ करुन घ्याव्यात. दुकानातूनच माशांचे खवले साफ करुन, कल्ले काढून आणि मासे कापून देतात, पण घरी साफ करायचे असतील, तर सुरीची बिनाधारीची बाजू, खवल्यांच्या विरुद्ध दिशेने फिरवली असता खवले निघतील. विळीच्या पात्यावर जमिनीला समांतर असे मासे फिरवले असताही खवले निघतात, पण ह्याला प्रॅक्टीस लागेल. डोके व पोटात काही घाण असेल तर काढून टाकावी. कल्लेही काढावेत. नगलीचे २ वा ३ तुकडे करावेत व थोडा वेळ मीठ लावून ठेवून द्यावे. चिंचेचा कोळ वगैरे लावायची गरज नाही, कारण नगलीला उग्र वास नसतो.

१ वाटी खोबरे, चिरलेला अर्धा कांदा, मिरी, धणे हळद व तिखट ह्यांचे वाटप करुन घ्यावे.
उरलेल्या खोबर्‍याचा पहिला जाड रस काढून घ्यावा. पुन्हा एकदा वाटून अजून रस काढून घ्यावा. हा दुसर्‍यांदा काढलेला रस जरा पातळ असतो.

हे झाले की नगल्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.

१ टेबलस्पून तेल तापवून त्यात थोडा बारीक कांदा व बारीक चिरलेले आले टाकून चांगले नरम गुलाबी रंगावर परतावे. त्यवर धुतलेल्या नगल्या टाकाव्यात. वाटप व नारळाचा रस घालावा. चवीनुसार मीठ घालावे. अर्धा टीस्पून चिंचेचा कोळ घालून व नारळाचा रस व वाटप ह्यांचे मिश्रण अगदीच जाडसर झाले असेल, तर थोडे पाणी घालून मंद विस्तवावर व्यवस्थित उकळी आली, की गॅस बंद करायला हरकत नाही.

वाढणी/प्रमाण: 
२ ते ३ जण.
माहितीचा स्रोत: 
आज्जी, आई.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फ्राय मुडदुशा खाल्लेत..ये भी ट्राय करना पडेगा...रेशिपी आवडली नोट करुन योग्य व्यक्तींकडे पोचवणेत येईल Happy म्हणजेच खायला मिळेल Wink

मेधा, आम्हालाही नाही मिळालेल्या बर्‍याच दिवसांत. हे आपलं आठवण आली नगल्यांची म्हणून.. Happy

शैलजा आता तूही ? इतके दिवस जागू जळवायची आता तू Wink
मस्त आहे गं. पण लसूण अजिबात नाही Uhoh पन मिर्‍यानी मस्त वेगळीच चव येईल नाही. आता शोधते पुण्यात कोठे मिळतात का. आता निघतेच आहे मासे खरेदीला Happy

नगलीचा वास उग्र नाही. खरं तर पापलेटसारखीच मासळी आहे ती, बिन वासाची. चवही सौम्य आहे, म्हणून लसणाची गरज नाही. Happy

मुड्दुस हे फक्त रोगाचं नाव आहे असं समजत होते.. Wink
तुम्हा लोकांना कित्त्त्त्ती प्रकारचे मासे माहीत असतात.. आमची गाडी सुरमई, पापलेट, कोळंबी, हलवा, रावसच्या पुढे काही जात नाही. Uhoh

हे लहान मासे म्हणजे मुडदुशे, मांदेली, सौंदाळे, पेडवे, शेतकं यांनाच खरी चव असते. पण दुर्दैवाने अशा माशांची मागणी फार कमी झाली आहे, त्यामुळे बाजारात येतही नाहीत. Sad मला आमच्या गोरेगावच्या बाजारात वर्षभरात एक-दोन वेळा सौंदाळे मिळतात. मुडदुशे मात्र भरपूर, विशेषतः पावसाळ्यात.

अगं अगं चिंगी,मूडदूस नाही गं Proud
भ्रमा म्हणतोय तसं खरी चव लहान मासळीलाच असते. मोठी ठराविक मासळी आजकाल सगळ्यांना ठाऊक असते, पण अस्सल मासेखाऊ लहान मासळीचीच निवड करणार. Happy

>>मुडदुशे हे मांदेलीचे कझिन आहेत.>> Lol
मस्ट असो वा मस्त दक्षे तू म्हटलस म्हण्जे.... Happy फोटो बघून खायनसा दिसला हा काय?

शैलजा मस्तच.
आता मला मार्केटमध्ये मुडदुशा शोधायला लागतील. नाही मिळाल्या तर समुद्रावर जाळ लावुन बसायला लागेल.

फोटो वरुन तरी मुडदुसे म्हणजे काणे फिश अअसे दिसतेय. हे काणे फ्राय मुंबईत समथींग फिशी (तुंगा ईंटर नॅशनल) आणि बँगलोर ला कूडला मधे मस्त मिळतात. कालवणातले हे मासे अजुन खाल्ले नाहित

माझ्या तोडांक पानी सुटला. पुण्याला कोणच्या हाटलात नगलीच कालवण मिळत ? कलकत्ता बोर्डीग बंद झालय. तिथ फक्त मोठ्ठा मासा मिळायचा.

शैलू तू हाटेलच टाक बघू कसा. तेव्ह्ढीच पुणेकरांची पण सोय जायत नी तू पण त्यानिमित्ताने नवीन व्यवसायात येशीत. Happy आणि जागू तू ईथे मुंबयत टाक. मुंबयकरांची सोय Proud

Pages